✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पांडू पाटील

ज
ज्ञानदेव पोळ यांनी
Wed, 03/29/2017 - 14:52  ·  लेख
लेख

4 पोरं, 3 पोरी, 21 नातवंडे, 16 परतुंड आणि अजून काही दिवस जगला असता तर खापर परतुंड बघण्याचं भाग्य लाभलेला चालता फिरता माझा आज्जा पांडू पाटील रात्री साडे दहा वाजता मातीत मिसळून गेला. 98 वर्षे जगलेला आणि जुनी चवथी शाळा शिकलेला गावातला शेवटचा दणकट म्हातारा. पण या वयापर्यंत कधी दाताला कीड लागली नाही कि डोळ्याला चष्मा लागला नाही. स्वातंत्र मिळायच्या आधी जन्माला आला तेव्हा राबायला शेताचा एक तुकडा होता आणि राहायला खणभर घर. पण दिवस रात्र राबून पंचवीस एकर जमीन केली. दोन विहिरी पाडल्या. सगळया वावरांचा कोपरा न कोपरा भिजवून काढला, आणि शहरात नोकरी करणाऱ्या पोरांना गावात चार घरे सुद्धा बांधली. म्हाताऱ्यानं प्रचंड गरिबी पाहिली, पारतंत्र पाहिलं, स्वातंत्र पाहिलं, तसं गरिबीनंतर कष्टानं मिळालेलं वैभव सुद्धा पाहिलं. पण खांद्याला खांदा लावून उन्हातान्हातून संसाराची बैलगाडी ओढणारी आणि मध्येच एका वळणावर साथ सोडून गेलेली म्हातारी म्हाताऱ्याला आतून व्याकुळ करत राहिली. पण तरीही म्हातारा वाकला नाही कि मोडला नाही. पण नियतीच्या क्रूर खेळात दोन तरणी ताटी मुलं गेली आणि भुंड कपाळ झालेल्या सुना बघून म्हातारा कोसळला. आपल्या आधीच स्मशानात जळणाऱ्या आपल्या पोरांच्या चिता पाहून म्हाताऱ्यानं केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता...
...पण म्हातारा खचणारा न्हवताच. व्हराडाचा टेम्पो उलटून खाली सापडलेला म्हातारा तुटलेल्या बरगडया छातीला जोडून जीवघेण्या दुःखातून सुद्धा उठला आणि पुन्हा मातीत राबला. खचला नाही की रुतला नाही. न्हवे रुतन्यासाठी तो पृथ्वीवर जन्माला आलेलाच न्हवताच. कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेला म्हातारा साऱ्या दुनियेच्या सुख दुःखात सामील झाला. रोज सकाळी पेपरात मान घालून सारी दुनिया म्हातारा वाचून काढायचा. यात्रा जत्रा करत काल परवा पर्यंत एकटा फिरत राहिला. ना कुणाचा जगण्यासाठी आधार घेतला, ना कुणाकडून सेवा करण्याची अपेक्षा. कधी अंगाला सुई टोचली नाही कि पोटाला औषध गोळ्या लागल्या नाहीत. कि शरीराला व्यसन लागलं नाही. मला शंभर वर्षे काय होणार नाही अशी जगण्याची इच्छाशक्ती असलेला म्हातारा काल नियतीने पाठवलेला पहिला आणि शेवटचा हार्ट आट्याक मात्र पचवू शकला नाही. आजूबाजूला प्रचंड वारा खेळत असतानासुद्धा शेवटी म्हातारा पांडू पाटील एका श्वासाला महाग झाला...

http://dnyandevpol.blogspot.in/2017/03/blog-post_26.html

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
3848 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

छान लिहिलंय

पैसा
Wed, 03/29/2017 - 16:59 नवीन
छान लिहिलंय. अजून खूप काही लिहिण्यासारखं असणार आहे या आज्याबद्दल. लिहिताना जरा हात आवरता घेतल्यासारखं वाटलं.
  • Log in or register to post comments

+१ खूप सुंदर लिहिलय..

शलभ
गुरुवार, 03/30/2017 - 14:17 नवीन
+१ खूप सुंदर लिहिलय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जबरदस्त...!!

विशुमित
Wed, 03/29/2017 - 17:13 नवीन
जबरदस्त...!! माझ्या आईच्या आजोबांची आठवण आली. डिक्टो सेम स्टोरी. एका भोपळ्याच्या वेलावर ४ वर्षं बायका पोरांना जगवलं. ते १०२ वर्ष जगले पण १०१ वर्षा पर्यंत अंगाला सुई टोचवून नाही घेतली. आणखी वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय. पुलेशु.

एस
Wed, 03/29/2017 - 18:31 नवीन
छान लिहिलंय. पुलेशु.
  • Log in or register to post comments

+11

प्राची अश्विनी
Fri, 03/31/2017 - 08:14 नवीन
+11
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

भेदक लेखन .

सिरुसेरि
Wed, 03/29/2017 - 19:45 नवीन
भेदक लेखन . "खुनमें तेरे मिट्टी , मिट्टीमें तेरा खुन .." हे वर्णन तर अशा कष्टमय जीवनाला जास्त समर्पक वाटते .
  • Log in or register to post comments

जबरी लिहीलंय..।

जव्हेरगंज
Wed, 03/29/2017 - 20:04 नवीन
जबरी लिहीलंय..। येऊंद्या अजून..!!
  • Log in or register to post comments

छान रस आलाया. पण अजूण बर्फ

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/29/2017 - 20:09 नवीन
छान रस आलाया. पण अजूण बर्फ वाडवा.
  • Log in or register to post comments

आद्दी मले वाटलं , पांडू

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/29/2017 - 20:11 नवीन
आद्दी मले वाटलं , पांडू पाटील मंजे... =)) असो! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

छान लिहिलय

अनुप ढेरे
Fri, 03/31/2017 - 12:29 नवीन
छान लिहिलय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा