✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ये,बैस ना जराशी...

स — सत्यजित..., Fri, 07/07/2017 - 10:18
ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची दररोज येत नाही ही रात चांदण्याची! हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची! कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे कवळून जा उराशी तादात चांदण्याची! येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची! स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती घेवून रात ये तू दारात चांदण्याची! आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
10750 वाचन

💬 प्रतिसाद (28)

आहाहा! क्या बात! तुमच्या

प्राची अश्विनी
Fri, 07/07/2017 - 11:55 नवीन
आहाहा! क्या बात! तुमच्या गझलांची fan झाली आहे.
  • Log in or register to post comments

खूप-खूप धन्यवाद प्राची अश्विनी!

सत्यजित...
Fri, 07/07/2017 - 23:16 नवीन
आपण लिहितो ते भावत असल्याचं रसिक अवर्जून कळवतात,शाबासकी/शुभेच्छा देतात,ही कुठल्याही कवी/लेखकासाठी एक विलक्षण समाधानाची,आनंदाची बाब आहे! आपली लेखणी,रसिकांशी कुठेतरी relate होवू शकते,त्यांना ती आपलीशी वाटते,ही जाणिवच तिला सतत चालते ठेवते! प्रतिसादाबद्दल अनेक आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

वा छान च.

चष्मेबद्दूर
Fri, 07/07/2017 - 19:30 नवीन
  • Log in or register to post comments

वा छान च.

चष्मेबद्दूर
Fri, 07/07/2017 - 19:31 नवीन
+१११
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक धन्यवाद चष्मेबद्दूर

सत्यजित...
Fri, 07/07/2017 - 23:19 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद चष्मेबद्दूर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चष्मेबद्दूर

मस्तच

सौन्दर्य
Sat, 07/08/2017 - 09:28 नवीन
शेवटच्या दोन ओळी एकदम खास. गझल फार छान लिहिली आहे. एक शंका, 'कवळून जा उराशी तादात चांदण्याची' ह्यातील 'कवळून'चा अर्थ कळला नाही. तुम्हाला कवटाळून म्हणायचे आहे का ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Sun, 07/09/2017 - 00:40 नवीन
>>>'कवळून जा उराशी तादात चांदण्याची' ह्यातील 'कवळून'चा अर्थ कळला नाही. तुम्हाला कवटाळून म्हणायचे आहे का ?>>>अगदी बरोबर सौन्दर्यजी! भट साहेबांनी सुद्धा हा शब्द वापरलेला आहे...'सूर्य येणारे मला कवळून गेले!' अवांतर—या सुंदर गझलेची आठवण झाली,म्हणून मतला देतो आहे... 'कोण जाणे कोण हे जवळून गेले! चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!!'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

कातिल!

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/08/2017 - 10:07 नवीन
कातिल!
  • Log in or register to post comments

मस्त गझल....

मुक्त विहारि
Sat, 07/08/2017 - 14:21 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments

(No subject)

जेनी...
Sat, 07/08/2017 - 16:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments

ह्म्म

सत्यजित...
Sun, 07/09/2017 - 00:41 नवीन
ह्म्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

वा वा क्या बात!

संजय पाटिल
Sat, 07/08/2017 - 16:59 नवीन
वा वा क्या बात!
  • Log in or register to post comments

आलीस ना छतावर झटकून केस ओले?

दशानन
Sat, 07/08/2017 - 21:27 नवीन
आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! क्या बात है... क्लास!
  • Log in or register to post comments

झकास! !

सानझरी
Sat, 07/08/2017 - 21:30 नवीन
झकास! !
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Sun, 07/09/2017 - 00:19 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आलीस ना छतावर झटकून केस ओले?

पद्मावति
Sun, 07/09/2017 - 01:16 नवीन
आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची!
क्लास्स्स!!!
  • Log in or register to post comments

आज अजून एक शेर सुचला...

सत्यजित...
Sun, 07/09/2017 - 06:15 नवीन
डोकावतेस जेंव्हा अरश्यात,नाहल्यावर क्षणभर छबी तरळते अरश्यात चांदण्याची!
  • Log in or register to post comments

मस्तच.. मूळ रचना आवडलीच, हा

रुपी
Mon, 07/10/2017 - 02:41 नवीन
मस्तच.. मूळ रचना आवडलीच, हा शेरही सुंदर आहे.. फक्त दोन्ही ओळींत 'अरश्यात' शब्द वापरण्याऐवजी आणखी काही सुचते का पाहा. (मला गझल, कवितेतलं फार काही कळत नाही. सहज सुचवलं). स्वल्पविरामानंतर एक 'स्पेस' द्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

ऐन्यात

पैसा
Wed, 07/12/2017 - 12:55 नवीन
ऐन्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

अप्रतिम खूपच छान.

वकील साहेब
Sun, 07/09/2017 - 19:43 नवीन
अप्रतिम खूपच छान.
  • Log in or register to post comments

मस्त!

नावातकायआहे
Mon, 07/10/2017 - 05:14 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

"आलीस ना छतावर झटकून केस ओले?

धनावडे
Mon, 07/10/2017 - 06:48 नवीन
"आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची!" खूपच छान....
  • Log in or register to post comments

मस्तं!

अनुप ढेरे
Mon, 07/10/2017 - 09:58 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

मस्त गझल!

राघव
Mon, 07/10/2017 - 16:35 नवीन
सगळेच शेर छान. स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची! आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! या ओळी खास आवडल्यात. पुलेशु. :-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Mon, 07/10/2017 - 20:27 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आवडली

पैसा
Wed, 07/12/2017 - 12:59 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

गझल आवडली

मारवा
गुरुवार, 07/13/2017 - 09:07 नवीन
"आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची!" या ओळीवरुन हा शेर आठवला किसने भिगे हुए बालोसे ये झटका पानी झुम के आयी घटा टुटके बरसा पानी छतावरील वा बाल्कनीतील प्रेयसी न्हाउनिया केस ओले वाळवणारी प्रेयसी या थीम्स फारच रोमॅंटीक आहेत नेहमी आवडतात
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Fri, 07/14/2017 - 00:20 नवीन
पैसा,मारवा...धन्यवाद! मारवा, आपण दिलेला शेरही सुंदर आहे!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा