Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लंपन, वानरांच्या फौजा आणि थोडं पाल्हाळ

न
नंदन यांनी
Fri, 10/19/2007 - 16:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
38233 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Fri, 10/19/2007 - 16:18 नवीन

सुरेख

अप्रतिम अभ्यासपूर्ण लेख. केवळ ती पुस्तकं ग्रेट आहेत यापेक्षा 'तुम्हांला' ती किती आवडतात हे महत्त्वाचं. केवळ गाजलेलं पुस्तक आहे म्हणून ते न आवडताच डोक्यावर घेऊ नये. शतशः सहमत. आजच एक वाक्य वाचले ते देण्याचा मोह आवरत नाही. What's right isn't always popular... and what's popular isn't always right. साहित्यात राईट व राँग असे काही नसले तरी आशय बराचसा लागू होतो.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 10/19/2007 - 16:20 नवीन

कॅचर इन द राय

लंपन, कोसला, हॅरी पॉटर यांसोबत "कॅचर इन द राय"चा उल्लेख नाही पाहून आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 10/19/2007 - 16:28 नवीन

कॅचर...

धन्यवाद, योगेश. कोसलाबद्दल लिहिताना 'कॅचर इन द राय' डोक्यात आले होते, पण ते वाचले नसल्याने त्याचा उल्लेख केला नाही. कोसला लिहिताना नेमाडेंनी 'कॅचर...'वरुन मोठ्या प्रमाणावर प्रेरणा घेतली आहे असाही प्रवाद ऐकला आहे. [चौकस यांचे 'निळे पेन'ही याच (लंपन - डोह वगैरे) सदराच्या जवळ जाते, असे वाटते.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Fri, 10/19/2007 - 16:34 नवीन

शक्यता आहे

कोसला आणि कॅचर इन द राय चा संबंध असण्याची शक्यता आहे. पण कोसलाच्या तुलनेत कॅचर फारच टोकदार प्रभावी वाटले. कॅचरची एका मैत्रिणीकडून उसनी घेऊन वाचलेली प्रत ही कधीही मोडून पडतील असली पिवळट पाने व त्यांचा विशिष्ट वास असलेली जुनाट होती. त्यामुळे कॅचरमधले होस्टेलचे वर्णन अगदीच अनुभवता आले. ;) - (वाचक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
क
कोलबेर Mon, 10/22/2007 - 02:33 नवीन

कोसला..

...अनेकदा वाचायला घेउन सोडून दिले आहे पण 'कॅचर' मात्र परदेशी असून एका बैठकीत वाचून काढावेसे वाटले. कोसलातील नेमाड्यांची शैली अनेकांना भुरळ घालत असली तरी मला झेपत नाही.. तेव्हा थोडक्यात, 'केवळ ती पुस्तकं ग्रेट आहेत यापेक्षा 'आपल्याला' ती किती आवडतात हे महत्त्वाचं.' हेच खरं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ज
जुना अभिजित Mon, 10/22/2007 - 13:48 नवीन

सहमत

आमच्या एका मास्तरांनी कोसला वाचा असं आम्हाला सांगीतलं. त्याचं कौतुक करताना ते म्हणाले होते की यातून जीवनविषयक दृष्टी मिळते. आम्ही वाचलं पण घंटा काही दृष्टी वगैरे मिळाली नाही. मराठी साहित्यातला मैलाचा दगड असा उल्लेख कोसलाबद्दल केला जातो. पण का ते कळत नाही. कदाचित आमची आवड जुळत नसावी. कोसला, बिढार, झूल, जरीला सगळी पुस्तके वाचली आहेत. पण अफलातून वगैरे वाटली नाहीत. अनोळखी लेखकांची अनेक अप्रतिम पुस्तके कथा वाचनात आल्या आहेत. नेमाडेंचा क्षमस्व अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ध
धनंजय Fri, 10/19/2007 - 16:53 नवीन

अभ्यासपूर्ण

तसाच आस्वादपूर्ण. मस्त लेख.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/19/2007 - 17:42 नवीन

सुरेख..

नंदन, सायबा, केवळ सुरेख लिहिलं आहेस.. तुझं मराठी साहित्यावरील प्रेम आणि वाचन पाहिलं की खरोखरंच थक्क व्हायला होतं! तुझ्या व्यासंगाला आपला सलाम... तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 10/21/2007 - 18:03 नवीन

++१

१०१% सहमत!!! (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रियाली Fri, 10/19/2007 - 18:19 नवीन

वा!

सुरेख, अभ्यासपूर्ण लेख. वानरांचे, त्यासोबत आलेले पावसाचे, कौलांच्या छिद्रातून दिसणारे आकाशाच्या निळ्या पार्‍याचे वर्णन फारच छान.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 10/20/2007 - 00:16 नवीन

सुंदर लेख

सुंदर लेख. हल्लीच चेतन भगत चे फाईव्ह पॉइंट समवन वाचून, माझी आणि बायकोची चर्चा झाली. तिला ते पुस्तक अजीबात आवडलं नाही, आणि मला ते प्रचंड आवडलं. ह्याचे कारण एकचः ही पुस्तकं वाचत असताना मी त्या वयाचा असताना असाच मॅडसारखा विचार करायचो असं वाचताना सतत वाटत राहतं आणि लंपनशी कुठेतरी धागा जुळतो; हेही एक महत्त्वाचं कारण असावं. आय आय टी च्या होस्टेल मधला (किंवा इतर कुठल्याही होस्टेलमधला) अनुभव नसेल, तर फाईव्ह पॉइंट समवन आवडणे कठीण आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 10/20/2007 - 00:39 नवीन

पाल्हाळ आवडले

जसे कुठलाही कलाविष्कार सादर करताना त्या कलाकाराची एक "ग्रेस/फ्लूएन्सी" बघायला मिळते तशी नंदन तुमच्या वाचनाला/रसग्रहणाला देखील एक "नजाकत" आहे. वाचनातून रसग्रहण व एकंदर तुमची जडणघडण ह्याचा एक अंदाज आला. :-) तयार कान असलेल्या श्रोत्यासारखे तुम्ही "पट्टीचे" (आदराने/कौतुकाने) वाचक आहात. वानरांबद्दल खूप फुलवलेला लेख असला तरी लहानपणी पाचगणीला धप्प्कन समोर आलेले, दोन पायावर उभे राहील्यावर (बसलेल्या माझ्यापेक्षा) अजूनच धिप्पाड असलेले काळ्या तोंडाचे निडर माकड जेव्हा फस्स्कन आवाज करून माझ्या हातातून पापड घेऊन गेले, तेव्हा पासून मी वानराला जरा टरकून, बरीच श्वापदे ही दुरूनच उत्तम. :-) माझी इतर भावंडेपण भेदरली होती. आम्ही सगळे मग खेळताना ते मीरकॅट फॅमीली सारखे वॉच ठेवून असायचो. बनेश्वरला सहलीला तर ती माकडे हातातील खाऊ, पिशवी पळवायला चोरी करायलाच यायची. असो ह्या आठवणीमुळे म्हणा की माझ्या अल्पमतीमुळे ते लहान मुलाने केलेले वानराचे वर्णन जरा जास्तच वाटते. :-) असतील बुवा त्यागावची गरीबडी वानरे.....
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 10/20/2007 - 04:55 नवीन

आठवणी

आमच्या उघड्या पडवीच्या लाल कौलारओळींच्या थोडे अलीकडे आत आम्ही घरची सारी जणे ते कुतूहल डोकावून, न लवणाऱ्या डोळ्यांनी पाहत उभी असू. पाणी पाणी पापण्यांभरी पाहत... कौलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. "डोह" वाचलं नाही. आधी च कुठेतरी कबूल केल्याप्रमाणे हल्ली वाचन कमी झाले आहे. पण वाचावंसं वाटतं आहे हे मात्र नक्की. तुम्ही म्हणता तसे लहानपणच्या अनुभवांशी हे वर्णन जुळून गेले. पडवी शब्दानेच लहानपण आठवले. पडवीचे गज, वर जुन्या घरात जाणारा जिना, बाहेरचे खांब, लहानपणी पावसात पाकोळ्या घरात येत ते सर्वच आठवले. लंपन आणि सुमा हे तर आधीच मनात खोलवर बसले आहेत. लंपनच्या आजीआजोबांच्या गावासारखेच आमचेही गाव होते (एके काळी म्हणायला हवे). कदाचित लंपन आवडण्याचे कारण त्याचे ते सुंदर गावही असेल. असे वर्णन वाचले की तुम्ही म्हणता ते अनुभव अधिक उमाळ्याने समोर येतात. त्यामुळे (मनापासून) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 10/20/2007 - 12:04 नवीन

अर्थात

अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. ती पुस्तकं ग्रेट आहेत यापेक्षा 'तुम्हांला' ती किती आवडतात हे महत्त्वाचं. कुठेतरी आपली ओळख पटते आणि ते पुस्तक आवडण्यामागचं एकमेव नसलं तरी महत्त्वाचं कारण बनून जातं. अनुभव ग्रहण करण्याची प्रत्येकाची पार्श्वभूमी काळाप्रमाणे बदलत जाते, हा भाग वेगळाच. आजचे नवीन अनुभव मग आपल्या पिंडाचा भाग बनतात. त्यामुळे आज एखादं पुस्तक/कविता आपल्याला जशी आवडली तशीच्या तशीच ती आपल्याला दहा वर्षांनी आवडणार नाही. जर आपल्याच आवडीत एवढा फरक पडू शकतो, तर दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण. सुंदर लेख! एखादे पुस्तक आपल्याला का आवडते किवा तितकेसे का आवडत नाही, याचे विवेचन अगदी आतून पटले. स्वाती
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 10/21/2007 - 17:58 नवीन

धन्यवाद

आपल्या प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार. सहजराव, त्या मूळ लेखात माकडांच्या हिंस्त्रपणाचेही वर्णन आहे. पण एकंदरीतच तुम्ही म्हणता तसं त्यांच्याविषयीचं आकर्षण अधिक दिसून येतं. चित्रा, तुम्ही म्हणताय ते खरंय. पहिल्या ओळीपासूनच मनात जुनी चित्रं आठवायला लागतात आणि त्यात वाचत जाऊ तसतसे अधिक डिटेल्स भरत जातात. आणखीन वीस-तीस वर्षांनी येणार्‍या पिढीला कदाचित हे लेखन (किंवा बटाट्याची चाळ) वगैरे तितकंसं आपलं वाटणार नाही कारण वर सर्किट यांनी म्हटल्याप्रमाणे हॉस्टेलसारखे जुने अनुभव गाठीशी नसतील. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 12/26/2008 - 17:27 नवीन

डोह

नंदन, काय सुंदर ओळख करून दिली आहेस रे!!! आता पुढच्या भारतवारीत 'डोह' नक्की घेणार. तू एकंदर वाचण्याबद्दल जे काही लिहिलं आहेस ते पण ग्रेटच आहे. मस्त. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/26/2008 - 18:43 नवीन

नंदन,

नंदन, नेहमीप्रमाणेच सहज, सुंदर भाषेतला ओघवता लेख.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 12/26/2008 - 19:16 नवीन

छान लेख

कोसला, शाळा - हे वैयक्तिक अनुभवाचे वैश्विक अनुभवांतर आहे. पांडुरंग सांगवीकर आपणही असतो आणि तसेच आपल्याही डोळ्यासमोर एखादी शिरोडकर असते. अश्याच प्रकारचा अनुभव " म्हैस - पु.ल. देशपांडे - वाचतानासुध्दा येतो. कथा आपल्यासमोर घडते आहे असं वाटतं.
  • Log in or register to post comments
च
चेतन Fri, 12/26/2008 - 19:20 नवीन

सुंदर

सुंदर लेख आणि डोह मधले वर्णनही मस्तच्. त्यामुळे आज एखादं पुस्तक/कविता आपल्याला जशी आवडली तशीच्या तशीच ती आपल्याला दहा वर्षांनी आवडणार नाही. जर आपल्याच आवडीत एवढा फरक पडू शकतो, तर दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण. मला मात्र काही पुस्तक/कविता कधिही तेव्हढ्याच आवडतात. दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण हे खरं डोह नक्की वाचेन अवांतरः कधी कधी एखाद लेखक आवडत नाही किंवा अजुन काही कारणास्तव बरेचजणं मुद्दामुन फक्त लेखनातल्या चुकाच शोधत बसतात. चेतन
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 12/26/2008 - 19:43 नवीन

नंदन

नंदन आभारी आहे.कुणीतरी या पुस्तकांवर लिहावं असं बरेच दिवस वाटत होतं आज अचानक हा लेख समोर आला.लेख आवडला.फार पूर्वी राम पटवर्धनांनी पाडस नावाची कादंबरी लिहीली होती ती आज परत आठवली.श्रीनीवास कुळकर्णी साहेबांचं अक्षरसुद्धा मोत्यासारखं होतं (त्यांच्या लिखाणाला शोभेसं).मौजेत फेर्‍या मारायचो तेव्हा एक नमुना मिळवला होता.सापडला तर अपलोड करतो.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 12/27/2008 - 04:24 नवीन

श्रीनीवास

श्रीनीवास कुळकर्णी साहेबांचं अक्षरसुद्धा मोत्यासारखं होतं (त्यांच्या लिखाणाला शोभेसं).मौजेत फेर्‍या मारायचो तेव्हा एक नमुना मिळवला होता.सापडला तर अपलोड करतो.
उत्सुक आहे. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ल
लिखाळ Sat, 12/27/2008 - 04:23 नवीन

मस्त लेख

मस्त लेख ! डोह हे माझे सुद्धा आवडते पुस्तक आहे. पाठ्यपुस्तकात 'उन्हातले दिवस' ही कथा होती. तेव्हाच कथासंग्रहाचे नाव लक्षात ठेवले होते. नंतर पुस्तक घेऊन वाचले. फारच सुंदर भाषा आणि वातावरन निर्मिती आहे. त्यातले काही शब्द लक्षात राहण्यासारखेच आहेत. 'पौष पाहटेच्या गारव्याने ओठ फुटायचे..' अश्या सारखी त्यातली वाक्ये मला नेहमीच लक्षात राहिली आहेत. माझ्या आवडत्या पुस्तकाची अनेक दिवसांनी आठवण झाली. बरे वाटले.
तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या मेळी तुम्ही होते रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा..."
हे मला सुद्धा अतिशय आवडलेले आणि लक्षात राहिलेले... लेख उत्तम आहे. -- (जुन्या जन्मीचा वानर)लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Fri, 02/15/2013 - 19:54 नवीन

सुंदर पुस्तकावरच्या सहज

सुंदर पुस्तकावरच्या सहज लेखावरच्या सुरेख प्रतिक्रिया! नंदन, तुमचा व्यासंग आणि पुस्तकांबद्दलचा जिव्हाळा.. यांच्यासाठी हा लेख वर काढत आहे. :)
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Fri, 02/15/2013 - 20:23 नवीन

सही!

त्यातल्याच 'आम्ही वानरांच्या फौजा' या कथेतला हा काही आवडलेला भाग --
हा भाग वाचताना अक्षरशः एखाद्या सार्त्रच्या कादंबरीचा अनुवाद वाचतोय की काय वाटुन गेलं. क्लासिक! इनिगोय अतिशय धन्यवाद धागा वर काढल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Fri, 02/15/2013 - 20:48 नवीन

प्र ना संत

प्र ना संत आणि श्रीनिवास कुलकर्णी दोघे कराडचे का ?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/15/2013 - 21:05 नवीन

केवळ अप्रतिम लेख. व्यासंग

केवळ अप्रतिम लेख. व्यासंग करण्यापेक्षा असे मोती अल्लाद वाचकांसमोर ठेवणे यासाठी पाहिजे नंदनच्या जातीचेच! येरा गबाळाचे काम ते अज्जीच नोहे. :)
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Sat, 02/16/2013 - 08:39 नवीन

मॅड सारखा एकदमच मस्त लेख!

लंपन वाचून खुळा झालोच होतो! म्हणजे कळायचे नाही की आपल्याला लहानपणी वाटणाऱ्या गोष्टी अगदी जशाच्या तशा कशा काय शब्दबद्ध केल्या आहेत, आणि आजपर्यंत त्या कधीच कुणी शब्दात मांडणे राहू द्या, आपण सुद्धा कुणाला सांगितल्या नव्हत्या :) लंपनची बेळगाव कडील मराठी तर कानात रुंजी घालत असते! निपाणी-बेळगाव भागात नेहमीच ऐकत आल्यामुळे खूप जवळची वाटते. डोह वाचताना अगदी असेच विचार आले होते! (मी लंपन अक्षरशः पुरवून पुरवून वाचतो आहे. तशी उशिराच गाठ पडली, त्यामुळे अजून 'झुंबर' बाकी ठेवलंय :) ) आपल्या लिखाणाबद्दल मी काय बोलू.. अनेक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/16/2013 - 10:51 नवीन

नंदोबाचा निषेध!

इतकं सुंदर लिहितोस आणि आता फक्त तेही सणासुदीला? हा आमच्यावर अन्याय आहे!
  • Log in or register to post comments
ह
हारुन शेख Sat, 02/16/2013 - 17:48 नवीन

अप्रतिम दर्जेदार लिखाण.

वाह ! काय लिहिलंय . वाचकाशी असा मनस्वी संवाद करणारे लिहू शकणारा विरळा. नंदनसाहेब मी आपला फ्यान झालो हे वाचून.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/18/2013 - 19:07 नवीन

वा! नंदन सायबा, वा!

'डोहा'त बुडवलेत! :) -(आनंदाने गुदमरलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 11/25/2013 - 19:29 नवीन

सुरेख लिहितोस.

नेहमी का लिहित नाहीस रे नंदन! पुन्हा वाचलं.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/26/2013 - 21:39 नवीन

+१

+१ हा प्रश्न बर्‍याच लोकांना लागू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
न
नवनाथ पवार Mon, 02/17/2014 - 10:26 नवीन

लेख ज्याम आवडला

लेख वाचून लगेच बुकगंगेवरुन 'डोह' मागवत आहे वाचनखुण साठवून ठेवली
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Fri, 03/28/2014 - 07:30 नवीन

पांच सांत वर्षांपुर्वी जरा

पांच सांत वर्षांपुर्वी जरा बरं लिहून नाव कमवुन नंतर वांझ झालेल्या लेखकांना पाहून गहीवरुन येतं.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Fri, 03/28/2014 - 10:08 नवीन

मी डोह वाचले नाही.पण मला पंखा

मी डोह वाचले नाही.पण मला पंखा, झुम्बर जाम म्हणजे जाम आवडते.मी प्रकाश संतांच्या लेखनशैलीची खुप चाहती आहे. लंपन आत हलवून जातो लक्ककन.ते वातावरण मलाही खुप जवळचे वाट्ते.कदाचीत ती बेळगावी बोली,ती लाल माती, तो मिलीट्री महादेव मला परत लहानपणीचा गंध देतात.डोह नक्की वाचीन.जुन्या आठवणी जागवल्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/23/2015 - 19:46 नवीन

एक सुरेख लेख.

एक सुरेख लेख. मुद्दाम वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sat, 05/23/2015 - 19:52 नवीन

वाह! वर आणल्याबद्दल धन्स!

वाह! वर आणल्याबद्दल धन्स!
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Fri, 06/05/2015 - 00:05 नवीन

धन्यवाद!

सुंदर लिखाण! लंपन बद्दल अगदी असेच वाटते. गेली ४ वर्षे अक्षरश: पुरवून पुरवून वाचतो आहे. प्रत्येक भाग कितीही वेळा वाचला तरी कंटाळा येत नाही. सध्या पुणे आकाशवाणीच्या '७९२ कि.हर्ट्झ ए. एम.' वाहिनी वर सकाळी १०:३० वाजता 'लंपन' च्या कथांवर आधारित कार्यक्रम चालू आहे. छान वाटते. बरेच दिग्गज कलाकार आहेत.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 06/05/2015 - 00:56 नवीन

अप्रतिम लेख ! हा लेख वर

अप्रतिम लेख ! हा लेख वर आणल्याबद्दल शतशः धन्यवाद !
  • Log in or register to post comments
प
पिचकू Fri, 06/05/2015 - 06:56 नवीन

सध्या टारगट प्रतिक्रिया

सध्या टारगट प्रतिक्रिया देण्याच्या फॅडामुळे तीनचार वर्षांपुर्वी लेखन करणारे सोडून गेलेत.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 07/07/2016 - 18:41 नवीन

हा लेख अप्रतीम सुंदर आहे. डोह

हा लेख अप्रतीम सुंदर आहे. डोह वाचलीच पाहीजे. अवांतरः लंपन च्या चारही पुस्तकांतील कथा इतक्या विलक्षण जादूभरल्या असताना सुद्धा कुणालाच अद्यापपर्यंत त्या चित्रपट, मालीका किंवा नाट्यरूपात आणाव्याश्या का वाटल्या नसाव्यात? की ते वातावरण, लंपणचे भावविश्व उभे करणे 'अपने बस की बात नही' हे मान्य केलेय? मुळात लंपनच्या कथांचा जीव मोठा आहे. संतांची शैली अतिशय निर्भेळ आहे. आपल्या डोळ्यासमोर कथा घडत आहे असं वाटावं इतक्या सहजपणे ते कथा फुलवतात. इतकं सारं मटेरीयल असुन्देखील कुणाला मोह होत नाही याचं वैषम्य, कुतुहल वाटतं. कधी संधी मिळेल तर नकीच हे करयला आवडेल.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 07/07/2016 - 20:29 नवीन

नाही आणल्या चित्रपटांमध्ये हेच चांगलं आहे.

काही कादंबऱ्यांवर चित्रपट बनूच नये. रारंग ढांग, रणांगण अशा नितांतसुंदर कादंबऱ्या चित्रपटाच्या नादात भ्रष्ट होण्याची शक्यता जास्त. लंपनचंही तसंच आहे. चित्रपट म्हटलं की त्यात mass ची, नफा-तोटा, अनुदान वगैरेंची गणितं येतात, तो चालावा म्हणून केलेल्या अपरिहार्य तडजोडी येतात. त्यापेक्षा कादंबरी वाचता वाचता डोळ्यांसमोर visualize करावी आपली आपणच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Fri, 07/08/2016 - 12:06 नवीन

खरंय आपलं.. असं काही हे

खरंय आपलं.. असं काही हे धंदेवाईक निर्माते करायला जातील तर कदाचीत अन्यायच होईल लंपनवर. पैठणीला ठीगळं जोडलेली पहावणार नाहीत असंच वाटतय. गॉडफादर सारखी रसरशीत आणि पुस्तकाइतकीच शानदार असणारी कलक्रुती कधी घडेल मरठीत काय माहीत? :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कंजूस Sat, 07/09/2016 - 06:10 नवीन

सध्या प्रनासंत काय करतात?

सध्या प्रनासंत काय करतात?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 07/09/2016 - 11:05 नवीन

वर गेले आहेत :(

वर गेले आहेत :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
पुंबा Tue, 10/18/2016 - 13:46 नवीन

संत कराडचे. आणि मीदेखील

संत कराडचे. आणि मीदेखील कराडला ४ वर्षे शिक्षणासाठी होतो.. त्यांची भेट व्हायला हवी होती असे फार वाटते.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
P
palambar गुरुवार, 10/20/2016 - 23:55 नवीन

रेडिओ पुणे आकाशवाणीवर लंपन वर

रेडिओ पुणे आकाशवाणीवर लंपन वर मालिका प्रसारित झाली होती , छान केली होती बरेच दिवस झाले, पाच वर्षे झाली असतील.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 10/24/2016 - 12:14 नवीन

आता ऐकावयास मिळेल काय? हे

आता ऐकावयास मिळेल काय? हे आकाशवाणी वाले युट्यूबवर का नसतात काय माहिती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar
अ
अलका सुहास जोशी Fri, 10/21/2016 - 14:40 नवीन

नंदन……......वाचण्यातली खरी

नंदन……......वाचण्यातली खरी गंमत काय हे कळणे महत्वाचे. गोष्टी ऐकून करमणूक करून घेण्याची यत्ता मागे पडली की खरे वाचन सुरू होते. तुमच्या लेखनातून आणि त्यावरील प्रतिक्रीयांमधून एका बोटीतले समानशील भेटल्याचा आनंद झाला. लंपन, सुमी, शारदासंगीत, लंपूचे आजीआजोबा, त्याचे “नकादुचेण्यापकासके” हे सगळे काही अवर्णनीय अनुभव देणारे आहे. संतांची पुस्तके बालकांचे भावविश्व उलगडतात हे अर्धसत्य आहे. लंपूच्या संगीतशिक्षिका आणि त्यांची न लिहिलेली भुतकाळातली गोष्ट, लंपनचे विद्वान आजोबा आणि खमकी आज्जी यांच्यामधली केमिस्ट्री असं खुप कायकाय आपल्याला शहाणं करणारं लिहून जातात प्रनासंत, लंपूच्या मागे लपून. लंपूचं निरागस हळवेपण वाचताना डोळे पाझरायला लागतात. तसं काय, कितीतरी पुस्तके वाचताना रडू येतंच की. पण लंपूबरोबर त्याच्या म्याड गावात हिंडताना, त्याच्या भवतालची माणसे वाचताना, डोळे दु:खभावनेने ओले होत नाहीत. लंपूचा कसा घसा दुखायचा हळवेपणी……तसं कासावीस तगमगायला होतं अगदी. तरीही, हे पुस्तक संपूच नये असंही वाटत रहातं. चांदणयांचा रस्ता हा संतांच्या अकाली निधनानंतरचा माौज प्रकाशनाने काढलेला लेखसंग्रह. तो वाचूनही दोनेक वर्षे झाली. त्यात त्यांनी आईबद्दल लिहिलेला लेख वाचला आणि इंदिरा संत यांची कविता नव्याने समजलेली. विशीपंचविशीत वाचलेले काही काही म्हंजे वपु, गाडगीळ, गोखले , वगेेरे आता पुन्हा वाचताना कंटाळा दाटतो. पुंडलिक , मर्ढेकर , आचवल , श्रीविकु, दुर्गाबाई, किणीकर, ग्रेस आणि बरेचजण मात्र ताजेताजे वाटतात………आजही. बादवे……..चष्मा चिकटल्यावर माझे वाचन आटले आहे. मिपाकरांचा काय अनुभव??
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा