मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता शोधायला मदत

आनन्दा · · काथ्याकूट
आम्ही सध्या एक जुनी कविता शोधत आहोत.. "मी बाई कोकिळ वनांची राणी गाईन सुंदर गोड गाणी" याचे कवी माहीत नाहीत, कवितासंग्रह पण माहीत नाही.. जुन्या पुस्तकांमध्ये कुठेतरी होती.. आम्हाला माहीत असलेले version इतके आहे - मी बाई कोकिळ वनांची राणी गाईन सुंदर गोड गाणी । घुमतील रानी सुस्वर माझे म्हणतील कोणी वीणा वाजे ।1। लपून बसेन मी झाडांमध्ये गाईन पंचम सुरामध्ये येईल का कुणी ऐकायला माझ्याशी रानात खेळायला ।2। ही कोण आली सुळूक सुळूक अगबाई ही तर वाऱ्याची झुळूक वाऱ्यावर झुलते परी जशी हळूच फुंकर घालते कशी ।3। अग अग झुळके पवनाराणी काय ग म्हणतेस वसंतराणी येतेस का माझ्याशी खेळायला? नाही ग बाई, जाते मी मोठ्या कामाला ।4। बंगलीत जाईन अमिराच्या झोपडीत जाईन गरिबांच्या देईन हवा अन जगविन जिवा साऱ्या जगाचा होईन विसावा । 5। तू तर कोकिळे मुलखाची आळशी तुझ्याशी खेळायला येऊ मी कशी ?

वाचने 2699 वाचनखूण प्रतिक्रिया 4

राघव 06/01/2021 - 18:20
पण एक ४ पुस्तकांचा संच आहे - "आठवणीतल्या कविता" म्हणून. लेखक/संकलकः पद्माकर महाजन. त्यात कदाचित मिळू शकेल, नक्की कल्पना नाही.