वालाची उसळ

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in पाककृती
27 Aug 2018 - 5:56 am

..

डाळिंबी वा वालाची उसळ हा मराठी घराघरात होणारा पदार्थ आहे
उसळ खूप चवदार बनते व ती अनेक प्रकाराने बनवली जाते
पण ते वाल भिजत घालणे मोड आणणे सोलाणे ह्या प्रक्रिया खूप उटा रेट्याचा असतात
परवा मंडईत गेलो असताना " वालाची डाळ " हा प्रकार समजला
विकत घेतली व घरी आलो
डाळ भिजत घातली ३- ४ तास भिजल्यावर ती फुगून मोठी झालेली दिसली
साधारण वालाच्या आकाराची
मग कांदा टोम्याटो मसाले वापरून त्याची उसळ / आमटी बनवली
खूप रुचकर लागते
जरूर ट्राय मारा

प्रतिक्रिया

डाळला मोड नसतात हा फरक आहे. पण ठीक आहे.

गवि's picture

27 Aug 2018 - 8:28 am | गवि

पुन्हा एकदा?

चांदणे संदीप's picture

28 Aug 2018 - 1:07 pm | चांदणे संदीप

ती उसळ वेगळी.. ही वेगळी

आ.न.

Sandy

प्रसाद_१९८२'s picture

2 Sep 2018 - 4:04 pm | प्रसाद_१९८२

कसे ?
--
फोटो वेगळा आहे ना !
--
25

II श्रीमंत पेशवे II's picture

28 Aug 2018 - 9:37 am | II श्रीमंत पेशवे II

फोटू छान आहे ....पण पाककृती बद्दल सविस्तर वाचायला आवडले असते ......
असो ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2018 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीच्या पद्धतीत, वालाला मोड येताना होणार्‍या रासायनिक प्रक्रियांमुळे, बिरड्याची खास चव निर्माण होते. तसेच, वालाची डाळ वापरून केलेल्या बिरड्यामध्ये तुकडे झालेल्या डाळींब्या फार असतात (हे चित्रातही दिसत आहेच). तेव्हा हा प्रकार एकदोनदा प्रयोग करून सोडून दिलेला आहे.

वालाचे बिरडे खाणे ही एक दृश्य, स्पर्श (टेक्स्चर), गंध आणि चव यांच्या आस्वादाची मिश्र प्रक्रिया असते, असे आमचे म्हणणे आहे ! :)

नूतन सावंत's picture

1 Sep 2018 - 7:49 pm | नूतन सावंत

दहा हजार वेळा सहमत.

>>एकदोनदा प्रयोग करून सोडून दिलेला आहे>>

हाटेल/केटरिंगवाल्यांचा बाजार उठवाल.
डाळीची उसळ हीच खरी उसळ.

बुवा चिडले तर उद्याच टाकतील च्यालेंजिंग हरेश्वर उसळ.

----
- जाहिरात -
बिरड्याचीही मिसळ होते.