✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

घरट्याची ओढ

च — चांदणे संदीप, Mon, 12/14/2015 - 13:10
वेळूच्या बनात एक पाखरू एकटे शीळ देई वारियाला         सांगे जा तू घरट्याला वारा उनाड बावरा घुमे वेळूच्या भवती म्हणे वेळूचे गे गाणे         गळा भर, पाखराला पारा उन्हाचा महान लखलख मृगजळ करी कंठी पाखराच्या परि         पाऊस घरचा ओला जीव बनी अडकला जीव एक घरट्यात देई हळवा संधिकाल         बळ नाजूक पंखाला - संदीप चांदणे

प्रतिक्रिया द्या
4894 वाचन

💬 प्रतिसाद (21)

अप्रतिम कविता संदिप.

प्रचेतस
Mon, 12/14/2015 - 13:52 नवीन
अप्रतिम कविता संदिप.
  • Log in or register to post comments

मस्त

एक एकटा एकटाच
Mon, 12/14/2015 - 13:56 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

वा वा वा वा वा! अप्रतिम

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/14/2015 - 14:00 नवीन
वा वा वा वा वा! अप्रतिम काव्य.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

चांदणे संदीप
Mon, 12/14/2015 - 14:25 नवीन
___/\___ प्रतिसादासाठी धन्यवाद! प्रचेतस आणि गुर्जींचे प्रतिसाद नेहमीच सुखावून जातात तर ३ए सरांचा प्रतिसाद म्हणजे एका कवीची अनमोल दाद! धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments

धन्यवाद संदीप

एक एकटा एकटाच
गुरुवार, 12/17/2015 - 10:29 नवीन
धन्यवाद संदीप पण चांगल्या कलाकृतीला दाद ही मिळाल्याशिवाय कधीच रहात नाही. असेच लिहित रहा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

आणि हो......

एक एकटा एकटाच
गुरुवार, 12/17/2015 - 10:32 नवीन
सर नका म्हणु..... एकेरी उल्लेख all ways welcome. तेव्हढीच सहजता रहाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

वोक्के....

चांदणे संदीप
गुरुवार, 12/17/2015 - 10:45 नवीन
वोक्के....नोटेड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच

सुंदर शब्दरचना....

शार्दुल_हातोळकर
Wed, 12/16/2015 - 23:13 नवीन
सुंदर शब्दरचना....
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

आतिवास
Wed, 12/16/2015 - 23:20 नवीन
कविता आवडली. पण ... शेवटच्या कडव्यात काहीतरी गडबड वाटली. पुन्हा जरा निवांतपणे वाचते.
  • Log in or register to post comments

देई हळवा संधिकाल

अभ्या..
गुरुवार, 12/17/2015 - 11:08 नवीन
देई हळवा संधिकाल बळ नाजूक पंखाला ह्याएवजी लागे हळव्या संध्याकाळी पिसे नाजूक पंखांना चालले असते असे वाटते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

शब्दरचना उत्तम आहे...

चांदणे संदीप
गुरुवार, 12/17/2015 - 11:34 नवीन
लागे हळव्या संध्याकाळी पिसे नाजूक पंखांना
शब्दरचना उत्तम आहे... पण अपेक्षित अर्थापासून दूर चालल्यासारखी वाटते! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अर्थात सॅन्डी.

अभ्या..
Fri, 12/18/2015 - 11:34 नवीन
अर्थात सॅन्डी. मला जर कविता करायला येत असती तर.... :( . असो. नाही येत तेच बरेय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मी काय म्हणतो अभ्या साहेब

एक एकटा एकटाच
Fri, 12/18/2015 - 13:14 नवीन
तुम्हाला एक ट्राय करायला काय हरकत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्तचं की!

रातराणी
गुरुवार, 12/17/2015 - 02:57 नवीन
मस्तचं की!
  • Log in or register to post comments

!

जव्हेरगंज
गुरुवार, 12/17/2015 - 10:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

अलगद

नाखु
गुरुवार, 12/17/2015 - 10:20 नवीन
कवीता.. मस्त
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार!

चांदणे संदीप
गुरुवार, 12/17/2015 - 10:50 नवीन
___/\___ आतिवासताईञ्च्या निवांत वाचनानंतरच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असलेला... Sandy
  • Log in or register to post comments

अरे सॅण्डीबाबा त्या बुलेट

अभ्या..
गुरुवार, 12/17/2015 - 11:06 नवीन
अरे सॅण्डीबाबा त्या बुलेट ट्रेन अन नास्तिक आस्तिकाच्या घोळात हे राह्यलेच की वाचायचे. सॉल्लीड जमलीय. पंखांना असलेली ओढ भिडली रे एकदम.
  • Log in or register to post comments

धन्यवाद अभ्यादादा!

चांदणे संदीप
गुरुवार, 12/17/2015 - 11:32 नवीन
___/\___ असंच होतंय आजकाल मिपावर माझपण! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सुरेख लय आहे कवितेला. आवडलीच

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 12/17/2015 - 20:03 नवीन
सुरेख लय आहे कवितेला. आवडलीच ..
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट कविता

देशप्रेमी
Tue, 01/17/2017 - 19:17 नवीन
सुंदर काव्यरचना.!! निखळ भावना अलगदपणे मांडलेल्या आहेत..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा