नेहमी प्रमाणेच छान !!
पुरी येथे गेलात भगवान जगन्नाथाचे दर्शन तरी घ्यावयास हवे होते हो.....
बाकी तुम्हाला लहानपणापासून निसर्ग आवडतो असा माझा कयास आहे... नेहमी तुम्हाला पाऊस व पावसाळी वातावरण आवडत असावे.. तुमच्या लेखनी मध्ये हे आरामात लक्षात येते.. प्रवास असाच रंगत दार ठेवा.. व पुढील भाग लवकर येऊ देत.
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
मेघदुत ची आठवण झाली. :)
ढगातला प्रवास आवडला, आकाशात जेव्हा केव्हा ढगांचा प्रवास पाहात राहू आपल्या लेखाची आठवण होत राहील.
ढगांच्या खिडकीतून खाली डोकावल्यावर काय काय दिसले वाचायला मजा आली.
''आकारमानाप्रमाणे आणि प्रदेशानुसार गारांचे वर्गिकरण करुन ठेवले होते.त्या एका चाळणीमधुन खाली टाकण्यात येणार होत्या. पाण्याने भरलेले छोटे ढगांचे तुकडे रचुन ठेवले होते.पाउस पडण्यापूर्वी वातावरण निर्मिती व्हावी म्हणुन ढगातील स्पीकर चालु केले होते.''
हाहाहाहा हे लै भारी !!!
बाकी 'ऐन' ला भेटल्याशिवाय आपला प्रवास थांबवूच नका आणि ती इतक्या सहजा सहजी भेटता कामा नये !!!
पाउस झाल्यामुले माणसे खुशीत येत असतीलच पण ढगही खुशीत येतात. ते हलेके होतात. पुढील प्रवासासाठी हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे म्हणत एकमेकांत मिसळतात.शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे तसे काहिसे झाले.....आमच्या ढगात बरेचसे लहनमोठे ढ्ग मिसळले.
छान कल्पना.
हाही ढगप्रवास आवडला.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. >>>
ही तुमची वर्णन करण्याची शैली मला आमचा नववी कि दहावीतील धडा आठवुन देते.
त्यात विठ्ठल गाडगीळ (चु भु दे घे) यानी त्यांच्या केरळ प्रवासाचे वर्णन केले होते. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
मस्त लेख....
पारले मोनॅकोच्या ऍडचे वर्णन आवडले....:)
फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते.
बाळापण आठवले...आम्हीपण सलाईनचा वापरकरून कारंजा करत होतो...:)
अजुनी तिला भेटला नाहीत याचे जास्त वाईट वाटले...:)
फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते.बाळापण आठवले...आम्हीपण सलाईनचा वापरकरून कारंजा करत होतो...
हेच म्हणतो विजुभाऊ...मस्तच
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
हवाई प्रवासाच्या नियमा नुसार ढगात ;हलकी असतात म्हणुन फ़क्त मोनॅको बिस्कीटे विकायला परवानगी होती.
शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे
जमलाय लेख. तुमच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे.
बाकी ढगांपासून प्रेरणा घेऊन एवढे लिखाण करणारे कालिदासानंतर बहुतेक तुम्हीच. :D :D
बिपिन.
पेस्तनकाकांचा आवाज या वेळेस स्पष्ट आला. मी वर पाहिले.....पहातो तो काय. पेस्तनकाका हवेत तरंगत होते.त्यानी मोनॅको बिस्किटे जास्त प्रमाणात खाल्यामुळे ते फ़ारच हलके होऊन हवेत तरंगत होते.
हा हा हा ...
खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती.
खुप सु॑दर वर्णन.
हळु हळु सगळे तारे अंधुक व्हायला लागले.पूर्वेला निळसर गुलाबी गुलालाची उधळण होऊ लागली.मी आत्तापर्यंत सूर्योदय फ़क्त डोंगराआडुनच होताना पाहिला होता.हा सूर्योदय अगदी क्षितीजावरुन होत होता.आकाश गुलाबी सोनेरी लालसर मोरपंखी अशा अनेक रंगानी भरुन गेले. आमचा ढग तर मिनिटामिनिटाला नवा रंग धारण करत होता.हळु हळु त्या प्रत्येक रंगात एक सोनेरी झाक डोकावु लागली. पूर्वेकडे साक्षात भगवान सहस्त्ररश्मी क्षितीजाआडुन डोकावु लागले.क्षितीजावरुन सूर्यास्त दिसतो जवळ जवळ तेवढाच सूर्योदय ही मनोहर दिसतो. किंबहुना त्यापेक्षा जास्तच. कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती. हळुहळु सगळ ढग लालसर सोनेरी प्रकाशाने न्हाउन निघाला. त्या प्रकाशात आम्ही सगळेच लालसर सोनेरी यक्ष दिसु लागलो. तेजपुंजाची झळाळी काय असते याचा आम्ही अनुभव घेत होतो.
निसर्ग सौद॑र्याची उधलण छान केली आहे स्वप्नात. तुम्ही आम्हाला ही स्वप्नात पाठवलेत.
स्वप्नप्रवास नेहमीप्रमाणे मजेशीर झाला ...
शितलला ज्या वाक्यांवर हसु आले तेथेच मला पण हसु आले तेव्हा पुन्हा स्मायली टाकण्यात अर्थ नाही ...
प्रवास नंतर लवकर संपवू नये ...
[ तसे मनात असल्यास आम्हाला वेगळी व्यवस्था करावी लागेल, च्यायला ढगांचे "ट्रॅफीक जाम" करुन टाकतो एकदम बेंगलोर श्टाईल, मग बसा वर्णन करत ....]
अवांतर : विजूभौ व्हीक्टर ममधले "व्हीक्टर" काय आहे ???
छोटा व्हिक्टर डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
विजूभौ व्हीक्टर ममधले "व्हीक्टर" काय आहे ???
ऍन मला विजुभाऊ न म्हणता व्हिक्टर या समानार्थी नावाने हाक मारते / ओळखते.
( मैत्रिणीने भाऊ म्हणुन संबोधणे .. :SS .ह्रदयाला काय वेदना होतात हे तुम्हाला काय ठाउक. तुम्हाला तुमची मैत्रीण डॉनुड्या शोनुड्या म्हणत असेल हो.....आमच्या नशीबी नेहमी सालं "भाऊ"च. माझे नाव मी बदलुन विजु"बबड्या" असंच ठेवतो आता )
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
छे: आजही तसेच. ऎन; पुन्हा.एकदा मी स्वप्नात तुला न भेटताच परत आलो. ही अशी स्वप्नांची समाप्ती नको वाटते. पण ते आपल्य हातात थोडेच असते.
विजुभौ गटणे मामा म्हणतो की ऍनने तुम्हाला नकार दिला म्हणुन.......=))
पण लगे रहो....एक ना एक दिवस तुमची स्वप्ने खरी होतील...
तुम्हाला ऍन वास्तवात ही भेटावी ...ही सदीच्छा
खास जेलो ला पाठवले आहे ना. ती आमच्या ग्रुप ची आवडती हेरोईन. तीचे लग्न झाले तेव्हा आम्ही शोकसभा वैगरे घेतली.
विजुभाउ थोडे समजुन घ्या. 'कहानी मे टिवस्ट' :)
खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती.
खडकावरुन फ़ेसाळत खळाळणारा पाण्याचा शूभ्र प्रवाह...त्याभोवती गवताचे हिरवे गार मखमली पाचुचे मखर. मधेच दिसणारी लालसर काळी माती या सगळ्याला विसंगत छेद देणारा काळाशार डामरी राष्ट्रीय महामार्ग. अक्षरश: वेड लावणारे दृष्य होते ते. हिरव्या रंगाच्या अगणीत छटा कोणीतरी मनाला येईल तशा उधळल्या होत्या.एका रंगाच्या इतक्या छटा असतात हे प्रथमच पहात होतो.नुकत्याच फ़ुटु पहाणा-या कोवळ्या सोनेरी लालसर मखमली दुलई पासुन ते गाभुळल्या शेवाळी काळसर हिरव्यापर्यंत........दाट वाढलेल्या कुरणाच्या फ़िक्कट पोपटी छटेपासुन ते वा-यावर नाचत हिंदोळणा-या मोठ्या हत्ती गवताच्या पाचुच्या हिरव्या गालिच्या पर्यन्त हिरव्या रंगाच्या असतील नसतील तेव्हढया सगळ्या छटा उपस्थित होत्या.
सुंदर वर्णन. आवडले.
अभिनंदन.
प्रतिक्रिया
नेहमी
मस्त
मेघदुत ची
व्हिक्टर..
छानच नेहमीप्रमाणे
सहमत
मला हा भाग
व्हिक्टरभाऊ
नेहमीप्रमाणे
अगदी
हवाई
सुखद प्रवास.........
मस्त, अगदी दोन्ही हाता॑नी निसर्ग सौद॑र्याची उधलण करणारे स्वप्न.
अगदी शितल
हेच म्हणतो ...
विजूभौ व्हीक्टर
मस्त!!
छे: आजही
खास जेलो
सुंदर....