मनोविकारशास्त्र(psychiatry)--आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक मिथक!!
साधारणतः २००६ साली मी कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करु लागलो.इंटरव्ह्युसाठी लांब ठीकाणी जायचे ,तिथे जाण्यासाठी तयारी करायची ,इंटरव्युला सामोरे जायचे असा प्रकार सुरु होता.इंटरव्युला जाताना सुर्वातीला मजा वाटायची नंतर त्याचे दडपण यायला सुरवात झाली. कुठे इंटरव्यु असेल तर तिथे आपले काय होइल ,नोकरी मिळाली तर आपल्याला झेपेल की नाही याचं प्रचंड मानसिक दडपण येऊ लागले.
अशातच मला एके ठीकाणी नोकरी मिळाली ,पहील्या आठवड्यतच माझ्यावर बरीच जबाबदारी सोपवण्यात आली ,ती पुर्ण करताना प्रचंड घाबरलो होतो.आपल्याला नक्की काय होतेय हे कळत नव्हते.कसाबसा दोन महीने टिकुन राहीलो पण मनावर सतत दडपण असायचे,श्वास लागायचा पॅनिक ॲटेक वगैरे यायला लागले म्हणून नोकरी सोडून सातार्यात परत आलो.स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे अशी घरी थाप मारु घरीच बसून राहीलो.मधे अधे आमच्या शेतावर जायचो.या प्रकारात तीन चार वर्ष घालवली.या काळात प्रचंड निराश असायचो,पण मित्र असायचे त्यामुळे वेळ जायचा.यथावकाश मित्र त्यांच्या नोकरीधंद्यात स्थिर स्थावर झाले, मी मात्र जागेवरच बसून राहीलो ,थिजल्यासारखा,पण विचारचक्र चालू असायचे ,mind clarity चांगली होती.घरचे शेत असल्याने लक्ष घालत होतो.
मित्रांची लग्न कार्ये ,चुलत मावस भावडांची आर्थिक झेप याच्याशी तुलना करत आपल्या आयुष्यात काहीच हॅपनींग नाही,आपण काहीच कामाचे नाही आहोत हा विचार बळावत गेला.something is terribly wrong with me ह्या निर्णयाप्रत आलो(ही चूक होती)
आता काय करायचे?
मग एक दिवस तुळईला गळफास घेण्याचा बालिश प्रयत्न केला.धाडकन खाली कोसळलो ,काही कळतच नव्हते काय होतेय ते!
घरचे धावत आले,बापाने दोन ठेऊन दिल्या ,आईने समजूत काढली की तुला मानसोपचाराची गरज आहे आपण तिकडे जाऊ,घरच्यांनी मग मला सायकीॲट्रीस्टकडे नेले .त्यांनी मला सांगितले की मेंदूमध्ये रासायनिक बदल घडल्याने असे होते.आपण औषधे चालू करुयात मग तू एकदम ठणठणीत बरा होशील,हे साल होते २०१२.ट्रीटमेंट सुरु झाली.तीन प्रकारची औषधे सुरु झाली antidepressants, antipsychotics,benzodiazepines,.पहील्या सहा आठ महीन्यांमध्ये प्रचंड झोप लागण्याशिवाय काही बदल दिसला नाही.मध्यंतरीच्या काळात दोन तीन वर्ष ट्रीटमेंट चालू ठेवली.दिवसभर गुंगीशिवाय काही फरक पडत् नव्हता.वजन ६० किलोवरुन ७५ किलो झाले ,नुसती खाखा सुटलेली असायची.डॉक्टरांना सांगितले तर फरक पडेल, ही औषधे लाँग टर्म घ्यावी लागतात असे उत्तर मिळाले.लाँग टर्म म्हणजे कीती काळ याचं उत्तर मिळत नव्हते.डॉक्टरची फी,अत्यंत महगडी औषधे घरच्यांखातर घेत राहून zombie अवस्थेला पोचलो.सगळ्या इमोशंस ब्लंट झाल्या होत्या,अगदी पोटंट असलेला सेक्श्युल इंटरेस्टही .ट्रीटमेंट आधी ज्या गोष्टीत रस वाटायचा तोही बंद झाला.मग ठरवले इंटरनेटच्या आधारे नक्की आपल्या मेंदूशी काय खेळ चालू आहे ते शोधुन काढुयात.
गुगलला जाऊन psychiatry असा सर्च देऊन पुर्ण व्हायच्या आतच गुगलने psychiatry is a hoax असे सजेशन दिले.त्यावर क्लीक केल्यावर ढीगभर वेबसाईटी ओपन झाल्या .त्यातल्या रिलायबल वाटणार्या बुकमार्क केल्या व अभ्यास सुरु केला.Joanna moncrieff ह्या ब्रिटीश सायकीट्रीस्टचे लेख इंटरेस्टींग वाटले.ते वाचायला घेतले.यावरुन मनोविकारशास्त्र हे drug centred असुन ते disease centred असल्याचे खोटे सांगत कसे रेटून नेले आहे ते समजले.इतर आधुनिक वैद्यकशाखा या disease centred ॲप्रोच वापरतात,म्हणून यशस्वी आहेत. ,सायकीॲटीस्ट्र आणि फार्मासिट्युकल जायंट्सने drug centred असलेल्या या मनोविकारशास्त्राला disease centred असल्याचे भासवून प्रचंड नफा कमावून कीती आयुष्य उध्वस्त केली असतील याची कल्पना न केलेली बरी
https://joannamoncrieff.com/2013/11/21/models-of-drug-action/
.मनोविकारशास्त्राला disease centred असल्याचे सिद्ध करण्यासाठी अगदी पेड रिसर्चही प्रसिद्ध केले जातात.
सायकीॲट्रीचे काही शेंडा बुडखा नसलेले ग्रह आहेत .त्यातला एक आहे नैराश्याच्या बाबतीत .
Serotonin hypothesis of depression -- सायकीॲट्रीनुसार नैराश्य वा डिप्रेशन हे मेंदूमधील सेरोटोनीन नावाच्या neurotransmitter वा संदेशवहनाचे काम करणार्या रसायनाच्या कमतरतेने येते.याला कोणताही आधार नाही .ही चक्क ढगात मारलेली गोळी आहे.मेंदूत कीती सेरोटोनिन आहे हे मुळात मोजताच येत नाही.अशी कोणतीही आधुनिक पद्धत नाही कि ज्याने मेंदूतील सेरोटोनिनची पातळी मोजता येईल.रक्तात कीती सेरोटोनीन आहे हे मोजता येते पण मेंदूत कीती आहे हे मोजता येत नाही.त्यामुळे सेरोटोनीन हाय्पोथिसिस हे एक मिथक आहे.
सेरिटोनिनची मेंदूतील पातळी वाढवण्यासाठी selective serotonin reuptake inhibitorअर्थात SSRI नावाची औषधं दिली जातात.यानुसार मेंदूत पुन्हा शोषले जाणारे सेरोटोनीन थांबवता येते व मेंदूतील सेरोटोनीन ची पातळी वाढते व नैराश्य कमी होते.याला कुठलाही ठोस आधार मिळालेला नाही.सेरोटोनीन ची पातळी वाढत असेलही पण त्याने नैराश्य कमी होते हे सिद्ध झालेले नाही.काही double blind clinical trials मध्ये SSRI व placebo यांचा परिणाम जवळपास सारखाच होता.
Peroxetine नावाचे एक अत्यंत सिडेटिव्ह औषध मला चालू होते ते याच antidepressants प्रकारात येते.माझे वजन वाढायला हे औषध कारणीभूत आहे.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4471964/
Antipsychotics-- मनोभ्रम(Psychosis) ,bipolar disorderआणि छिन्नमनोवस्था(schizophrenia) या रोगांवर antipsychotics दिले जातात.सेरोटोनीन व डोपामाईन या मेंदूतील रसायनांचा ताळमेळ सुधारणे हे या औषधाचे काम मानले जाते.पण याच्या उपयुक्ततेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.रुग्णाला मदत होण्याऐवजी यातून नुकसानच अधिक होते हे लक्षात आले आहे.हे औषध घेतल्याने मेंदूतील उती(tissues)नष्ट होतात व मेंदूचे आकारमान लहान होते.खास करुन विचार करणारा मेंदूचा भाग (prefrontal cortex)ह्रास पावत जातो ,याला brain atrophy म्हणतात.खास करुन मेंदूतील ग्रे मॅटर वॉल्युम कमी होत असल्याचे आढळुण आले आहे.स्कीझोफ्रेनिक जे antipsychotics घेतात त्यांची तुलना औषध न घेणार्या स्कीझोफ्रेनिक पेशंटशी केली असता ,औषध न घेणारा वर्गाचा आजार आटोक्यात असल्याचे दिसून आलेले आहे.त्यामुळे antipsychotics घेणे खुपच धोक्याचे आहे.या औषधामुळे टाईप टू प्रकारचा डायबेटीस होण्याचा धोका अधिक वाढतो.
https://www.theguardian.com/commentisfree/2008/mar/02/mythoftheantipsychotic
Benzodiazepines--- ही मायनर ट्रॅंक्युलायझर्स म्हणजे गुंगी आणणारी औषधे आहेत .दोन आठवड्यांनंतर प्रचंड डिपेंडंस येतो.रुग्णाला सतत गुंगीत ठेवणारी औषधे आहेत.यापैकी मला clonazepam नावाचे औषध चालू होते .ज्याची खरे तर काहीच गरज नव्हती.पण gross scientific misconduct चे जे लाखो बळी आहेत त्यापैकी मी एक आहे.
माझ्या अल्पमतीनुसार मी psychiatry नावाच्या आधुनिक वैद्यकशास्त्रातील मिथकाचा बळी ठरलो होतो.एप्रिल २०१७ नंतर मी ट्रीटमेंट थांबवली.पण जो डॅमेज झाला आहे तो न भरुन येणारा आहे.जवळपास लाख दिडलाखाची औषधे खाउन हाती काहीच लागले नाही ,फसवले गेल्याची भावना मनात आहे.जे लोक मनोविकारत्ज्ञाकडे जाण्याचा विचार करत आहेत त्यांना माझ्या अनुभवाचा उपयोग व्हावा ही भावना ठेऊन हे लिहले आहे.
जो पर्यंत मनोविकारासाठी disease centred ट्रीटमेंट विकसीत होत नाहीत तो पर्यंत मनोरुग्णांची परवड होत राहील.इतर आधुनिक वैद्यकीय शाखांची भ्रष्ट नक्कल करण्याच्या नादात psychiatry ही शाखा बदनाम होत चालली आहे.सध्या पुन्हा ट्रीटमेंट आधीचं व्यक्तीमत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे ,जे फार चांगलं होतं असं नाहि पण आजच्या इतकं वाईट नक्कीच नव्हते. या दोन शब्दांचा कुणाला फायदा झाल्यास आनंदी वाटेल.
योग्य ठीकाणी लिंक्स दिल्या आहेत,त्या जरुर वाचाव्यात.विशेषतः Joanna moncrieff यांचे लेखन जरुर वाचावे.
याद्या
17844
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
सहमत
महत्वाचा विषय
डॉक्टर
काही फरक पडलाय का?
अतिशय योग्य
In reply to काही फरक पडलाय का? by SHASHANKPARAB
हा हा हा
प्रिय रुस्तमजी,
In reply to हा हा हा by रुस्तम
हम्म
In reply to प्रिय रुस्तमजी, by arunjoshi123
गंभीर विशय आहे, जाणकारांनी
औषध न घेता समुपदेशन घेतले तर
मला वाटते, औषधे शारीरीक तंत्र
दुर्दैवी !
In reply to मला वाटते, औषधे शारीरीक तंत्र by विनिता००२
नक्कीच! वेळ मिळेल तसे लिहीन
In reply to दुर्दैवी ! by चौथा कोनाडा
विषय आणि केलेला दावा मोठा व
सिंथेटिक जिनियस
लेख बराच माहितीपूर्ण आहे आणि
In reply to सिंथेटिक जिनियस by सुबोध खरे
+१११
In reply to लेख बराच माहितीपूर्ण आहे आणि by श्रीगुरुजी
आभार
In reply to सिंथेटिक जिनियस by सुबोध खरे
https://youtu.be/esPRsT-lmw8
In reply to सिंथेटिक जिनियस by सुबोध खरे
NO ANIMAL MODEL IS AVAILABLE
In reply to सिंथेटिक जिनियस by सुबोध खरे
सायकीॲट्रीक ड्र्ग्ज आहेत
In reply to NO ANIMAL MODEL IS AVAILABLE by सिंथेटिक जिनियस
https://www
In reply to सायकीॲट्रीक ड्र्ग्ज आहेत by सुबोध खरे
डॉ खरे साहेब, आपल्या सविस्तर
In reply to https://www by सुबोध खरे
बऱ्याच औषधांच्या वैद्यकीय
In reply to सायकीॲट्रीक ड्र्ग्ज आहेत by सुबोध खरे
सध्या अशा चाचण्यांसाठी मानवी
In reply to बऱ्याच औषधांच्या वैद्यकीय by मराठी_माणूस
डॉ. खरे तुमचा अभ्यासपुर्ण प्रतिसाद आवडला
In reply to सिंथेटिक जिनियस by सुबोध खरे
selective serotonin reuptake inhibitorअर्थात SSRI हि औषधे १०० % रुग्णांवर गुणकारी ठरतात असा कुणाचाच दावा नाही आणि ज्यांना लागू पडतात त्यांनाही १००% लागू पडतात असेही नाही. पण म्हणून ती औषधे अगदीच निरुपयोगी आहेत असेहि नाही. तसा दावा करणारे अनेक शास्त्रज्ञ आणि मनोविकार तज्ञहि आहेत. साधारण ३० % रुग्णांना हि औषधे उत्तम लागू पडतात. ४० % रुग्णांना मध्यम लागू पडतात आणि उरलेल्या ३० % रुग्णांना ती कमी लागू पडतात किंवा अजिबात लागू पडत नाहीत.याचा संदर्भ नेटवर वाचायल मिळेल का ? दुसरं ज्यांना लागु पडतात त्यांनी ही SSRI औषधे जरी चांगली असली लागु पडली तरी जर सलग ३-४ वर्षे नियमीत घेतल्यास त्याचा काय परीणाम होतो ? हे म्हणजे या औषधांच्या दिर्घकाळ सेवणाचा काय साइड इफेक्ट होतो ? डिपेन्डन्स होतो का कायम स्वरुपी ? सोडता येणे शक्य होते का ? या विषयी अधिक माहीती दिल्यास आनंद होइल. वा संदर्भ नेट वर असल्यास कृपया दयावासत्गुरू वामनराव पैंची
विश्वप्रार्थना खरोखर फार
In reply to सत्गुरू वामनराव पैंची by शाम भागवत
सिंजि यांच्याशी बऱ्याच अंशी
बहुतेक खरं वाटतंय
भूलभुलैया
'मेडिसिन'
लेखाशी बर्यापैकी सहमत.
रंगीला रतनएका अॅडीक्शन पासुन
In reply to लेखाशी बर्यापैकी सहमत. by रंगीला रतन
सुबोध खरेजी...
In reply to रंगीला रतनएका अॅडीक्शन पासुन by सुबोध खरे
सायकियाट्रिस्ट मधे दोन पंथ
खरं आहे
In reply to सायकियाट्रिस्ट मधे दोन पंथ by प्रकाश घाटपांडे
तज्ञांमधेच मतभेद आहेत
In reply to खरं आहे by पैसा
डियर सिंथेटिक जिनिअस,
येथे आलेले बरेच प्रतिसाद हे
मनोविकाराबाबत असणारे
माहीतीपूर्ण प्रतिसाद.
In reply to मनोविकाराबाबत असणारे by सुबोध खरे
औषधे न घेता समुपदेशन च्या
In reply to मनोविकाराबाबत असणारे by सुबोध खरे
पटले.
In reply to मनोविकाराबाबत असणारे by सुबोध खरे
अगदी बरोबर आहे . आमच्या घरात
लेख आणि प्रतिसाद वाचून