Skip to main content

वालाची उसळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 27/08/2018 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
.. डाळिंबी वा वालाची उसळ हा मराठी घराघरात होणारा पदार्थ आहे उसळ खूप चवदार बनते व ती अनेक प्रकाराने बनवली जाते पण ते वाल भिजत घालणे मोड आणणे सोलाणे ह्या प्रक्रिया खूप उटा रेट्याचा असतात परवा मंडईत गेलो असताना " वालाची डाळ " हा प्रकार समजला विकत घेतली व घरी आलो डाळ भिजत घातली ३- ४ तास भिजल्यावर ती फुगून मोठी झालेली दिसली साधारण वालाच्या आकाराची मग कांदा टोम्याटो मसाले वापरून त्याची उसळ / आमटी बनवली खूप रुचकर लागते जरूर ट्राय मारा

वाचने 7616
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

फोटू छान आहे ....पण पाककृती बद्दल सविस्तर वाचायला आवडले असते ...... असो ..

नेहमीच्या पद्धतीत, वालाला मोड येताना होणार्‍या रासायनिक प्रक्रियांमुळे, बिरड्याची खास चव निर्माण होते. तसेच, वालाची डाळ वापरून केलेल्या बिरड्यामध्ये तुकडे झालेल्या डाळींब्या फार असतात (हे चित्रातही दिसत आहेच). तेव्हा हा प्रकार एकदोनदा प्रयोग करून सोडून दिलेला आहे. वालाचे बिरडे खाणे ही एक दृश्य, स्पर्श (टेक्स्चर), गंध आणि चव यांच्या आस्वादाची मिश्र प्रक्रिया असते, असे आमचे म्हणणे आहे ! :)