फायनान्शियल गोल्स सेटिंग
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करा फायनान्शियल गोल्स सेटिंग:
१. रिटायरमेंट कॉर्पस. [वेगवेगळे कॅल्क्युलेटर ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यात तुम्ही तुमचे सध्याचे वय, सध्याचे इन्कम, निवृत्तीचे वय , आताचा तुमचा एकुण खर्च वगैरे गोष्टी टाकून निवृत्तीनंतर लागणारा कॉर्पस तुम्हाला काढता येतो. हा कॉर्पस काही कोटींमध्ये जातो.]
आपल्या निवृत्तीच्या कॉर्पस ची तजवीज नोकरीच्या पहिल्या दिवसापासून करावी. तुमच्या कडे गुंतवणुकीसाठी साधारण ३० वर्षे असतात ज्यात तुम्ही अधिक रिस्क घेऊन अधिक परतावा मिळवू शकता. त्यानुसार फंड्स किंवा इतर गुंतवणुकीचे पर्याय निवडता येतात.
एकदा लागणारा कॉर्पस काळाला की त्यासाठी किती मासिक गुंतवणूक किंवा सिप करावे लागतील हे कळते, त्यासाठी ऑनलाईन कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा.
२. आपत्कालीन निधी जमा करणे : हा निधी तुमच्या मासिक खर्चाच्या ३ ते ६ पट असावा आणि तो लिक्विड फंड, सेविंग्स मध्ये ठेवावा. हा निधी फक्त आणि फक्त आपत्काळात वापरावा.
३. टर्म इन्शुरन्स : हा तुमच्या मासिक वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० ते १२ पट कव्हरेज चा घ्यावा. हा इन्शुरन्स नोकरीला लागल्या लागल्या घेणे. याचा जो प्रीमियम आहे तो वार्षिक असावा. त्या प्रीमियम ची सोय रिकरींइंग काढून करावी. म्हणजे समजा २४००० प्रीमियम आहे तर २००० रुपये दर महिना बाजूस ठेवावे.
४. मेडिक्लेम निधी: हा निधी प्रतिव्यक्ती किमान ५ लाख सुरक्षा कवच असलेला घ्यावा. शक्यतो फॅमिली फ्लोटर बारा पडतो. याचा जो प्रीमियम आहे तो वार्षिक असावा. त्या प्रीमियम ची सोय रिकरींइंग काढून करावी.मेडिकल इन्शुरन्स तुम्ही लहान असताना, आणि निरोगी असताना काढावा. अनेक कंपन्या सुद्धा मेडिक्लेम इन्शुरन्स देतात. तो जरी असला तरी स्वतःचा एक असावाच. कंपनीचा मेडिक्लेम आपल्या घरातील पालकांसाठी वापरावा आणि स्वतः काढलेला स्वतःसाठी.
५. स्वतःचा स्किल डेव्हलोप करणेसाठी चा निधी. : स्वतःत केलेली गुंतवणूक जास्त रिटर्नस देते. मी म्हणून आपला स्किल सेट दरवर्षी वाढवावा. स्किल सेट वाढला की तुमच्या पगारवाढीची शक्यता वाढते. हा निधी प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो.
६. मुलं मुली यांचे शिक्षण निधी: याची सुरुवात लग्न झाल्या दिवसापासून करावी. पहिले आपले उत्पनानुसार अपत्ये जन्मास घालावीत. शिक्षण खर्च दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि त्यामानाने आपले उत्पन्न वाढणार आहे का हे बघावे. शिवाय लोकसंख्या नियंत्रण हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. हा खाजगी विषय आहे त्यामुळे ज्याला पटेल आणि ज्याची त्याची सद्बुद्धी सांगेल तसे वागावे.
हा निधी किती असावा याचे गणित महागाई कॅल्क्युलेटर ने काढता येईल. आताचा एखाद्या स्ट्रीम चा लागणारा खर्च आणि आपली मुले जेव्हा या शिक्षणाच्या वयाची होतील तेव्हाच संभावित खर्च हे ऑनलाईन महागाई गणक यंत्रे आहेत त्यांनी काढता येतो. त्यांनुसार सिप सुरु करावा.
७. मुलं मुली यांचे लग्न निधी: मुलांचे मुलींचे लग्न अजून किती वर्षाने आहे त्याचा अंदाज घेऊन हा निधी किती असावा याचे गणित महागाई कॅल्क्युलेटर ने काढता येईल. आताचा एखाद्या लग्नाचा लागणारा खर्च आणि आपली मुले जेव्हा लग्नाच्या वयाची होतील तेव्हाच संभावित खर्च हे ऑनलाईन महागाई गणक यंत्रे आहेत त्यांनी काढता येतो. त्यांनुसार सिप सुरु करावा. आपल्याकडे मुलीकडच्यांनी सगळं खर्च करायचा अशी पद्धत आहे. हा खर्च अर्धा अर्धा दोघांनी करावा. (मा. व. म.).
८. घर खरेदी: हा एक अतिशय गंभीर आणि वादाचा मुद्दा आहे. घर विकत घ्यावे का भाड्याने राहावे हे ज्याच्या त्याच्या परिस्थिती सापेक्ष आहे. ती चर्चा इथे नको.
९. वरील सगळे खर्च करण्याचे नियोजन झाले आणि तरीही पैसे उरले असतील तर फॉरेन ट्रिप , कार खरेदी, मोबाईल खरेदी अशी जीवनशैली संबंधित खर्च याचे नियोजन करावे.
१०. सगळ्यात प्रथम तरलता असलेली गुंतवणूक करावी आणि मग रिजिड प्रकारची गुंतवणूक करावी.
११. आपल्या मुलांना लहानपणापासुन खर्च लिहिणे शिकवावे आणि त्यांचे बँक खाते उघडून त्यात अगदी मामुली रक्कम ठेऊन ती व्याज मिळून कशी वाढते याचे प्रात्यक्षिक दाखवावे.
१२. दुसऱ्याला उधार पैसे देणे जामीन राहणे टाळावेच टाळावे.
कौस्तुभ पोंक्षे
याद्या
9274
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
माहिती बद्दल धन्यवाद
छान माहिती. धन्यवाद.
ह्यातून कसा मार्ग काढावा समजत नाहीये.
In reply to छान माहिती. धन्यवाद. by अमरेंद्र बाहुबली
उत्तम+१
पेन्शन किवा उत्पन्न कसे सुरु करता येइल???
एनपीएस
In reply to पेन्शन किवा उत्पन्न कसे सुरु करता येइल??? by आर्यन मिसळपाववाला
एन.पी.एस/ अॅन्युईटी
In reply to एनपीएस by अहिरावण
सुधारणा
In reply to एन.पी.एस/ अॅन्युईटी by चंद्रसूर्यकुमार
चंद्रसूर्यकुमार साहेब,
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
अॅन्युईटी परत आणि इतर
In reply to एन.पी.एस/ अॅन्युईटी by चंद्रसूर्यकुमार
अॅन्युईटी परत पण करता येते
In reply to अॅन्युईटी परत आणि इतर by अनामिक सदस्य
माझ्या माहिती प्रमाणे
In reply to अॅन्युईटी परत आणि इतर by अनामिक सदस्य
साध्या अॅन्युईटीत असते
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by सुबोध खरे
अॅन्युईटी टाळायची असल्यास एन पी एस टियर २ चा पर्याय आहे
In reply to एन.पी.एस/ अॅन्युईटी by चंद्रसूर्यकुमार
भविष्याची तरतूद आणि
छान लेख.
टर्म इन्शुरन्स घ्यायच्या वेळेबद्दल थोडे वेगळे मत आहे
टर्म प्लॅन
In reply to टर्म इन्शुरन्स घ्यायच्या वेळेबद्दल थोडे वेगळे मत आहे by अनामिक सदस्य
टर्म प्लॅन ३० पेक्षा जास्त वर्षांचे पण आहेत
In reply to टर्म प्लॅन by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to टर्म प्लॅन ३० पेक्षा जास्त वर्षांचे पण आहेत by अनामिक सदस्य
काही तरी गल्लत झाली आहे.
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to काही तरी गल्लत झाली आहे. by सुबोध खरे
टर्म प्लॅन चा अर्थच तो आहे.
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
मी स्वतः साठी ५० लाखाचा एक
In reply to टर्म प्लॅन चा अर्थच तो आहे. by सुबोध खरे
दर वर्षी ठराविक रक्कम भरायची
In reply to मी स्वतः साठी ५० लाखाचा एक by गवि
धन्यवाद..
In reply to दर वर्षी ठराविक रक्कम भरायची by सुबोध खरे
८५ वर्षापर्यंत प्युअर टर्म
मतभिन्नतेच्या आदरासहित
- जीवनविमा - कमावत्या व्यक्ती
- आरोग्यविमा - कुटुंबातील सर्वजण
- गृहविमा - किमान स्वतःच्या राहत्या घरासाठी
- वाहनविमा - पूर्ण विमा, स्वतःच्या सर्व वाहनांसाठी
हे विमे कमावत्या व्यक्तीने घ्यायलाच हवेत. जीवनविमा हा आपल्या सध्याच्या उत्पन्नाच्या १५-२० पट रक्कमेचा घ्यायला हवा. उत्पन्न जसजसे वाढत जाते तसतसा ही रक्कम वाढवत न्यायला हवी. हा विमा केवळ term insurance plan याच स्वरूपातच घ्यायला हवा. "विम्याच्या मुदतीत मृत्यू झाल्यास ठरलेली रक्कम वारसांना मिळणे, मृत्यू न झाल्यास काहीही न मिळणे" हा प्रकार सर्वोत्तम आहे. कमावत्या नसलेल्या व्यक्तीने जीवनविमा काढून फारसा उपयोग नाही. --- गुंतवणुकीबद्धलची माझी मते मी याआधी इतरत्र व्यक्त केलेली आहेत.गृहविमा ?
In reply to मतभिन्नतेच्या आदरासहित by वामन देशमुख
मी माझ्या घरासाठी ३ कोटी
In reply to गृहविमा ? by चौकस२१२
२० व्य मजल्यावर म्हणजे फ्लॅट
In reply to मी माझ्या घरासाठी ३ कोटी by सुबोध खरे
सोसायटीचा विमा सोसायटी घेते
In reply to २० व्य मजल्यावर म्हणजे फ्लॅट by चौकस२१२
इथली पद्धत सांगतो म्हणजे
In reply to सोसायटीचा विमा सोसायटी घेते by सुबोध खरे
माझ्या कडे ऑलरेडी एक असाच
माझ वय ३१ आहे, कुणी मला
अवलंबून आहे
In reply to माझ वय ३१ आहे, कुणी मला by अमरेंद्र बाहुबली
हो. पत्नी आणी मूल आहे. एकदमच
In reply to अवलंबून आहे by हणमंतअण्णा शंक…
कंपनीनेही आपलक विमा
In reply to हो. पत्नी आणी मूल आहे. एकदमच by अमरेंद्र बाहुबली
गुगल वर टर्म प्लान शोधतोय तर