Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३०

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 25/04/2018 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत. http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-li…

वाचने 61527
प्रतिक्रिया 281

प्रतिक्रिया

सरकारचे अभिनंदन

In reply to by जेम्स वांड

अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसाराम बापूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोघेही एकत्र दिसत आहेत. इतकंच नाही तर व्हिडीओत नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडतानाही दिसत आहेत. आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं नरेंद्र मोदी बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मला जेव्हा कोणीच ओळखत नव्हतं तेव्हापासून आसाराम बापूचा आशिर्वाद मला मिळत असल्याचं मोदी बोलत आहेत. मी बापूंना प्रणाम करतो. ते मला नवी शक्ती देतात. त्याच विश्वासाने मला सत्संगमध्ये येण्याची संधी मिळालीये. स्वत:ला भाग्यवान समजतो. बापूंना माझं नमन असंही मोदी यावेळी बोलत आहेत. https://www.loksatta.com/desh-videsh-news/video-of-asaram-bapu-and-nare…

In reply to by श्रीगुरुजी

फोटोशॉप् वाटते आहे गुरुजी

In reply to by श्रीगुरुजी

कॉन्ग्रेस विरोधात अनेक मुद्दे आहेत की गुरुजी... कशाला उगा फोटोशोप वापरायचं?

In reply to by श्रीगुरुजी

आता हे धडधडीत फोटोशॉप केलेले ट्रोलिंग चालते का? ह्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. नसता आम्ही फोटोशॉप केलेले काहीही पुरावे ऍक्सेप्ट करायला पाहिजेत.

In reply to by श्रीगुरुजी

मी म्हणतोय म्हणून खोटे, मी म्हणतो कारण आर्टची 5 वर्षांची सरकारी डिग्री आणि ग्राफिक डिझाईनचे 4 डिप्लोमा आहेत म्हणून. मी म्हणतो कारण अडोबचे फोटोशॉप ट्रेनिंग घेतलेले म्हणून. मी म्हणतो कारण 12 वर्षांचा फोटोशॉपचा अनुभव म्हणून. मी म्हणतो कारण अशा इमेज फोर्जरी आणि ब्लॅकमेल प्रकरणात मला तज्ञ म्हणून बोलावतात म्हणून. अजून काही?

In reply to by अभ्या..

अडग्या मंडळींवर (कुठल्याच बाजूच्या) रगात जाळू नये, श्वास आत घे अन एकदा शांतपणे 'ओंकार' म्हणून कामाला लाग पाहू. दुसरं म्हणजे मला एक सांग, मॉर्फ इमेजची समज एक केस आहे, ज्यात अ ह्या माणसाने आपल्या ब ह्या स्त्री सहकारिणीचे फोटो मॉर्फ करून आक्षेपार्ह चित्रे तयार केली, त्या केशीत समज तुला एक्स्पर्ट म्हणून बोलवले तर तू एक रिपोर्ट तयार करून देशील, त्या रिपोर्ट मध्ये कसे मॉर्फिंग आहे ते सिद्ध करणारे मुद्दे असतील, तो रिपोर्ट कोर्टात एक्स्पर्ट ओपिनियन, demonstration, वगैरे म्हणून ऍडमिसेबल असतो का? असल्यास कोर्ट सर्टिफिकेट प्राप्त सब्जेक्ट एक्स्पर्ट व्हायला तू काही वेगळं केलंस का?

In reply to by अभ्या..

मी म्हणतो कारण अशा इमेज फोर्जरी आणि ब्लॅकमेल प्रकरणात मला तज्ञ म्हणून बोलावतात म्हणून. अजून काही? चाबूक

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या फोटोत पहा. आसाराम व सोनिया यांच्या कपड्यांच्या मार्जिन्स overlap आणि blurr आहेत. दुसरा फोटोही चेहेर्याचा आकार , eye to eye contact इ इ वरुन खोटाच जास्त वाटतो.

In reply to by श्रीगुरुजी

वांडोबा परफेक्ट बोललेला. आडग्यांवर रक्त आटवण्यात अर्थ नाही. खोटेनाटे पुरावे देणे, त्याचा खोटेपणा उघडा पडला की दुसर्‍यांकडे बोटे दाखवणे. मुद्द्याचा आव आणून फाटे फोडत बसणे हेच तुमचे कार्य आहे आणि त्यालाच ट्रोलिंग असे म्हणतात.

In reply to by अभ्या..

एवढा आकांडतांडव व त्रागा कशासाठी? मी फक्त एवढंच विचारलंय की या चित्रफिती ख-या आहेत का खोट्या? तुम्ही या विषयात एक्सपर्ट असल्याने चित्रफितींच्या खरेपणाविषयी नक्की मत देता येईल. ज्या तातडीने व आत्मविश्वासाने चित्रांबद्दल मत दिलेत तसेच मत चित्रफितींविषयी का द्यावेसे वाटले नसावे? मी दुसरं विचारलं की ज्या काळात आसारामवर आरोप नव्हते त्या काळातील आसारामच्या एखाद्याच्या बरोबर असलेल्या चित्रफिती (चित्रफिती ख-या का खोट्या याविषयी खातरी नाही) व्हायरल करणे याला ट्रोलिंग म्हणता येईल का? मी चित्रे टाकल्यावर लगेच ट्रोलिंगचा शिक्का मारलात, परंतु चित्रफितींबद्दल अजून काहीच प्रतिक्रिया नाही?

In reply to by श्रीगुरुजी

आकांडतांडव आणि त्रागा? अहो ह्याला जर आकांडतांडव म्हणत असाल तर निम्मं मिपा तुमच्याच प्रकांड आकांडतांडवाने भरलेले आहे. तुमचा इतर सगळ्या भाजपाविरोधकांबद्दलच्या त्राग्याने निम्मे धागे भरलेले असतात हे कुठल्याही मिपाकराला माहिती आहे. तुम्ही विचारा की, मी सांगतो त्या चित्रफिती अगदी खर्‍या आहेत. पण त्यासाठी तुम्ही खोटे फोटोशॉप्ड फोटो का टाकले? दुसर्‍याचे काय आहे ते बघता येइल इव्हन कित्येकजणांवर मिपाप्रशासनाकडून कारवाई पण झालीये, पण तुम्हीही ट्रोलिंगच करता हे तरी मान्य करा निदान.

In reply to by अभ्या..

चिल्याक्स >>> तुम्ही विचारा की, मी सांगतो त्या चित्रफिती अगदी खर्‍या आहेत. बरं. ज्या काळात आसारामवर आरोप नव्हते त्या काळातील आसारामच्या एखाद्याच्या बरोबर असलेल्या चित्रफिती (चित्रफिती ख-या आहेत असे तुम्ही ठासून सांगितले आहे) व्हायरल करणे याला ट्रोलिंग म्हणता येईल का? मी चित्रे टाकल्यावर लगेच ट्रोलिंगचा शिक्का मारलात, परंतु चित्रफितींबद्दल अजून काहीच प्रतिक्रिया नाही?

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी त्यांनी जरी ट्रोलिंगचा(तुमच्याच म्हणन्याप्रमाणे) धंदा पण असली नोटांनी केला, तुम्ही तिथे पण जाली नोटा वापरल्यात. कशासाठी करता येवढे?

In reply to by अभ्या..

>>> गुर्जी त्यांनी जरी ट्रोलिंगचा(तुमच्याच म्हणन्याप्रमाणे) ते ट्रोलिंग आहे असे तुमचे म्हणणे नाही?

In reply to by अभ्या..

कधी सिद्ध झालं? आणि चित्रफिती टाकणे हे सुद्धा ट्रोलिंग आहे यावर अजूनही मत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या टिंब टिंब हे या विषयात तज्ज्ञ आहेत. मिपासाठी सुद्धा ते हे काम करतात. त्यांचे मत ग्राह्य धरायला हवे . @ अभ्या : तुझि डिग्री तुला आता कोर्टात प्रुव्ह करायला लागणार :)

In reply to by श्रीगुरुजी

मी का म्हणतो त्याची कारणे दिली आहेत. असो बिसो चा मानभावीपणा लै झाला. कबूल तरी करा खोटे आहे म्हणून. आणि अशाच खोटेपणाने करता आणि लिहिता का सारे? तसे सांगा मग, उरला सुरला पण आदर नष्ट होईल तुमच्याबद्दलचा.

In reply to by अभ्या..

प्रतिसाद आवडला. वरील फोटो गडबड आहे हे माझ्यासारख्या चित्रकला/फोटोग्रफी इत्यादी दृष्यकलांमधल्या अडाणी माणसालापण समजलं.

In reply to by अभ्या..

शांत! गदाधारी भीम!! शांत!!! 'आसारामला जन्मठेप झाली आहे' हे चुकीचे आहे. त्याला आजन्म कारावासाची सजा फर्मावली आहे.

In reply to by अभ्या..

आता हे धडधडीत फोटोशॉप केलेले ट्रोलिंग चालते का? ज्या काळात आसारामवर आरोप नव्हते त्या काळातील आसारामच्या एखाद्याच्या बरोबर असलेल्या चित्रफिती (चित्रफिती ख-या का खोट्या याविषयी खातरी नाही) व्हायरल करणे याला ट्रोलिंग म्हणता येईल का? काही दिवसांनी आसारामच्या बारश्याच्या घुग-या खातानाच्या एखाद्या नेत्याच्या चित्रफिती व्हायरल होतील.

In reply to by श्रीगुरुजी

हाच प्रतिसाद आधी आला पाहिजे होता, जो योग्य आहे. उगाच खोटे फोटो टाकून चोरी पकडली गेल्यावर काय उपयोग.

In reply to by श्रीगुरुजी

अरे देवा! हि वेळ आली का आता? इतका पण नका धीर सोडू हो... जरा चांगल्या लोकांकडून फोटोशॉप तरी करून घेत जावा! असेही सगळे "गुणवंत" तुमच्याकडेच आहेत ना? :P अनेक वेळा स्वतः तोंडावर आपटून देखील मंगू सारख्या आयडीला लोचट वगैरे विशेषणे बहाल करायला चांगलाच निब्बरपणा लागत असेल नै! (म्हणजे भाजपचे समर्थक सोडूनपण इतर लोक वाचतात आपले प्रतिसाद हे माहिती असताना! कारण आपले सवंगडी इतरांच्या मागे लागतात तसे आपल्या मागे हात धुवून लागणार नाहीत, बरोबर ना? ) असो, कोलांट्या उड्यांचा खेळ बघत बसावा आता!

In reply to by manguu@mail.com

ला शिक्षा झाली. बघा हे फक्त भाजपा च्या राज्यात शक्य आहे. इतरांचे राज्य असते तर तो पोलिसाना सापडलाच नसता. किवा पुराव्या अभावी निर्दोष सुटला असता.

In reply to by सुखीमाणूस

केसची सुरुवात २०१३ पासून झाली. तेंव्हा इतरांचेच राज्य होते. हा हिंदु संताना बदनाम करायचा कट आहे , असे तेंव्हा काही लोक म्हणत होते.

In reply to by manguu@mail.com

...सो कॉल्ड हिंदुत्ववादी शासन असताना हिंदू सो कॉल्ड संतांवर कार्यवाही होऊन त्यांना शिक्षा होते आहे, हे विधी आणि सुव्यवस्थेसाठी आशादायक आहे.

In reply to by mayu4u

हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या काळातच या भोंदू हिंदू बाबाला अटक झाली व हिंदुत्ववादी पंतप्रधानांच्या काळातच त्याला शिक्शा झाली. याजागी सोनिया गांधींचे सरकार असते तर हा खटला २०१९ च्या निनडणुकीनंतर चालवावा अशी मागणी सिब्बलने न्यायालयात केली असती.

In reply to by manguu@mail.com

'मला जेव्हा कोणीच ओळखत नव्हतं तेव्हापासून आसाराम बापूचा आशिर्वाद मला मिळत असल्याचं मोदी बोलत आहेत'. यात काय गैर आहे? हे सर्व असरामच्या बाह्यरूपाला उद्देशून आहे. आसाराम बलात्कारी आहे हे उघड झाल्यावरही त्याला पाठींबा देणारे गुन्हेगार आहेत. स्वतंत्र भारतातले पहिले बापू, महात्मा गांधी यांच्या बद्दलही अनेक प्रवाद होते. भारताचे रॉकेट मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम हे देखील 'सत्य साई बाबां'चे दर्शन घेत किंवा भक्त होते.ही त्यांची वैयक्तिक श्रद्धा होती. या श्रद्धा बालपणात रुजतात. नंतर त्यांना धक्का लावणे खूप कमी जणांना जमते.

आता अशीच धडक कारवाई 'कॅन्सर बरा करतो' पासून ते 'जिन्न आणि शैतान उतरवतो' म्हणणाऱ्या ख्रिस्ती पाद्री अन मुल्ल्यांवर सुद्धा लवकर व्हावी. सध्याचा निर्णय जोधपूर सेशन्स कोर्टाचा आहे असे दिसते आहे, आसाराम बापूच्या वकिलाने निर्णय आल्याबरोबर हायकोर्टात अपील करण्याचे सूतोवाच केले आहे. अर्थात जोधपूर कोर्टानेच गड्याला इतके ढिले केले आहे की हायकोर्टात काही चमत्कार होईल असे वाटत नाही, देव करो अन तुम्ही म्हणालात तसे ह्यो जेलातच खपो.

In reply to by arunjoshi123

भारतीय दंडविधानात ह्या खोट्या दाव्यांसाठी खास कलम ४२० स्पष्ट नमूद आहे, हे क्लेम करून फिर्यादीस भावनिक दृष्ट्या खोटा दिलासा देऊन ह्या क्लेमच्या पुर्ततेपोटी पैसे घेणे, ह्याला फ्रॉड म्हणायला पूर्ण वाव आहे

In reply to by जेम्स वांड

डॉक्टरांनाही अपेक्षा नसताना (त्यांनी तसे नातेवाईकांना म्हणून दाखवले असताना) एखादा पेशंट वाचला (वा दगावला) तर त्यांनाही ४२० लावावे का? संभवतः खोटा ठरू शकणारा दावा करण्याचे स्वातंत्र्य केवळ डॉक्टरांस का असावे?

In reply to by arunjoshi123

मिपावर असलेले तज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करतील, पण प्राइमा फेस मला वाटतं की डॉक्टर्सचे निर्वाळे हे उपलब्ध वैज्ञानिक कसोट्या, आधार, ज्ञान ह्यांच्या परामर्षातून आलेले असतात, तिथे 'coning' नसते, कुठलाही डॉक्टर एका पुडीत कॅन्सर बरा करतो म्हणणार नाही किंवा हिप्पोक्रेटचा आत्मा येऊन तुला पीडेतुन मुक्ती देईल म्हणत नसतो, बहुसंख्य डॉक्टर्स आजही मानवी शरीर अजूनही मोठं गूढ असल्याचं खुल्या दिलाने मान्य करतात, त्यांची प्रोबाबलिटी सायंटिफिकली बेस्ड असते, फाल्स क्लेम नाही, त्यात प्रोबाबल एरर किती असू शकतात हे पेशंट परत्वे बदलू शकते. बाकी ओव्हर टू डॉक्टर्स!

In reply to by जेम्स वांड

भारतात डॉक्टर जाहिरात करू शकत नाही, किन्वा रोग आजार बरा करण्याचा दावाही करू शकत नाही. http://www.theindianlawyer.in/blog/2016/08/23/permissiable-advertisemen…

In reply to by मार्मिक गोडसे

जम्मू मधे चिमूरडीवर बलात्कार झाला हा तपासणार्‍या डॉक्टरांचा दावा होता कि अस्सेच मोघम विधान होते?

In reply to by जेम्स वांड

डॉक्टर्सचे निर्वाळे हे उपलब्ध वैज्ञानिक कसोट्या, आधार, ज्ञान ह्यांच्या परामर्षातून आलेले असतात, तिथे 'coning' नसते,
कोचिंग क्लासेस मुलाला डॉक्टर बनवतो म्हणून खूप अभ्यास, इ इ करून घेतात. त्यातही काही कॉनिंग नसतं. पण या वचनालाही काही वैज्ञानिक ज्ञानाचा आधार नाही. कंसेंटिंग अडल्ट्सनी काय करू नये याचा नक्की कोणता नियम वापरत आहात?
बहुसंख्य डॉक्टर्स आजही मानवी शरीर अजूनही मोठं गूढ असल्याचं खुल्या दिलाने मान्य करतात
यात त्यांची नम्रता पाहण्याचं कारण नसावं.

In reply to by जेम्स वांड

भावनिक दृष्ट्या खोटा दिलासा
अपघात, मृत्यू, रोग, इ इ झालेले असताना भावनिक दृष्ट्या खोटा दिलासा खूपदा दिला जातो. यांच्यावरही ४२० लावणार?

न्यायलयाचे, तपास अधिकार्‍यांचे, फिर्यादीची केस लढवणार्‍याचे आणि फिर्यादीचे खरोखर अभिनंदन
भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे.
सौ टकेकी बात. भक्त किती आहेत आणि किती कट्टर आहेत त्याचा विचार न करता खटाखट केस घातल्या पैजेत, पटापट निर्णय लागले पैजेत, झटाझट जन्मठेपा नैतर फाश्या झाल्या पैजेत. जयतु ओरिजिनल हिंदुत्व जयतु हिंदुमहिमा, बदनामी करणारे मुर्दाबाद

In reply to by manguu@mail.com

मोदींविरूद्ध बोलण्याचा अजून एक मुद्दा निष्प्रभ ठरला. त्यामुळे पप्पूछाप आचरट बोलणे क्रमप्राप्त आहे. चालू द्या.

In reply to by mayu4u

थोडी सुधारणार. त्याच्यासाठी लोचरट (लोचट + आचरट) हे विशेषण योग्य ठरेल.

In reply to by मार्मिक गोडसे

म्हणजे तुमच्या साहेबांचे हल्लाबोल का डल्लामार म्हणून काहीतरी होतं ते खोटं होतं तर.

जेम्स वांड,
अर्थात जोधपूर कोर्टानेच गड्याला इतके ढिले केले आहे की हायकोर्टात काही चमत्कार होईल असे वाटत नाही,
आसाराम बापूंच्या कर्मचाऱ्यांवरील जुनी केस उच्च न्यायालयात टिकली नाही. ही देखील टिकेलसं वाटंत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बहुतेक प्रमुख साक्षीदारांना गोळ्या घालून मारले गेले आहे, एकाला भोसकलं आहे. हे जर हायकोर्ट नजरेआड करत असेल तर हाय खावी लागेल.

कुत्र्याला कंटाळून इम्रानखानाची तिसरी बायको घराबाहेर पडली आहे. बातमी : https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-new… बायकोसोबत करावयची कृत्ये इम्रानने कुत्र्यासोबत केली की काय? म्हंजे मला म्हणायचं होतं की आंजारणे, गोंजारणे, जेवतांना आपल्या थाळीतून घास भरवणे, इत्यादि. -गा.पै.