नावात काय नाही?
हे जरा त्या शेक्सपियरला सांगा! उगाच आपला "नावात काय आहे " असे म्हणाला होता.
नाव आहे म्हणूनच ना २३एप्रिलला त्याची ४४४ जयंती आहे हे लक्षात राहिले? एरवी हे कसे लक्षात राहिले असते?
मोडक शेठ/पंत/साहेब/राव/भाऊ काय म्हणू? तुम्ही कोणत्याही नावाने ओळखले जात असलात तरी लेख मस्तच लिहिला आहे.. हे सत्य आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
तुमचा हा अतिशय बारीक निरीक्षणाने लिहिलेला लेख. आवडला.
आडनावानं उल्लेख करतो त्यांच्याशी असलेलं नातं केवळ व्यावसायिक असतं!
माझा अनुभव तरी आजवर असाच आहे.
सोनाली
श्रावणसर,
नांवात काय आहे आणि काय नाही, याचा विस्तृत उहापोह आवडला. छान लिहिलं आहे...
मिपावर हे आपले पहिलेच लेखन दिसते आहे. अजूनही असेच लेख येऊ द्या. मिपावर आपले मनापासून स्वागत!
श्रावणसर म्हणणाराही एक मित्र आहे. पण त्याच्या त्या सरमध्ये इंग्रजी सर नसतो. श्रावणातली पावसाची सर ही भावनाच त्यात असते, असा तो उच्चार असतो.
क्या बात है, मलाही आपल्याला श्रावणसर असेच संबोधित करायला आवडेल! ;)
तात्या.
लेख तर आवडलाच,आपली निरिक्षणे आणि त्यावरील टिप्पणीही मार्मिक आहे.
इथे जर्मनीमधील अनुभव- आपण कोणालाही फोन केला तर फोन उचलणार्याकडून 'हॅलो ' न येता त्या व्यक्तीचे 'आडनाव' कानावर येते हे मला जरा वेगळे वाटले होते.
स्वाती
तुमचं निरीक्षण आणि विश्लेषण अचूक आहे.
तुम्ही तुमच्या प्रेयसीचा प्रसंग केवढ्या प्रांजळपणे सांगितला आहे! ('प्रेयसी' हा शब्दसुद्धा नि:संकोचपणे वापरला आहे). तो वाचून मीही थोडावेळ स्वप्नात रममाण झालो.
अभिनंदन.
ठणठणपाळ
श्रावण सर,
मस्त लेखन !
हा लेख वाचायचा राहिला होता, धन्यवाद !! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
आहे, लेख वाचायचा राहून गेला होता. निरीक्षणाला दाद द्यावी तितकी थोडीच, श्रावणसर :). या ओघाने तुमच्या दुसर्या एका लेखातले 'रिकी पाँटिंग'चे उदाहरण आठवले. (अर्थात त्याचा विषय थोडा वेगळा आहे याहून)
काका
सकाळची सुरुवातच तुमच्या लेखाने झाली
खूपच मस्त लिहिले आहे
(तुमची पुतणी )
पाऊसवेडी
अवांतर : मोडककाका ऐवजी मी तुम्हाला श्रावणकाकाच म्हणते कारण ओजस म्हणते तसे तुमचे नाव आडनावा पेक्षा खरच छान आहे
खरोखर फारच उशीराने हे स्फुट वाचले.
मस्तच आहे, एकदम आवडले आणि जवळचे वाटले.
------
(बरीच टोपण नावे एंजॉय करणारा)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
बारकाईने केलेल्या निरिक्षणाची चांगली मांडणी.
पौर्वात्य देशांमधे मात्र स्वतःचे नाव सांगण्याची एकच पद्धत असते.
त्यापध्दतीप्रमाणे तुमचे नाव असे बसेलः
"मी अमूक तमुक कंपनीचा/-तला मोडक श्रावण, (नोकरी/धंद्यातला हुद्दा). बोलतोय. आई आहे का?"
मग ओजस तिच्या आईला म्हणेलः
"आई, अमुक-तमुक कंपनीचे मोडक श्रावण- हुद्दा बोलता आहेत."
मौजेची गोष्ट अशी की ही पध्दत कोणी आप्तस्वकीयांना स्वतःची ओळख करून देताना सुद्धा बदलत नाही . फक्त हुद्द्याचा भाग गाळतात. :)
सही लिहिलयत काका...
माझी बहीण माझ्या भाचीला "मनू/चिऊताई" म्हणते. संध्याकाळी अंगणात खेळून घरी परत यावं म्हणून तिला ताईने तिच्या ह्या लाडक्या नावाने कितीही हाका मारल्या तरी ती परत येत नाही. पण ख-या नावाने एकाच हाकेत बाईसाहेब लग्गेच वर येतात. आईची पेशन्सची लेवल तिला नावातून कळत असते. ;)
मला ही कळले नाही की हा लेख कसा वाचायचा राहीला.
बाकी या वरून आठवले की आम्ही कोल्हापुरात एकमेकांना त्यांच्या नावाने कधीच हाक मारली नाही. मला सगळे "योग्या" म्हणायचे. गौतम ला "गवत्या", आश्या, पश्या, दिप्या, मयर्या, अशाच नावाने सगळे ओळखायचे.
रत्नागिरीला असताना मात्र एकमेकांना वडिलांच्या नावाने चिडवा-चिडवी चालायची. ती एक वेगळीच मजा(?) होती.
खादाडमाऊ
श्रावणवैरी बरसे झीलमिल चैन पडेना जीवा क्षणभर|
यातला वैरी शब्द सुद्धा हवासा वाटणारा आहे. शब्दा वाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले अशी अवस्था असते त्यावेळी नावात काय बी नस्तय.
मिपावर उकरुन काढलेल्या धाग्यात असा ऐवज सापडतो. धन्यवाद अवलिया!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
एप्रिलपासून वाचायचा राहिला होता ? च्यायला ... कमालच आहे !
तुमचं निरीक्षण खूप आवडलं.
मलाही तुम्हाला 'श्रावणसर' म्हणणं आवडेल पण तुमची आणि तुमच्या रसिक मित्राची हरकत नसेल तरच. मला असं वाटतं की असं एखाद्या युनिक नावाने आपल्याला कुणी हाक मारणारं असेल तर त्या व्यक्तीलाही युनिक असून द्यावं. 'श्रावणसर' ह्या नावातल्या रसिकतेसाठी तुमच्या मित्राला दाद दिली आहे हे कळवाल का?
मला बायकोनी माझं नाव आणि आडनाव अशी पूर्ण हाक मारली की आता आपण नक्की काय (नवीन) गोंधळ केलाय ह्याचा विचार करायला लागतो ;)
प्रतिक्रिया
छान लिहिलंय!
छान लेख
छान लेख..
लेख आवडला
लेख आवडला..
सुंदर ललितलेखन!
तुमचं
धन्यवाद
+१
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्तच
मस्त!
मस्त लिहिलंय !!!
मस्तच ...
मस्त...
मस्त लिहिलंय !!!
बारकाईने
छानच...
भाद्रपदात श्रावणसर! :)
मस्त लेख...
वाचनीय
लेख खरोखर
मस्त लेख...
लेख आवडला.
श्रावणवैरी
इतका चांगला लेख