Skip to main content

करोनात्रस्त त्रागा

करोनात्रस्त त्रागा

Published on मंगळवार, 13/10/2020 प्रकाशित मुखपृष्ठ
संदीप खरे यांची क्षमा मागून, चाल - मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो करोनामुळे काही लोक पूर्ण घरात बसून आहेत, सगळी काळजी घेत, आणि काही लोक सगळे नियम धाब्यावर बसवून फिरतायत, त्यावरून झालेला वैताग आता कवितेतून व्यक्त होत आहे मी नाकावरती दहा मुखवटे आवळतो तो उघड्या नाकपुड्यानी गावातून फिरतो मी दाव्याच्या बैलापरी झालो बंदी तो उनाड रेड्यापरि धावे स्वच्छंदी मी दाव्यावरती पाय गंजवित बसतो तो उघड्या नाकपुड्यानी गल्लीत फिरतो डोळ्यात माझिया पोलीसांची भीती असते डोक्यावर हेल्मेटही चिलखती तो त्याच पोलिसांनाही खुन्नस देतो तो उघड्या नाकपुड्या आम्हाला हसतो मी शिंकेच्या आवाजाला घाबरतो अन दारे खिडक्या लावून घरात लपतो तो त्याही आवाजाला देऊन संगीत टिकटॉक बनवून रोज व्हायरल होतो मी मोजून सोशल distancing ची खोली पट्टीने मोजून हात, बोलतो बोली तो सरळ तोडूनी लाईन घुसतो आणि वाण्याच्या हातून घेऊन जिन्नस जातो हे सगळे होऊन पण, शेवटी या काळजी घेणाऱ्या माणसाला करोना झालाच, मग तो वैताग आता त्याने व्यक्त केला आहे.. एवढ्या वेळात याने दुसऱ्या माणसाला *फाटकी चड्डी* च्या धर्तीवर *उघड्या नाकपुड्या* असे नाव देऊन टाकले आहे.. हा माणूस करोना होऊन 21 दिवस हॉस्पिटलात जाऊन आला, पण उघड्या नाकपुड्या मात्र अजून फिरतोच आहे.. आता बघा तो वैताग कसा व्यक्त होतो!! मी करी मुखवट्यांचाच नवा शृंगार पण तरी करोना करे मजवरी वार तो "उघड्या नाकपुड्या" सर्वांना छळतो का कळे करोनाही त्याला घाबरतो - आनंद वैद्य
लेखनविषय:

याद्या 3849
प्रतिक्रिया 8

हिही

खरेच आहे, त्रागा होणारच.