✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

व्हॅलेंटाईन्स डे....

प — प्राजु, Sat, 02/02/2008 - 22:42

प्रतिक्रिया द्या
35626 वाचन

💬 प्रतिसाद (81)
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/07/2008 - 03:34 नवीन

वाहवा....

अव्यक्तने व्यक्त केलेली भावना खरच मस्त आहे..... आणि काय हे तात्या. कोण ही अनुष्का सांगा की ! काय झाले 'प्रेमळ' विषयांतर झाले तरी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित गुरुवार, 02/07/2008 - 11:21 नवीन

आपला आयटम

तिने मोठ्या तोर्‍याने माझे प्रेम झिडकारले तेच फूल सुदैवाने तिच्या मैत्रिणीने स्विकारले. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments
अ
अनिला गुरुवार, 02/07/2008 - 22:30 नवीन

प्रेमाच्या वटेवरील प्रेमविरानो..

प्रेमे झाली, झाल्या आणाभाका लग्ने झाली, झाली पोरे बाळे, बळे. कुठ्ली प्रभा? कुठ्ला चन्द्रमा? नभातुन कुठे तो चंद्र प्रकाश झळाळे कुंतलातुन मम फक्त गुन्ता कोसळे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 22:40 नवीन

क्या बात है..

क्या बात है.. वास्तववादी चारोळी! नुसत्या छान छान, प्रेमळ प्रेमळ चारोळ्या वाचून कंटाळा आला होता! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिला
प
प्राजु Fri, 02/08/2008 - 01:19 नवीन

गंधित त्या

गंधित त्या फुलांच्या राशी सख्या मी सांडित गेले डाव सुंदर संसाराचा तुझ्यासवे मांडित गेले - प्राजु
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/08/2008 - 06:36 नवीन

मी पण मी पण

संसाराच्या या डावात रंगात तुझ्या रंगले राहीले न माझी मी प्रेमात अशी भिजले
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/08/2008 - 06:36 नवीन

मी पण मी पण

संसाराच्या या डावात रंगात तुझ्या रंगले राहीले न माझी मी प्रेमात अशी भिजले
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 06:38 नवीन

दोनदा?

राहीले न माझी मी प्रेमात अशी भिजले वरदा, नाही, प्रेमात वगैरे भिजलीस ते चांगलंच आहे, पण दोनदोनदा? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
वरदा Fri, 02/08/2008 - 06:38 नवीन

दोनदा?

का झालं असं? एक पोस्ट उडवता येईल का प्लीज?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 06:58 नवीन

चलता है..

का झालं असं? कदाचित तुझं तुझ्या नवर्‍यावर जरा जास्तच प्रेम असावं म्हणून असं झालं! :) एक पोस्ट उडवता येईल का प्लीज? हो नक्कीच येईल. परंतु राहू दे! मिपाने तुला नवर्‍यावर दोनदोनदा प्रेम करायची परवानगी दिली आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
वरदा Fri, 02/08/2008 - 06:49 नवीन

हो ना

मी पाहीलच लगेच खालंचं पोस्ट लिहिलं..पोस्ट कसं उडवायचं? अहो प्राजु कडुन प्रेरणा घेऊन सुचेल ते लिहिते...तिला कसं सुचतं कोण जाणे म्हणुन म्हटंलं आपणही प्रयत्न करत रहावा......
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/08/2008 - 06:57 नवीन

वरदा... सह्ह

वरदा... सह्ही आहेस हं! छान जमलीये चरोळी.. प्राजु
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/08/2008 - 07:13 नवीन

अरे वा

थँक्यू ...तुझं सर्टीफिकेट महत्वाचं...तू खूपच छान लिहितेस....
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/08/2008 - 07:57 नवीन

तात्या

कळ्ळं होतं मला ते..उत्तर लिहीते म्हट्लं आणि राहीलं...आता चारोळित उत्तर प्रेम का मोजून करता येतं ते कायमचं असतं... ते दोन जणांच्या नुसत्या असण्यानं नाही मनं गुंफल्यानं होतं... प्राजु तू आता बास कर गं म्हणेपर्यंत लिहीणारे मी चारोळ्या....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/08/2008 - 09:42 नवीन

वरदा तुझे स्वागत..

तू ये सोबत माझ्या कवितेच्या विश्वात भावनेला वीण शब्दांत जसा पाऊस यावा ग्रिष्मात -(आनंदी) प्राजु
  • Log in or register to post comments
क
किशोरी Fri, 02/08/2008 - 13:33 नवीन

मी पण जरा नाक खुपसु का?

प्रेमाचे हे लक्षण असते खास चोहीकडे होतो आनंदाचा आभास अजुन एक जीवनदायीनी,वात्सल्य तु तुच आहेस माया प्रेमस्वरुप आई तु देवाचीच काया (जमली का हो चारोळी??,या प्राजुजीं काय सुंदर चारोळ्या करतात,कस जमत कोन जाणे असतात चार ओळी पण निबध लिहीणे सोपे अस वाट्तय,चार ओळीतच वेड लागायची पाळी आली)
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/08/2008 - 17:42 नवीन

प्राजु

मी येते सोबत तुझ्या गुंफीत शब्दांना देईन आकार माझ्या मनातील भावनांना
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/08/2008 - 17:43 नवीन

किशोरी

छान आहेत की दोन्ही चारोळ्या...खूप आवडल्या...
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 02/08/2008 - 18:26 नवीन

मस्तच आहेत

प्राजु, वरदा, किशोरी या चारोळ्या मस्तच... अजुनी येऊ देत अशाच छान छान ... वाचून करूया फस्त... बाय द वे ही चारोळी नव्हे-:))))))))
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/08/2008 - 18:30 नवीन

कविता हे

कविता हे माझे पहिले प्रेम आहे वरदा, किशोरी तुमचेही सेम आहे??? - प्राजु
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/08/2008 - 19:50 नवीन

काय माहीत.....

कविता करणे प्राजु तुझासवेच शिकले कोण जाणे प्रेम का हे चार ओळी खरडू लागले
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2008 - 19:50 नवीन

प्रेमाचे

प्रेमाचे काय तुझे माझे सेम आहे तुझे त्याच्यावर आहे माझे तुझ्यावर आहे...... मी कधीच लिहीत नाही कवीता हा माझा प्रांत नाही पण तुझ्यात व माझ्यात काही सेम असावे ह्यातच ह्या चारोळीच्या जन्माची मेख आहे..... जशी जमली तशी केली आहे चारोळी मी आवडली तर बेस्ट आहे नाही तर नेहमी प्रमाणे वेस्ट आहे कोणी नाही तर वाचनारे गेस्ट (पाहूणे सदस्य) आहेत राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
क
किशोरी Fri, 02/08/2008 - 20:01 नवीन

अजुन एक

सौंदर्याचा अविष्कार हा शब्दांचा आहे खेळ कविता म्हणजे मनातील भावनांचा सुंदर मेळ (तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद वरदा,स्वाती,प्राजु)
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2008 - 20:13 नवीन

भावनांना

भावनांना आकार देणे हा काही माझा खेळ नाही तुझ्या प्रेमात पडणे ह्यात काही गेम नाही राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/08/2008 - 20:16 नवीन

सुर्व्या

सुर्व्या निघाला लाल होऊनी वाटेला लागला परतीच्या क्षितिजावरती चुंबुनी गेला कोमल अधरा धरतीच्या.... - प्राजु ( सुर्व्या - म्हणजे सुर्य..)
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/08/2008 - 20:19 नवीन

मस्तच

प्राजु एक्दम वेगळी आणि छान चारोळी
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2008 - 20:32 नवीन

ह्या

ह्या सुर्याचे रोज नवे नाटक आहे दिलावर रोज नवा दंश आहे आज जगावे तुझ्यासाठी तर मागे आपला वंश आहे... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
क
किशोरी Sat, 02/09/2008 - 10:01 नवीन

सुर्या

सुर्या गेला चुंबुनी धरतीचे अधर धरती लाजली ओढुन घेतला तिने चांदण्याचा पदर
  • Log in or register to post comments
क
किशोरी Sat, 02/09/2008 - 10:03 नवीन

प्रेम

प्रेमात पडल्यावर सगळ जग सुंदर दिसत लग्न झाल्यावर कळत प्रेम नेहमीच आंधळ असत
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/10/2008 - 00:59 नवीन

तुझ्या

तुझ्या डोळ्यांतल्या नभी माझे स्वच्छंदी विहरणे निळ्या मेघात दाटूनी सरीतूनी बरसणे.. - प्राजु
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 20:16 नवीन

सर्व कवींचा हेवा .......

वाटतो. ही ग्रंथि आम्हाला जन्मतः च नाही. फार फार मजा आली. आपल्या सर्वांचे कौतुक वाटते. प्राजू, हा आनंदमयी चैतन्याचा ओघ असाच राहू दे. सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा