✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मला भेटलेले रुग्ण - ६

ड
डॉ श्रीहास यांनी
Fri, 08/11/2017 - 07:40  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/40524 डॉक्टर बासरी वाजवता येईल का मला ? असं विचारलं मला पेशंटनी ..... मला लक्षात आलं कि काय गडबड झालीये ती !! मी : कोण म्हणालं नका वाजवू ? पे. : एके ठिकाणी वाचलं होतं कि दमा असलेल्यानी बासरी वाजवू नये म्हणून .. मी : साफ चुक लिहीलंय .... पे. : म्हणजे मला बासरी वाजवायला काहीच हरकत नाही (चेहेरा खुलायला सुरू झाला ) मी : अगदी काहीच हरकत नाही , उलट बासरीवादनाचा फायदा असा आहे की तुमच्या श्वासाची क्षमता किती वाढली आहे ह्यॅचा अंदाजा येईल आणि श्वासाच्या स्नायूंचा व्यायाम होईल नियमीत ... पे. : मी ऊगीच वर्ष घालवलं मग ... मी : हो .... एकदा जरा विचारलं असतं तरी सगळं स्पष्ट झालं असतं... असो आता रोज रियाज करा आणि मला पुढल्या भेटीत सांगा की किती फरक पडला 'बासरी वादनात' !! पेशंट धन्यवाद म्हणतांना कुठला तरी सुर आळवत होता आणि मी स्वत:वर खुपच खुश होतो .... एका कलाकाराला त्याच्या कलेशी परत नाळ जोडतांना बघून :)) ________________•________________ 'डॉक्टर मेरी पोस्टींग लगने वाली है और दौडते वक्त बहोत सास फुल रही है। ' असं म्हणतांना तिच्या चेहेऱ्यावर काळजी दाटून आलेली होती.... मी तपासलं आणि टेस्ट सांगतांना विचारलं की 'कहा पोस्टींग है और आप exactly क्या करती हो ?' 'सर BSF मे सिलेक्शन हुआ है और पहले दिल्ली जाना है और वहांसे फायनल पोस्टींग होगी' अस म्हणली ती आणि मी क्षणभर स्तब्धच झालो .... मनातल्या मनात त्या पेशंटाला सॅल्युट केला आणि आभार मानले मी _/\_. टेस्ट झाल्यावर औषधांमध्ये बदल करून दिला आणि एवढच म्हणू शकलो की 'आप बस्स तयारी करीये बिना टेन्शन की , अस्थमा की चिंता मुझपर छोड दिजीए .... ' त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण विरघळतांना बघीतला आणि पुढचा संपुर्ण दिवस भारलेला होता ....... _________________________________

Book traversal links for मला भेटलेले रुग्ण - ६

  • ‹ मला भेटलेले रुग्ण - ५
  • Up
  • मला भेटलेले रुग्ण - ७ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
औषधोपचार

प्रतिक्रिया द्या
18064 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

मस्त डॉक

इरसाल कार्टं
Fri, 08/11/2017 - 08:22 नवीन
सुरुवात छान झाली दिवसाची
  • Log in or register to post comments

+१ अगदी असेच म्हणतो.

राजाभाउ
Fri, 08/11/2017 - 11:53 नवीन
+१ अगदी असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

ग्रेट!

एस
Fri, 08/11/2017 - 09:21 नवीन
ग्रेट!
  • Log in or register to post comments

छान..

शलभ
Fri, 08/11/2017 - 10:08 नवीन
छान..
  • Log in or register to post comments

मस्त

ज्योति अळवणी
Fri, 08/11/2017 - 10:37 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

वाह, दिवसाची सुरुवात हे वाचून

केडी
Fri, 08/11/2017 - 10:45 नवीन
वाह, दिवसाची सुरुवात हे वाचून झाली, मस्त वाटलं!
  • Log in or register to post comments

काय काय गैरसमजुती असतात....

देशपांडेमामा
Fri, 08/11/2017 - 11:01 नवीन
काय काय गैरसमजुती असतात आजारांबद्दल.. माहीतीत भर पडते आहे !! देश
  • Log in or register to post comments

क्या बात है

अत्रन्गि पाउस
Fri, 08/11/2017 - 11:24 नवीन
असे डॉक्टर सगळ्यांना मिळोत
  • Log in or register to post comments

तिला काही प्रॉब्लेम नाही

प्रीत-मोहर
Fri, 08/11/2017 - 11:36 नवीन
तिला काही प्रॉब्लेम नाही होणार ना पण?
  • Log in or register to post comments

नाही होणार.... काय काळजी

डॉ श्रीहास
Fri, 08/11/2017 - 11:50 नवीन
नाही होणार.... काय काळजी घ्यायची , औषधं नियमीत घेणे , वरिष्ठांना दमा असल्याची कल्पना देणे, कि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

...किमान ५-६ महिन्यांची औषधं

डॉ श्रीहास
Fri, 08/11/2017 - 12:11 नवीन
...किमान ५-६ महिन्यांची औषधं सोबत हवीत आणि दिल्लीला जाण्यापुर्वी एकदा भेटून जाणार आहेच पेशंट तेव्हा परत एकदा बोलणं होईलच ... तुम्ही दाखवलेल्या काळजीसाठी _/\_
  • Log in or register to post comments

निमलष्करी दलांमध्ये भरती

सुबोध खरे
Fri, 08/11/2017 - 12:21 नवीन
निमलष्करी दलांमध्ये भरती होण्यापूर्वी शारीरीक क्षमतेची चाचणी होते आणि त्यात पास झाल्यावर सहसा नंतर समस्या उद्भवत नाही. जर उमेदवार १५ मिनिटात २. किमी धावू शकत असेल. २० जोर २० बैठका आणि ८ चीन अप करू शकत असेल तर त्याला भरती साठी पात्र समजले जाते. जर त्याला नंतर दमा उद्भवला तरीही फारशी समस्या येत नाही. दमा असलेले अनेक रुग्ण मी लष्करात औषधोपचाराने सर्व कामे करताना पाहिलेली आहेत.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर .... पी.टी ऊषा ,

डॉ श्रीहास
Fri, 08/11/2017 - 13:04 नवीन
अगदी बरोबर .... पी.टी ऊषा , सौरव गांगुली , ईयान बोथम , पी. कश्यप आणि शोएब अख्तर सारखे elite athletes सुध्दा दमा असतांना जग जिंकून गेलेले आहेत... केवळ योग्य औषधोपचारा मुळेच !!
  • Log in or register to post comments

मस्त वाटलं तुमचा आणि खरे

प्रीत-मोहर
Fri, 08/11/2017 - 14:59 नवीन
मस्त वाटलं तुमचा आणि खरे काकांचा प्रतिसाद वाचुन!! ("ती" नेही जग जिंकावं अशी मनापासुन इच्छा असलेली ) प्रीमो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

आमेन _/\_

डॉ श्रीहास
Fri, 08/11/2017 - 15:39 नवीन
आमेन _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

छान अनुभव

सिरुसेरि
Fri, 08/11/2017 - 14:39 नवीन
छान अनुभव .
  • Log in or register to post comments

मस्तच ..

भ ट क्या खे ड वा ला
Fri, 08/11/2017 - 17:10 नवीन
फार मोठं काम .. एका कलाकाराची नाळ त्याच्या कलेशी परत जोडण्यात मदत करणे .. व दुसरा ही खासच ...
  • Log in or register to post comments

.

धडपड्या
Fri, 08/11/2017 - 18:30 नवीन
मस्तच डाॅक... दमा या आजाराभोवती असलेलं गैरसमजाच्या जाळ्यानेच बर्याचदा पेशंट खचत असेल.. तुमच्या सारखे वेळेवर हात देणारे डाॅक असतील, तर सगळेच पेशंट कोणत्याही आजारातून हसत हसत बरे होतील...
  • Log in or register to post comments

झक्कास हो...

मोदक
Fri, 08/11/2017 - 18:40 नवीन
झक्कास हो... एखादी दमा आणि तत्सम विषयावर लेखमाला येऊद्यात..!!
  • Log in or register to post comments

Excellent!!! Very nice

Dr.vijay Solanke
Fri, 08/11/2017 - 19:39 नवीन
Excellent!!! Very nice
  • Log in or register to post comments

मस्तं चालली आहे लेखमाला !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/11/2017 - 21:39 नवीन
मस्तं चालली आहे लेखमाला ! पेशंट सहृदयपणे हाताळणे आणि त्या प्रसंगातली मेख चपखलपणे सांगणे, या दोन्ही विषयामधले तुमचे प्राविण्य वाखाणण्याजोगे आहे ! अजून अनुभव येऊ द्या ! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

सुरेख

Nitin Palkar
Sat, 08/12/2017 - 14:52 नवीन
असे डॉक्टर सर्वांना मिळोत. पुलेशु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा