कविता शोधायला मदत

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
6 Jan 2021 - 5:09 pm
गाभा: 

आम्ही सध्या एक जुनी कविता शोधत आहोत..

"मी बाई कोकिळ वनांची राणी
गाईन सुंदर गोड गाणी"

याचे कवी माहीत नाहीत, कवितासंग्रह पण माहीत नाही.. जुन्या पुस्तकांमध्ये कुठेतरी होती..

आम्हाला माहीत असलेले version इतके आहे -

मी बाई कोकिळ वनांची राणी
गाईन सुंदर गोड गाणी ।
घुमतील रानी सुस्वर माझे
म्हणतील कोणी वीणा वाजे ।1।
लपून बसेन मी झाडांमध्ये
गाईन पंचम सुरामध्ये
येईल का कुणी ऐकायला
माझ्याशी रानात खेळायला ।2।
ही कोण आली सुळूक सुळूक
अगबाई ही तर वाऱ्याची झुळूक
वाऱ्यावर झुलते परी जशी
हळूच फुंकर घालते कशी ।3।
अग अग झुळके पवनाराणी
काय ग म्हणतेस वसंतराणी
येतेस का माझ्याशी खेळायला?
नाही ग बाई, जाते मी मोठ्या कामाला ।4।
बंगलीत जाईन अमिराच्या
झोपडीत जाईन गरिबांच्या
देईन हवा अन जगविन जिवा
साऱ्या जगाचा होईन विसावा । 5।
तू तर कोकिळे
मुलखाची आळशी
तुझ्याशी खेळायला
येऊ मी कशी ?

प्रतिक्रिया

राघव's picture

6 Jan 2021 - 6:20 pm | राघव

पण एक ४ पुस्तकांचा संच आहे - "आठवणीतल्या कविता" म्हणून. लेखक/संकलकः पद्माकर महाजन.
त्यात कदाचित मिळू शकेल, नक्की कल्पना नाही.

बहुतेक ग ह पाटील यांची असावी.

इथे ती अर्धवट आहे. मूळ कविता खूप मोठी आहे म्हणे..