वाङ्मय

आंतर जालावरच्या स्वामित्वहक्क आणि कायदेशीर कारवाई

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
21 Jul 2019 - 5:01 pm

नमस्ते
मराठी आंतरजाल सुरु झाले अंदाजे २० वर्ष आधी
गेल्या १० वर्षात कायम कुठे ना कुठे बघतील कि मराठी मध्ये कॉपी पेस्ट होते आहे ,लेखक ओरडताय

ह्या निम्मिताने काही प्रश्न

१ आत्तापर्यंत कधी काही कार्यवाही झाली व चोरी थांबलीय ?
२ कॉपी पेस्ट बंद व्हावे म्हणून काय काय उपाय केले

तसेच २ खास घटना नमूद कराव्या वाटत आहे

वाङ्मय

मगं ! आज काय वाचताय ?

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
17 Jul 2019 - 9:45 pm

नमस्कार,
आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे.
तर मग ! आज काय वाचलं ?

पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल
मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी
मराठी अनुवाद : सायली गोडसे
प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे
किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त
----------------

आस्वादवाङ्मय

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
17 Jul 2019 - 3:38 pm

#टिचभर_गोष्ट

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

प्रकटनविचारसद्भावनाप्रतिभामांडणीवावरसंस्कृतीकलासंगीतवाङ्मयमुक्तकभाषासाहित्यिकसमाजजीवनमान

पुस्तक परिचय : सुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह )

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
9 Jul 2019 - 2:46 pm

सुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह )

शिफारसवाङ्मय

पावसा पावसा पडू नकोस

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जे न देखे रवी...
2 Jul 2019 - 10:58 pm

पावसा पावसा पडू नकोस
------------------------------------------------------

ढगांमध्ये दडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस

आम्हाला आहे खेळायचं
खेळताना तू येऊ नकोस

क्रिकेटचा खेळ आलाय रंगात
त्याच्यामधे खो घालू नकोस

ढगांमध्ये दडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस

वाङ्मय

तुझे शहर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
2 Jul 2019 - 11:04 am

तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय –
डोळे न उघडता तुला पाहून आलेय

रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे –
तुझा हात घामेजला आहे

मंदिरातले कासव ओलांडले आहे –
तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे

दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे –
लोबानचा गंध दरवळत आहे

मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे –
हात चिकट, तोंड गोड झाले आहे

भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत –
तुझे डोळे चमकत आहेत

रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे –
तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे

मांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरकविता माझीकालगंगाप्रेम कविता

वॉल्डन....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Jun 2019 - 10:30 am

लेखक - - अभिषेक धनगर

आपले जीवन किती का क्षुद्र असेना? त्याला सामोरे जा आणि ते जगा. त्याच्यापासून तोंड वळवून दूर जाऊ नका; आणि त्याला नांवेही ठेवीत बसू नका. जीवन कसेही असले तरी तें काही तुमच्या आमच्या इतके खचित वाईट असत नाही.[१]

लेखवाङ्मय

जर्नी इस द रिवॉर्ड

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
14 Jun 2019 - 4:47 pm

जगातले काही शोध असे आहेत, ज्यामध्ये पूर्ण समाजाला बदलूंन टाकायची शक्ती असते. कम्प्युटरचा शोध या महत्वाच्या शोधांपैकीच एक. कम्प्युटर जेव्हा प्राथमिक अवस्थेत होते तेव्हा कोणी विचारही केला नसेल, कि येत्या काही दशकांत तुम्ही घरबसल्या दुसऱ्या खंडातल्या लोकांशी संवाद साधू शकाल, खिशात १००० गाणी ठेवून फिरू शकाल. खरं तर तेव्हा अशी कोणी कल्पना असती तर त्याला अगदी वेड्यात काढलं असतं, पण म्हणतात ना वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात.

आस्वादअनुभवइतिहासवाङ्मयजीवनमान

मी तुझा विचार करते

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 Jun 2019 - 12:36 am

मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते....
माझे खळाळणारे हसू
अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून
सुशांत जलाशयातल्या
शांत स्मितासारखे
तुझ्या ओठांशी येऊन थांबेल......

मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......
तुझ्या एवढी होईन तेव्हा
शब्दांची झोळी बाहेर खुंटीला टांगेन
अर्थाच्यामागे धावणे थांबेल आणि,
उंच झाडांच्या गहन जंगलातून
निवांत चालत तुझ्या डोळ्यांच्या
वाटेशी थांबेन .......

मांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयमुक्तकसाहित्यिकसमाजकविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविता