✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Wed, 11/23/2016 - 12:51
लिहितो विडंबन स्वतःच साठी समोर दिसता कच्चा माल शब्द कल्पना यमके सारी आपसुक धरती त्यावर ताल विषय निवडीचा नसे विकल्प चारोळी, गजल की पोवाडा, जो कविने विषय मांडला त्यावरी केवळ तुटून पडा वाचून किंवा दुर्लक्षूनही डोळ्यांपुढती नाचत राही मग डोक्याची होते मंडई लेखणी खुपसून फाडून खाई लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
10331 वाचन

💬 प्रतिसाद (19)

ह्हाह्हाह्हा!! भारी लिहीलंय

किसन शिंदे
Wed, 11/23/2016 - 12:53 नवीन
ह्हाह्हाह्हा!! भारी लिहीलंय हे
विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस
एक लंबरच
  • Log in or register to post comments

नेहेमीप्रमाणेच सुंदर हो बुवा!

खेडूत
Wed, 11/23/2016 - 12:58 नवीन
नेहेमीप्रमाणेच सुंदर हो बुवा! अजून कच्चा माल शिल्लक आहे..
  • Log in or register to post comments

हहा...लय भारी

पाटीलभाऊ
Wed, 11/23/2016 - 13:11 नवीन
पैजारबुआ...मस्त लिहिलंय.
  • Log in or register to post comments

वा वा.. वंटास लिहिलंय

पुंबा
Wed, 11/23/2016 - 13:15 नवीन
वा वा.. वंटास लिहिलंय
  • Log in or register to post comments

हही हही हही

टवाळ कार्टा
Wed, 11/23/2016 - 13:22 नवीन
हही हही हही
  • Log in or register to post comments

किमान

नाखु
Wed, 11/23/2016 - 14:01 नवीन
या प्रतिसादात्मक काव्यासाठी तरी मूळ काव्याला श्रेय द्यायला पाहिजे.
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा
जमालगोटा कडवे खास ठेवणीतले. अमक्या तमक्या यमक्यातला नाखु
  • Log in or register to post comments

देवा.... अशी गुस्ताखी आमच्या कडून कशी होईल?

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 11/23/2016 - 20:14 नवीन
आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे बुवा मुख्याध्यापक आहेत. (इथे कानाला (स्वतःच्या) हात लावणारी स्मायली कल्पावी) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मस्त लिहिलंय :)

ग्रेंजर
Wed, 11/23/2016 - 14:21 नवीन
मस्त लिहिलंय :)
  • Log in or register to post comments

लोल!

वेल्लाभट
Wed, 11/23/2016 - 15:58 नवीन
लोल!
  • Log in or register to post comments

हहपुवा.

प्रचेतस
Wed, 11/23/2016 - 16:11 नवीन
हहपुवा. पैजारबुवा हे मिपाला लाभलेले एक श्रेष्ठ विडंबक आहेत.
  • Log in or register to post comments

+१००

सस्नेह
Wed, 11/23/2016 - 17:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पुन्हा अवेळी आली कळ जर

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 11/23/2016 - 17:45 नवीन
पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका
जबराट!
  • Log in or register to post comments

पुन्हा अवेळी आली कळ जर

सूड
Wed, 11/23/2016 - 20:20 नवीन
पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका
हा शालजोडीतला का?
  • Log in or register to post comments

=))

अजया
Wed, 11/23/2016 - 21:06 नवीन
=)) महान विडंबक आहेत पैजारबुवा!
  • Log in or register to post comments

@पुन्हा अवेळी आली कळ जर

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/23/2016 - 22:50 नवीन
@पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका. ››› =)) अच्च क्काय! =)) दू दू दू ! थांबा हं आता तुम्हाला ना Ssssss तांब्या घेऊन . . . . . . . . . . नळावरच पाठवतो! ;)
  • Log in or register to post comments

=))

रातराणी
Mon, 12/05/2016 - 17:01 नवीन
=))
  • Log in or register to post comments

वाचन करता यावा फेस

बरखा
Mon, 12/05/2016 - 17:08 नवीन
"विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस" हे भारी....
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Tue, 12/06/2016 - 11:56 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

बुवा

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 12/07/2016 - 07:46 नवीन
बुवा __/\__!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा