Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक स्वप्न प्रवास (८)

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 06/12/2008 - 09:38  ·  लेख
लेख

Book traversal links for एक स्वप्न प्रवास (८)

  • ‹ एक स्वप्न प्रवास.(७)
  • Up
  • एक स्वप्न प्रवास (९) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10131 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

र
राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/12/2008 - 09:47 नवीन

नेहमी

नेहमी प्रमाणेच छान !! पुरी येथे गेलात भगवान जगन्नाथाचे दर्शन तरी घ्यावयास हवे होते हो..... बाकी तुम्हाला लहानपणापासून निसर्ग आवडतो असा माझा कयास आहे... नेहमी तुम्हाला पाऊस व पावसाळी वातावरण आवडत असावे.. तुमच्या लेखनी मध्ये हे आरामात लक्षात येते.. प्रवास असाच रंगत दार ठेवा.. व पुढील भाग लवकर येऊ देत. राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 06/12/2008 - 09:59 नवीन

मस्त

मस्त वर्णन आपल्या पुढील सर्व प्रवासास हार्दीक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/12/2008 - 10:03 नवीन

मेघदुत ची

मेघदुत ची आठवण झाली. :) ढगातला प्रवास आवडला, आकाशात जेव्हा केव्हा ढगांचा प्रवास पाहात राहू आपल्या लेखाची आठवण होत राहील. ढगांच्या खिडकीतून खाली डोकावल्यावर काय काय दिसले वाचायला मजा आली. ''आकारमानाप्रमाणे आणि प्रदेशानुसार गारांचे वर्गिकरण करुन ठेवले होते.त्या एका चाळणीमधुन खाली टाकण्यात येणार होत्या. पाण्याने भरलेले छोटे ढगांचे तुकडे रचुन ठेवले होते.पाउस पडण्यापूर्वी वातावरण निर्मिती व्हावी म्हणुन ढगातील स्पीकर चालु केले होते.'' हाहाहाहा हे लै भारी !!! बाकी 'ऐन' ला भेटल्याशिवाय आपला प्रवास थांबवूच नका आणि ती इतक्या सहजा सहजी भेटता कामा नये !!!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 06/12/2008 - 10:49 नवीन

व्हिक्टर..

वा व्हिक्टर
पाउस झाल्यामुले माणसे खुशीत येत असतीलच पण ढगही खुशीत येतात. ते हलेके होतात. पुढील प्रवासासाठी हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे म्हणत एकमेकांत मिसळतात.शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे तसे काहिसे झाले.....आमच्या ढगात बरेचसे लहनमोठे ढ्ग मिसळले.
छान कल्पना. हाही ढगप्रवास आवडला. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 06/12/2008 - 11:52 नवीन

छानच नेहमीप्रमाणे

झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. >>> ही तुमची वर्णन करण्याची शैली मला आमचा नववी कि दहावीतील धडा आठवुन देते. त्यात विठ्ठल गाडगीळ (चु भु दे घे) यानी त्यांच्या केरळ प्रवासाचे वर्णन केले होते. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 06/12/2008 - 16:13 नवीन

सहमत

अक्शी खरे ... नववी तल्या या धड्यात नारळीच्या बागांचे असे काही वर्णन दिले आहे की बास .. बाकी ते वर्णन खोटे वाटावे अशी सध्या केरळची अवस्था आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/12/2008 - 12:00 नवीन

मला हा भाग

मला हा भाग खूप आवडला!! फार सुंदर वर्णन...! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/12/2008 - 12:36 नवीन

व्हिक्टरभाऊ

व्हिक्टरभाऊ मस्तच... कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती. हे फार आवडल.. (स्वप्नाळु) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 06/12/2008 - 14:03 नवीन

नेहमीप्रमाणे

मस्त लेख.... पारले मोनॅकोच्या ऍडचे वर्णन आवडले....:) फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते. बाळापण आठवले...आम्हीपण सलाईनचा वापरकरून कारंजा करत होतो...:) अजुनी तिला भेटला नाहीत याचे जास्त वाईट वाटले...:)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 06/13/2008 - 01:42 नवीन

अगदी

फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते. बाळापण आठवले...आम्हीपण सलाईनचा वापरकरून कारंजा करत होतो... हेच म्हणतो विजुभाऊ...मस्तच कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/12/2008 - 15:15 नवीन

हवाई

हवाई प्रवासाच्या नियमा नुसार ढगात ;हलकी असतात म्हणुन फ़क्त मोनॅको बिस्कीटे विकायला परवानगी होती. शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे जमलाय लेख. तुमच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. बाकी ढगांपासून प्रेरणा घेऊन एवढे लिखाण करणारे कालिदासानंतर बहुतेक तुम्हीच. :D :D बिपिन.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे गुरुवार, 06/12/2008 - 16:28 नवीन

सुखद प्रवास.........

कमाल आहे तुमच्या कल्पना शक्तीची.. मानलं तुम्हाला...
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 06/12/2008 - 17:36 नवीन

मस्त, अगदी दोन्ही हाता॑नी निसर्ग सौद॑र्याची उधलण करणारे स्वप्न.

पेस्तनकाकांचा आवाज या वेळेस स्पष्ट आला. मी वर पाहिले.....पहातो तो काय. पेस्तनकाका हवेत तरंगत होते.त्यानी मोनॅको बिस्किटे जास्त प्रमाणात खाल्यामुळे ते फ़ारच हलके होऊन हवेत तरंगत होते. हा हा हा ... खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती. खुप सु॑दर वर्णन. हळु हळु सगळे तारे अंधुक व्हायला लागले.पूर्वेला निळसर गुलाबी गुलालाची उधळण होऊ लागली.मी आत्तापर्यंत सूर्योदय फ़क्त डोंगराआडुनच होताना पाहिला होता.हा सूर्योदय अगदी क्षितीजावरुन होत होता.आकाश गुलाबी सोनेरी लालसर मोरपंखी अशा अनेक रंगानी भरुन गेले. आमचा ढग तर मिनिटामिनिटाला नवा रंग धारण करत होता.हळु हळु त्या प्रत्येक रंगात एक सोनेरी झाक डोकावु लागली. पूर्वेकडे साक्षात भगवान सहस्त्ररश्मी क्षितीजाआडुन डोकावु लागले.क्षितीजावरुन सूर्यास्त दिसतो जवळ जवळ तेवढाच सूर्योदय ही मनोहर दिसतो. किंबहुना त्यापेक्षा जास्तच. कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती. हळुहळु सगळ ढग लालसर सोनेरी प्रकाशाने न्हाउन निघाला. त्या प्रकाशात आम्ही सगळेच लालसर सोनेरी यक्ष दिसु लागलो. तेजपुंजाची झळाळी काय असते याचा आम्ही अनुभव घेत होतो. निसर्ग सौद॑र्याची उधलण छान केली आहे स्वप्नात. तुम्ही आम्हाला ही स्वप्नात पाठवलेत.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 06/12/2008 - 22:42 नवीन

अगदी शितल

म्हणते तस्सच माझी प्रतिक्रीया देऊन टाकली तिने... तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम! सिंपली ग्रेट!!!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 06/12/2008 - 22:49 नवीन

हेच म्हणतो ...

स्वप्नप्रवास नेहमीप्रमाणे मजेशीर झाला ... शितलला ज्या वाक्यांवर हसु आले तेथेच मला पण हसु आले तेव्हा पुन्हा स्मायली टाकण्यात अर्थ नाही ... प्रवास नंतर लवकर संपवू नये ... [ तसे मनात असल्यास आम्हाला वेगळी व्यवस्था करावी लागेल, च्यायला ढगांचे "ट्रॅफीक जाम" करुन टाकतो एकदम बेंगलोर श्टाईल, मग बसा वर्णन करत ....] अवांतर : विजूभौ व्हीक्टर ममधले "व्हीक्टर" काय आहे ??? छोटा व्हिक्टर डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
विजुभाऊ Fri, 06/13/2008 - 11:29 नवीन

विजूभौ व्हीक्टर

विजूभौ व्हीक्टर ममधले "व्हीक्टर" काय आहे ??? ऍन मला विजुभाऊ न म्हणता व्हिक्टर या समानार्थी नावाने हाक मारते / ओळखते. ( मैत्रिणीने भाऊ म्हणुन संबोधणे .. :SS .ह्रदयाला काय वेदना होतात हे तुम्हाला काय ठाउक. तुम्हाला तुमची मैत्रीण डॉनुड्या शोनुड्या म्हणत असेल हो.....आमच्या नशीबी नेहमी सालं "भाऊ"च. माझे नाव मी बदलुन विजु"बबड्या" असंच ठेवतो आता ) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
य
यशोधरा Fri, 06/13/2008 - 08:11 नवीन

मस्त!!

मस्त!! मोनॅकोची जाहिरात सहीच!!
  • Log in or register to post comments
ब
बकुळफुले Sun, 06/15/2008 - 19:27 नवीन

छे: आजही

छे: आजही तसेच. ऎन; पुन्हा.एकदा मी स्वप्नात तुला न भेटताच परत आलो. ही अशी स्वप्नांची समाप्ती नको वाटते. पण ते आपल्य हातात थोडेच असते. विजुभौ गटणे मामा म्हणतो की ऍनने तुम्हाला नकार दिला म्हणुन.......=)) पण लगे रहो....एक ना एक दिवस तुमची स्वप्ने खरी होतील... तुम्हाला ऍन वास्तवात ही भेटावी ...ही सदीच्छा
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 06/15/2008 - 19:42 नवीन

खास जेलो

खास जेलो ला पाठवले आहे ना. ती आमच्या ग्रुप ची आवडती हेरोईन. तीचे लग्न झाले तेव्हा आम्ही शोकसभा वैगरे घेतली. विजुभाउ थोडे समजुन घ्या. 'कहानी मे टिवस्ट' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बकुळफुले
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/19/2008 - 18:54 नवीन

सुंदर....

खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती. खडकावरुन फ़ेसाळत खळाळणारा पाण्याचा शूभ्र प्रवाह...त्याभोवती गवताचे हिरवे गार मखमली पाचुचे मखर. मधेच दिसणारी लालसर काळी माती या सगळ्याला विसंगत छेद देणारा काळाशार डामरी राष्ट्रीय महामार्ग. अक्षरश: वेड लावणारे दृष्य होते ते. हिरव्या रंगाच्या अगणीत छटा कोणीतरी मनाला येईल तशा उधळल्या होत्या.एका रंगाच्या इतक्या छटा असतात हे प्रथमच पहात होतो.नुकत्याच फ़ुटु पहाणा-या कोवळ्या सोनेरी लालसर मखमली दुलई पासुन ते गाभुळल्या शेवाळी काळसर हिरव्यापर्यंत........दाट वाढलेल्या कुरणाच्या फ़िक्कट पोपटी छटेपासुन ते वा-यावर नाचत हिंदोळणा-या मोठ्या हत्ती गवताच्या पाचुच्या हिरव्या गालिच्या पर्यन्त हिरव्या रंगाच्या असतील नसतील तेव्हढया सगळ्या छटा उपस्थित होत्या. सुंदर वर्णन. आवडले. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा