✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

थंडी गॉन… घाम ऑन!!!

आ
आदिजोशी यांनी
Tue, 01/23/2018 - 14:15  ·  लेख
लेख
चातक जितक्या आतुरतेने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो त्यापेक्षा आतुरतेने आम्ही त्या घामाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत होतो. मागचे काही दिवस मुंबईचं हवामान पार म्हणजे पारच बिघडलं होतं. थंडीच्या मोसमात मुंबईत चक्क थंडी? हा काय आचरटपणा आहे? मुंबईकरांना थंडी हवी असती तर आम्ही सिमल्याला नसतो गेलो? लोकल ट्रेन, टॅक्सी, बेस्टची बस, सी लिंक, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, धारावी, बॉलिवूड, वडा पाव ह्यांच्याप्रमाणेच 'घाम' ही मुंबईची ओळख आहे. घामट्टपणा ही मुंबईकरांची आवडती अवस्था आहे. मुंबईची हवा म्हणजे तर बोलायलाच नको. जाज्वल्य अभिमान एटसेट्रा नाही पण मुंबईत येतो तसा घाम जगात कुठेही येत नाही. पण आजकाल कसलाच भरवसा राहिला नाही हेच खरं. काही गोष्टींसाठी मुंबईकर एकदम अनप्रिपेअर्ड असतात. उदा.: पहिल्याच रिक्षा/टॅक्सी चालकाने आपल्यालं हवं तिथे यायला हो म्हणणे, कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळी ट्रेन रिकामी दिसणे, फुटपाथवर चक्क चालायला जागा असणे... ह्यातच थंडी अनुभवणे ह्या गोष्टीचा समावेश आहे. मुंबईकरांनी थंडीची अजिबात म्हणजे अजिबातच सवय नाही. नाही म्हणजे इतकी नाही की मुंबईकरांचे एसी सुद्धा कधी २०-२२ डिग्रीच्या खाली चालत नाहीत. जगबुडी होत असताना मुंबईकर अगोचरपणा करून पाण्यातून चालत घरी जातील, रॅकवर ठेवलेल्या बॅगेत बाँब असू शकतो ही सूचना ऐकत उभ्या उभ्या झोप काढतील, इतकंच नव्हे तर ग्लोबल वॉर्मींगलाही मुंबईकर घाबरत नाही कारण 'वॉर्मींग झालंच तर फार फार तर अजून थोडा घाम येईल, त्यात काय...'. पण... पण... पण... थंडीत करायचं काय हे मात्र त्यांना कळत नाही. पंखा लावायचा नाही तर झोप कशी येणार? गरम हवा खोलीभर फिरवण्यासोबत मुंबईतल्या पंख्याचे मुख्य काम म्हणजे एका लईत आवाज करून माणसांना गाढ झोपवणे. ही अंगाई बंद झाल्यापासून झोपही उडाली. असे एकंदरीत कठीण दिवस सुरू होते. खिशातले रुमाल कोरडे राहत होते. पंख्यावर जळमटं साठत होती. 'फिलींग कूल इन मुंबई' असे अपमानास्पद हॅशटॅग फिरवले जात होते. 'मुंबईत ॠतू दोनच' हे ब्रह्मवाक्य बदलावं लागतं की काय अशी वेळ आली होती. स्वतःच्याच घरात 'बबन चड्डी आणि बनियान' ह्या जागतीक युनिफॉर्मवर वावरायची सोय राहिली नव्हती. स्वेटर, शाली, दुलया ह्या शोभेच्या वस्तूंची घडी मोडावी लागते की काय अशी भीती वाटत होती. पण देवाच्या कॄपेने शेवटी आज तो आलाच. ऑफिसला जात असताना कानामागून ओघळणारा, आपण मुंबईतच असल्याची खात्री पटवणारा, माझा नवसाचा घामाचा थेंब. - अट्टल मुंबईकर, आदि जोशी
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मायक्रोवेव्ह
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
12298 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

१+

पगला गजोधर
Tue, 01/23/2018 - 15:45 नवीन
चला जरा वेगळं वाचायला मिळालं !
  • Log in or register to post comments

आपण हा लेख लिहिलात आणि इथे

सतिश पाटील
Tue, 01/23/2018 - 17:50 नवीन
आपण हा लेख लिहिलात आणि इथे मुम्बैत भर दुपारीच पुन्हा गार हवा सुटली. थंडी परत सुरु झाली सध्याचे ५ वाजताचे तापमान २६ डिग्री. बहुतेक आज बसावे लागेल...
  • Log in or register to post comments

खुसखुशीत (की चिकचिकीत?):)

प्राची अश्विनी
Tue, 01/23/2018 - 18:00 नवीन
खुसखुशीत (की चिकचिकीत?):)
  • Log in or register to post comments

मस्त.... थंडीतही पंखा लावून

ज्योति अळवणी
Tue, 01/23/2018 - 18:27 नवीन
मस्त.... थंडीतही पंखा लावून चक्क शाल पांघरून झोपण्याची मजा अनुभवली खुद्द मुंबईमध्ये. आता परत मागील पाढे पंचावन्न! आवडला लेख
  • Log in or register to post comments

काय सांगता

मित्रहो
Tue, 01/23/2018 - 21:21 नवीन
काय सांगता मुंबईत थंडी थंडी तेही मुंबईत, थंडी थंडीवरुन दवणीय अंडी आठवली , नंतर आले नाही दवणीय अंडे
  • Log in or register to post comments

छ्या!

एस
Tue, 01/23/2018 - 23:48 नवीन
मुंबईत थंडीबिंडी पडू शकते यावर आपला विश्वास नाही. कधीकाळी नाईलाजाने मुंबईला जावं लागलंच, तर परत गाडी खंडाळ्याचा घाट चढून येईतोवर आणि पुन्हा गार हवा अंगाला झोंबेतोवर जीवाला चैन म्हणून नसते. कसं काय राहतात लोक त्या मुंबैत!
  • Log in or register to post comments

धुळवड

नाखु
Wed, 01/24/2018 - 07:34 नवीन
धाग्याना गप"गार" करणारा लेख पुण्यात नक्की कुठला ऋतु आहे या पेचातला नाखु सकाळी बोचरी थंडी, दुपारी कडक ऊन
  • Log in or register to post comments

मस्तं लिहिलय :)

अनुप ढेरे
Wed, 01/24/2018 - 10:08 नवीन
मस्तं लिहिलय :)
  • Log in or register to post comments

झकास...

रंगीला रतन
Wed, 01/24/2018 - 10:29 नवीन
झकास...
  • Log in or register to post comments

मस्तच लिहीलयं.मस्तच लिहीलयं.

दुर्गविहारी
Wed, 01/24/2018 - 10:58 नवीन
मस्तच लिहीलयं. बाकी एकदा फिल्मस्टारच्या घरांना भेट दिल्याचे अनुभव येउ द्यात. ;-)
  • Log in or register to post comments

मागच्या महिन्यात तर खुप वेळा

सतिश पाटील
Wed, 01/24/2018 - 11:36 नवीन
मागच्या महिन्यात तर खुप वेळा आमच्या घरातील प्याराशुटच्या बाटलीतले तेल चक्क गोठले होते.
  • Log in or register to post comments

आजही खुप थंडी होती.

जागु
Wed, 01/24/2018 - 11:45 नवीन
आजही खुप थंडी होती.
  • Log in or register to post comments

ग्लोबल वॉर्मींगलाही मुंबईकर

कानडाऊ योगेशु
Fri, 01/26/2018 - 11:43 नवीन
ग्लोबल वॉर्मींगलाही मुंबईकर घाबरत नाही कारण 'वॉर्मींग झालंच तर फार फार तर अजून थोडा घाम येईल, त्यात काय...'.
ठ्ठो!!!!
  • Log in or register to post comments

मस्त, आवडले.

माहितगार
Fri, 01/26/2018 - 12:07 नवीन
मस्त, आवडले.
  • Log in or register to post comments

सध्या थंडीचा लपाछपी डाव चालु

मदनबाण
Fri, 01/26/2018 - 23:36 नवीन
सध्या थंडीचा लपाछपी डाव चालु आहे... ;) खोकल्याचा व्हायरस सगळीकडे पसरलाय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Havana (Vertical Video) ft. Young Thug :- Camila Cabello
  • Log in or register to post comments

:)

पैसा
Sun, 01/28/2018 - 16:52 नवीन
:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा