✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नास्तिक चळवळ : काळाची गरज ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sun, 04/08/2018 - 10:08  ·  लेख
लेख
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात. मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्‍या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्‍या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्‍या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात. नास्तिक चळवळ मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे. (मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
132316 वाचन

💬 प्रतिसाद (336)

प्रतिक्रिया

बरंचसं ( कदाचित सगळंच)

सुबोध खरे
Wed, 04/11/2018 - 19:02 नवीन
बरंचसं ( कदाचित सगळंच) डोक्यावरून गेलं. पण प्रतिसाद वाचून करमणूक मात्र छान झाली.
  • Log in or register to post comments

एक दृष्टीकोन

स्वधर्म
गुरुवार, 04/12/2018 - 23:56 नवीन
चर्चा चांगली रंगली अाहे. दोन्ही बाजूंकडून जी हमरीतुमरी सुरू अाहे, ते पाहून एक विचार मनात अाला. मला असे वाटते, की श्रध्दावान असणे किंवा नसणे असा लेख हवा होता. श्रध्दा या शब्दाला एक सकारात्मक रंग अाहे, पण तूर्त मला अाधिक चांगला शब्द सुचत नाही, म्हणून ‘प्रश्नच न विचारण्या एवढा, शंकाच न येण्याएवढा अभंग विश्वास’ असा बिनरंगी अर्थाने मी श्रध्दा हा शब्द खाली वापरलाय. ज्या अास्तिकांवर कोरडे अोढले जात अाहेत, त्यांचे धर्माशी किंवा देवाशी किंवा परंपरांशी फक्त एकच नाते अाहे, ज्यामुळे त्यांना दुसर्या बाजूवर तुफानी हल्ला चढवलाय. पण गंमत म्हणजे नास्तिकांचेही या गोष्टी ‘नाहीतच’ या भावनेशी नेमके तेच नाते दिसते अाहे! हे नाते म्हणजे श्रध्दा! याच लेखात एके ठिकाणी अजो यांनी अशी प्रतिक्रिया दिली अाहे, की जगातले अनेक मानवसंहार नास्तिकांनी केले. खरेही अाहे ते, पण ते संहार खरे तर अनुयायांच्या नेत्यांनी सांगितलेल्या कल्पनांवर असलेल्या श्रध्देमुळे अनुयायांनी केले. उदा. नाझी किंवा माअोवादी साम्यवादी अनुयायांची त्यांच्या तत्वांवर जी श्रध्दा होती, ती तंतोतंत प्रचंड हत्याकांडे, छळ इ. करणार्या धार्मिक मूलतत्ववाद्यांसारखीच होती. फक्त श्रध्देचा विषय वेगळा होता. नाझी किंवा माअोवादी यांचे अाचरण धार्मिक नसले तरी ते प्रचंड पोथीनिष्ठ, अापल्या नेत्यांवर, त्यांच्या उपदेशांवर एखाद्या निस्सिम ईश्वरोपासकाएवढीच श्रध्दा ठेवणारे होते अन् एकदा हा श्रध्देचा (इथे मात्र खरोखरच वेगळा शब्द हवा होता) विषाणू अात शिरला, की तो काहीही करवू शकतो. त्या अर्थाने नाझी, साम्यवाद, नास्तिकता हेही धर्मच अाहेत. मला स्वत:ला प्रश्न पडतो, की माणूस हा इतका क्षुल्लक शारिरिक, मानसिक, बौध्दिक क्षमता व मर्यादित अायुष्य असलेला प्राणी अाहे अाणि जग हे इतकं अाफाट गुंतागुंतीचं, अनेक चलांनी (व्हेरिएबल्स) चालणारं अाहे, की कोणीही संत, नेते, धर्मग्रंथ झाले तरी त्यांना हा सगळा व्यवहार ‘अाकळणे’ शक्य नाही. असे असताना कसे काय कुणाला वाटू शकते की माझा धर्म, विचारधारा, संस्कार, परंपरा, संस्कृती ही श्रध्दा ठेवण्याइतकी परिपूर्ण असेल? त्यातली तत्वे त्रिकालाबाधित सत्य असू शकतील? त्यामुळे इथे तावातावाने वाद घालणार्या दोन बाजू दिसत असल्या तरी मला ते अगदी एकसारखे वाटतायत - श्रध्दावान!
  • Log in or register to post comments

+१

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/13/2018 - 10:18 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

+१

विशुमित
Fri, 04/13/2018 - 10:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

संपूर्ण सहमत.

पुंबा
Fri, 04/13/2018 - 11:39 नवीन
संपूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

अभंग विश्वास म्हणजे निष्ठा का?

शाम भागवत
Fri, 04/13/2018 - 11:57 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

शब्द

स्वधर्म
Fri, 04/13/2018 - 12:27 नवीन
अभंग विश्वास, म्हणजे जो सहसा भंग पावत नाही, त्या विश्वासाच्या विपरीत नविन माहिती मिळाली तरी, असा अर्थ मला अभिप्रेत होता. निष्ठा हा शब्द जर तोच अर्थ दर्शवत असेल, तर चालू शकेल. पण तो मला जरासा कृती करायला लागणारी उर्जा पुरवणारा शब्द वाटतो अाणि विश्वास हा बराचसा मनाची किंवा अाकलनाची स्थिती दाखवणारा शब्द वाटतो. शब्द एक असोत, पण तुंम्हाला मी काय म्हणतोय ते समजले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

आल लक्षात.

शाम भागवत
Fri, 04/13/2018 - 13:23 नवीन
आल लक्षात. निष्ठा शब्द नाही चालणार. दॄढ विश्वास चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

नात्सी नास्तिक?

राही
Fri, 04/13/2018 - 12:31 नवीन
नात्सी हे क्रिस्टिअन धर्माला सर्वश्रेष्ठ मानणारे आणि पराकोटीचे वंशश्रेष्ठत्ववादी होते. कम्यूनिस्ट हे धर्म मानीत नाहीत हे नात्सींकडून घडलेल्या कम्यूनिस्टांच्या हत्येचे एक कारण होते. नात्सींचा ज्यूद्वेष कुप्रसिद्ध आहे. आर्यरक्ताचा त्यांना टोकाचा दुरभिमान होता. या विचारधारेला नास्तिक कसे मानता येईल? धर्माच्या नावावर नरसंहार करणाऱ्यांमध्ये नात्सींचे नाव ठळकपणे उठून दिसते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

धर्माची बदनामी थांबवा

arunjoshi123
Fri, 04/13/2018 - 15:11 नवीन
या प्रतिसादात जे एकूण अज्ञान आहे ते कोणत्याही निष्पक्ष इतिहासकारास कायमचे कोमात घालील. ====================================== १. नाझींनी अगोदर कमुनिस्ट नसलेल्या पश्चिम आशियातल्या ख्रिश्चन देशांवर हल्ला केला, त्यांना जिंकले तेव्हा त्यांना खुरापत करायला रशिया उरला होता. (युके बेट असल्यामुळे, स्विटझर्लँड उंच असल्यामुळे, इ ते वाचले पण हल्ल्यांनी भंड आणलाच होता.). १.१ मुळात तुम्ही हे विसरताय की नास्तिक होते म्हणून (हो ते अगदी अस्संच आहे.) हिटलर, मुसोलिनी, आणि स्टॅलिन यांचा लिखित सहकार्याचा करार होता. जपानचा राजा स्वतःच देव आहे म्हणे हा एक वेगळा भाग आहे. पण हे सगळे तथाकथित आभाळातला देव नाकारणारे होते. १.२ दुसर्‍या महायुद्धात देव न मानणार्‍या दानवांचा पराभव झालेला आहे. १.३ जे धार्मिक विरोधक असतात त्यांना तो नावडता धर्म "आपल्या घरी" नको असतो. वा धर्मांतर करायचं असतं. ख्रिश्चन तर ऑब्सेस्ड असतात यासाठी. हिटलरचं तसं नव्हतं. त्याला ज्यूंना तिकडे अरबास्तानात पाठवायचं नव्हतं. ख्रिश्चन तर करायचंच नव्हतं. फक्त मारून टाकायचं होतं. १.४ ================================= २. हिटलर ख्रिश्चन धर्माचा पक्का द्वेष्टा होता. पण नास्तिकांची चलती असल्यामुळं असं म्हणता येत नाही. काय म्हणता येतं ते पहा. https://en.wikipedia.org/wiki/Religious_views_of_Adolf_Hitler
the wide consensus of historians consider him to have been irreligious, anti-Christian, anti-clerical and scientistic.[1]
भाषांतर अधिकांश इतिहासकारांच्या मते हिटलर हा अधार्मिक, ख्रिश्चन धर्माचा विरोधक, पुजार्‍यांचा विरोधक, आणि ज्यू-द्वेष्टा होता ------------- लक्षात घ्या इथे ख्रिश्चन विरोधक असा शब्द वापरला आहे. ======================================== हिटलर नास्तिक नव्हता आणि असला तरी नास्तिकता त्याच्या हिंसेमागची प्रेरणा नव्हती हे सिद्ध करायला धडपडणारी पुस्तके हौशी नास्तिकांनी टनांनी पाडली आहेत आणि त्यांना कुत्रे भीक घालत नाही. ============================================ सोशल डार्विनीझम आणि युजेनिक्स बद्दल कधी वाचा. धर्म (म्हणजे पाद्री लोक) जगातल्या अनेक वंशांच्या प्राणांची करुणा भाकत तेव्हा नास्तिक लोक ती न जुमानता ते वंश नष्ट करत. या डार्विनवाद्यांचा एवढा पगडा होता कि हार्वड आणि स्टँफर्ड या त्यांनी काढलेल्या विद्यापीठांत मुलाखती न घेता कवट्यांची मोजमापे घेऊन प्रवेश देत. अनेक युजेनिक्सवादी हिटलरच्या अत्यंत जवळचे होते नि त्यांचे मते अनेक निकृष्ट स्पसिस जगातनं नष्ट व्हायला हव्या होत्या. हिटलर, इ स्वतःचे मते आणि तत्कालीन जर्मन आणि अनेक युरोपीयन शास्त्रज्ञांचे मते अजिबात क्रूर इ नव्हते. पोल्ट्रीतल्या कोंबड्या मारणारी माणसं बाईट असतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

आणि पराकोटीचे

arunjoshi123
Fri, 04/13/2018 - 15:25 नवीन
आणि पराकोटीचे वंशश्रेष्ठत्ववादी होते.
आणि याला आस्तिकांशी नि धर्माशी जोडणे पराकोटीचे डोके फिरवणारे आहे. ---------------------------------- युरोपात वंश (रेस) हा शब्द १८०० (कि १७००) पूर्वी नव्हता. असला तरी माणसांचे सोडून बाकीचे प्रकार सांगायला वापरला जात असे. त्यानंतर डार्विन साहेबांनी सजीवांचे वर्गीकरण केले तेव्हा हा शब्द वापरला. सर्वायवल ऑफ फिटेस्ट चे बरेच अर्थ काढले गेले. त्यात एक "अधिकृत" अर्थ होता कि युरोपीय लोक सर्वात सुस्थितीत आहेत तर ते सर्वात श्रेष्ठ असावेत. यात दोन समस्या निर्माण झाल्या: १. नेहमी प्रत्येक युरोपीय विद्वान भारतीय साहित्यास कोट करत असे इतकी भारतीय ज्ञानाची जगन्मान्यता होती. २. भारत अगदी अलिकडेपर्यंत प्रचंड श्रीमंत देश होता. भारतीयांना जातींचा गंड देणे आवश्यक होते म्हणून आणि य दोन गोष्टींवर उपाय म्हणून आर्यन इव्हेजन थेरी काढण्यात आली. आणि काही सवर्ण भारतीयांना ओके करण्यात आले. -------------------- लवकरच वंश हा कंसेप्ट फोफावला. चर्चने भूमिका घेतली कि हि "आपल्यासारखीच माणसे" आहेत तेव्हा येन केन प्रकारे त्यांना ख्रिश्चन बन्वू. पण शास्त्रज्ञांना/नास्तिकांना या रेसेसची म्मनुष्य म्हणून कदर नव्हती. सजीव म्हणून होती. =============================== कृपया अज्ञानातून उपजलेला, नास्तिकांचे पाप झाकणारा, धर्मविरोधी अपप्रचार थांबवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

माझा नाइलाज

राही
Fri, 04/13/2018 - 16:40 नवीन
आपले डोके फिरत असेल तर त्याला माझा नाइलाज आहे. डार्विनला मध्ये आणण्याचे कारण नव्हते. सर्वाय्वल ऑफ फिटेस्ट ची संकल्पना काळाच्या ओघात टिकून राहून काही बदलांसह टिकून राहिली आहे. विकीच्या अनेक लिंका आहेत. आपण म्हटल्याप्रमाणे टनावारी साहित्य लिहिले गेले आहे. विकीवर सोयीस्कर लिंका बाजूने आणि विरुद्ध अशा अनेक असतात. आर्यन इनवेजन थिअरी जरी मागे पडली असली (अजूनही इनवेजन ऐवजी माय्ग्रेशन शब्द वापरून भाषाशास्त्रज्नांमध्ये त्यावर वादविवाद चालतात.) तरी ती भारतीयांना जातिगंड देण्यासाठी खोडसाळपणे निर्माण केली गेली हे म्हणणे बरोबर नाही.या माय्ग्रेशनला पुरातत्वाचा आधार अजूनपर्यंत मिळालेला नसला तरी लिंग्विस्टिकचा आधार आहे. त्यावरूनच मुख्यत: ती मांडली गेली. धार्मिक मूलतत्ववादी आपल्या धर्माच्या लोकांनासुद्धा मारत सुटतात हे नेहमीचे आहे. किंबहुना आपल्याच धर्मामधला विचारभेदही त्यांना सहन होत नाही. आम्ही सांगू तोच देव आणि तोच धर्म अशी त्यांची भूमिका असते. असो. ललितलेखनाखेरीज इतर विषयांवर आपल्याशी चर्चा कधीच थांबवली आहे. आपले ललित लेखन वारंवार वाचावयास मिळावे ही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

ललितलेखनाखेरीज इतर विषयांवर

arunjoshi123
Fri, 04/13/2018 - 17:14 नवीन
ललितलेखनाखेरीज इतर विषयांवर आपल्याशी चर्चा कधीच थांबवली आहे.
आपली नास्तिकी अस्मिता अवाजवी आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

नाझी

स्वधर्म
Fri, 04/13/2018 - 18:17 नवीन
अापल्या चर्चेत अास्तिकता ही देव अाणि धर्माच्या बाबतीत अाली अाहे. त्या अर्थाने नाझींनी जे क्रूरकर्म केले ते देवाच्या किंवा धर्मावरील श्रध्देपायी केले असे मानता येणार नाही. काही नाझी धार्मिक असतीलही कदाचित, पण बायबल किंवा येशूची अाज्ञा म्हणून त्यांनी संहार केला नाही. त्यांचा ज्यू द्वेष हा वंशश्रेष्ठत्वावरील श्रध्देतून अाला होता अाणि तीच त्यांची हत्याकांडामागची प्रेरणा होती. इतक्याच मर्यादित अर्थाने ते नास्तिक होते असे म्हणायचे होते. बाकी त्यांची वंशश्रेष्ठत्वावरील श्रध्दा ही एखाद्या धार्मिक मूलतत्ववाद्यासारखीच होती. असो, माझा मूळ मुद्दा अास्तिक-नास्तिक ऐवजी श्रध्दा असलेले व नसलेले याबाबत अाहे. या दृष्टीकोनातून बघितले तर खूप रंजक वर्तणूक पहायला मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

+१

प्रदीप
Fri, 04/13/2018 - 19:43 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

लोकरंग

हणमंतअण्णा शंक…
Fri, 04/13/2018 - 17:25 नवीन
शिळ्या कढीला ऊत आणणारी चर्चा. त्यापेक्षा हेमंत राजोपाध्यांचे लोकरंग मधील सदर वाचा. वेळेची बचत आणि ज्ञानात भर.
  • Log in or register to post comments

++११

पुंबा
Fri, 04/13/2018 - 17:34 नवीन
++११ सदर सदर उत्कृष्ट आहे केवळ.. खुपदा थांबून, विचार करून जरा अदमास घेऊन पुन्हा वाचावे लागते. जबरदस्त लिहितात राजोपाध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

आर्याक्रमणसिद्धांत

गामा पैलवान
Sat, 04/14/2018 - 02:34 नवीन
राही,
या माय्ग्रेशनला पुरातत्वाचा आधार अजूनपर्यंत मिळालेला नसला तरी लिंग्विस्टिकचा आधार आहे. त्यावरूनच मुख्यत: ती मांडली गेली.
माझ्या मते आर्याक्रमणसिद्धांतास भाषाज्ञानाचाही आधार नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मुळात नास्तिक पना म्हणजे

Rajesh188
Tue, 02/18/2020 - 11:47 नवीन
नास्तिक कोणाला म्हणायचे आणि नास्तिक पना म्हणजे काय ह्या विषयी. च नास्तिक लोकांत गोंधळाचे वातावरण आहे. नास्तिक जाणून बुजून स्वतःला बुध्दी pramanyavadi, विज्ञान निष्ट असली विशेषण लावून घेतात. नास्तिक पना आणि वरील दोन्ही गोष्टी ह्याचा तरी मला कुठेच संबंध दिसला नाही. चोकस वृत्ती आणि अण्यात गोष्टी विषयी कुतूहल हाच विज्ञानाचा पाया आहे. त्या साठी नास्तिक असण्याची गरज नाही अस्तिक लोक सुद्धा चोकास आणि चिकिस्तक वृत्तीचे असतात. आता पर्यंत जे शोध लागले आहेत त्या मध्ये काही अपवाद सोडले तर आस्तिक लोक च जास्त आहेत. देव किंवा ईश्वर न मानने म्हणजे नास्तिकता आहे का? धर्म न मानने म्हणजे नास्तिकता आहे का? असे असेल तर गोंधा भारता मधील उद्योग क्षेत्रातील यशस्वी सर्व उद्योगपती मध्ये जास्त भरणा अस्तीक लोकांचाच आहे देव मानल्या मुळे त्यांचे काहीच नुकसान झाले नाही . तशीच परिस्थिती सर्व क्षेत्रात आहे. मग हे नास्तिक लोक आस्तिक लोकांना देवाच्या भरवश्यावर राहणारे व प्रयत्न n करणारी लोक अशी व्याख्या आस्तिक लोकांची का करतात. एक ठराविक धर्म ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही त्याच धर्माचा छुप्या पद्धतीने समर्थन करण्याचा एक छुपा अजेंडा नास्तिक लोकांचा आहे अशी खूप लोकांना rast shanka aahe
  • Log in or register to post comments

"मग हे नास्तिक लोक आस्तिक

चौकस२१२
Sun, 02/23/2020 - 09:28 नवीन
"मग हे नास्तिक लोक आस्तिक लोकांना देवाच्या भरवश्यावर राहणारे व प्रयत्न n करणारी लोक अशी व्याख्या आस्तिक लोकांची का करतात." जेव्हा जेवहा "अस्तिकाला" विचारले कि बाबारे हे असे का? किंवा जरा समजावून सांग...काही तर्क आहे का मागे .. तर बरेचदा यावर अगम्य उत्तरे मिळतात - हे असेच असते विश्वास ठेवा - अनेक पिढ्या असे चालत आहे म्हणून सत्य असलेच पाहिजे - तुम्ही असे का विचारता म्हणजे तुम्ही नास्तिक आणि धर्म विरोधी आहत असे धुडकावून दिले जाते या पेक्षा हि वाईट म्हणजे समोर असेलेली जिवंत माणसाचं प्रामाणिक प्रयत्नावर शंका घेतली जाते.. उदाहरण एखादी व्यक्ती नोकरी शोधात आहे प्रयत्न चालू आहेत आणि यश येत नाही तर त्याला जर कोणी " श्रद्धाळू" म्हणाला कि " असरे बघ तू अमुक अमुक नबाब ला गुरु मानले नाहीस / अमुक ठिकाणी प्रार्थना केली नाहीस " म्हणून असे मग तो बेकार असलेलं आधीच वैतागलेला माणूस चिडतो आणि विचार करतो आरे माझ्य प्रयत्नांना काही किंमत आहे कि नाही ? माझा तरी असा अनुभव आहे कि लहानपणी सर्वसाधारण मध्यमवर्गिय मराठी हिंदू कुटुंबात जे संस्कार, घरातील मर्यादित कर्मकांड यात वावरलो.. तरी जसे वय आणि अनुभव वाढत गेला तसे " इंग्रजीत ज्याला agnostik " म्हणतात त्याकडे तशी वृत्ती झाली.. आणि जरी अगदी करमाड नास्तिक नसलो तरी अस्तिकतेचा उबग आणि त्यातील फोल पण जाणवू लागला... पण त्याचा बरोबर एक राजकीय आणि सामाजिक अभयास म्हणून कि काय धर्म / सर्वधर्मसमभाव यातील रस वाढत गेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कर्मकांडात

चौकस२१२
Sun, 02/23/2020 - 09:13 नवीन
-कर्मकांडात अडकू नये -समाजाला आणि स्वतःला आनंद देणाऱ्या आणि दुसऱ्याला त्रास ना होणाऱ्या प्रथा पाळाव्यात त्या करिताना निसर्गाचे नुकसान होणार नाही याची काळजी घावयी - जमेल तसे तर्क वापरून जगावे पण हे करताना बरेचदा चांगला आणि वाईट यात एक धूसर सीमारेषा असते / येते आणि ती कुठे आहे किंवा नाही हे ठरवणे कठीण होते उदाहरणार्थ - करोडो चा कारभार असणाऱ्या "बुवा" लोकांना/ इवजल्लिकल ख्रिस्ती चर्चेस ( मुख्य धारावही चर्च नाही तर "स्वतःचाच ब्रँड काढलेले चर्च नावाचे उद्योग) मी कडाडून विरोध करतो पण त्याच वेळेला एक मनात शंकेची पाल चुकचुकते ती म्हणजे असा या "बुवा बिझिनेस " मुळे लोक अंधश्रदेहपोटी का होईना जे पैसे गोळा करतात त्यातून काहीतरी समाजउपयोगी काम होत असेल कि ! - सार्वजनिक उत्सव सार्वजनिक ठिकाणी करूच नयेत असा नास्तिक पण जसा चुकीचा वाटतो तसेच या उत्सवमुळे कधी कधी त्रास होतोही आणि नासिर्गिक संपत्तीचे नुकसान आणि गैरउपयोग होतो ते हि चुकीचे हे हि पटते .. दुर्दैव ( याला नास्तिक शब्द सापडत नाहीये ) असं कि लोक टोकालाच जातात...
  • Log in or register to post comments

बुडते हे जन देखवे न डोळा म्हणूनी कळवळा येत असे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/23/2020 - 09:43 नवीन
चौकससेठ, तुम्ही योग्य मांडणी करत आहात. (काही मुद्दे पुसट आणि संधिग्ध असूनही )आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

आळस

चौकस२१२
Sun, 02/23/2020 - 10:31 नवीन
एकाच वेळी चारही बाजूंनी विचारांची गर्दी + लिखाणाची घाई + देवनागरी टंकलेखांत "आपोपाप" शब्द घुसडले जातात ( मी ज्या ठिकाणाहून लिहून इथे चिकटवतो तिथे) आणि एकूण तपासायचा आळस आणि त्यातून होणारे असंख्य ध चे मा ! ( आता हे लिहिताना बघा आळस चाय ऐवजी "आलास " झाला होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आस्तिक कि नास्तिक?

चौकस२१२
Sun, 02/23/2020 - 09:16 नवीन
म्हणजे असं कि मंदिर झाले काय कि नाही यात माझ्यसारख्याला काहीही फरक पडत नाही कारण मी तसा नास्तिक आहे असे म्हणूयात पण एक सामाजिक न्याय म्हणून हिंदूंच्या मनातील हे मंदिर झाले पाहिजे याला माझा पाठिंबा आहे मग मी आस्तिक कि नास्तिक?
  • Log in or register to post comments

सकारात्मक नास्तिक

माहितगार
Sun, 02/23/2020 - 12:09 नवीन
मुर्ती अथवा मंदिरात देव न बघता केवळ सांस्कृतिक ठेवा बघणारी व्यक्ती सकारात्मक नास्तिक असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

नास्तिक

शा वि कु
Sun, 02/23/2020 - 18:35 नवीन
नास्तिक जन अतिरेकी असतात, नास्तिक जन तर्काधारावर लोकांच्या आनंदावर विरजण आणतात, यात अडकून नास्तिकत्वाची चळवळ पाहू नये. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या तर्कावर देव असतो का नसतो यावर उत्तर शोधावं. नास्तिकांचा गट सुद्धा धर्म या कल्पनेच्या विरोधात असेलच असं नाही. अनेक नास्तिक सुद्धा धर्म ही संकल्पना आता value addition देत नाही, जर धर्माचे काहीही उपयोग कुठल्याही काळात होते, तर ते आता संपले आहेत असं बोलायला बरेचशे नास्तिकही बिचकतात. त्यांचा तर्क केवळ देवाचे अस्तित्व अमान्य करून का थांबतो काय माहीत !
  • Log in or register to post comments

देव ही संकल्पना

Rajesh188
Sun, 02/23/2020 - 21:31 नवीन
देव ही संकल्पना जशी सिद्ध करता आली नाही तसेच देव नाही हे सुद्धा सिद्ध करता आलेलं नाही. पण देव नाकारला तरच विज्ञान पुढे जावू शकत म्हणून विज्ञान ती संकल्पना नाकारते गरज म्हणून तसे गृहीत धरणे गरजेचं आहे. जड स्वरूप आणि सुध्म स्वरूप ह्या दोन्ही स्वरूपाचा अभ्यास केला तर परत एकच पातळीवर येतात मग ते सजीव असू नाही तर निर्जीव.
  • Log in or register to post comments

१०५

चौकस२१२
Mon, 02/24/2020 - 14:14 नवीन
माझं आणि हिंदू धर्माचे , आस्तिक/ नास्तिकतेचं नातं १०५ आहे म्हणजे असे कि बाहेरून अन्याय होत असेल तर कौरव पांडव एकत्र १०५, परंतु अंतर्गत १०० वेगळे ५ वेगळे असे हिंदू समाजावर ( धर्म हा समाज असे मानून ) कारण नसताना जो अति दाव्यानी या समाजाला आणि देशाला त्रास दिला आणि देत आहेत त्याचाशी लढताना मी हिंदुत्ववादी होतो पण ते झाल्यावर जर इतर कडव्या भक्त हिंदुत्ववाद्यांच्या पंक्ती ला बसलो तर त्यांना माझे विचार डावे वाटतील इतकी मला त्यान्चाय धार्मिकते बद्दल आणि कर्मठते बद्दल चीड असते. काय बिघडतं नाही केली तर ? आज कोट्यवधी लोक जगात हे मानत नाहीत आणि त्यांच्याही जीवनात तशीच सुख आणि दुःख असतात कि.. पूजा घालून जर सगळे सुजलाम सुफलाम होत असते तर आज भारतात एवढे प्रश्न नसते? आस्तिक नास्तिकतेचं उदाहरण द्यायच झालं तर .. फर्ग्युसन महाविद्यालयात पूजा का ठेवली असे म्हणणाऱ्याना मी वैचारिक रित्या ठोकून काढेन ( जरी मनात हे पटत असलं कि पूजा नाही केली तरी चालेल) आणि त्याच श्वासात मी पूजेचे समर्थन करणाऱ्यांना हे कडवे पणाने विचारेंन कि कशाला पाहिजे पूजा ? थोडक्यात काय दोन्ही कडून मार मिळतो
  • Log in or register to post comments

थोडक्यात काय दोन्ही कडून मार

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/25/2020 - 08:58 नवीन
थोडक्यात काय दोन्ही कडून मार मिळतो
याच कारण लोकांना द्वैतात अडकायला आवडत. जर तुम्ही आमच्या बाजूचे नसाल तर तुम्ही त्यांच्या बाजूचे आहात हे बुद्धीमांद्य सर्रास पहायला मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

प्राडॉ सरांचे अभिनंदन केले

माहितगार
Mon, 02/24/2020 - 14:30 नवीन
प्राडॉ सरांचे अभिनंदन केले पाहीजे. धागा चर्चा दिडवर्षानंतरही चालू आहे यातच धाग्याच्या उद्दीष्टाचे यश सामावले आहे.
  • Log in or register to post comments

हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/26/2020 - 08:57 नवीन
देवाळू लोकांची कृपा दुसरं काय ? ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

=)) हे बरंय सर,

माहितगार
Wed, 02/26/2020 - 10:02 नवीन
=)) हे बरंय सर, कांदा टोपलीत ठेवणार्‍यास कांदा टोपलीत ठेवण्याचा आणि टोपलीतल्या कांद्यात देव नाही म्हणायाचे याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच आणि त्याचा आदरही केला पाहीजे. आपण टोपलीत कांदा ठेऊन द्यायचा, त्यावर फुले वाहील्याचे क्रेडीट फुले वाहत राहणार्‍यांना द्यायचे हे ही ठिकच. पण प्रथम कांदा टोपलीत कुणी ठेवला आणि कांदा टोपलीत ठेवणार्‍याच्या क्रेडीटचे काय ? म्हणून आम्ही आपणासच या धाग्याचे (कांद्याचे) आद्य प्रवर्तक म्हणून अभिनंदनाचे पहिले अधिकारी समजतो. :)) टोपली = मिपा नास्तिक धागा = कांदा फुले = प्रतिसाद (फुलांचे वर्गीकरण या प्रतिसादात अनावश्यकते मुळे केलेले नाही :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जगभरातील काफिरांना त्यांच्या

वामन देशमुख
Wed, 02/26/2020 - 09:56 नवीन
जगभरातील काफिरांना त्यांच्या अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी आस्तिकत्व अत्यावश्यक आहे.
  • Log in or register to post comments

काही शंका आस्तीकांसाठी

माहितगार
Wed, 02/26/2020 - 10:33 नवीन
ते कसे बरे ? १) असे समजून चला की जगात देव नाहीच तर काफीर त्यांच्या अस्तीत्वाची लढाई लढले नसते, की लढू नये ? २.१) समजा देव आहे, पण काफीरांवरील अन्यायाकडे दुर्लक्ष करुन काफीरांना त्यांची लढाई करण्यास त्यांनाच भाग पाडतो. देव असे का वागतो ? २.२) देव काफीरांवरील अन्यायाकडे दुर्लक्ष करत असेल, आणि देव बरोबर असेल तर अन्याय करणारे बरोबर आहेत आणि ते अन्याय नसून देवाची कृपा आहेत असे होत नाही का ? २.३) जर देवच अन्यायाला न्याय म्हणत असेल तर नास्तिकांनी देवा विरुद्ध तक्रार का करु नये ? २.४) जर आस्तीक काफीर आणि नास्तिक काफीरांना एकाच अन्याया विरुद्ध लढायचे असल्यास दोघांनी एकत्र का लढू लय ? २.५) अन्याया विरुद्ध एकत्र लढण्यासाठी नास्तिक काफीरांवर आस्तिकतेची अट का लादावी ? अशा अटी लादून खरी अस्तिकता साढली जाऊ शकते का ? ( मी अज्ञेय आहे आस्तिक आणि नास्तिक दोन्ही बाजूतील सकारात्मकता उचलून धरतो, जिथे साशंकता, प्रश्न चिन्हे आहेत तेही उभी करतो माझा दृष्टीकोण नीर-क्षीर विवेकाने बाळ वाचवावे आणि न्हाऊचे पाणी फेकावे असा आहे दृष्टीकोण नमूद करण्याची कारण माझ्या प्रश्नांमुळे माझ्याबद्दल व्यक्तिगत टिकाकरण्या एवजी उपस्थीत केलेल्या शंकाना उत्तरे मिलून हेल्दी चर्चा व्हावी असा आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

* असे वाचावे

माहितगार
Wed, 02/26/2020 - 10:48 नवीन
* का लढू लय ? > का लढू नये ? * अस्तिकता साढली जाऊ शकते का ? >अशा अटी लादून खरी अस्तिकता साधली जाऊ शकते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

का बरे ?

शा वि कु
Wed, 02/26/2020 - 22:13 नवीन
एकत्र राहावे इथपर्यंत मान्य केले जाऊ शकते. आस्तिकत्वाची काय गरज ? आणि धर्मातल्या त्रुटींवर बोटं पडून पडून, वैचारिक ढवळाढवळ होऊन सर्वच धर्मापासून दूर होतील , हे जास्त चांगले नाही का होणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

नास्तिकाने तो नास्तिक आहे असे

भाऊजी
Wed, 02/26/2020 - 13:14 नवीन
नास्तिकाने तो नास्तिक आहे असे न सान्गता प्रबोधन करावे , त्याच फायदा होइल , तसेच आस्तिकाने पन प्रबोधन करताना थोडी समज दाखवावी नाहितर इन्दुरिकर महाराज होतो. इन्दुरिकर महाराज चान्गले प्रबोधन करतात पन त्यानि धर्म्ग्रन्थाचा आधार घेत अन्धश्रधा पसरवल्या आणि पत कमी करुन घेतली.आणि काही लोक त्यान पाठिम्बा पन देतात.
  • Log in or register to post comments

अंधश्रद्धा आहे ते तुम्ही कोण ठरवणार

Rajesh188
Wed, 02/26/2020 - 14:00 नवीन
प्रयोग करा त्याचा रिझल्ट बघा आणि नंतर सांगा अंध श्रद्धा आहे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊजी

वाह

शा वि कु
Wed, 02/26/2020 - 22:26 नवीन
डार्विनने पण फक्त पुंगी सोडायला हवी होती, की कायतर नॅचरल सिलेक्शन नावाचा प्रकार असतो. आणि त्याला खोटं म्हणल्यावर म्हणायला हवं होतं की प्रयोग करून बघा. नाही तसे इंदुरीकर महाराज हे वैद्यकशास्त्रातील मोठे नामवन्त आहेत. त्यामुळे प्रयोग तर व्हायालाच हवेत. टिप: आधुनिक विज्ञान आपल्याला हवंय का नको एकदा फडशा पाडला जाऊदे. निदान जिथे परस्परविरोध आहे तिथेतरी. डायबिटीस,पोलिओ निर्मूलन, अँटिबायोटिक वगैरे लक्षात असुद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

विज्ञान ला उच्च पातळीवर पोचवणारे

Rajesh188
Wed, 02/26/2020 - 23:58 नवीन
विज्ञान ला उच्च पातळीवर घेवून येणारे किती महान संशोधक हे आस्तिक होते. आणि त्यांचा विज्ञान च्या प्रगतीत सक्रिय सहभाग होता त्यांनी नवीन नवीन शोध लावले आहेत फक्त तोंड पाटीलकी केलेली नाही. आस्तिक विज्ञान वादी नसतात हा प्रचार नास्तिक लोक (फक्त भारतातील) का करतात. फक्त अहंकारातून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

अस्तिकत्व नास्तिकत्व नन्तर बोलू

शा वि कु
गुरुवार, 02/27/2020 - 09:57 नवीन
आधी इंदुरीकर महाराजांचे वाक्य हे प्रगत समाजामध्ये, विज्ञाननिष्ठ समाजामध्ये उच्चारले जावे का आणि त्याचे समर्थन ( आणि justification) व्हावे का ? आणि थोर शास्त्रज्ञ आस्तिक होते, हे खरे आहे. तितकेच थोर शास्त्रज्ञ नास्तिक सुद्धा होते. re.- स्टीफन हॉकिंग चे शेवटचे पुस्तक Brief answers to the big queastion यात त्याने देवाच्या अस्तित्वाची कुठलीही शक्यता नसल्याच प्रतिपादन केले आहे. पण मी तो नास्तिकत्वासाठी दाखला म्हणून देत नाहीये, कारण हा प्रश्न प्रत्येकाने आपापला तर्क वापरून उत्तर काढायचा आहे. ज्यावर कधी विचार केला नाही त्यावर विचार व्हावा इतकीच इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हो , बरेच शास्त्रज्ञ आस्तिक

भाऊजी
गुरुवार, 02/27/2020 - 11:36 नवीन
हो , बरेच शास्त्रज्ञ आस्तिक होते, पन त्यातल्या किती जणानी देवावर सन्शोधन किंवा देवाचा शोध घेतला ते पन सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

उत्क्रातींतून

चौकस२१२
गुरुवार, 02/27/2020 - 18:49 नवीन
भारताबाहेर सुद्धा हि चर्चा असते .. कॅथलिक शाळेत ( कि ज्यांना सरकारी शाळांप्रमाणेच सरकारी अनुदान मिळते) तिथे डार्विन सिद्धांत शिक्ववच लागतो पण ते त्यांच्या मालकांना ( चर्च ) ला पटलेले नसते त्यामुळे नाईलाजाने दोन्ही सांगतात जग उत्क्रातींतून निर्माण झाले हे हि आणि प्रभू ने बनवले हे हि... म्हणजे पोरं गोंधळतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

आधी आस्तिक लोक म्हणूदेत तर

भाऊजी
गुरुवार, 02/27/2020 - 12:01 नवीन
आधी आस्तिक लोक म्हणूदेत तर इंदरीकर महाराज जे म्हणातात त्यात तथ्य आहे मग करु प्रयोग..तुम्ही सांगा तुमचा ह्यावर विश्वास आहे का ..आणी हे अंधश्रद्धा आहे हे समजण्या इतके सुज्ञ आम्ही आहोत आणी तुम्ही ही असाल हा विश्वास आहे.. अजून एक, नास्तिक असावेत का नसावेत ह्यावर माझे काही ठाम मत नाही, पन अशा अंधश्रद्धाना कोनी थारा देऊ नये.. आणी केवळ आस्तिक आहे म्हणून ह्यावर पन विश्वास ठेवावा असे तुम्हाला वाटत असेल तर नास्तिका असलेले बरे नव्हे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

Indorikar फक्त निम्मित

Rajesh188
गुरुवार, 02/27/2020 - 12:52 नवीन
Indorikar जे बोलले त्याला आधुनिक विज्ञान मान्यता देत नाही हे मला माहीत आहे. त्यांच्या बोलण्याला शास्त्रीय आधार नाही हे सर्वानाच माहित आहे जे आस्तिक आहेत. पण ते दाखले पुरातन आहेत. पण त्यांच्या विरोधात ज्या प्रवृत्तीचे लोक प्रचार करू लागले त्यांचे टार्गेट हे indorikar नव्हतेच त्याचा वापर करून ते हिंदू धर्माला टार्गेट करत होते हे उघड आहे . आणि त्या मुळेच indorikar चे समर्थन करणे हाच पर्याय योग्य होता. ज्यांनी मोर्चे काढले,tv var ज्ञान पाजळले ते खरोखर चे समाज कार्यकर्ते किंवा समाजाचे भले करणारी लोक नाहीत हे पण सर्वांना माहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊजी

पुरातन ज्ञान

Rajesh188
गुरुवार, 02/27/2020 - 13:05 नवीन
पुरातन काळी जसे लोकांना विश्व समजले तसे त्यांनी लिहाल. तसेच जे indorikar जे बोलले ते पुरातन ग्रंधा वर तेव्हा जे लोकांना समजले तसे त्यांनी मांडले आहे. ते ज्ञान आता टाकावू झाले असेल ह्याचा अर्थ हा नाही ती पुरातन लोक विज्ञान वादी नव्हते त्यांचे कष्ट तुम्ही नाकारू शकत नाही किंवा त्या वर टीका सुद्धा करू शकत नाही. उद्या ह्या stephan hacking ह्यांचे संशोधन चुकीचे आहे असे सिध्द झाले तर आपण स्टीफन ना मूर्ख समजू शकत नाही. असा विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

टाकाऊ

शा वि कु
गुरुवार, 02/27/2020 - 21:32 नवीन
तसेच जे indorikar जे बोलले ते पुरातन ग्रंधा वर तेव्हा जे लोकांना समजले तसे त्यांनी मांडले आहे. ते ज्ञान आता टाकावू झाले असेल ह्याचा अर्थ हा नाही
माझ्या मते जर हे सम विषम आकड्यांचे तत्व शास्त्रात आहे, तर ते आता टाकाऊ झालेच आहे. जे तत्व विज्ञान स्पष्टपणे चुकीचे म्हणतो ते जर अजूनसुद्धा आपण बरोबरच म्हणणार आहे, तर हा एक प्रकारचा दुटप्पी पणा आहे. उदा- कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी आणि रेडिएशन सोबत गोमूत्र आणि अंगारे धुपारे करणे आणि श्रेय अवैज्ञानिक गोष्टींना देणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हाच तर्क पटला

चौकस२१२
गुरुवार, 02/27/2020 - 18:57 नवीन
पण त्यांच्या विरोधात ज्या प्रवृत्तीचे लोक प्रचार करू लागले त्यांचे टार्गेट हे indorikar नव्हतेच त्याचा वापर करून ते हिंदू धर्माला टार्गेट करत होते हे उघड आहे . हाच तर्क पटला.. उदाहरण पिके या चित्रपणाचा मूळ हेतू अंधश्रद्धा उघडकीला आणणे हा होता हे पटलेच होते पण एकूण फक्त "हिंदू धर्मातीलच " अंधश्रद्धा या "कलाकार" माणसांना का दिसते म्हणून माझ्यासारखा नास्तिकतेकडे झुकणार केवळ जन्माने हिंदू असलेला पण त्या दिग्दर्शकाच्या विरुद्ध बोलला पण तसे केले कि "बघा हा अजून एक मनुवादी" असे हिणवले जाते . असे दिगदर्शनक विरळाच कि ज्यांनी इतर धर्मातील चुकीच्या प्रथांवर प्रकाश टाकणारे चित्रपट / नाटक निर्माण केले! halala हा मराठी चित्रपट मात्र अपवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

विज्ञान च

Rajesh188
Wed, 02/26/2020 - 14:04 नवीन
आधुनिक विज्ञान च कथित पुरोगामी लोकांना उघडे पाडेल. आणि पश्चिमात्य देश जे खरे आधुनिक युगाचे जनक आहेत तेच ह्यांना नागडे करतील. भारतीय हिंदू द्वेशी पुरोगामी ह्यांचे काहीच योगदान नाही आधुनिक विण्यान मध्ये. त्यांची बिना पुराव्याची बकवास ऐकण्याची काही गरज नाही
  • Log in or register to post comments

पुरोगामी व पाश्चात्य देश

गामा पैलवान
Wed, 02/26/2020 - 19:23 नवीन
Rajesh188, 'आधुनिक विज्ञान च कथित पुरोगामी लोकांना उघडे पाडेल', हे ठीक वाटतंय. पण 'पश्चिमात्य देश जे खरे आधुनिक युगाचे जनक आहेत तेच ह्यांना नागडे करतील' हे विधान काही पटलं नाही. कारण की पाश्चात्य देश आधीच दोन महायुद्धांच्या आगीत होरपळलेले आहेत. आज त्यांना स्वत:च्याच समस्या भारी झाल्या आहेत. ते कशाला भारतातल्या पुरोगाम्यांच्या मागे लागतील! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा