च॑द्रशेखर गोखल्या॑चा (की 'ची') हायकू आठवला (ली)
ह्या जगात वेड॑ असण्याचे
बरेच फायदे आहेत
कारण, शहाण्या॑ना जगण्यासाठी
काटेकोर कायदे आहेत !
कुण्या एरिस्टॉटलने का कुणीतरी म्हणूनच ठेवलेय ना 'आपण मुर्ख आहोत, हे ज्याला माहित आहे तोच खरा शहाणा.' बस्स. शहाणे ठरण्यासाठी तरी आपल्यात मुर्खपणा हवाच नाही का?
- सह'मत्त' ध मा ल.
दासबोध वाचताना "मूर्खांची लक्षणे " वाचु लागालो ती सगळी लक्षणे आपण समर्थांबरोबर रहात होतो त्याना रोज भेटत होतो. अशी जणु आपल्यालाच समोर ठेउन आपल्यावरुन लिहीली आहेत असे वाटते....
उदा: टवाळा आवडे विनोद......( पु ल म्हनतात की त्यावेळेच्या एखद्या केशुने त्याना दासबोधाचे विडंबन ऐकवले असेल....)
किंवा : सांगे वडिलांची ख्याती तो येक मूर्ख....
असो आपणच स्वतःला मूर्ख म्हणणे हा ईतरानी मूर्ख ठरविण्यापासुन वाचण्याचा येक वुपाय.....
बर्याचदा आपल्याला कोणी काम सांगत नाही( व पुं ची अशी एक गोष्ट आहे नाव आठवत नाही)
नंतर तो हरतर्हेने घालविण्याचा प्रयत्न करतो. पण मी डिंकासारखा चिकटून रहातो. यामुळे होतं काय की नंतर दुकानदार वैतागून मला ती वस्तू सांगितली त्यापेक्षा बर्याच कमी किमतीत देऊन टाकतो. अर्थात ही युक्ती सगळीकडे चालत नसली तरी बर्याच ठिकाणी चालते हेही तितकेच खरे आहे.
हा हा हा! भोचकगुरुजी, दुकानदाराशी वाद न घालता, चतुराईने चेहेर्यावर मूर्ख व बावळटपणा ठेवत बार्गेनिंग करायची आपली ही पद्धत मस्त आहे! :)
'आपण मुर्ख आहोत, हे ज्याला माहित आहे तोच खरा शहाणा.' बस्स.
क्या बात है! शेवटी हेच खरं...!
भोचकगुरुजी, लेख नेहमीप्रमाणेच छान आहे...
आपला,
(महामूर्ख) तात्या.
लेख आवडला
=======
ट्रॅफिक पोलिसाने पकडले की आपण कसे मूर्खासारखे पाकीट घरी विसरलोय आणि आपल्याकडे सध्या मूर्खासारखे कसे २० ते ५० रुपयेच आहेत...
कुठे पोचायला उशिर झाला आणि कोणी आपली वाट बघत असेल तर आपले घड्याळ कसे मूर्खासारखे मागे पडले आहे...
(मूर्ख) मनस्वी
लकडी पुलावरुन दुचाकी वाहनाना जाता येत नाही .दुचाकी ला नो एंट्री आहे.
माझा एक मित्र ( हो पुणेरी) त्याने पैज लाउन ही नो एंट्री तोडुन जायचे ठरवेले. नेहमी प्रमाणे त्याल पोलीसाने पलिकडच्या ( या बाब्तीत पोलिस हे असं का करतात हो ? नेहमी शेवटच्या टोकाला गेल्यावरच तो स्वागत करतात) टोकाला त्याला अडवले.
तेंव्हा त्या बावळट चेहेर्याच्या तरुणाचा (तोच मित्र) चेहरा आणखीनच बावळ्ट झाला. पोलीसाने "नो एंट्री चा बोर्ड दिसला नाही का?" असे दरडावुन विचारले तेंव्हा त्या बाणेदार तरुणाने कसनुसा आणि बावळट चेहरा करुन सांगितले "ओ साहेब जाउ दे ना खूप घाईची लागलीय" बिचारा पोलीस त्याने आपला चेहरा बावळट करुन त्या बावळट चेहेर्याच्या तरुणाला तिथे तसा काही प्रसंग होउ नये म्हणुन सोडुन दिले....
बावळट चेहेर्याच्या तरुणाचा (तोच मित्र) चेहरा आणखीनच बावळ्ट झाला.....भले पठ्ठे शब्बास्..गुरुनाथ नाईक्....गोलंदाज कथा.....झकास आठवण
बावळट चेहेर्याच्या तरुणाचा चेहरा आणखीनच बावळ्ट झाला. डोळ्याची पापनी लवते न लवते तोच त्या तरुणाच्या हातात पिस्तुल आले केंव्हा त्याने डाव्या हाताने तीन गोळ्या झाडल्या केंव्हा आणि पिस्तुल पुन्हा खिशात लावले केंव्हा हे समोरच्या तरुणाला कळले सुद्धा नाही..त्याचा हात मात्र कोपरावर फुटला होता.......बरोबर हेच वर्णन असायचे त्यात.......
आहाहा ......लहानपणानन्तर हे ग्रन्थ राज पुन्हा कधी बघायलाच मिळाले नाहीत
थोडक्यात रोजच्या जगण्यात मला माझ्या शहाणपणापेक्षा मुर्खपणा जास्त फायदेशीर ठरतो. मी मुर्ख असल्याचे दाखविणे, भासविणे आणि ठसविणे हेच अंतिमतः माझ्या फायद्याचे असते.
फायद्याची १००% खात्री.
(शतमुर्ख)
मदनबाण
प्रतिक्रिया
च॑द्रशेखर
शहाने
दासबोधात "मूर्खांची लक्षणे " आहेत
चांगला लेख..
लेख आवडला
बावळट चेहेर्याच्या तरुणाचा चेहरा आणखीनच बावळ्ट झाला
झकास आठवण
छान लेख..
लहानपणानन्तर हे ग्रन्थ राज पुन्हा कधी बघायलाच मिळाले नाहीत
येडा बनके पेडा खाव !!!!!
पंत वैद्य