Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 03/13/2009 - 05:11
  • Log in or register to post comments
  • 47058 views

Book traversal links for माझं खोबार... भाग ८

  • ‹ माझं खोबार... भाग ७
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by प्राजु on Fri, 03/13/2009 - 05:51

Permalink

अक्षरशः एक अध्याय आहे हा.

इतक्या प्रवाही भाषेत, इतकं आत्मियतेनं तुझ्या खोबारला आमच्यासमोर उभं केलंस की, आम्ही तिथेच तुझ्या शेजारीच होतो सगळ्या प्रसंगात असंच वाटायला लागलं होतं. हे खोबार म्हणजे खरंच एक अध्याय आहे. एका वेगळ्या खास करून कट्टर मुस्लिम देशाबद्दल जी काही खरी-खोटी माहीती असते, त्यावर बराच प्रकाश पडला या लेखमालिकेमुळे. खूपच सुंदर. बिपिनदा, हे तुझे लेख तू पैलतीर ला पाठव. प्रत्येक आठवड्यात एक याप्रमाणे. लोकं डोक्यावर घेतील खोबारला. खूप खूप सुंदर मालिका. अभिनंदन! आणि.... ________/\___________ :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/13/2009 - 06:03

Permalink

बिपिनभाऊ,

अनुभव वाचून ज्ञानात भर पडली असेच म्हणावे लागेल. इतक्या सुंदर रितीने खोबार आमच्या समोर उभं केलत त्याबद्दल धन्यवाद! ही मालिका संपणार आहे हे विसरायला लावलेत यातच सर्व काही आले. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Fri, 03/13/2009 - 06:08

Permalink

अप्रतिम !!

अप्रतिम !! मस्त झालाय हा भाग... संपवू नकोस ना प्लीज... ही मालिका फार छान वाटतेय वाचायला.. सुफळ संपूर्णचा प्रचंड राग आला ! >:P आता एक बावळट प्रश्न... मला पहीला जोक कळलाच नाही !! :( ( बहुतेक खोबार मधे उजव्या साईडने गाडी चालवतात की डाव्या ही माहीती नसल्यामुळे झाले असेल.. कोणीतरि समजवा!!) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 03/13/2009 - 06:14

In reply to अप्रतिम !! by भाग्यश्री

Permalink

अगं...

अगं.... तो ड्रायव्हर ग्रीन सिग्नलला थांबला कारण उजव्या बाजूने म्हणजे इंटरसेक्शनच्या (रस्त्याच्या नव्हे) उजव्या बाजूने... ज्या बाजूच्या लोकांना रेड सिग्नल असेल तिथून रेड सिग्नल जंप करणारा एखादा टॅक्सीवाला येईल ना सुस्साट्ट.... म्हणून हा ग्रीन सिग्नल असूनही थांबला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Fri, 03/13/2009 - 06:22

In reply to अगं... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

ओह.. अच्छा..

ओह.. अच्छा.. :) जोक समजावून सांगायला लागणे म्हणजे अगदी फ्लॉपच शो ना! :( http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मृण्मयी on Fri, 03/13/2009 - 06:29

Permalink

शेवटचा भाग? :(

आधीच्या सगळ्या भागांइतकाच सुरेख! वाघाला केळी... !!!! सही जोक!!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 03/13/2009 - 06:31

Permalink

उत्तम

ही लेखमाला संपू नये, असं वाटत होतं. हा भाग छान उतरला आहे. किस्से आणि विनोद रंजक आहेत. अलीकडेच न्यू यॉर्क टाईम्समध्ये सौदीतल्या बेदरकार ड्रायव्हिंगचे कारण तिकडे इतर जवळपास सर्व गोष्टींवर असणारी जाचक बंधने आहेत हे सांगणारा एक लेख वाचला होता, तो आठवला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 03/13/2009 - 06:40

Permalink

मस्त लेखमाला

शेवटही रंजक. माहितीपूर्ण म्हणावासा! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 03/21/2009 - 02:06

In reply to मस्त लेखमाला by बेसनलाडू

Permalink

असेच म्हणतो

उशीरा वाचला, पण हुकला नाही म्हणून बरे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on Fri, 03/13/2009 - 06:45

Permalink

अहो

अहो बिपीनभाऊ, आठच तर भाग झाले आहेत. इतक्यात कुठे संपवता.;) लेखमाला मस्तच झाली. खोबारबद्दल बरेच काही कळले. अजुन लेख येउद्यात. - सूर्य.
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली हसमनीस on Fri, 03/13/2009 - 06:54

Permalink

अप्रतिम---

बिपिनदा,सर्वच भाग अप्रतिम झाले आहेत.एखादी सुंदर कादंबरी वाचल्यासारखे वाटते आहे.वेगळा देश, वेगळे अनुभव,त्यातही सुंदर लेखनकौशल्य,त्यामुळे वाचताना मजा आली.मीही एका प्रगत मुस्लिम देशातच राहते,पण माझे अनुभव फारच वेगळे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची on Fri, 03/13/2009 - 07:26

Permalink

सफळ संपूर्ण

मिपावर आल्यावर पहिलाच लेख "माझं खोबार" बघितला आणि पटकन वाचायला घेतला.वेड लावलंय तुमच्या खोबारने.आताचा लेखही खूप छान झाला. =D> =D> =D> >>निरनिराळे लोक भेटले, नाना देशीचे नाना तर्‍हा असलेले नमूने बघितले, आपल्या स्वभावाला शक्य आणि आवश्यक तेवढी मुरड घालून त्यांच्याशी कसं जमवून घ्यायचं ते कळलं. एक नविन संस्कृती / भाषा जिच्याबद्दल लहानपाणापासून सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकून एक वेगळीच प्रतिमा मनात निर्माण झालेली असते, तिच्याबद्दल खूप काही शिकायला मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं.... माणूस नावाचा अनाकलनिय आणि अतुलनिय प्रकार हा एका विशिष्ट पातळीवर सगळीकडे सारखाच असतो हे थोडंफार समजलं. सौदी अरेबियासारख्या कट्टर मुस्लिम देशात तुम्हाला आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांचं चित्रण आम्हालाही बरच काही शिकवून गेलं. अहो बिपिनदा,पण इतक्यातच "सफळ संपूर्ण." :O ठीक आहे,अशीच तुमच्या अनुभवांची गाठोडी आम्हाला यापुठेही उघडून दाखवा ही विनंती. :) :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Fri, 03/13/2009 - 07:32

Permalink

"माझं" खोबार

तुमचे अनुभव ८ ही भागात छान उतरले आहेत. सगळे अनुभव - काही बरे, काही घुसमटवणारे असले तरी खोबारला "माझं" खोबार म्हणावं ह्याचं थोडं आश्चर्य वाटलं. तुम्हाला उद्विग्न करणारे अनुभव आल्यानंतर "गड्या आपुला गाव बरा" असं कधी वाटलं होतं का?
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 03/13/2009 - 09:09

In reply to "माझं" खोबार by विंजिनेर

Permalink

+१

हाच प्रश्न मनात आला ! * सुंदर लेख माला ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by शुभान्गी on Fri, 03/13/2009 - 07:38

Permalink

झक्कास

बिपिनभाऊ, मस्तच झाले लिखाण..........बिपिनभाऊ हे अनुभव तर पहिल्या १/२ वरीसचे हाय...... नन्तरच्या २/३ वरीस चे अनुभव वाचण्यास उत्सुक आहोत ईतक्यात सान्गता नका करु......
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 03/13/2009 - 08:35

Permalink

बिपिनभौ, सुरेख मालिका!

सौदी अरेबियासारख्या मुस्लिम राज्यकर्ते आणि संस्कृती असलेल्या देशाचं जीवन असं जवळून बघताना, तिथल्या रोजच्या जीवनाशी एकरुप होऊन तिथले बारकावे टिपताना तू इतका समरस झालेला होतास की ह्या लेखमालेत तू आम्हाला तुझ्याबरोबर घेऊन गेलास. प्रत्येक प्रसंग, घटना ही जणू तुझ्याबरोबर बघत आहोत इतकी जिवंत वाटत होती. लिखाणातला नर्म विनोदी भाव, अभिनिवेश नसलेली साधी, सोपी, गप्पा मारल्यासारखी भाषा ह्याने मी अतिशय आनंदित झालोय. शेवटच्या भागातले तीनही किस्से एकदम हटके आहेत! आपल्याकडे सरदारजी स्पेशल जसे असतात ना तसे तुझे हे सौदी स्पेश्शल आहेत! :) :) वाघाला केळी हे तर जामच फिट्ट!! ;) तुझ्या मनातलं खोबारचं हे मलईदार खोबरं असं अल्लाद हातानं उकलून आम्हाला आस्ते आस्ते भरवत होतास आणि साठा उत्तराची कहाणी आठा उत्तरात संपवलीस ही बाब मात्र मनाला जाम चुटपुट लावणारी ठरली! कोणत्याही छान गोष्टीलाही शेवट हा असतोच ह्या न्यायाने आम्ही मनाची समजूत घातलीये खरी पण आता तू पुढची अनुभवांची संदूक उघडायची तयारी सुरु करशील ह्या बोलीवरच!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 03/13/2009 - 09:00

In reply to बिपिनभौ, सुरेख मालिका! by चतुरंग

Permalink

वेगळं काय बोलु ?

रंगाशेठशी शब्दशः सहमत ... अजुन वेगळं काय बोलु ? खोबार हे खरोखरच अप्रतिम झाले होते. अगदी पहिल्या भागापासुन ते आत्ता वाचलेल्या अखेरच्या ओळीपर्यंत एकदाही कंटाळवाणे, जडबंबाळ अथवा अतर्क्य असे वाटलेच नाही कधी ... आत्तापर्यंत मी वाचलेल्या सर्वोत्तम आंतरजालीय लेखमालेंमधली ही एक नक्कीच आहे. असेच लिहीत रहा ... पुढच्या भागाची म्हणाणार नाही मात्र पुढच्या "शिदोरी"ची वाट पहातो आहे. आणि हो, मुलाखत कधी देताय ह्या निमीत्ताने ? ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 03/13/2009 - 10:26

In reply to वेगळं काय बोलु ? by छोटा डॉन

Permalink

+१

चतुरंग आणि डॉन्याशी सहमत. खूपच सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिलं आहेस. आणि हो, तू ओसामा बिन लादेनला ओळखतोस असं अल्-जवाहिरी म्हणाला मला काल! ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 03/13/2009 - 11:37

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+२

सहमत. या दिवसात अत्यंत आवडलेली लेखमाला. एका वेगळ्या जगाची करुन दिलेली नविन ओळख. लिखाण म्हणजे निव्वळ अस्सल .. कुठलाही चोथा नाही. प्रचंड आवडलेले. अवांतरः माझा एक आंतरजालिय मित्र मसंस वरच्या संपादकांना मुतव्वे म्हणतो .. त्याची अन इथे दिलेल्या मुतव्व्यांच्या घटनांची सांगड घालुन अंमळ मजा आली. त्यातल्या त्यात त्यांच्या पुनर्वसन क्यांपाबद्दल वाचुन तर अजुनच :)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 03/13/2009 - 11:42

In reply to +२ by आनंदयात्री

Permalink

+३

माझा एक आंतरजालिय मित्र मसंस वरच्या संपादकांना मुतव्वे म्हणतो .. त्याची अन इथे दिलेल्या मुतव्व्यांच्या घटनांची सांगड घालुन अंमळ मजा आली. त्यातल्या त्यात त्यांच्या पुनर्वसन क्यांपाबद्दल वाचुन तर अजुनच
=)) =)) =)) अगदी अगदी ... माझ्या मनात अगदी हेच आले होते व मी लिहणारही होतो , पण म्हटले कशाला ? असो. आंद्यायात्री आणि आमची दोस्ती कशाच्या पायावर बांधली गेली आहे हे आज पुन्हा समजले. चालायचेच ... मात्र आंद्याने दिलेला संदर्भ अतिशय जबरा आहे. खल्लासच ...!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Fri, 03/13/2009 - 10:44

In reply to बिपिनभौ, सुरेख मालिका! by चतुरंग

Permalink

हेच म्हणतो

बिपिनदा - ये दिल अभी भरा नही! :) तू जमल्यास थोडी अजूण भर घालून ह्याचे पुस्तक प्रकाशित कर ना!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 03/13/2009 - 08:38

Permalink

बिपिनभावज

बिपिनभावजी, वरील सगळ्यांशी सहमत. तुमच्या ह्या लेखमालिकेने मिपाला खूप खूप श्रीमंत केलं आहे.. सगळे म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच एक पुस्तक काढा. लोकांना ते अतिशय आवडेल. 'मिपा प्रकाशन' ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी घ्यायला आनंदाने तयार आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 03/13/2009 - 12:49

In reply to बिपिनभावज by विसोबा खेचर

Permalink

१+_

असेच म्हणतो. आता किती वेळा असेच म्हणायचे
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 03/13/2009 - 09:34

Permalink

संपलय?

संपलय? :( लेखमाला सुरेख !!! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 03/13/2009 - 11:52

In reply to संपलय? by अवलिया

Permalink

+१

सहमत. अप्रतीम लेखमाला बिपिनदा. हय लेखमालेनी एक वाचक म्हणुन खुप समृद्ध केले. धन्यवाद. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 03/13/2009 - 09:53

Permalink

बिका,

बिका, येकदम झकास झाली लेखमालिका... अर्र, संपली वाटतं... अशी प्रतिक्रिया झालीच शेवटी... हेच लेखमालेचे यश... :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Sat, 03/28/2009 - 15:15

In reply to बिका, by भडकमकर मास्तर

Permalink

सहमत

अगदि हेच म्हणतो. बिका, अभिनंदन. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 03/13/2009 - 09:57

Permalink

उत्तम!!!

का हो असं लवकर संपवलत बि३का? आम्हाला वाटलं हळूहळू का होईना पण खोबारचे खूप सारे भाग वाचायला मिळतील.
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Fri, 03/13/2009 - 10:05

Permalink

काय म्हणू ?

सुरेख!अप्रतिम!खूप आवडलं तुमचं खोबार! बिपिन भौ, माझं खोबार ही लेखमाला संपल्याचं वाईट वाटतंय. अतिशय सुरेख लेखन आहे आपलं. खोबार जरी तुम्हाला गवसलं असलं तरी आणखी खूप काही वाचायला आवडेल तुमच्याकडून. वरती प्राजू यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच पाठवा ही लेखमाला पैलतीर ला.
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Fri, 03/13/2009 - 10:08

Permalink

अप्रतिम लेखमाला!

बिका, तुमची लिहिण्याची शैली झकास आहे. आणि तिथली परिस्थिती, तुमचे अनुभव, तुमची मतं, बदल, वेगवेगळे किस्से ... असं मस्त सजवलंय पूर्ण लेखांना. ह्या लेखमालेत तू आम्हाला तुझ्याबरोबर घेऊन गेलास. प्रत्येक प्रसंग, घटना ही जणू तुझ्याबरोबर बघत आहोत इतकी जिवंत वाटत होती. लिखाणातला नर्म विनोदी भाव, अभिनिवेश नसलेली साधी, सोपी, गप्पा मारल्यासारखी भाषा ... चतुरंगांनी एकदम बरोब्बर वर्णन केलं आहे... पण इतक्यात समारोप करू नका. अजून लिहा. तुमचा अनुभव मोठा आहे. अजून लिहिण्यासारखं पुष्कळ असेल या बुरख्यामागच्या देशाबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Sat, 03/21/2009 - 12:43

In reply to अप्रतिम लेखमाला! by मैत्र

Permalink

अगदी अगदी.

अगदी अगदी. मैत्रनी म्हटलंय तशी अभिनिवेश नसलेली, गप्पा मारल्यासारखी भाषा. पण निरीक्षणं किती मार्मिक. लिहा, अजून लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Fri, 03/13/2009 - 10:10

Permalink

बिपीनजी, मजा आली!

सगळे भाग फार उत्तम लिहिलेत! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 03/13/2009 - 10:52

Permalink

छ्या...

छ्या... लेखमाला संपली? अजुन अनेक भाग आले असते तरी त्यात तेव्हढीच गोडी वाटली असती हे मात्र नक्की.. :) बाकी वो बंदरवाला जोक भारी है| :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Fri, 03/13/2009 - 11:01

Permalink

उत्तम

१ नंबर मालिका. बिपीनभाई , आता दुबई येऊ द्यात.....
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Sat, 03/14/2009 - 07:02

In reply to उत्तम by शेखर

Permalink

सहमत

दुबईतले अनुभव वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 03/13/2009 - 11:16

Permalink

उत्तम लेखमाला

बिपिनदा ही लेखमाला अतिशय आवडली. अजुन हवीहवीशी वाटताना संपणे यात या मालीकेचे जबरदस्त यश आहे. खोबार, धर्म, संस्कृती, माणसे, अतिशय मनोरंजक किस्से पेरत पेरत बिपिनदा तुम्ही एक फार सुंदर रंगबिरंगी कलाकृती निर्माण केलीत. गोष्टीवेल्हाळ बिपिनदांची मिपाकरांना झालेली ओळख, जुळलेले नाते हे या मालीकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 03/13/2009 - 14:29

In reply to उत्तम लेखमाला by सहज

Permalink

अगदी !!

सहजरावांशी सहमत रे बिपिन, 'तुझं खोबार' फार फार आवडलं, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 03/13/2009 - 11:49

Permalink

.

भारी भारी भारी भारी :) :) :) खोबार एकदम १ नं.
  • Log in or register to post comments

Submitted by सायली पानसे on Fri, 03/13/2009 - 11:49

Permalink

नेहमी प्रमाणेच छान !

बिपिन दादा. मस्त झाला आहे लेख... सगळे भाग खुप छान झाले... पुढच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत.... सायली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 03/13/2009 - 13:28

Permalink

गाउन

बेष्ट ब्वॉ यकदम जंक्शन. काही मान्स काळा गाउन घालत्यात तर काही ढवळा घालत्यात. मुतव्वा सोडुन बाकी मान्सांना रिंग घालने कंपल्सरी हाये का? तिथ मरनाचा उकाडा हाय त मंग काळी कापड का घालत्यात ते? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 03/13/2009 - 13:53

Permalink

Is it all over ?? :-(

Hey बिप असे कसे तू ईतक्या लवकर सगळं संपवलेस ?? Not fair !! प्रत्येक लेख मालेत तू आम्हाला घेऊन चाललास अन आता ही ले़खमाला संपली ? ओह नो ! :-( माझ्या मनात घर करून बसलेल्या खोबारचं ऋण उतरायचं होतं. कोणाबरोबर तरी वाटायचं होतं. ते झालं आता तू दुबई बद्धल लिह अन आफ्रीका अजून बाकी आहे ना ?? ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 03/13/2009 - 14:04

Permalink

१० का वादा था !!

अजून २ लेख माला हव्या आहेत !! बाबा अन मी बोलले होतो की तुला १० लेख माला लिहायला लावू अन त्यानंतर पुस्तक प्रकाशना बाबतीत बघु पण तु तर ८ मध्येच संपवलेस सगळे ?? THIS IS NOT FAIR ...तू मूड OFF केलास BIIIIIIP THIS IS REALLY NOT FAIR THIS CAN NOT BE END ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Fri, 03/13/2009 - 14:51

Permalink

अप्रतिम

अप्रतिम लेखमाला. तुमचं खोबार आता कायमचं मनात घर करून राहणार.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 03/13/2009 - 15:21

Permalink

मस्त.

लेखमाला खूप आवडली. छान लिहिलयं. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Fri, 03/13/2009 - 17:11

Permalink

सुंदर

अप्रतिम लेखमाला!! पण ८च भागात संपवली हे काही आवडलं नाही. :( आम्हाला तुमच्या खोबारची सफर घडवल्याबद्दल अनेक आभार!! <<तू असशील वाघ... पण तुझा व्हिसा माकडाचा आहे. तुला केळीच मिळतील.<< हाहा... खूप हसले. आता पुढची लेखमाला कधी सुरु करणार?? --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Fri, 03/13/2009 - 17:30

Permalink

कार्यकर्त

कार्यकर्ते, लेखमाला फार आवडली. छान पुस्तक होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 03/13/2009 - 17:36

Permalink

छान

हा भाग जमून आलाय. छान. इतर भागांतील भ्रमंतीही येऊ द्या (मध्यंतरी आफ्रिकेतले लिहिले होते तुम्ही). अशा तीन-चार लेखमालातून एक प्रवासवर्णन तयार होईल छानपैकी. पुस्तकाच्या रुपात.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 03/13/2009 - 17:49

Permalink

सुंदर..

बिपीनदा, गप्पा मारत बोलाव तशी तुझी ही लेखमाला आहे. मस्त किस्से,जोक आहेत ह्या भागात. त्या ड्रायव्हरचा आणी वाघाचा तर काही विचारू नकोस. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मन्जिरि on Fri, 03/13/2009 - 17:56

Permalink

स्॑पल?

अस कस? अजुन लिहायला हव होतत.मि तर इत्कि जाहिरात केलि आहे खोबारचि.आता पुस्तक येउद्यात .बेस्ट लक.
  • Log in or register to post comments

Submitted by शशिधर केळकर on Fri, 03/13/2009 - 23:19

Permalink

खोबार

खोबार संपले? अरे भाऊ ही तर सुरुवात आहे! आता बखर सुरू करा. ह.ना. आपटेंची होती ना - स्वराज्यावरील कादंबरीमाला - स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याचा संकल्प, स्वराज्यावरील संकट, स्वराज्यातील दुही - वगैरे ८ भागात, किंवा पेशवाईचे ३० भाग - वगैरे, तसे हे ८ झाले, बखरीचे १०, मग डुबईचे १०, मधूनच एकादा काव्यसंग्रह, मग ....! बिपिनभाऊ तुमच्या लेखणीचा सुवर्णकाळ आहे, उदंड लिहा; रसिक वर्ग वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com