✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

व्हॅलेंटाईन्स डे....

प — प्राजु, Sat, 02/02/2008 - 22:42

प्रतिक्रिया द्या
35627 वाचन

💬 प्रतिसाद (81)
क
केशवसुमार Sat, 02/02/2008 - 23:17 नवीन

प्राजूताई स्वागत

शब्द बदलून माझ्या हातून पुन्हा एक काव्य पडले.. कळलेच नाही मला विडंबनाच्या च्या प्रेमात हे काय घडले...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 23:38 नवीन

प्राजू,

वा प्राजू, छान आहे उपक्रम! चालू द्या.. (पुन्हा नव्या जोमाने उभी) हे आवडले..:) वेलकम ब्यॅक... मि.पा. डॉट कॉम च्या प्रेमात पडले... तुझे मिपावरील प्रेम असेच कायम राहू दे, हीच संत व्हॅलेन्टाईनच्या चरणी संत तात्याबांची प्रार्थना.. :) आपला, संत तात्या. अवांतर - आम्हाला पिरेम करण्याकरता १४ फेब्रुवारी हा एकच दिवस नव्हे तर कुठलाही दिवस चालतो! :)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 02/02/2008 - 23:47 नवीन

ही घे प्राजु,

अजून वारयावर गुंजतात ज्याच्या प्रेमाच्या आरोळ्या असा हा पिवळा डांबिस कशाला करील चारोळ्या? :)) तुझ्या आग्रहाखातर केलेली माझ्या आयुष्यातली ही पहिली चारोळी! खराब निघाली तर प्राजुला धोपटा, रे!! :)))
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:26 नवीन

अनामिकेस,

प्रिय अनामिकेस, प्रेमाचा प्रत्येक रंग मला तुझ्यामधे दिसतोय तुझ्यातील रंगांमुळेच मी प्रेम करायल शिकतोय -(प्रेमळ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/03/2008 - 00:28 नवीन

तुझ्या

तुझ्या प्रत्येक रंगात मला माझाच चेहरा दिसला उन, पाऊस, वा-यामध्ये कसा ऋतू हसला...! - प्राजु
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:32 नवीन

ऋतुंचे

ऋतुंचे हसणे, पावसाचे बरसणे, तुझ्या एका हास्यापुढे हे सारे काही उणे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/03/2008 - 00:36 नवीन

डांबिसकाक

डांबिसकाका, तुमच्या धोपटण्यामध्ये मायेचा ओलावा आहे या पुतणीला तुमच्या, इथे परदेशात विसावा आहे... -प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 00:57 नवीन

क्या बात है...

क्या बात है.... एकापेक्षा एक विसाव्याच्या शोधामधे दूनियेत रणरण फिरलो, फिरून पुन्हा आईच्या कुशीत मी शिरलो. 'आई'.....आपल्या आयुष्यातले पहिले प्रेम.... या व्हेलेंटाईन डेला सर्वप्रथम तिला ही प्रेमळ भेट. बाकी 'तात्यांच्या' म्हणण्याप्रमाणे प्रेमाकरीता आम्हालाही व्हॅलेंटाईन डेची गरज नाही.... आपला प्रत्येक क्षण 'व्हेलेंटाईन.... (प्रेमळ) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पिवळा डांबिस Mon, 02/04/2008 - 00:12 नवीन

सुंदर!

अगदी कोंड्याचा मांडा बनवणारी सुग्रण कवयत्री आहेस गं तू, प्राजु! छान, छान!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 02/03/2008 - 01:18 नवीन

एक प्रयत्न...चुकले असेल तर माफ करा

तू इथे नसलीस तरी तुझे अस्तित्व प्रत्येक रंगात आहे आपल्या प्रेमाची मदहोशी अजूनही माझ्या अंगात आहे... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 15:31 नवीन

धन्यवाद

पुन्हा उपक्रम चालू केल्याबद्दल आनंद झाला. प्राजु, धनंजय, विनायक, ऋषिकेश. पिवळा डांबिस चालू राहू दे... आम्हाला नविन नविन चारोळ्या वाचायला दिल्याबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/04/2008 - 02:14 नवीन

प्रेम कर

प्रेम कर गरीबा सारखं कोंड्याच्या भाकरीवर प्रेम कर कुंभारासारखं.. मातीच्या खापरीवर (मांडे भाजण्यासाठी लागणा-या) - प्राजू
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 02/04/2008 - 04:47 नवीन

प्रेम कर

प्रेम कर कधीही कुठल्याही खापरीवर आपल्यासाठिचे त्याचे पोळणं पाहून त्याचे ऋण मनात स्मर ऋणी. डॅनी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 02/04/2008 - 05:32 नवीन

चांगले झाले

वाचतो आहोत (नाहीतरी काव्याच्या बाबतीत आम्ही तेवढेच करू शकतो!). चारोळ्या पुन्हा सुरू झाल्या हे चांगले झाले! (रसिक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/04/2008 - 09:33 नवीन

कॄष्णाची

कॄष्णाची घेण्या फिरकि राधा झाली कान्हा जाता सामोरी त्याला, अचंबित कान्हा दिसे.. म्हणे तिला"कृष्णाच्या नयनी दिसे राधा .. पण तुझ्या तर नयनी कान्हाच वसे???" - प्राजु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 11:18 नवीन

ए प्राजू,

छ्या! कैच्या कैच केली आहेस हो ही चारोळी! आपल्याला नाय आवडली! प्रामाणिक मत, राग नसावा... आपला, ('चारोळ्या पाडणे' या प्रकाराला भयंकर घाबरणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्रमोद देव Mon, 02/04/2008 - 11:32 नवीन

प्राजु,असे केले तर...

कृष्णाची घेण्या फिरकी राधा झाली कान्हा जाता सामोरी त्याला,अचंबित दिसे कान्हा म्हणे राधेला, मम नयनात फक्त वसे राधा.. तव नयनात मात्र मजला दिसतसे कान्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 02/04/2008 - 20:17 नवीन

अज्ञात कविची कविता

ही चारोळी नसून ती नागपूरच्या एका कविंच्या कवितेच्या पहील्या चार ओळी आहेत. पण त्या फार सुंदर आहेत त्यामुळे इथे देण्याचा मोह आवरत नाही. जर कोणाला ती कविता आणि कवि माहीत असतील तर कृपया पूर्ण कविता प्रकाशित करावी. वेदना पचविल्या ज्यानी हसण्याचे मानकरी ते, त्यानीच फुले वेचावी काट्यांशी ज्यांचे नाते...... -अज्ञात कवि -वेदना पचवणारा डॅनी पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/05/2008 - 00:10 नवीन

प्रेमाची

प्रेमाची लाली चढे मम गाली अशी ही जादू केली तरी कुणी लाज आली पाहूनी मजला प्रतिबिंब माझे त्या दर्पणी.. - प्राजु ( कृष्ण -राधेची कल्पना शब्दांत नाही नीट मांडता आली, त्याबद्दल मी दिलगीर आहे. प्रमोदकाकांनी ति उत्तम शब्दांत मांडली, धन्यवाद प्रमोद काका.)
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 02/05/2008 - 19:43 नवीन

प्रयत्न

आयुष्यात कधीहि लिहिल्या नाही कवितेच्या दोन ओळी तुझ्या प्रेमात प्राजुताई ही पहीली चारोळी छे फार कठीण आहे ग प्राजु...अशी लिहितेस तु इतक्या छान चारोळ्या.....
  • Log in or register to post comments
ग
गौरी Tue, 02/05/2008 - 23:58 नवीन

पहिलीच मराठी चारोळी...

प्रेमात.. प्रेमात पडले कसे मी कळले ना माझ्या मनी उमजले सर्व काही प्रतिबिंब पाहता मज तुझ्या नयनी (पहिलीच चारोळी आहे. चारोळी एक्स्पर्ट प्राजू , जमलं का नाही सांग गं!!!)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/06/2008 - 00:15 नवीन

संत व्हॅलेंटाईन चरणी ही "अभंग"चारोळी!

प्रेमाची चारोळी | करायाचा ध्यास | नाही तो अभ्यास | काव्यक्षेत्री || जमावी ती कशी | चारोळी मजला | म्हणे 'चतुरंगा'| धाव आता!|| चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/06/2008 - 00:37 नवीन

वा वा

वरदा, गौरी, चतुरंग.. अप्रतिम.. येऊद्यात अशाच आणखीहि... प्रेमामध्ये असे | अशी काही जादू| | हरवतो साधू | मेनकेत| | कोण म्हणे प्रेम | सुखाचा निचरा | नाही त्यास थारा| दुनियेत| | - प्राजु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/06/2008 - 00:43 नवीन

अरे वा!

प्रेमाची ती हाक | असे किती मोठी | दुसरी चारोळी | पहा झाली || प्रेमच ते मोठे | व्यापून उरले | 'मि.पा.'अवकाशा | दशांगुळे || चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/06/2008 - 00:51 नवीन

वा. चतुरंग..

वा. चतुरंग.. सह्ह्ही बॉस चारोळीत तुझ्या | प्रेम भरलेले| भरून उरलेले| अंतरात| | मि.पा.अवकाश| कृतकृत्य झाले| धन्य ते पावले| आंतरजाली| | -प्राजु
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 02/06/2008 - 00:54 नवीन

वाह वाह

क्या बात है...प्राजु, चतुरंग सहीच...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/06/2008 - 01:05 नवीन

क्या बात है! अजून एक..

प्रेमाला ह्या कशी | नसे ती उपमा | कोणी लेखाजोखा | ठेवीयला || वाटा ते भरून | आता दाहीदिशा | वदे मि.पा.वरी |'चतुरंग' || चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/06/2008 - 01:12 नवीन

देवाजीच्य

देवाजीच्या द्वारी| मागणे न उरे| जीवनी या भरे| प्रेम सारे| | म्हणोनि असे की| प्रेमची करावे| ओवाळूनी द्यावे| जीवन ते| | - प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 02/06/2008 - 01:15 नवीन

च्यामारी...

च्यामारी... चारोळ्यांच्या जागी ओव्या कशा काय चालू झाल्या? असो! छान चालू आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
च
चतुरंग Wed, 02/06/2008 - 01:15 नवीन

अच्छा..

काम माझे आता | वाट तेची पाही | जावयाचे आहे | लॅबमध्ये || विसरत नाही | प्रेमा मी तरिही | म्हणे 'चतुरंगा' | पळ आता! || चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/06/2008 - 01:24 नवीन

अरे

अरे सभासदा | श्लोक नाहि काही| प्रेमाचीच असे| चारोळी ही| | प्रेमाचीच गाथा| प्रेमिकांच्या ओठी | कविता वा श्लोक| लिही तू ही | | - प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 02/06/2008 - 01:42 नवीन

हूश्श.....!

प्राजूबाई तूम्ही|म्हणता म्हणून| पामर हा काही|नाही काव्यासी लायक|| आम्ही खरडतो चार| ओळी काही बाही| चारोळी म्हणती|जन आपसूक|| जमलं एकदाचं... हूश्श.....! -संथ इनोबा(संदर्भः मिसळबोध)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
रविराज Wed, 02/06/2008 - 02:26 नवीन

तू माझी प्रिया

तू माझी प्रिया मी तुझा रवी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने मी झालो कवी - रविराज
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/06/2008 - 02:33 नवीन

वावा

रविराज, उखाणा सदृश कविता छान आहे. त्यात तिचे नाव गुंफले असतेत तर मस्त उखाणाच झाला असता... - प्राजु
  • Log in or register to post comments
र
रविराज Wed, 02/06/2008 - 03:00 नवीन

आहे त्यामधे

प्राजु, नाव गुंफले ले आहे त्यामधे. रविराज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Wed, 02/06/2008 - 03:02 नवीन

अरे वा..

अरे वा.. तिचे नाव "प्रिया" आहे तर.. खूपच छान... आणखिही येऊदेत अशा चरोळ्या.. - प्राजु
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/06/2008 - 09:16 नवीन

प्रियेचा विरह .....

च्यायला डोक्याचा भूगा झाला तरी आम्हाला 'कविता' सुचेल तर शपथ ... म्हणून आमच्या मनाच्या भावना दर्शवणार्‍या "संदिप आणि सलील" यांच्या ४ ओळी देत आहे .... " दिसे जे कवीला , न दिसते रवीला सांगून गेले कुणीसे शहाणे ... .... दिसे जे कवीला , न दिसते रवीला सांगून गेले कुणीसे शहाणे ... .... मला तू न दिसशी, परंतु तयांच्या नशिबी कसे सांग तुजला पहाणे .... प्रिये ये निघेनी घनांच्या कडेने ..... मला एकटेसे आता वाटत आहे ..... " विरहतेने व्याकूळ [ छोटा डॉन ]
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/06/2008 - 11:06 नवीन

हेच,

च्यायला डोक्याचा भूगा झाला तरी आम्हाला 'कविता' सुचेल तर शपथ ... आम्हीही दिवसातून एकदा तरी अगदी हेच म्हणत असतो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
र
रविराज Wed, 02/06/2008 - 11:01 नवीन

महाबळेश्वर वाई पाचगणी

महाबळेश्वर वाई पाचगणी कोयना भीमा कास बामणोली ठोसेघर प्रतापगड सज्जनगड सह्याद्री अजिंक्यतारा आय लव माय(भू़मी) सातारा - रविराज .
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/06/2008 - 11:08 नवीन

:)

मस्त चारोळी! :) आपला, (महाराष्ट्रीयन) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविराज
र
रविराज Wed, 02/06/2008 - 11:31 नवीन

माफ कर प्रिये

माफ कर प्रिये मला, तुला मी खोटं बोललो तुझ्या आधी सुद्धा होतो मी प्रेमात पडलो येते जेव्हा आठवण तिची, मनात खमंग वारा वादळी ती होती माझ्या आजीच्या हातची पुरणपोळी पुरणपोळीवर तुप जोडीला आमरस प्रेम घट्ट झाले आमचे दिवसेंदिवस कधी निमित्त सणाचे कधी वाढदिवसाचे तर कधी आमच्या भेटीला निमित्त माझ्या रुसण्याचे एकदा मात्र घात झाला पुरणपोळीने धोका दिला अचानक आजी निघुन गेली प्रेयसीही माझी तिच्याबरोबर गेली आता जेव्हा गावी जातो चुली समोर आजीला पाहतो तीच्या आठवणींच्या पुरणपोळ्या मी पोटभर खातो - रविराज.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/06/2008 - 11:41 नवीन

हम्म!

ही कविता वेगळीच आहे बुवा! उगीच मन उदास करून गेली..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविराज
ऋ
ऋषिकेश Wed, 02/06/2008 - 21:28 नवीन

अप्रतिम

अप्रतिम कविता!!! खूप खूप आवडली.. अजून येऊ दे रविराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविराज
प
प्राजु Wed, 02/06/2008 - 20:15 नवीन

पु.पो. वरून आठवलं...

पांधरा शुभ्र गोळा तरंगे जशी सळसळे तरूणाई मुखी येता.. तृप्त आत्मा ती माझी रस्-मलाई..... उम्म्म..... वा वा... - (रसमलाईत गुंतलेली )प्राजु
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी Wed, 02/06/2008 - 20:24 नवीन

िव्कास०१५

िव्कास०१५४ गाजराची पुन्गी वाजली तर वाजली नाहितर मॊडून खाल्ली पोरगी पटली तर पटली नाहितर बहीण मानली.........
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 02/06/2008 - 21:59 नवीन

मी पण....मी पण......

भरपुर झाले 'राज'कारण अन 'सपा'ची सत्तेची हाव मिटवा वाद सगळे आता वाढवु फक्त प्रेम अन् बंधुभाव - (समस्त भैय्यांचा भाऊ) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
अ
अव्यक्त गुरुवार, 02/07/2008 - 00:22 नवीन

श्याम नभ

श्याम नभ जसे झाकोळे चंद्रमा कृष्ण कूम्तल व्यापे तव मुख चंद्र्मा नभातुन जसा चंद्र प्रकाश झळाळे कुंतलातुन तव सौंदर्य प्रभा झळाळे ... (प्रेमवीर) अव्यक्त!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 00:42 नवीन

साला, आपलीही एक..

तात्या दिवाना अनुष्कावर मरतो अनुष्कासाठीच अहोरात्र झुरतो.. आपला, (अनुष्का प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 02/07/2008 - 00:49 नवीन

आता ही कोण

तात्या कोण ही अनुष्का?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 00:52 नवीन

खरडवहीत..

तात्या कोण ही अनुष्का? उत्तर कृपया तुमच्या खरडवहीत पाहा, इथे विषयांतर नको.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा