✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

समाजामध्ये कमी माहिती जैन समाजाबद्दल ?

न
निओ१ यांनी
Sat, 09/03/2016 - 22:24  ·  लेख
लेख
आपल्या समाजामध्ये जैन समाजाबद्दल खूप कमी माहिती आहे का ? दिगंबर जैन का आहेत? त्याची गरज का आहे? ते दिगंबर का आहेत ? जर आपल्याला एका धर्माबद्दल माहिती नसेल तर आपण आपले मत व्यक्त करताना थोडी माहिती का शोधू नये? काही लोकांनी "ते नागडे" इत्यादी प्रकारे उपहास केला आहे. त्याना धर्माची माहिती घेणे गरजेचे आहे असे का वाटत नाही? जैन धर्म मधील प्रत्येक व्यक्ती हिंदू-जैन असे लिहितो, तुम्हीच जर असे लिहले किंवा विरोध केला तर त्याचा परिणाम काय होइल याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जैन हे आधी हिंदू आहेत मग ते जैन आहेत पण असे दिसू लागले आहे की हिंदू जैन समाजाला आपले समजत नाही आहे. खूप वाईट वाटले म्हणून लिहिले.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
39886 वाचन

💬 प्रतिसाद (182)

प्रतिक्रिया

मुनीवर कि जय!!

खालीमुंडी पाताळधुंडी
Sun, 09/04/2016 - 21:03 नवीन
मुनीवर कि जय!! नागासाधु कि जय!! गौमाता कि जय!! भारत माता कि जय!!
  • Log in or register to post comments

देशाची घटना, तिचे पावित्र्य

अभिजीत अवलिया
Sun, 09/04/2016 - 22:03 नवीन
देशाची घटना, तिचे पावित्र्य ह्यापेक्षा जर धर्म मोठा होऊ लागला तर ही फार चिंताजनक गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

अगा जे ....

गामा पैलवान
Sun, 09/04/2016 - 22:49 नवीन
संदीप डांगे, >> महाशय, माझ्या वक्तव्याने जैन धर्माचा अपमान कसा झाला याबाबद्ल उत्तर हवंय, आहे का तुमच्याकडे? >> बाकीचा फाफट पसारा नन्तर बघू! अगा जे घडलेचि नोहे त्याची वार्ता काय पुसताहे? बरं, पण जैन धर्मावर आगपाखड कशासाठी? जैन धर्माला सत्याची लाज वगैरे वाटते का म्हणून? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

अगा जे घडलेचि नोहे त्याची

संदीप डांगे
Sun, 09/04/2016 - 23:35 नवीन
अगा जे घडलेचि नोहे त्याची वार्ता काय पुसताहे? >> झालं तर मग.. विषय संपला. जैन धर्मावर आगपाखड कशासाठी? >> असे का वाटले बुवा तुम्हाला? माझे जैन धर्म किंवा जगातल्या कोणत्याच धर्माशी कसलेही वैर नाही. धार्मिक कारणांवरुन भावना दुखावून घेणार्‍या जमातीबद्दल मात्र वेगळे विचार आहे. मी एक हिंदू आहे पण नागासाधूंबद्दल कोणी भलतंसलतं बोलत असेल तर मला काही फरक पडत नाही. कारण त्याने नागासाधूंना काही फरक पडत ना हिंदूधर्माला काही फरक पडत. मला नागासाधूंबद्दल योग्य ती माहिती आहे आणि ती माझ्यापुरती पुरेशी आहे. इतर कोणी अजाणतेपणी-जाणूनबूजून नागासाधूंबद्दल खिल्ली उडवणारं बोलत असेल तर मला हिंदूधर्माचा अपमान झाल्याचे वाटत नाही. जो स्वतःला हिंदू समजतो त्या कोणालाही वाटू नये. माझा आक्षेप जैनमुनिंवर नव्हताच, तो होता त्यांना विधानसभेत बोलवणार्‍या महान लोकप्रतिनिधींबद्दल आणि ते पाडत असलेल्या चुकीच्या पायंड्याबद्दल. उद्या कोणी झाकिर नाईकला बोलावले तरी असाच आक्षेप असणार आहे. तसेच त्यांच्या दांभिक भूमिकेवर. एकिकडे स्त्रियांनी उचित कपडे घालावे असे आग्रह धरणारेच नग्न साधुंबद्दल मात्र उलट भूमिका घेतात. त्यावर हा आक्षेप होता. निओ१ साहेबांना तो समजला नाही, म्हणून मी चर्चेला तयार आहे असे सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

दिगंबर साध्वी पण असतात का ?

अप्पा जोगळेकर
Mon, 09/05/2016 - 10:24 नवीन
दिगंबर साध्वी पण असतात का ? की फक्त दिगंबर साधूच असतात.
  • Log in or register to post comments

दिगंबर जैनांच्या मते,

संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 10:33 नवीन
दिगंबर जैनांच्या मते, मोक्षाचा मार्ग हा फक्त पुरुषालाच साध्य आहे. त्यामुळे स्त्रियांना दिगंबर साध्वी होण्याची परवानगी नाही. ओशोंनी ह्या विषयावर बरीच बेधडक वक्तव्ये केली आहेत, त्यांच्यावर जैनधर्मिय कधी उखडलेले दिसले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अरेरे.

अप्पा जोगळेकर
Mon, 09/05/2016 - 10:38 नवीन
अरेरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अरेरे

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 09/05/2016 - 22:43 नवीन
फारच वाईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

दिगंबर जैनांच्या मते, मोक्ष

संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 10:41 नवीन
दिगंबर जैनांच्या मते, मोक्ष फक्त पुरुषालाच साध्य आहे. त्यामुळे स्त्रियांना दिगंबर साध्वी होण्याची परवानगी नाही. ओशोंनी ह्या विषयावर बरीच बेधडक वक्तव्ये केली आहेत, त्यांच्यावर जैनधर्मिय कधी उखडलेले दिसले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

संन्यास धारण केलेल्या

श्रीगुरुजी
Mon, 09/05/2016 - 12:21 नवीन
संन्यास धारण केलेल्या साधूंबद्दल काही वाचनात आले आहे. संन्यास धारण केल्यावर चैनीच्या वस्तू वापरायला त्यांना मनाई आहे. त्यामुळे केस कापण्यासाठी, दाढी करण्यासाठी ते कात्री, ब्लेड इ. चैनीच्या गोष्टी वापरत नाहीत. ते डोक्याचे व दाढीचे केस कोणतेही साधन न वापरता हाताने उपटून काढतात. माणसाच्या डोक्यावर अंदाजे १ लाख केस असतात म्हणे. इतके केस उपटून काढणे खूप वेदनादायक असणार. पण मग ते शिजविलेले अन्न ग्रहण करतात का? शिजविलेले अन्न ग्रहण करत नसतील तर पश्नच नाही. पण शिजविलेले अन्न ग्रहण करीत असतील तर अन्न शिजविण्यासाठी गॅस, स्टॉव्ह इ. चैनीची साधने वापरावी लागतील. कदाचित ही साधने न वापरता चुलीवर अन्न शिजविता येईल. पण त्यासाठी तोडलेली लाकडे लागतील व लाकडे तोडण्यासाठी कुर्‍हाड, करवत इ. साधने वापरावी लागतील. तसेच चूल पेटविण्यासाठी काड्यापेटी या साधनाचा वापर करावा लागला असता. तसेच अन्न शिजविण्यासाठी पातेली वगैरे कारखान्यात तयार झालेल्या वस्तू वापराव्या लागल्या असत्या. म्हणजे अशा चैनीच्या वस्तू संपूर्णपणे टाळता येणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments

सन्यासी भिक्षा मागून उदरभरण

संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 12:25 नवीन
सन्यासी भिक्षा मागून उदरभरण करतात. भिक्षेत मिळालेल्या वस्तू ह्या चैनीच्या समजल्या जात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

केशलोचनाचा(लुंचन) विधी

अभ्या..
Mon, 09/05/2016 - 12:33 नवीन
केशलोचनाचा(लुंचन) विधी त्रासदायक असतोच पण त्याचा समारंभ केला जातो. मी पाहिलेले नाही पण काहीतरी टेक्निक असते ते. बर्‍याच विधींचे लिलावही बोललेले असतात धनाढ्य लोकांनी. कोणी श्रमणदिक्षा घेत असेल तर ते त्याच्या पूर्ण घराला सन्मानाचे गौरवाचे मानले जाते. मी माझ्या डिझाइनच्या कामानिमित्त एका स्थानकवासी जैनांच्या स्थानकात गेलेलो होतो. साध्वी पूर्ण पांढर्‍या पोशाखात होत्या. वय अंदाजे २० ते २२ वाटत होते. अत्यंत अलौकिक सुंदर अन शांत चेहरा असलेल्या त्या साध्वीजी फक्त सूर्याची किरणे जेथे येतात तेवढ्याच उजेडात(दिवे वापरत नाहीत) डिझाइन पाहून अत्यंत मृदू भाषेत करेक्शन्स सांगत होत्या. सुरुवातीला मी तसे होत नसते, जमत नाही वगैरेची टेप वाजवल्यावर त्यांनी शांतपणे माझ्या सॉफ्टवेअरमधीलच कन्सेप्ट मला सांगितल्या. ते सुध्दा फर्ड्या इंग्रजीतून. बाहेर आल्यावर माझ्या जैन प्रेस वाल्या मित्राने (त्याने मला तेथे नेले होते) सांगितले की साध्वीजी बीई कम्प्युटर आहेत. हा प्रकार पाहून हात जोडायचेच बाकी राह्यले फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शरीराला वेदना देऊन,

श्रीगुरुजी
Mon, 09/05/2016 - 12:51 नवीन
शरीराला वेदना देऊन, दिगंबरावस्थेत राहून, भिक्षा मागून, दिवे/कात्री/पादत्राणे इ. सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू चैनीच्या समजून त्या न वापरणे इ. मुळे परमार्थात प्रगती होण्यास व मोक्ष मिळण्यास कशी मदत होते हे समजून घेण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आक्षेप मान्य पण ....

गामा पैलवान
Mon, 09/05/2016 - 12:48 नवीन
संदीप डांगे,
>> माझा आक्षेप जैनमुनिंवर नव्हताच, तो होता त्यांना विधानसभेत बोलवणार्‍या महान लोकप्रतिनिधींबद्दल
आक्षेप पूर्णपणे मान्य. खरंतर मुनीश्रींना असं बोलावणं धाडणं मलाही खटकलं. फक्त एक विनंती आहे. जो आक्षेप आहे तो कृपया स्वच्छ शब्दांत मांडावा. लेकी बोले सुने लागे असं नको. जैन धर्माला सत्याची लाज वाटते का वगैरे प्रश्न कृपया नकोत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी

संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 14:24 नवीन
तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी आहे. तिथे कोणताही धर्म-पंथ टाका, अर्थ बदलत नाही. धार्मिक कारणाने दुखावले जाणे हा एक वेगळाच प्रकार आहे. ती 'घेट्टो मेन्टॅलिटी' आहे. कोणताही धर्म हा मनुष्यास मुक्त करणारा प्रकार आहे. बांधले जाणे हे आचरण 'धर्म' ह्या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध आहे. सगळ्या धर्मसंस्थापकांचे संदेश बघितले तर त्यांनी मुक्त व्हायला सांगितले आहे. लोक अगदी उलट करतात. आपल्या विचारांशी साम्य ठेवणार्‍या लोकांचा संघ हा धर्माचरणासाठी उपयुक्त आहे. पण धर्माशी असलेल्या बांधिलकीपेक्षा अशा संघाशी होणारी मोठी बांधिलकी ही समस्येचे मूळ आहे. कितीही म्हटले तरी मनुष्याचा कळप करुन सुरक्षित राहण्याचा अंगभूत नैसर्गिक गुण सुटत नाही आणि महात्म्यांनी दिलेल्या संदेशाच्या अगदी उलट आचरण सुरु होते. सर्व साधु, संत, महंत, योगी, सन्यासी, फकिर, अवधुत हे खरंतर मुक्त असतात. त्यांच्यावर विशिष्ट गटाने मालकी सांगणे हे त्यांच्या शिकवणुकीच्या उलट वागणे ठरते. ते मुक्त असल्याने, मान-अपमान इत्यादींच्या वर असल्याने अपमान हा त्यांचा होतच नाही. मग कोणाचा होतो? त्यांच्यावर मालकीहक्क सांगणार्‍या मनोवृत्तीचा. मालकीहक्क सोडा, अपमान झालेला वाटणार नाही. जैनांना मुनिंचे नग्न असणे खुपते का? नाही. मग इतर कुणाच्याही कोणत्याही प्रतिक्रियेने त्रास का होतो हा मुद्दा आहे. धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात जैनधर्मियांसारख्या मोजक्या शांतिप्रिय समाजानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे. अपमान करणार्‍याला 'इग्नोर मारणे' हा सर्वात मोठा उपाय आहे. अन्यथा मल्टिप्लिकेशन होत जातं. समजूतींमधे विसंगती आली की दुखावले जाण्याचे चान्सेस वाढतात. तुम्ही मला वर एका प्रतिसादात विचारले की माझ्या जन्माचं रहस्य चारचौघात उघड करुन सांगितलं तर कसं वाटेल? त्यावर मी चिडलो नाही. कारण मला सत्याची लाज वाटत नाही. कारण असे केल्याने माझा किंवा माझ्या जन्मदात्यांचा नव्हे तर जाहिर उघड करणार्‍याचा अपमान होतो. संभोग करणे पाप आहे असे मी समजत असेल तर मी नक्कीच दु:खी होईल. "संभोग व त्यातून अपत्यप्राप्ती हे काही पाप आहे, चुकीचे आहे, वाईट आहे, गुन्हा आहे" असे कुठेतरी तुम्हाला वाटत असेल म्हणून तुम्हीही हेच उदाहरण दिले असावे. कोणत्याही धर्मातल्या नग्न साधुंचे वर्तन मला अयोग्य वाटत नाही. ते सत्य आहे तसेच स्विकारले पाहिजे, ते कुणी नाकारत असेल तर त्याला लाज वाटते का हा प्रश्न येईलच. माझे मूळ विधान हे डबलस्टॅण्डर्ड ठेवणार्‍या लोकनिर्वाचित नेत्यांसाठी होते. त्यात जैन समाजाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नक्कीच नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

डांगे बुआ, हा प्रतिसाद आपल्या

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 09/05/2016 - 21:38 नवीन
डांगे बुआ, हा प्रतिसाद आपल्या हातून कोणीतरी लिहून घेतला आहे! उत्तम पटलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

+१

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 09/05/2016 - 22:51 नवीन
सहमत. खासकरून, समजूतींमधे विसंगती आली की दुखावले जाण्याचे चान्सेस वाढतात. आजकाल धार्मिक अस्मिता प्रचंड टोकदार होत चालल्यात. त्यामुळे कोण केव्हा कुठ कसा दुखावेल काहीच सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एक नंबर मस्त प्रतिसाद

बॅटमॅन
Tue, 09/06/2016 - 08:12 नवीन
एक नंबर मस्त प्रतिसाद डांगेसरकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

डांगेबुवा

मास्टरमाईन्ड
Tue, 09/06/2016 - 11:58 नवीन
ती 'घेट्टो मेन्टॅलिटी' आहे.
+११११
धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे.
+११११
कारण असे केल्याने माझा किंवा माझ्या जन्मदात्यांचा नव्हे तर जाहिर उघड करणार्‍याचा अपमान होतो.
पटलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

+१११११११११११

भम्पक
Sun, 09/11/2016 - 19:55 नवीन
एकदमच मुद्देसूद आणि समर्पक प्रतिसाद ......जिओ संदिपशेठ ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

दुखावले जाणे वगैरे

चित्रगुप्त
Mon, 09/05/2016 - 16:36 नवीन
संदीप डांगे यांचा दुखावले जाणे वगैरेबद्दलचा समंजस प्रतिसाद या सर्व लोच्यावर नेमके बोट ठेवणारा आहे. त्याचेशी १००% सहमत.
  • Log in or register to post comments

चुकीचा अ‍ॅप्रोच

कपिलमुनी
Mon, 09/05/2016 - 17:52 नवीन
लेखकाने घेतलेला अ‍ॅप्रोच चुकीचा वाटतो आहे , त्या ऐवजी त्यांनी जैन धर्माच्या स्थापने पासून आतापर्यंतची स्थित्यंतरे , प्रथा , परंपरा अशी लेखमाला लिहिली असती तर या समाजाबद्दल अधिक माहिती मिळाली असती ( काहीतरी कंस्ट्रक्टीव लिहायला हवे होते )
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो,

संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 17:58 नवीन
हेच म्हणतो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सहमत. हे ऊठसूट काही झालं की

अभिजीत अवलिया
Mon, 09/05/2016 - 18:01 नवीन
सहमत. हे ऊठसूट काही झालं की लोक 'आमच्या भावना दुखावल्या' अशी जी ओरड मारतात त्याचा अक्षरश: वैताग आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अशी जी ओरड मारतात

मोदक
Mon, 09/05/2016 - 18:22 नवीन
अशी जी ओरड मारतात असुद्द भाश्येमुले माज्या भाव्ना दुखाव्ल्या अहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

सगळ्या दुखावलेल्या

नाखु
Tue, 09/06/2016 - 09:30 नवीन
(भावनाप्रधान) लोकांसाठी मिपा एक फिरता "दवाखाना" सुरू करणार आहेत तो पर्यंत कळ काढा (आम्ची सोडून कुणाचीही) अखिल मिपा साधक-बाधक चर्चा महाम्डळाकडून गणपती बाप्पा चरणी विनवणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हजार वेळा सहमत..

शलभ
Mon, 09/05/2016 - 18:49 नवीन
हजार वेळा सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मिपावर लेख कसा लिहावा

अकिलिज
Mon, 09/05/2016 - 21:06 नवीन
एखादा लेख कसा लिहावा, सुरुवात कशी करावी आणि कुठून वाचकाला वाहवत न्यावे आणि आपल्याला नक्की काय सांगायचे आहे ते दुसर्‍याच्या गळी कसे उतरावे यावर लेख लिहायला पाहीजे. मला कळतंय की जैन धर्माच्या काही चार गोष्टी तुम्हाला सांगयच्या आहेत. पण उगीचच चार प्रश्न विचारून वाचकाला जिज्ञासा उत्पन्न होईल ही जरा अती अपेक्षा झाली.
  • Log in or register to post comments

डांगे साहेब

झेन
Mon, 09/05/2016 - 22:17 नवीन
"अपमान करणार्‍याला 'इग्नोर मारणे' हा सर्वात मोठा उपाय आहे. अन्यथा मल्टिप्लिकेशन होत जातं" हे थेराँटीकली ओके वाटतं पण प्रत्यक्षात... ? असो नव्याने प्रयत्न करून बघेन म्हणतो.
  • Log in or register to post comments

उपदेश करणे सोप्प, आचरण

संदीप डांगे
Tue, 09/06/2016 - 00:28 नवीन
उपदेश करणे सोप्प, आचरण महाकठिण. पण आपल्या अपमानाचा-रागाचा-दुखावल्या जाण्याचा ट्रिगर कोणा दुसर्‍याच्या हातात असणे हे जास्त भयावह आहे. प्रयत्न करुन पाहण्याची तयारी दाखवणे ही सुद्धा एक उत्तम सुरुवात आहे. आपण साधी माणसं आहोत, रागावणे-दुखावल्या जाणे साहजिक आहे, त्यावर उपाय केला गेला पाहिजे, फक्त तो वर कपिलमुनि यांनी म्हटल्याप्रमाणे कन्स्ट्रक्टिव असावा, डिस्ट्रक्टिव नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन

काही प्रश्न

गामा पैलवान
Tue, 09/06/2016 - 03:37 नवीन
संदीप डांगे, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. काही प्रश्न उभे राहिले. १. >> तो प्रश्न दुखावलेल्यांसाठी आहे. तिथे कोणताही धर्म-पंथ टाका, अर्थ बदलत नाही. धार्मिक कारणाने दुखावले जाणे >> हा एक वेगळाच प्रकार आहे. ती 'घेट्टो मेन्टॅलिटी' आहे. खालच्या चित्रात विधानसभेचा काहीही अपमान झालेला दिसंत नाही. उलट मुनीश्रींच्या भाषणाची अॅब्सर्ड आणि नॉनसेन्स म्हणून हेटाळणी करण्यात आली आहे. Image removed. तरीपण तुम्ही विधानसभेचा आणि घटनेचा अपमान झाला म्हणून ओरडा करता आहात. तुमच्यांत आणि घेट्टोवाल्यांत फरक तो काय उरला मग? २. >> कोणताही धर्म हा मनुष्यास मुक्त करणारा प्रकार आहे. बांधले जाणे हे आचरण 'धर्म' ह्या संकल्पनेच्या >> अगदी विरुद्ध आहे. कोण्या बावळटानं हे सांगितलं तुम्हाला? उलट धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम आहे. कर्तव्ये कशी पार पाडावीत याची चिकित्सा म्हणजे धर्म. जिवंतपणी देह धारण केलेला असतांना जरी सायुज्य मुक्ती मिळाली तरी देहबंधन असतंच. ३. >> सगळ्या धर्मसंस्थापकांचे संदेश बघितले तर त्यांनी मुक्त व्हायला सांगितले आहे. जरा उदाहरण देणार का? मुक्ती वा मोक्ष देणं ईश्वराचे हाती आहे. मुक्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे मुक्त होणे नव्हे. ४. >> कितीही म्हटले तरी मनुष्याचा कळप करुन सुरक्षित राहण्याचा अंगभूत नैसर्गिक गुण सुटत नाही आणि >> महात्म्यांनी दिलेल्या संदेशाच्या अगदी उलट आचरण सुरु होते. प्रस्तुत प्रसंगात असं काही दिसून येत नाही. ५. >> सर्व साधु, संत, महंत, योगी, सन्यासी, फकिर, अवधुत हे खरंतर मुक्त असतात. >> त्यांच्यावर विशिष्ट गटाने मालकी सांगणे हे त्यांच्या शिकवणुकीच्या उलट वागणे ठरते. दोन वाक्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. वाट्टेल ते ठोकून देताय होय? शिवाय प्रस्तुत प्रसंगात असं काहीही झालेलं नाहीये ते वेगळंच! ६. >> मालकीहक्क सोडा, अपमान झालेला वाटणार नाही. उपरिनिर्दिष्ट चित्रात दाखवलेले absurd nonsense हे शब्द मुनीश्रींचा अपमान सोडून दुसरं काय दर्शवतात? ७. >> मग इतर कुणाच्याही कोणत्याही प्रतिक्रियेने त्रास का होतो हा मुद्दा आहे. भारतीय राज्यघटनेचा अपमान झाला म्हणून तुम्ही नाय का थयथयाट केलात? कोणी केला होता घटनेचा अपमान? मुनीश्रींनी? की खट्टरांनी? आणि त्यामुळे तुम्हाला कसाकाय त्रास होत होता? स्वत:च्या पायाखाली काय जळतंय ते कधी दिसणार तुम्हाला ! ८. >> धार्मिक भावना दुखावल्या जाणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात जैनधर्मियांसारख्या मोजक्या >> शांतिप्रिय समाजानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे. घटनेचा अपमान झाल्याची हाकाटी करणे हा एक घातक ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यात संदीप डांग्यांसारख्या मोजक्या विवेकप्रिय मनुष्यानेही उतरावे हे आश्चर्यजनक आहे. ९. >> अपमान करणार्‍याला 'इग्नोर मारणे' हा सर्वात मोठा उपाय आहे. माझ्या मते आजिबात नाही. अर्थात तुमचं मत बाळगण्याची तुम्हाला पूर्ण मुभा आहे. १०. >> तुम्ही मला वर एका प्रतिसादात विचारले की माझ्या जन्माचं रहस्य चारचौघात उघड करुन सांगितलं तर >> कसं वाटेल? त्यावर मी चिडलो नाही. कारण मला सत्याची लाज वाटत नाही. नेमकी हीच परिस्थिती आम्हा हिंदुत्ववाद्यांना बदलायची आहे. विनाकारण आईबाप काढले की चिडायचं असतं. आणि साधूंची नग्नता विनाकारण काढली की देखील चिडायचं असतं. अर्थात, तुम्हाला तुमचा थंडपणा बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहे. ११. >> "संभोग व त्यातून अपत्यप्राप्ती हे काही पाप आहे, चुकीचे आहे, वाईट आहे, गुन्हा आहे" असे कुठेतरी तुम्हाला >> वाटत असेल म्हणून तुम्हीही हेच उदाहरण दिले असावे. छे छे ! काहीतरीच काय !! अहो, तुमच्यासारखा दिव्य जीव पैदा होण्यामागची कथा किती विलक्षण असेल, हाच विचार माझ्या मनी होता. १२. >> माझे मूळ विधान हे डबलस्टॅण्डर्ड ठेवणार्‍या लोकनिर्वाचित नेत्यांसाठी होते. त्यात जैन समाजाचा अपमान >> करण्याचा कोणताही हेतू नक्कीच नव्हता. हे विधानाच्या ठिकाणीच स्पष्ट व्हायला हवं. अन्यथा तुमचे प्रतिसाद आणि स्वगत एकमेकांत गुंतत गेलेले वाटू शकतात. मग हे विधान याच्यासाठी अन ते विधान त्याच्यासाठी अशी मांडणी ( की बतावणी? ) करंत बसावं लागतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

गा मा साहेब, तुम्हाला फ्रेंच

संदीप डांगे
Tue, 09/06/2016 - 09:15 नवीन
गा मा साहेब, तुम्हाला फ्रेंच कार्टुनिस्ट ची हत्या आणि काही महिन्यांपूर्वी महंमद पैगंबरचा अपमान केल्याबद्दल एका हिंदू नेत्याची फाशीची मागणी करणारा लाखोंचा समुदाय ह्या दोन्ही घटना मान्य व उचित असल्याचे तुमच्या प्रतिसादावरून लक्षात येते, बाकी विशाल दादलानी काय बोलला त्याचे बिल माझ्यावर फाडू नका, माझे विचार मांडून झाले, ह्यापेक्षा अधिक चर्चेत फार काही तथ्य नाही, तुमचे विचार तुम्ही बाळगा, माझे माझ्यापाशी, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तेव्हा कुठे गेला होता ....

गामा पैलवान
Tue, 09/06/2016 - 17:34 नवीन
संदीप डांगे, १. >> तुम्हाला फ्रेंच कार्टुनिस्ट ची हत्या आणि काही महिन्यांपूर्वी महंमद पैगंबरचा अपमान केल्याबद्दल एका हिंदू >> नेत्याची फाशीची मागणी करणारा लाखोंचा समुदाय ह्या दोन्ही घटना मान्य व उचित असल्याचे तुमच्या >> प्रतिसादावरून लक्षात येते, विषयांतर. एवीतेवी तुम्ही विषयांतराची गाय मारलीच आहे, तर मी आता वासरू मारून घेतो. तुम्ही भारतीय राज्यघटनेचा अपमान झाल्याचे ढोल बडवता आहात. ठीके. बडवा खुशाल. पण एके ठिकाणी तुम्ही भारतीय राज्यघटनेत नसलेली तरतूद घुसडली होतीत. कलमं १६ (४) आणि २९ (२) आठवताहेत का? तो राज्यघटनेचा अवमान म्हणून धरायचा का हो? तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? २. >> बाकी विशाल दादलानी काय बोलला त्याचे बिल माझ्यावर फाडू नका, जैन धर्माला सत्याची लाज वाटते का वगैरे अक्कल युष्मादिक कोणास शिकवीत होते? ३. >> माझे विचार मांडून झाले, ह्यापेक्षा अधिक चर्चेत फार काही तथ्य नाही, तुमचे विचार तुम्ही बाळगा, >> माझे माझ्यापाशी, बरोबर आहे. तुमचे विचार तुम्हाला लागू केल्यावर तुमचा चर्चेतला रस संपुष्टात आला. चालायचंच! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

वर काही प्रतिसादात उल्लेख

गणामास्तर
Tue, 09/06/2016 - 11:07 नवीन
वर काही प्रतिसादात उल्लेख आल्याप्रमाणे हिंदू-मारवाडी कधी बघण्यात आलेले नाहीत. माझे काही मित्र आहेत ते धर्म जैन आणि जात मारवाडी लावतात. ते स्वतःला हिंदू म्हणवत नाहीत. उद्योग धंद्यात बराचं पुढारलेला समाज आहे हा. तसेचं कोल्हापूर जिल्ह्या च्या आसपासचे बरेचं जैन लोकं धर्म हिंदू आणि जात जैन लावतात. ते दिगंबर जैन म्हणवतात स्वतःला. पाटील ,चौगुले, खोत अशी आडनावं आहेत त्यांची. लहानपणापासून जैन-मारवाडी (स्थानकवासी) बहुल भागात राहिल्यामुळे दीक्षा समारंभ, भिक्षा मागण्याच्या पद्धती हे प्रकार जवळून बघितले आहेत. भरीस भर म्हणून शालेय शिक्षण सुद्धा जैन विद्या प्रसारक मंडळाच्या मराठी माध्यम शाळेतून झाल्यामुळे जैन-मारवाडी लोकांशी संपर्क पहिल्यापासून आला आणि त्यांच्या बऱ्याचं प्रथा अगदी जवळून पाहायला मिळाल्या.
  • Log in or register to post comments

"छे छे ! काहीतरीच काय !! अहो,

सचु कुळकर्णी
Tue, 09/06/2016 - 12:51 नवीन
"छे छे ! काहीतरीच काय !! अहो, तुमच्यासारखा दिव्य जीव पैदा होण्यामागची कथा किती विलक्षण असेल, हाच विचार माझ्या मनी होता" it is irrelevant and not required at all.
  • Log in or register to post comments

नका लोड घेऊ! त्यांच्यावर

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 09/06/2016 - 12:58 नवीन
नका लोड घेऊ! त्यांच्यावर काहीही आक्षेप घेतले तरी ते त्यांना मंजूर असतात कारण ते हिंदुहिताचे असतात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी

अगदी बरोबर बोललात

गामा पैलवान
Tue, 09/06/2016 - 16:57 नवीन
सचु कुळकर्णी, अगदी बरोबर बोललात पहा. वाद उद्भवल्यावर काही लोकांनी (मिपाकर नव्हे) जैन साधूंचा 'नागडे' म्हणून उपहास केला आहे. जो अनावश्यक आहे. नेमकी हीच खंत निओ१ (=धागालेखक) यांनी व्यक्त केली आहे. यावर आपले डांगेबुवा बोधामृत पाजताहेत की जैन धर्माला सत्याची लाज वाटते का! डांगेबुवांचं तर्कट लावू पाहता, जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडायला काहीच हरकत नसावी, नाहीका? जो न्याय मला लावाल तोच संदीप डांग्यांनाही लावावा एव्हढीच विनंती. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी

जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत

संदीप डांगे
Tue, 09/06/2016 - 17:35 नवीन
जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडायला काहीच हरकत नसावी, नाहीका? >> अहो मांडा की मग, मी नाही म्हटलंय का? सत्याची लाज बाळगू नयेच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मुनी

कपिलमुनी
Tue, 09/06/2016 - 13:01 नवीन
सदर मुनींचा आणि आमच्या आयडीचा काहीही संबंध नाही. आमची कोठेही शाखा नाही : कपिलमुनी
  • Log in or register to post comments

Aa. Na. GA. Pai. Every human

सचु कुळकर्णी
Tue, 09/06/2016 - 13:34 नवीन
Aa. Na. GA. Pai. Every human being come to this world thru the same natural process. Nobody exist here because of his or her parents consume "payas"
  • Log in or register to post comments

जैनांबद्दल अजून एक वाचलेले

श्रीगुरुजी
Tue, 09/06/2016 - 14:11 नवीन
जैनांबद्दल अजून एक वाचलेले आढळले. हे फक्त जैन साधूंसाठी आहे का सर्व जैनांसाठी आहे हे माहित नाही. जैन तत्वज्ञानानुसार एखादा पुरूष एखाद्या स्थानी बसला असेल तर त्याचे गुणदोष त्या जागेला चिकटतात व तो तिथून उठल्यानंतर सुद्धा पुढील १४४ मिनिटे ते गुणदोष त्या स्थानावर असतात. त्यामुळे एखादा पुरूष एखाद्या स्थानावर काही काळ बसून तिथून उठला तर पुढील १४४ मिनिटे त्या स्थानावर बसू नये. अन्यथा त्याचे गुणदोष आपल्यात यायची शक्यता असते. पुरूषाच्या ऐवजी एखादी स्त्री एखाद्या स्थानावर बसली असेल तर तिचे गुणदोष त्या स्थानावर एक त्रूतीयांश काळ म्हणजेच फक्त ४८ मिनिटे त्या स्थानावर असतात. त्यामुळे तिथून स्त्री उठल्यावर ४८ मिनिटे त्या ठिकाणी बसू नये. पुण्यात अनेक ठिकाणी आदिनाथ, पार्श्वनाथ, सुपार्श्वनाथ, नेमीनाथ, नवकार अशी नावे असलेल्या सोसायट्या आहेत. या सोसायट्यात फक्त जैन कुटुंबेच राहतात. जैन नसलेल्यांना या सोसायटीतील घरे/सदनिका विकल्या जात नाहीत किंवा भाड्यानेही दिल्या जात नाहीत. जैनांनी अनेक ठिकाणी स्वतःचे असे घेटो तयार केले आहेत. असे करणे चांगले की वाईट हा एक वेगळा मुद्दा आहे. दिगंबर राहिल्याने मोक्ष मिळण्यास व पारमार्थिक प्रगती होण्यास कशी मदत होते या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही. धागाकर्ता बहुतेक बेपत्ता झाले आहेत. धागाकर्त्यापेक्षा इतरांनीच जैनांविषयी जास्त माहिती दिली आहे.
  • Log in or register to post comments

कारवाई होत नाही का ह्या

रॉजरमूर
Sun, 10/16/2016 - 19:50 नवीन
कारवाई होत नाही का ह्या लोकांवर ?
पुण्यात अनेक ठिकाणी आदिनाथ, पार्श्वनाथ, सुपार्श्वनाथ, नेमीनाथ, नवकार अशी नावे असलेल्या सोसायट्या आहेत. या सोसायट्यात फक्त जैन कुटुंबेच राहतात. जैन नसलेल्यांना या सोसायटीतील घरे/सदनिका विकल्या जात नाहीत किंवा भाड्यानेही दिल्या जात नाहीत.
इथे मुंबईत पश्चिम उपनगरात तर मुस्लिम लोकांना घर विकत अथवा भाड्याने देता येणार नाही असा ठराव सोसायटीने पास केला तर सोसायटीच्या सगळ्या लोकांना तुरुंगात टाकलं . ही ती बातमी काँग्रेस तर काँग्रेस पण भाजप सुद्धा अल्प संख्यांकांचे तुष्टीकरण करतंय असं नाही वाटत ? आजाद मैदानात जेव्हा या लोकांकडून कुत्र्या सारखे बडवले गेले तेव्हा कुठे गेली होती मर्दुमकी ? इथे मात्र शांतताप्रिय नागरिकांना अटक करायला निर्लज्जासारखे धावून गेले . या घटनेतही आग लावायला शेटजींचे वृत्तपत्र पुढे होते. स्वतःच्या बुडाखालचा अंधार दिसला नाही कधी .......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

इथे मुंबईत पश्चिम उपनगरात तर

श्रीगुरुजी
Sun, 10/16/2016 - 20:02 नवीन
इथे मुंबईत पश्चिम उपनगरात तर मुस्लिम लोकांना घर विकत अथवा भाड्याने देता येणार नाही असा ठराव सोसायटीने पास केला तर सोसायटीच्या सगळ्या लोकांना तुरुंगात टाकलं .
सोसायटीने मूर्खासारखे ऑन पेपर ठराव केला ज्याचा तुरूंगात टाकण्यासाठी उपयोग झाला. जैनांच्या सोसायट्यामध्ये इतरांना घरे द्यायची असे तोंडी अंडरस्टँडिंग असते. कागदोपत्री कोठेही अशी बंदी घातलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर

english sathi maafi asavi

सतीश कुडतरकर
Tue, 09/06/2016 - 15:23 नवीन
Borivli purvela maajhi ek office maitrin rahate. Tichya building madhye kahi Jain Saadhu/ Saadhvi rahayala aahet. Te jain sadhu Kagdavar shuachas basatat aani to kagad DUSTBIN madhyech taktat. Society ne yavar akshep ghetlyavar jorache bhandan kele. Aapla mal dusryas uchalnyas bhaag paadne hi suddha ahinsa naahi ka? Tyanantar tya jain sadhu ni veglich shakkal kaahdli. Kagdavarach shauchala bastat aani to kagad building chya baher neun taktat.
  • Log in or register to post comments

रोचक आहे! जैन। मित्र

संदीप डांगे
Tue, 09/06/2016 - 15:26 नवीन
रोचक आहे! जैन। मित्र ह्याबद्दल अधिक माहिती देतील अशी आशा बाळगूया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

नक्की?

रिम झिम
Tue, 09/06/2016 - 16:32 नवीन
जैन साधू बिल्डींग मध्ये राहतात? माझ्या माहितीनुसार त्यांची मंदिरात राहण्याची सोय असते. नविन प्रथा पडली असल्यास माहिती नाही. पण असो..... उद्या जैन साधू गाडीतून फिरतात पण टोल भरत नाहीत असे ऐकल्यास आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

रिम झिम

सतीश कुडतरकर
Tue, 09/06/2016 - 16:58 नवीन
अहो, खरंच सांगतोय! बोरिवली, कार्टर रोड वरील सोसायटीतील घटना आहे. एका भक्तानेच आपल्या घरात त्या साधूना राहण्याची व्यवस्था केली आहे. एका जैन मित्राला विचारलं तर तो म्हणतो आधुनिक गोष्टी वापरण्यास अर्धेअधिक लोक काकू करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिम झिम

अ‍ॅक्चुअली हाच प्रश्न मलाही

संदीप डांगे
Tue, 09/06/2016 - 17:02 नवीन
अ‍ॅक्चुअली हाच प्रश्न मलाही पडला होता, कारण जैन साधु एका ठिकाणी फार काळ वास्तव्य करत नाहीत, सतत फिरतीवर असतात, मंदिरात राहतात, फक्त पावसाळ्याचे चार महिने काय तर एका ठिकाणी वास्तव्य असतं. त्यामुळे हे काही नवीनच ऐकले म्हणून कन्फर्म करावे असे बोललो. तसेच हे कागद वापरण्याची प्रथाही प्रथमच ऐकली. सतीशजी खोटं बोलत आहेत असे म्हणत नाही पण काहीतरी गोंधळ झाला असावा अशी शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिम झिम

dange saheb

सतीश कुडतरकर
Tue, 09/06/2016 - 17:23 नवीन
फक्त पावसाळ्याचे चार महिने काय तर एका ठिकाणी वास्तव्य असतं.>>>>>> gelya mahinyatlich ghatnaa.
  • Log in or register to post comments

ओके, पण ते वास्तव्य मंदिरात

संदीप डांगे
Tue, 09/06/2016 - 17:38 नवीन
ओके, पण ते वास्तव्य मंदिरात असतं नॉर्मली. हे काही नवीनच ऐकले. असूही शकेल, बाहेर प्रचलित असलेली माहिती आणि खास आतलं सत्य काहीवेळा वेगवेगळं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा