Skip to main content

WhatsApp च वापरणार की सिग्नल,टेलिग्रामवर जाणार?

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 11/01/2021 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
WhatsApp ची नवीन पॉलिसी देत बसत नाही.कारण आतापर्यंत ती पाठ झाली असेल.काहीजणांना वाटतंय हे नवीन धोरण धोक्याचं आहे; काहीजण म्हणतायत आधीच नागवे झालो आहोत अजून काय नागवे करणार? वगैरे. याच अनुषंगाने आलेल्या दोन फेसबुक पोस्ट पहा. ------------------------------------------------ *#व्हॉट्सअपची_नवीन_पॉलिसी* सोशल मीडिया जायंट असलेल्या व्हॉट्सअपने आपली नवीन टर्म्स अँड प्रायव्हसी पॉलिसी जाहीर करून करोडो वापरकर्त्यांना धक्का दिलाय. आम्ही सांगतो ते मान्य करा, अथवा अकाउंट डिलिट करू अशी गोड भाषेत धमकी दिल्याने वादळ उठले आहे. याशिवाय या प्रायव्हसी पॉलिसीमुळे आपला डेटा आता सुरक्षित असेल का अशी वापरकर्त्यांना चिंता वाटते आहे. कित्येकांनी व्हॉट्सअपला कायमचा राम राम ठोकून टेलिग्राम किंवा सिग्नल वर शिफ्ट होण्याची तयारी केली आहे. खरंच हे भीतीदायक चित्र आहे का? चला तर मग जाणून घेऊया… *आधी आपण व्हॉट्सअपची नवीन पॉलिसी नक्की काय आहे ते समजून घेऊ.* आतापर्यंत आम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवतो असा दावा करणाऱ्या व्हॉट्सअपने नवीन प्रायव्हसी पॉलिसीनुसार वापरकर्त्यांचा डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर करण्याचे ठरवले आहे. आता हा डेटा म्हणजे कोणता? तर आपले नाव, आपला नंबर, आपला डीपी, लोकेशन, आपले आर्थिक व्यवहार, एकमेकांना दिलेले पत्ते, शेअर केलेले व्हिडीओ, कॉन्टॅक्टस, आपली राजकीय मते, ज्या ग्रुपमध्ये आहोत त्या ग्रुपची माहिती, त्या ग्रुपची मानसिकता, आपला आयपी एड्रेस… सगळंच! *हा आपला पर्सनल डेटा मिळवून फेसबुक नक्की काय करणार?* फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकत घेऊन या तिन्ही कंपन्यांना एकाच छताखाली आणलंय. या तिन्हीवरचा डेटा जमा करण्यासाठी डेटा सेंटर्स उभारली आहेत. या डेटाचा उपयोग टार्गेटेड ऍडव्हरटाइजिंग आणि पॉलिटिकल कॅम्पेनसाठी केला जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही व्हॉट्सअपवर कुणासोबत लॅपटॉपविषयी चर्चा कराल तर तुम्हाला फेसबुक लॅपटॉपच्या जाहिराती दाखवायला सुरुवात करेल. व्हॉट्सअपने नुकतेच स्वतःचे UPI व्हॉट्सअप पेमेंट लाँच केले आहे. त्यावर होणाऱ्या व्यवहारावर सुद्धा बारीक नजर असेल. जर तुम्ही एखाद्या पक्षाचे समर्थक असाल तर निवडणुकीच्या प्रचारात तुम्हाला टारगेट करून प्रचार केला जाईल. अधिक विस्ताराने सांगायचं तर समजा मी 'अबक' पक्षाचा समर्थक आहे आणि माझ्या मतदारसंघातील 'अबक' पक्षाचा उमेदवार सोशल मीडियावर स्पॉन्सर्ड कॅम्पेन करत असेल तर फेसबुक त्याची जाहिरात आधी मला दाखवेल. मी त्याला सकारात्मक प्रतिसाद देईन. या माझ्यासारख्या अनेकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे उमेदवाराची कॅम्पेन सफल होईल आणि फेसबुकलाही पैसा मिळेल. काही वेळा हे उलट पण होऊ शकतं. आपली राजकीय मते बदलण्यासाठी विरुद्ध बाजूच्या उमेदवाराच्या जाहिरातीचा भडिमार आपल्यावर केला जाऊ शकतो. जो पक्ष जास्त पैसा देईल, फेसबुक त्याचं! बरं, इथपर्यंत ठीक आहे, पण हा डेटा जर फेसबुक तिसऱ्याच कंपनीला विकत असेल तर ते जास्त भयानक असेल. *व्हॉट्सअप साठी टेलिग्राम/सिग्नल हा पर्याय आहे?* हे तर जास्त रिस्की असणार आहे. व्हॉट्सअपचा डेटा सध्या फक्त मालक कंपनी असणाऱ्या फेसबुककडे जातोय. पण टेलिग्राम हे ओपन सोर्स ऍप असल्याने यावरचा डेटा कुठेही जाऊ शकतो. त्याचा कुणीही गैरवापर करू शकतो. टेलिग्राम ही मुळात रशियन कंपनी होती. तिने आपले बस्तान नंतर बर्लिनला हलवले, नंतर व्हाया इंग्लंड ती आता दुबईला स्थित आहे. टेलिग्रामचे सर्व्हर्स सध्या दुबईमध्ये आहेत. आणखी एक पर्याय सिग्नल या ऍपचा सांगितला जातो. या ऍपची निर्मिती ऍक्टन नावाच्या व्यक्तीने केली आहे. हा ऍक्टन म्हणजे व्हॉट्सअपचा सहसंस्थापक. फेसबुकने व्हॉट्सअप विकत घेतले तेव्हा हा राजीनामा देऊन बाहेर पडला होता. सिग्नल हे ऍप तुलनेने अत्यंत नवखे असल्याने त्यांच्या पॉलिसी कश्या असतील ते आज सांगता येणार नाही. थोडक्यात, व्हॉट्सअप सोडून दुसरीकडे जाणे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे आहे. *मग आता करायचं तरी काय?* लक्षात घ्या, सध्याच्या युगात प्रायव्हेट असं काहीही राहिलेलं नाही. तुम्ही ज्या ज्या साईटवर जाता तिथे तिथे तुमचा डेटा गोळा केला जातो. तुम्ही जे जे ऍप वापरता तिथेही तुमचा डेटा गोळा केला जातो. जस्ट डायल, इंडियामार्ट यासारख्या साईटवर रजिस्टर करताय? त्यावर रजिस्टर केलेल्या प्रत्येकाचा डेटा मार्केट मध्ये उपलब्ध आहे. नौकरी डॉट कॉम वर रिझ्युम अपलोड करताय? त्या प्रत्येक कॅण्डीडेटचा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ट्रु कॉलर वापरत असाल तर तुमच्या नंबरसकट तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येकाचा नंबरचा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे सगळे लपून डेटा गोळा करतात आणि विकतात. फरक एवढाच की, व्हॉट्सअप हे राजरोसपणे सांगून करत आहे. शक्यतो आपली अत्यंत वैयक्तिक माहिती व्हॉट्सअप चॅट मध्ये देणे टाळावे हाच सध्या तरी एकमेव उपाय. जर फारच भीती वाटत असेल तर इंटरनेटचा वापर पूर्णपणे बंद करणे हा शेवटचा पर्याय! *अनुप कुलकर्णी* *सोशल मिडिया मॅनेजर* *स्मार्ट मिडिया सोल्युशन्स* *#अनुपानंद* ---------------------------------------------- जोक मारून झालाय तर आता शिरेसली लिहीते. हे लिहीण्याची माझी टेक्निकल पात्रता शून्य आहे पण गेली सात वर्षं युकेत काम केल्यामुळे Data Protection Act 1998 आणि GDPR सारख्या डोकेखाऊ कायद्यांविषयी जवळून माहिती मिळाली. आमची ॲाफशोर (म्हणजे युके आणि EEU बाहेर कुठलंही लोकेशन, अगदी अमेरीका सुध्धा) ॲाफिसेस ही या दोन कायद्यांचं पालन करणारी असणं आमच्यावर बंधनकारक होतं आणि आहे त्यामुळे याविषयी वाचन, चर्चा आणि ग्राऊंड लेव्हलला काम केलेलं आहे आता तुला काय कळतं यातलं हा प्रश्न बाजुला काढल्यावर मुळ मुद्दा! WA च्या नव्या डेटा पाॅलिसीचं भ्या वाटतंय? तर मग सांगते की या क्षणी तुमची अख्खी जन्मकुंडली, इतिहास, भूगोल हा इंटरनेट वर उपलब्ध आहे. डिप/डार्क वेबच्या अंधाऱ्या दुनियेत हा डेटा वाट पाहतोय ते कोणीतरी त्यावर बोली लावायची. हे डार्क वेब गुगल सर्चवर सापडत नाही. याला ॲक्सेस करायचे मार्ग वेगळे पण ते करायच्या भानगडीत पडू नका एवढंच सांगेन. पण आपण इतके गरीब आहोत की आपल्या डेटावर बोली लावायचे कष्ट कोणी घेत नाही गेली आता भिती? सिंह दिसला की कुत्र्याची भिती कमी होते असं वाटलं म्हणून विचारतेय या मानाने मार्कदादा झकरबर्ग तुमचा डाटा शिस्तीत, सांगुनसवरून घेऊन तो ‘स्टोर’ करताहेत. ह्यात आणि एका नाॅन एथिकल हॅकरने तो ‘हॅक’ करणं यात तेवढाच फरक आहे जेवढा करण जोहर आणि क्रिस्तोफर नोलन मधे आहे. झकरबर्ग काय करेल डेटाचं? तर तो तुम्हाला टारगेटेड ॲड्स दाखवेल म्हणजे काय तर तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही गोव्याला जायचा ग्रुप उघडला की तो गोवा टुरीजमच्या ॲड दाखवेल कारण त्या वायझेडला हे कुठं ठाऊक की तुम्ही नुसते प्लान करता, जात नै ते? किंवा तो हो डेटा घेईल आणि इतर १०० मिलीयन लोकांबरोबर ॲड करेल आणि त्यातून एका ठरावीक डेमोग्राफिकचं राजकीय मत, गोष्टी विकण्या-विकत घेण्याचे पॅटर्न्स जमा करून मोठ्या कंपन्यांना विकेल. इसमे कंपनीयोंका घाटा, तेरा कुछ नही जाता जेव्हा फेबु, गुगल सारख्या मोठ्या कंपन्या तुमचा डेटा जमा करतात तेव्हा त्या डेटाचं प्रोटेक्शन आणि सिक्युरीटीची मोठ्ठी जबाबदारी त्याच्यांवर असते आणि यासाठी त्यांची आयटी टिम दिवसरात्र कामही करत असते. हा डेटा एका एक्सेल शीट मधे मावणारा नसतो तर करोडो खर्च करून मोठ्या डेटासेंटर्समधे स्टोर असतो. ही हॅक होऊ शकत नाहीत का? होऊ शकतात पण त्याची शक्यता कमी आहे. ह्याने मार्कभाऊ झकरबर्ग यांची रातोंकी नींद हराम व्हायला पाहिजे, तुमची नै. म्हणजे बघा. तुमचा पगार तुम्ही तुमच्या बेड खाली ठेवता का? नाही ना? बॅंकेत ठेवता ना? मग बॅंकेचा राखणदार तुम्ही निवडता का? की स्वत: जाता रोज कंदील घेऊन रात्री रखवाली करायला. ते बॅंकेचं काम आहे ना? तसंच यालाही डेटा बॅंकच समजा अजून भ्या वाटतंय? मग, - learn online hygiene. कुठला डेटा सोशल मिडीया वर शेअर करायचा कुठला नाही ते शिका. घरचा ॲड्रेस, आई वडिलांचं नाव (हे बरेचदा सिक्रेट प्रश्न असतात), पॅन कार्ड, आधार कार्ड हे असे डिटेल्स टाळावेत - जाहीरातींचा भडीमार झाला तर ती व्हाॅट्स ॲप सारखं absolutely amazing communication tool फ्रि मधे वापरायची किंमत समजा. जाहिरात दिसली की विकत घेतलं अशी तुमची अवस्था असेल तर data privacy is least of your problem dude - राजकिय मतं - नो कमेंट्स. व्हाॅट्स ॲपचे लेख वाचून तुम्ही सारासार विचार करण्याची कुवत गमवत असाल तर data privacy is least if your problem dude अजून भ्या वाटतंय? मग एक वळकटी बांधा आणि हिमालयात रहायला जा हुश्श दमले बै © *हिमाली कोकाटे* Sr. Project Manager, Capegemini UK ---------------------------------------------- सर्वात श्रीमंत एलॉनभाऊ म्हणतात सिग्नल वापरा. काहीजण म्हणतात टेलिग्राम वापरा.आज या दोन्ही अॅप्सची पॉलिसी वापरकर्त्यांची माहिती पेरेंट कंपनीला देणार नाही अशी असली तरी ती उद्या तशीच राहील याची खात्री काय? वापरकर्त्यांची संख्या खूप कमी होऊन आपलंच नुकसान होईल हा विचार झकेरबर्गनी केला असेलच ना? खरच नवी पॉलिसी कितपत धोकादायक आहे? WhatsApp वापरकर्त्यांना उबग आणेल का? काय मत आहे तुमचं यावर?

वाचने 44644
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

-काय मत आहे तुमचं यावर? ऑलरेडी आपण ज्या दिवशी नेटवर कनेक्ट झालो त्याचदिवशी आपलं असं पर्सनल काही राहिलेलं नाही. आपलं पर्सनल काय काय फेसबूकवर येईल त्याची मला उत्सुकता आहे. 'वॉट्सॲप' असा काही डाटा फेबू वर वा अन्य त्यांच्या माध्यमांवर प्रकाशित करेल ज्याचा मला त्रास होईल तेव्हा वॉट्सॲप अकाउंटच डिलीट करेन असं माझं धोरण आहे. (अजून धोरण काही नक्की नाही) वॉट्सॲपवर आपण यापुढे काय काळजी घ्यायची या विषयावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. असे व्यवहार, विचार, फोटो, आणि असे आदान प्रदान जे सर्व वॉट्सॲप पाहात आहे, असे समजून यापुढे वागायचे आणि ती ही आपली सर्व माहिती जगजाहीर करणार आहे अशा सर्व गोष्टी 'वॉट्सॲप' वर टाकायच्या नाहीत अशी काळजी घ्यायची. आपल्याला न सांगता वॉट्सॲप सध्या आपली काय माहिती घेईल आपलं लोकेशन, आपलं कोणतं सिम आहे. नेटडाटा, आपलं फोन मॉडल, ऑपरेटिंग सिस्टिम, ब्राउजर, आयपी पत्ता, फोन क्रमांक, मोबाइल बॅटरी, सिम कार्ड सिग्नल्स, आपली भाषा, कॉल्स, वाट्सअप ग्रुपची माहिती, प्रोफाइल फोटोज, आपण ऑनलाइन केव्हा असता, आपण शेवटी वाट्सपचा उपयोग केव्हा केला. आपण कोणाशी बोलता, किती बोलता. आपली फोनची सेटिंग कशी असते. मोबाइलवरील एप्लीकेशन आणि वाट्सप अजून काय काय लुटेल त्याचं आपल्याला किती नुकसान आहे, याची जो पर्यन्त कोणी भयंकर फळं भोगत नाहीत (फक्त तो मी नसावा) तो पर्यन्त वाट्सपवर काळजी घेऊन असू. आमचं एप्लीकेशन वापरायचं तर तुम्हाला आमच्या अटी मान्य कराव्या लागतील हे जरी खरे असले तरी प्रायवसी अशी जगजाहीर होतेय असे म्हणून कोर्टकचे-या व्हाव्यात, टर्म आणि कंडीशन्स बदलाव्यात अशी अपेक्षा करूया. वरील धाग्यात कमीत कमी दहा प्रतिसाद टाकण्यासाठी रुमाल टाकून ठेवत आहे. (अटी लागू) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्हॉट्सअ‍ॅपची काही क्रॅक्/मोडीफाईड व्हर्जन्स पण उपलब्ध आहेत असे समजते. नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळॅ ही व्हर्जन्स बंद होतील काय? किंवा नवी पॉलिसी झुगारुन देऊन ह्या व्हर्जन्सवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येईल काय हे आपणास माहित असल्यास सांगावे.

In reply to by प्रचेतस

नव्या पॉलिसी ते झुगारु शकत नाहीत आणि मोडीफाय व्हर्जन्स बंदही होणार नाहीत. सध्याच्या उपलब्ध प्लॅटफॉर्मवरच ते सुरु राहील. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रायवसी अशी जगजाहीर होतेय असे म्हणून कोर्टकचे-या व्हाव्यात, टर्म आणि कंडीशन्स बदलाव्यात अशी अपेक्षा करूया. अनुमोदन. पण शेवटी धंदा करायला बसलाय झुकरबर्ग. हे ही विसरुन चालणार नाही.माहिती विकली नाही तर त्याचा धंदा कसा व्हावा?

जे जे फुकट ते ते सुंदर. सर्व वापरतो। वाटसप - मिडिया आणि। कॅाल्स. टेलग्राम - फुल रेझलुशन फोटो पाठवणे. मालिका उतरवणे अजून नै केलं वाइबर - जपानमध्ये कॅाल इमो - कत्तारमध्ये कॅाल गूगल कॅाल माइक्रोसोफ्ट कॅाल इमेल - पाच सर्विस प्रवाइडरस काही राहिलं का?

मी काहीही न वाचता, policy accept केल्या होत्या. त्यामुळे जे करायचे ते करा.. आर्थिक सोडून बाकी ढवळा ढवळ नको फक्त.. बाकी विशेष काही phone मध्ये करत नाहीच..

पुर्वी मुघल, ब्रिटिशांचे गुलाम होतो आणि आता व्हॉटअप, फेसबुक सारख्या परकिय व्यापारी सॉफ्टवेरचे गुलाम. ..... ..... ..... ..... आणि गुलामांना चॉईस नसतो !

In reply to by उपयोजक

होऊ शकतो. सक्षम पर्याय आणि फेबु-व्हॉटसपची कोंडी करायला पाहिजे.

जरा आता कुठे स्मार्टफोन हातात पडु लागले आणि वाटसप खेळु लागले सिनिअर सिटिझन तर बंद करा बंद करा?!

व्हाॅट्स ॲप वापरणे बंद करणार. टेलिग्राम :- बराच काळ वापरत आहे, परंतु त्याचा वापर हा फक्त कंटेंट डाउनलोडसाठीच करतो, मला टेलिग्राम चे सर्वात आवडणारे फिचर म्हणजे तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक हाईड करु शकता, याचा फायदा वेगवेगळ्या विषया वरचे ग्रुप्स जॉइन करुन सुद्धा तुमचा नंबर जग जाहीर होत नाही. टेलिग्राम ओपन सोर्स नाही हा मला न आवडलेला गुण मात्र फिचर्सच्या बाबतीत सध्या सगळ्यात वरचढ. एनक्रिप्शन कीज सर्व्हरवर असतात. सिग्नल :- हे देखील बराचकाळ मोबल्यात वास्तव्य करुन आहे,पण वापरात नाही. मस्क मामां सारखेच स्नोडेन बुवा देखील याचा वापर करतात आणि दोघेही याचा वापर करण्यासाठी आग्रही आहेत. मस्क मामा फेसबुकवर खुन्नस खाउन आहेत हे सर्वश्रुत आहेच, आता त्यांना काडी करायची अजुन एक संधी मिळाली आणि त्यांनी ती चुकवली नाही. एक ट्विट आणि सिग्नलचा डेटाबेसचा लोड विक्रमी वेगाने वाढायला लागला. मला न आवडलेला गुण म्हणजे नंबर हाईड करण्याची सोय नाही, मात्र हे ओपन सोर्स असल्याने यापुढे व्यक्तिगत वापरासाठी याला निवडणार आहे. एन्क्रिप्शन कीज मोबाइल /पीसीवर राहतात. दोन्ही मध्ये बग्स येतात आणि सुधारले देखील जातात, भविष्यात त्यांच्याकडे युजरचा डेटा कायदेशीर पद्धतीने मागितल्यास त्यांना बहुधा तो ध्यावा देखील लागु शकेल परंतु आत्ता पर्यंत या बाबतीत सिग्नलचा इतिहास हा अधिक उत्तम असल्याचे जालावरुन समजते. टेलिग्रामच्या जागी सिग्नल का ? = फारच कमी मेटाडेटा स्टोअर केला जातो. [ या विषयावर अधिक माहितीसाठी जालावर भ्रमंती करावी. ] जाता जाता :- सेशन या मेंसेंजला चांगले भविष्य दिसत आहे, पण सध्या तरी सिग्नल पकडणे महत्वाचे आहे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- If You Had My Love... :- Jennifer Lopez

In reply to by मदनबाण

व्हाॅट्स ॲप वापरणे बंद करणार. काही काळ वापरणे पूर्णपणे बंद केले होते पण सध्या काही कारणास्तव किमान वापर ठेवला आहे, इतर महत्वाच्या कामासाठी मात्र केवळ सिग्नल वापरत आहे. फेसबुक परत आपली पॉलिसी परत जबरदस्ती लागु करण्याच्या त्यांच्या धोरणावर परत आलेला असुन मला याचा छोटासा पॉपअप मेसेज अधुन मधुन दिसतो. फेसबुक माचो असल्याने मला जितके दिवस त्यांची पॉलिसी टाळता येणार आहे तितके दिवस ती टाळणार आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Billa 2 - Madurai Ponnu Song Video | Yuvanshankar Raja

फार पूर्वी " ब्लू थन्डर " नावचा चित्रपट आला होता ! त्यात पोलिसान्च्या हेलीकोप्टरच्या मशीनमधे मोटारीच्या आर टी ओ नम्बरवरून तुमची २० वर्षे जुनी असली तरी क्र्राईम हिस्टरी मिळण्याची सोय असल्याचे दाखवले आहे ! आता तर काळ फार पुढे गेला ! माझ्या मते आपले वर्तन फक्त सेक्स हा विषय सोडला तर त्यात प्रायव्हेट काही असावे असे आपल्याला वाटावेच का ...? सेक्स तरी का .....? तर त्यासम्बन्धी काही कायदे जगात अस्तित्वात आहेत म्हणून ! त्यात नुसत्या दन्डाने सुटता येत नाही म्हणून .. त्यात दुसर्या व्यक्तीच्या मान्यतेचा... वैवाहिकपणाचा.. रोगाचा...जाणतेपणाचा सम्बन्ध आहे म्हणून !

व्हाॅट्स ॲप वापरणे बंद करणार नाहि, सध्या तरि. मला शुल्क आकरले तरि चालेल. शुल्क भरा अथवा प्रायव्हसी पॉलिसी स्विकारा असा पर्याय हवा.

माझ्यासरखे जे व्हाटसअप वापरतात पण फेसबुक अकाउंटच नाही त्यांना कुठे अॅड दाखवणार?

In reply to by अभिजीत अवलिया

फेसबुकवर तुम्ही असा की नसा, तुमच्या माहितीशी त्यांना मतलब आहे, तुमची माहिती शेयर करायला तुम्ही कशाला हवे त्यांना तिकडे. तुमच्याकडील उपयोगी माहिती ते इतरांना पुरवत राहतील. फक्त तुम्हाला माहिती होणार नाही इतकेच... असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by अभिजीत अवलिया

तुम्हाला व्हॉटसअॅपच्या स्टेटसमधे जाहिराती दाखवणार.शिवाय इन्स्टाग्राम, फेबु मेसेंजर हे वापरत असाल तर तिथेही कदाचित दाखवतील.

मी काही वर्षे व्हॉट्सअ‍ॅप वापरले तरी मला ते आवडत नव्हते कारण.
  • व्हॉट्सअ‍ॅपमध्येही आपला फोन क्रमांक सार्वजनिक होणे खूप सहजपणे होते. या प्रकाराची (फोनवर इन्स्टन्ट मेसेंजर) मुहूर्तमेढ रोवणार्‍या ब्लॅकबेरी मेसेंजरमध्ये हे कधीच शक्य होत नाही.
  • दुसरे म्हणजे भारतीय वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपचा केलेला अतिरेकी वापर (अनेकांसाठी इन्स्टंट मेसेजिंग ऐवजी इंटरनेट म्हणजे बहुतांशी व्हॉट्सअ‍ॅप). अमेरिकेत सुरुवात होऊनही अमेरिकन लोक याचा फारसा वापर करतानाही दिसत नाहीत.
सुदैवाने व्हॉट्सअ‍ॅपनेच तीन वर्षांपूर्वी ब्लॅकबेरी फोनवर चालणे बंद केले अन माझ्यासाठी सुंठीवाचून खोकला गेला ;-). व्हॉट्सअ‍ॅपचे इतर पर्याय म्हणून ब्लॅकबेरी मेसेंजर एन्टरप्राइझ सुचवतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

फेसबुकचा भरपूर वापर करत असलो तरी केवळ ब्राऊझरमधून त्यांचे कोणतेच अ‍ॅप इन्स्टॉल केलेले नाही.

आधीपासून तिन्ही मेसेंजर्स चा वापर सुरु आहे. वापरत नाही तो म्हणजे घाणेरडा फेसबुक मेसेंजर. - व्हाट्सअँप => भारतातील काही मंडळी वापरतात म्हणून वापरावा लागतो. नोटिफिकेशन mute करून ठेवलेय. - टेलिग्राम => बहुतेक मित्र मंडळी ह्यावर आहेत. - सिग्नल => फक्त खास मित्र लोक वापरतात माझ्या मते सर्वप्रथम फेसबुक अकाऊंट पूर्ण पणे बंद करावा. मेसेंजर चे नवीन पर्याय बाजारांत येणार आहेत.

फेसबुक माध्यमातून मोबाईल पेजला मिळत नव्हते . नंतर मिळू लागले. पोस्ट्सच्या अध्येमध्ये जाहिराती. पण आता तशा जाहिराती वाटसपला नाही तर एक काच ठेवणार. एका बाजूने दिसतं दुसऱ्या बाजूचं तसं. ----------- टेलिग्रामही देईल जाहिराती. सोय देणार तर काही किंमत मोजावी लागणारच.

In reply to by मराठी_माणूस

https://play.google.com/store/apps/details?id=com.namastebharat Made In India ची सुरुवात करुया. अमेरिकन अँप वाँटसप च्या ऐवजी भारतीय अँप नमस्ते भारत स्विकारुया. *नमस्ते भारत अँप मध्ये वाँटसप पेक्षा जास्त फंक्शनस् आहेत* १)यात १६ एम्. बी.पेक्षा जास्त ५० एम्. बी.चा व्हिडीओ पाठवू शकता. २)यात word, excel आणि Adobe च्या फाईल्स पण पाठवू शकता. ३) यात २०० जण ग्रुप मध्ये अँड करता येतात. ४)कोणताही आकार नाही. पूर्णपणे मोफत. ५)वाँटसप सारखेच चालते.कांहीही फरक नाही. आजच Namaste Bharat स्विकारुन देशसेवेला सुरुवात करुया. सर्व मित्र मैत्रीणींना,नातेवाईकांना कळवा आणि नमस्ते भारत वरच एकमेकांना भेटा. *भारत माता की जय!*

माझ्या मते whatsapp वापरावे पण आपले संपूर्ण ट्रॅकिंग useless करण्याचे मार्ग आहेत. इन फॅक्ट, गूगल आपली किती माहिती ट्रॅक करते हे पाहिलं तर तुम्हाला धक्का बसेल. पण तरीही काही गोष्टी करता येतातच. - गूगल चं पूर्ण ट्रॅकिंग बंद करण्याचे options गूगल देते. ते वापरा. - chrome ऐवजी duckduckgo browser वापरा - माझे सर्व ठिकाणी वेगवेगळे प्रोफाईल्स आहेत. वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या जन्मतारखेसकट आणि वेगळी इमेल वापरून. जोडा व्हाट्सअप्प आणि फेसबुक आणि करा analysis. - फेसबुक फक्त browser वापरून उघडायचा ऑपशन आहे. - इन्स्टाग्राम वापरतच नाही आणि फेसबुक कधी तरी दोन महिन्यातून एकदा उघडतो. - काही न ट्रॅक करणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स पण आहेत, पण ते जाऊदे - जिमेल नको वाटत असेल तर प्रोटॉनमेल सारखी secure इमेल सर्व्हिस आहे. वापरून पहा. या निमित्ताने privacy वर चर्चा सूर झाले हे ही कमी नाही.

** सूचना ** उगाच मेक इन इंडिया आहे म्हणून काहीही मेसेंजर अप इन्स्टॉल करू नका. काही काळ थांबा. फेसबुक किंवा गुगल कडे आपला कितीही डेटा असला तरी तो बहुतांशी १००% सुरक्षित असतो. पण त्यांच वेळी शनिवारी सुरु करून मंगळवारी गायब होणाऱ्या कंपनी कडे काहीही सुरक्षित असू शकत नाही. भारतांत डेटा संबंधी कायदे नाहीत आणि फ्रॉड कंपन्यांची सध्या खूपच चालती आहे. निव्वळ तुमचे कॉन्टेक्स चोरून विकण्यासाठी अनेक मेसेंजर कंपन्या आपली अँप्स प्रमोट करणार आहेत. थोडा काळ थांबावे, कंपनी कुठली आहे, त्यांचे HQ कुठे आहे, इन्वेस्टर्स कोण आहेत हे थोडे वाचूनच ऍप्प इंस्टाल करावे. झोहो हि भारतीय कंपनी माझ्या मते जगांतील सर्वांत चांगल्या कंपनी पैकी असून लवकरच त्यांचे मेसेंजर अँप येणार आहे. हे वाचा : https://restofworld.org/2020/all-the-data-fit-to-sell/ [ Inside India's dark data economy ]

In reply to by साहना

---- उगाच मेक इन इंडिया आहे म्हणून काहीही मेसेंजर अप इन्स्टॉल करू नका. या वाक्याशी सहमत. उगाच काहीही भारताचं म्हणून किंवा सेफ म्हणून काहीही इंस्टॉल करू नका. काही काळ वाट पाहूया. वाट्सप काही जीवनमरणाच्या प्रश्न नै ये. भारतीय लोक, म्हणजे जगभरातले लोक तसेच असतील, काहीही व्हायरल करायला नंबर एक. दुसरं काहीच काम नाही. आलं की ढकल संप्रदायातले. आज सकाळी असंच एक दळण आलं. पूर्ण टाकत नाही. "A poor villager's son from Uttar Pradesh who passed from IIT with a gold medal has created an app called Signal ..... Also WhatsApp will be shut down in six months because their servers are not able to handle the traffic'' - Jai Hind - अजून मधल्या मॅटरमधे इथे नासा आणि यूनेस्कोने पहिल्या क्रमांकाचे app म्हणून कसा गौरव केला वगैरे... च्यायला कसलं सुचतं लोकांना काहीही. असो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा हा हा. त्यात नासा/एम आय टी/गूगल वगैरेचे भारतियाना भन्नाट वेड आहे. १५/१६ वर्षपुर्वी उत्तर प्रदेशातील एका मुलाने 'लंडनला जाउन नासाची परीक्षा दिली आहे. अशीच परीक्षा अब्दुल कलाम ह्यानी दिली होती" अशी बातमी चॅनेल्सवर येत होती. तो मुलगा अर्थातच "गरीब शेतकर्याचा व नियमाप्रमाणे "उच्च शिक्षणासाठी पैसे नव्हते" वगैरे. शेवटी खुलासा झाला- की मुलगा पैसे घेउन कुठेतरी मजा करयला गेला होता. पैसे संपल्यावर तोंड कसे दाखवायचे.. मग अशी ही कथा बनवली. आई वडिलानी ही कथा मग पत्रकाराना जशीच्या तशी सांगितली. स्थानिक पत्रकारानी मग ती देशभर नेली.

In reply to by मुक्त विहारि

मुविकाका तो ही फार काही सेफ पर्याय नाही! शेवटी ती साईट कुठे तरी होस्ट करावी लागेल, आणि त्या होस्टिंग कंपनीला त्यांच्या सर्व्हर वरील डेटाचा पूर्ण access असेल. ती माहिती (मूल्यवान असेल तर) ते इतरांना विकू शकतातच की! अर्थात बराचसा खर्च करून स्वतःच्या सर्व्हरवर आणि जागेत ती साईट होस्ट केली तर नक्कीच डेटा सुरक्षित राहील म्हणा, पण एवढी हौस कोणाला असेल कि नाही काय माहित 😀 टीप: मी स्वतः वेब होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करत असलो तरी कुठ्ल्य्शी ग्राहकाची कुठलीही माहिती इतरांना विकत/पुरवत नाही!

In reply to by टर्मीनेटर

घरच्या 100-200 माणसांसाठी, हे योग्य ठरेल. सध्या तरी, आर्थिक दृष्ट्या, कितपत परवडेल? ह्याचा अंदाज घेत आहोत. ही closed site असल्याने, virus येण्याची शक्यता कमी.

आपला डेटा कोणाच्या हातात पडतो त्यावर सगळे अवलंबून आहे/असेल. फार पर्सनल आणि सेन्सिटिव्ह माहिती शेअर करत नसतील त्यांनी चिंतीत होऊन व्हॉट्सॲप वापरणे बंद करणे मला तरी योग्य नाही वाटत. डेटा प्रचंड मौल्यवान वस्तू झाली आहे हे खरेच आहे आणि चुकीच्या व्यक्तींच्या हाती तो पडणे नक्कीच धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जरा जपून वापर करणे श्रेयस्कर! ह्यातले काही धोके दाखवणारा युट्यूब वरचा (The Return of Abhimanyu) हा dubbed सिनेमा अवश्य बघा, केवळ मसालेदार नसून बराच वास्तववादी आहे. https://www.youtube.com/watch?v=REdVA3_ORk0

जग अधिक सुंदर/सुरक्षित बनवणे, आंतर्जालाचा प्रसार करणे वगैरे बोलायच्या गोष्टी आहेत. फेसबूक असो टेलिग्राम.. तुमच्या व्यक्तिगत आवडी-निवडी व ईतर संभाषण data analytics कंपन्याना विकणे हाच त्यांचा पैसे मिळवण्याचा मार्ग आहे.मग रविवारी डोंबिवलीला मिटक्या मारत पिझा खाल्ल्ला की कल्याण-डोंबीवलीच्या पिझा हट्/डोमिनोझमधुन दर शनिवारी/रविवारी जीमेलवर येणार्या 'खास ऑफर्स' वाचायच्या. त्यात जे जे मोफत ते सर्व उत्तम ही भारतीय मानसिकता. 'डोक्यावर कोणते तेल वापरतो ते 'साफ' होण्यासाठी कोणते एरंडेल वापरतो.. फुकट मिळतेय म्हंटल्यावर भारतीय नागरिक कोणतीही माहिती देण्यास तयार असतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

इथली सर्व माणसे आपला डेटा इतका गुप्त ठेवण्यासाठी का झटत आहेत?जणू ही अँप्लिकेशन वापरण्यात काही सोय नाही ना आनंद ! एक पोस्टमन तुमचे कार्ड वाचू शकतो की नाही ? आपण या सर्व सोयींचा वापर घाणेरड्या हेतूसाठी केला तर आपल्याला काही त्रास होईल ना ? जाहिरातीचा मारा टीव्ही वर नसतो का ? मग त्याविरुद्ध आघाडी का नाही ? समजा मी समाजवादी विचाराचा आहे तर समाजवादाचे कट्टर शत्रू ती माहिती वापरून माझी सुपारी मारेकर्याना देण्याची शक्यता किती व ती असेलच तर ती १९७५ साली हे काहीच नव्हते त्यावेळी नव्हती का ? भारत देशात मतदान गुप्त असूनही कोट्यावधी लोक राजरोसपणे एखाद्या पक्षाचे सभासदत्व पत्करतात की नाही ? मग शिक्रेट काय राहिले ? आपण म्हंजे कोणीतरी व्हीही आय पी असून आपलली फळाची आवड निवड , कपड्याची आवड निवड , आवडता रंग ई माहिती कुणाला कळू नये त्यासाठी इतका आटापिटा काय म्हणून ? ती कळ ली तर काय फरक पडतो ? विवाह जमवून देणार्या संस्था तर आजकाल तुम्हाला अनुवांशिक जडण घडण कशी आहे हे ही विचारतात त्या इथे माहिती नाकारून पहा काय होते ते ! नोकरी करताय .. आपले छंद , इतर कला ,कसब याचा उल्लेख कशासाठी करता मग ?

In reply to by चौकटराजा

साध्या साध्या गोष्टींवरून, एखाद्या कुटुंबाची, गावाची, राष्ट्राची, मानसिकता समजू शकते. एखाद्या राष्ट्राला कोंडीत पकडण्यासाठी, ह्याच सामान्य माणसाच्या मानसिकतेचा आढावा, घेतला जाईल. जगाची शस्त्रे बदलत आहेत.

In reply to by मुक्त विहारि

ती मानसिकता पकडण्यसाठी फेसबुक चाच डेटा हवा कशाला.... ? भारतीय माणसाची मानसिकता भाविकतेच्या अंगाने जाते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छा सत्य एक उदाहरण म्हणून पुरेसे आहे. ( नुकताच देवळे उघडावी म्हणून भक्तानी केलेला टाहो आपण पाहिलाच की ) स्थान महात्म्य...... ( तीर्थक्षेत्र ई ) काल महात्म्य ( मूहूर्त ई ) व्यक्ती महात्म्य ( फु शा आं ) याचे नाव भारतीय माणूस . ते झुकरबर्गचेच कशाला सान्गायला हवे ! भारतात भा ज पा ला कोणत्या जाती मते देतात हे फेसबुक नसल्यापासून लोकाना माहीत आहेच की ! भोगीला हरबरा महाग होतो ,खण्देनवमीला झेन्डू महाग होतो ,दिवाळी आली की खाद्यतेले महाग होतात ! अमुक अमुक पुढारी बोलतो एक मनात एक असा आहे ,तमुक पुढारी रोखठोक आहे ! कोण तेल लावलेला पैलवान आहे. राजकीय माणसान्च्या फायली एकमेकाकडे असतात त्यामुळे निर्णायक शिक्षा कुठल्याच राजकीय माणसाला होत नाही ! ( कॉमनवेल्थ गेम भ्रश्टाचारचे काय झाले ? ) लोकपाल चे काय झाले ? ही सारी सिक्रेट्स काय फेसबुक सान्गते का?

In reply to by मुक्त विहारि

फेसबुक प्राधान्याने लोक कशासाठी वापरतात ते पाहू ! १. मी अमुक अमुक होटेल मधे एन्जोय करतोय हे जगाला दाखविणे २.माझ्या आईचा ,वडिलान्चा, मुलाचा मुलीचा पत्नीचा आमच्या लग्नाचा वाढदिवस जगाला कळावा म्हणून ३. आम्ही केलेली ट्रीप ४. आमचे गावाकडचे घर फार्म हाउन्स , शेतमळा जगाने पहावा म्हणून ५ आमची मान्जरी व्याली तिला दोन कन्या व दोन पुत्र झाले हे जगाला कळावे म्हणून ६. माझ्या केटरिग, रंगकाम म आकौंट रायटिन्ग ई ची जाहिरात फुकट करता येते म्हणून ७. पूर्वी कसे चान चान दिवस होते असा नोस्टाल्जियाचा राग आळवता यावा म्हणून ८ मी कारावके वर म्हटलेले गाणे ऐका मण्डळी , त्या बरोबर माझी मुलगी तीही कारवके वर गाणे म्हण्ते बरे हे दाखविण्यासाठी फेसबुक ९ आम्ही घेतलेला नवा अ‍ॅपलचा फोन माझ्या नवर्याने मला बर्थ्डे गिफ्ट म्हणून दिला हे सर्वाना कळावे म्हणून १०. चित्पावन , लाख मराठा , सी के पी , इ जात हा बेस धरून केलेले ग्रूप .. त्यावर मला पूजेला भटजी हवेत, अम्बाजोगाईला रहायची काही सोय आहे का ? एकदा घरी गणपति ला हलवल्यावर त्याची आरती घाटावर करावी का ? शास्त्रात काय सान्गितले आहे ? कोकणस्थ असून बोडण नाही असे कोणाचे घराणे आहेच का असल्या चौकशा ! ११ बबड्याला चांगला चोपला पाहिजे ते मला तर त्या येडपट आईच्याच कानाखाली वाजवाविशी वाटते येथवर स्वतः चा राग मोकळा करणे १२ कळविण्यास आनन्द वाटतो की माझ्या चुलत भाचीचा साखरपुडा काल सम्पन्न झाला...... मग अभिनन्दनाची रान्ग. १३. माझे आजोबा वयाच्या ९८ व्या वर्षी वारले ... मग आर आय पी किन्वा भावपूर्ण श्रद्धान्जलीची रांग वरील तेरा आयटम मधे स्वतः ची मते बनवायला कुठे जागा आहे ........ ? की ज्या मतांमुळे मी एखादे सरकार उलथवू शकेन ? आपण लई मोठ्ठे आहोत हा ज्याचा गोड गैरसमज आहे त्याला मात्र मी यातून क्रांतिकारी कार्य करणार आहे असे वाटणे स्वाभाविक आहे !! माझ्या परिचयातील व नात्यातील ९५ टक्के लोक फेसबुक वर फक्त वर्षाचा आपला वाढदिवस साजरा व्हावा व आपला अहन्कार त्यामुळे सुखावावा यासाठी मेम्बर झालेले आहेत ! मग यू "मेड माय डे .. असे घासून तयार झालेले वाक्य टाकायचे की मग शुभ दीपावली , ह्याप्पी न्यू यर साठी कधीतरी उगवायचे असा खाक्या असतो !

In reply to by चौकटराजा

यात पाउट, नवीन साडी, "फेबुफ्लेक्स"फेम सतरंज्या उचलणारे, एकदा केलेल्या ट्रिपची फोटोमधून दहादा झैरात करणारे हे सगळे अ‍ॅडवा :)

In reply to by चौकटराजा

लोकं पॅनिक का झालेत कारण whatsapp वाल्यांनी कमीतकमी सांगितलं तरी आहे आम्ही असा असा डेटा कलेक्ट करतो, त्याने लोकांना जरा शुद्धी आलीये पूर्वी GDPR वगरे येण्याच्या आधी कसाही डेटा कलेक्शन करायच्या वेबसाईट आणि अँप्स. बाकी किती तरी application एकतर unsecured आहेत आणि त्यांचे सर्व्हर कोणीपण होस्ट केलेले असतात मग डेटा लीक होणं इ. गोष्टी घडतात. बऱ्याच वेळा ToS मध्ये न declare केलेला पण डेटा कलेक्ट केला जातो कंपन्यांकडून. Worst examples are Facebook and Google. मागच्या वर्षी पर्यंत तर गूगल असिस्टंट, cortana इ. चे रेकॉर्डिंग ऐकायला employees ठेवलेले expose झाल्यानंतर त्याचा consent गुगल आणि मायक्रोसॉफ्ट ने लोकांना पाठवलं आणि त्या एम्प्लॉईस ना रातोरात फायर केलं. असले खूप उदाहरणं सापडतील. पण मग इतकाच स्वतः चा डेटा सेन्सिटिव्ह वाटत असेल तर मग Android/विंडोज सारखे क्लोजड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम वापरून घोर चूक करत आहात. कुठलं का अँप्लिकेशन असेना, सेन्सिटिव्ह डेटा असा unencrypted पाठवू किंवा स्टोर करू नये (7-zip AES256, Bitlocker, VeraCrypt इ. वापरावं), android मध्ये सगळ्या अँप्स ना सगळ्या परमिशन न बघता देऊ नये इ. सध्या गोष्टी करणं सुद्धा पुरेसं असतं. हे डिजिटल हायजीन पाळलं पाहिजे.

In reply to by उपयोजक

XX फाटली वाटतं सरळ सरळ त्यांची, म्हणून जरा ब्याकफुटवर आलेत आहेत असे वाटते. चलो देर आये दुरुस्त आये म्हणू या.....! -दिलीप बिरुटे

यांच्या दोन्ही प्रतिसादाशी पूर्ण सहमत. इतर बऱ्याच गोष्टींप्रमाणे प्रायव्हसी बाबतीत पाश्चात्य लोकांचं अंधानुकरण चालू आहे. WhatsApp, फेसबुक अन झुकेरबर्ग ला शिव्या घालणाऱ्यांपैकी निम्म्या लोकांना नक्की काय चाललंय अन त्याचे काय परिणाम होणार आहेत त्याची सुतराम कल्पना नाही. आणि बाकी निम्मे privacy anxiety ने ग्रस्त झाल्यासारखे वागत आहेत. आपली डिजिटल फुटप्रिंट आणि आपल्या "खाजगी" गोष्टी यात लोक गल्लत करतात. प्रा डॉ यांच्या पहिल्या प्रतिसादात लिहिल्या नुसार तुम्ही इंटरनेट शी कनेक्ट झाला की तुमची गोपनीयता संपते. मग व्हॉट्सॲप वापरा किंवा नका वापरू. त्यांनी नवी पॉलिसी जाहीर करो वा गुपचूप डेटा गोळा करो. गुगल वापरा किंवा बिंग किंवा डकडकगो किंवा आणखी काही. सिग्नल किंवा डकडकगो तुम्हाला सांगून विकत नाहीत, एवढंच काय ते मानसिक समाधान. आपला मुलगा बाहेर मद्यपान करतो हे माहिती असून आपल्या समोर तर नाही ना करत, यात वाळूत डोकं खुपसलेल्या शहामृगासारखे आपण दुर्लक्ष करतो. मी स्वतः समाज माध्यम वापरात नाही, पण ते त्यातून होणाऱ्या स्व पूजक लोकांना अन ९९% खोट्या माहितीच्या भडीमाराला वैतागून. बाकी गुगल वा व्हॉट्सॲप च्या बागुलबुवा ला घाबरण्यापेक्षा सध्यातरी त्यांचा उपयोगच होतोय.

करणदीप आनंद, Vice President, Head of Workplace at Facebook App यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टद्वारे या बदलांबद्दल माहिती दिली आहे

PSA: Questions about WhatsApp? After responding to a few hundred relatives and friends, figured it might be easier to...

Posted by Karandeep Anand on Saturday, January 9, 2021

इंटरनेट वरती फक्त यु ट्युबच सोप्या पध्द्तिने चांगल राहलय व्यक्त होण्यासाठी,नवीन काही चांगल शिकायला..कारण तिथे व्हाटसपवर ,फेसबुकवर काकी,मावशी,आत्या फार हेरगिरी आणि कसले कसले मोठे मोठाले मेसेज करतात ;(,त्या पेक्षा दूरध्वनी केलेला चांगल ना. टेलीग्राम सध्या शिकतेय.व्यावसायिक संदेश वहनासाठी प्रत्येकाच स्वतंत्र सोफ्टवेअर पाहिजे.लॉकडाऊन पासून फेसबुकवर जाहिरातबाजीचा वीट आलाय.ब्राउसरहूनच फेबु पाहते.जवळच्या मित्रमैत्रिणींसाठीच व्हाटसप वापरते.आपल्या माहितीचा वापर जाहिरातीचा भडीमार करण्यासाठी होणार असेल तर नकोच हे सोशल मेडीया!! -(हळूहळू सोशल मेडियापासून संन्यास घेऊ इच्छिणारी भक्ती)

बर्‍याच विनोदी प्रतिक्रिया वाचल्या ! त्या वाचुन मला मिपावरचा हा [ हेल्मेटसक्ती ] प्रसिद्ध धागा आठवला ! वाचकांनी त्या धाग्याचा लुफ्त लुटावा ही विनंती ! :))) असो... व्हाॅट्स ॲपच्या एका प्रायव्हसी पॉलिसीमुळे त्यांनी स्वतःचीच कशी मस्त ठासुन घेतली ते पाहुन लयं आनंद झाला. तसेही टेक जायंट मोकाट सुटले आहेत हे आता आपल्या समोर असुन अगदी आरश्या सारखे स्पष्ट देखील दिसते. त्यात फेसबुक ची अपकिर्ती ही अधिक आहे. मुक्त विचार स्वातंत्र्याचा गळा घोटणे हे काही वर्षात याच टेक कंपन्यांनी केले आहे, तसेच युजर्सच्या व्यक्तीगत माहितीचा जमेल त्या मार्गाने [ भलेही तो चुकीच्या पद्धतीने / नीतिमत्ता फाट्यावर मारुन ] माग काढला आहे. या निमित्त्याने लोकांमध्ये प्रायव्हसी या गंभीर विषया संबंधी जागरुकता वाढली या बद्धल मी व्हाॅट्स ॲप चे आभारच मानीन ! :) ज्या लोकांना खरंच या विषयात रस असेल त्यांनीच खालील दुवे उघडण्याचे कष्ट घ्यावेत ही विनंती ! :- ‘If You Build for India, You Build for the World’: Signal Co-Founder Brian Acton on WhatsApp and Future of Private Messaging The Underworlds Of Whatsapp Big blow to WhatsApp! Several top company executives move their account to Signal जाता जाता :- जर तुमचा जी-मेल आयडी तुम्ही अ‍ॅमॅझॉनच्या साईटवर दिला असेल तर तुम्ही खरेदी केलेल्या सामानाची यादीच गुगल [ जी-मेल ] बनवते, हे तुम्हाला ठावूक आहे का ? यावर अधिक माहिती मिळवण्यासाठी gmail purchase history असा सर्च करावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jenny from the Block (Official Music Video) :- Jennifer Lopez

In reply to by मदनबाण

मुक्त विचार स्वातंत्र्याचा गळा घोटणे हे काही वर्षात याच टेक कंपन्यांनी केले आहे

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zoo Zoo Zoobie Zooby... :- [ Dance Dance (1987) ]

In reply to by उपयोजक

हे झाले तर समस्या काय आहे ? जो पर्यन्त मी नको त्या ठिकाणी जात नाही तो पर्यन्त मला गुगल मॅप ची मदतच होत असते असा माझा अनुभव आहे ! मी श्रीमंत असेन तर मला फालतू मोबाइलची जाहिरात माझ्या समोर आली तर का आवडेल ? मला भारी मोबाइलचीच जाहिरात हवीच असते ! फक्त सोशल मीडियामधून आर्थिक व्यवहार जो वर मी करीत नाही तोवर माझी कुठलिही माहिती मी अगदी ट्रम्प ला देखील थेट द्यायला तयार आहे !! मला तरी आतापावेतो अशा जाहिरातीच्या लिंक्स चा फायदाच झालेला आहे !! आता सुरक्षित्तेचे म्हणाला तर डिकास्टा म्हणतात त्याप्रमाणे कोणतीही मेल १०० टक्के सुरक्षित नाही ! मी त्यावर अशी पुस्ती जोडेन की मग पोस्टकार्ड चालू करा आणि पोस्टमन ते झाडाच्या सावलीत बसून वाचण्याचीही आपोआप सोय होऊ द्या !

In reply to by उपयोजक

वरील गोष्टी या आधीपासुनच होत आहेत. सर्वात जास्त डेटा तर गुगल घेत आहे. सरकारने यावर निर्बंध आणायला पाहीजे कारण आर्थिक बाबतीत हे धोकादायक आहे.

मी व्हॉटसअ‍ॅप वापरायचे अगदी कमी करुन ते फक्त कामापुरतेच वापरतो. साधारण २-३ वर्षांपुर्वीच टेलिग्राम वापरणे चालू आहे व ते मला जास्त आवडते. व्हॉटसअ‍ॅप न आवडायचे कारण म्हणजे तिकडची मंडळी समोरच्याला अगदी सळो की पळो करुन सोडतात. फोन नाही लागला तर सरळ व्हॉटसप ऑडीओ/व्हिडिओ कॉल करतात. समोरच्याला आपला फोन घ्यायचाय की नकोय त्याची पण पर्वा नाही. मात्र एखादा भारतीय कसा बाहेरच्या देशात गेला की शिस्तीत वागतो आणि भारतात आल्यावर कसा गाडीतून रस्त्यावर कचरा फेकतो अगदी तस्सीच मानसिकता व्हॉटसअ‍ॅप आणि टेलिग्राम वर आहे. म्हणजे व्हॉटसअ‍ॅप वर चाळे करणारा तोच माणुस टेलिग्राम वर अगदी शिस्तीत कसा वागतो हे कोडे मला अजुनही उलगडले नाही. शिवाय लॉकडाऊन मधे टेलिग्राम ने भरपुर चित्रपट, मालिका बघण्याचा आनंद मिळवून दिला. त्यामुळे माझी पहिली पसंद पहिल्यापासूनच टेलिग्राम आहे. शिवाय हे मोबाईल वरुन काढून टाकले तरी डेस्कटॉप / लॅपटॉप वर चालूच राहते हा अजून एक फायदा.