||चंद्रवेळ||
1 आकाशातून खिडकीत, खिडकीतून फोटोत उतरलेला चंद्र,
तुला WhatsApp वर पाठवला की मग कुठे माझी पौर्णिमा सुरू होते.
अन तुझा त्यावर reply आला की ती शारदीय होते.
2माहीत असतं, "छान, ओके किंवा तूच माझा चंद्र"
याहून दुसरा तुझा reply येणार नाही.
पण तरी मी खूष असते कारण मला कळतं
याहून अधिक तुला खरंच काही सुचणार नाही.
3 आठवतं? एका रात्री एअरपोर्टवरवरून तू मला कॉल केला होतास.
तू घरी पोचेपर्यंत आपण बोलत होतो. .
तेव्हा चंद्रसुद्धा खिडकीपाशी थांबून राहिला होता.
4 एकदा मोकळ्या आभाळाखाली समुद्रकिनारी
तुझ्या कुशीत चांदणी रात्र घालवायचीय.
खाली चमचमणारी वाळू, समोर चमचमता समुद्र
पांघरायला चांदणं... प्लीज? एकदाच?
5 कधी कधी वाटतं, आपल्या या नात्यात
मी तुला हट्टाने पकडून ठेवलंय, चांदण्यासारखं
जरा मूठ सैल केली की तू निघून जाशील.
मागं कसलीही खूण न ठेवता..
6न राहवून तुला काल खिडकीतल्या चंद्राचा फोटो पाठवला.
वाटलं, इतक्या दिवसांच्या अबोल्यानंतर तू काही तरी तर बोलशील..
आपल्यातलं अंतर मी केव्हाच स्विकारलेलं
खात्री होती की दुसऱ्या टोकाला तू नक्कीच असशील..
7 तुझा हात तर सोडून दिलाय, निग्रहाने,
मनाचा चकोर झालाय..
आपली चंद्रवेळ परतून येईल???
छान
खूपच सुरेख.
मस्त लिहीलीये!
बाब्बौ..!
छानच..
धन्यवाद सगळ्यांंना! :)
एकेका कडव्याचा प्रवास
धन्यवाद.
हो ना. कशा आहात तुम्ही? काही
सुंदर !
लाजवाब
:)
आकडे का टाकलेत कळलं नाही.