झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...
पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.
घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !
हॅप्पी न्यू यीअर !!
मैत्रीण पहिली कशी मिळाली
लाइन कोठे कशी क्रॅास झाली
निसंकोच आम्हा इथे व्यक्त व्हाया
मिपावरी कोनाडा असावा.....
घरी सासू येणे कसे आवरावे
वाचाळ पत्नी, कसे शांतवावे
समस्येवरी यां चर्चा घडाया
मिपावरी कोनाडा असावा.....
कसा धीर गळतो, कसा त्रास होतो
बिछान्यावरी का वनवास होतो
उपाय त्यावर जाणून घ्याया
मिपावरी कोनाडा असावा.....
भविष्य मेनू आरोग्य ज्ञान,
उपयुक्त साहित्य प्रत्येक पान
पंचअंग भावे पुरुषस्वभावा
मिपावरी कोनाडा असावा.....
मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत!
प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये!
प्रेरणा
काय करणार लोकं पण अश्शा जिलब्या पाडतात ना, आवरता आवरत नाही.
सहाचा वडा गरमागरम असतो!
वड्याच्या कव्हरला गुदगुल्या केल्या कि
आपला हात मस्तसा भाजतो,
चटणी हवी काय म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!
सहाचा वडा झणझणीत असतो!
शरीराचा रोम न् रोम जागा करतो
जिभेवर लसणीचा स्वाद पसरवतो,
अजून मिरची हवी होती का? म्हणून
खोडीलपणे विचारतो!
चारचा चहा touch screen असतो!
कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि
आतल्याआत मस्तसे हसतो,
How's the day? म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!
चारचा चहा screen saver असतो!
शरीराचा tab refresh करतो
मनाचे software update करतो,
What's on your mind? म्हणून
खोडीलपणे विचारतो!
चारचा चहा google map असतो !
मनाचा cursor global होतो
पण हातातला mouse local च राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो
अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !
खास प्रचेतस साठी,
झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव
आता जाई चरावयासी हाटेलात हा जीव
रोज रोजची पुरी भाजी खाऊन झाली जाssssssssssssssssssssssssssssssssssड
जुनाSSssट पोलकं मनगटी अटकी त्याला धरुनी फाड
मस्कापावचे ढीग आणति कितीते वेटर भाऊ
बटरवाली पाव भाजी ?तरी किती मी खाऊ!!!?
श्रिखंडाचा क्षणात फडशा .. शेवयाची अन् खीर
कंबर परी लवचिक इतुकी..शिट्ट्या मारिती पोरं
झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव
आता जाई चरावयासी mess वरं हा जीव
रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड
जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड
"हाय"कू
"हाय"कू
हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला.