✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लोकशाहीचा अभंग

ग — गंगाधर मुटे, Wed, 08/14/2013 - 13:57

लोकशाहीचा अभंग

आपुलिया हिता । असे जो जागता ।
फक्त त्याची माता । लोकशाही ॥

कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥

पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥

संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥

मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥

वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥

सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
रस्ता भटकते । लोकशाही ॥

चार पिढ्या सत्ता । एका कुटुंबाला ॥
म्हणू कशी हिला । लोकशाही? ॥

जनता 'अभय' । निर्भयाने व्हावी ।
ताळ्यावर यावी । लोकशाही ॥

                            - गंगाधर मुटे
------------------------------------------------
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!
------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
15508 वाचन

💬 प्रतिसाद (65)

लोकशाहीचा अभंग खुप आवडला

Bhagwanta Wayal
Wed, 08/14/2013 - 20:19 नवीन
लोकशाहीचा अभंग खुप आवडला
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Wed, 08/14/2013 - 23:48 नवीन
लोकशाहीचा विजय असो!
  • Log in or register to post comments

मुटे काका...नेहमीप्रमाणे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/15/2013 - 00:04 नवीन
मुटे काका...नेहमीप्रमाणे झक्कास..!
  • Log in or register to post comments

सुन्दर ! ! !

निरन्जन वहालेकर
Fri, 08/16/2013 - 16:46 नवीन
अतिशय सार्थ. लोकशाहीचा अभंग आवडला
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/16/2013 - 17:36 नवीन
लोकशाहीचा अभंग आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मुटे, साहेब अप्रतिम आहे अभंग

अनिल तापकीर
Fri, 08/16/2013 - 18:06 नवीन
मुटे, साहेब अप्रतिम आहे अभंग
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Mon, 09/30/2013 - 10:59 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

धन्यवाद

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 13:29 नवीन
सर्वांना मनपूर्वक धन्यवाद
  • Log in or register to post comments

तत्परतेबद्दल

नाखु
Tue, 07/19/2016 - 15:54 नवीन
धन्य्वाद धागा २०१३ चा आपण प्रतिसाद प्रपंच पाहिला १९.७.२०१६ ला !!! पुन्हा धन्य्वाद
  • Log in or register to post comments

धन्यवाद

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 16:26 नवीन
२०१३ मधील मिसळपाववरिल आय डी आणि २०१६ चे आय डी यात काय साम्य आणि तफावत आहे हे शोधायला आलो होतो. मला उत्तर मिळाले. आकाशातील ग्रहतार्‍यांचा मनुष्याच्या स्वभावावर प्रभाव पडतो असे म्हणतात. केंद्रातील सत्ताबदलाचाही तसाच काही प्रभाव असतो का?, हे आता शोधायचं बाकी आहे.
  • Log in or register to post comments

मुटे सर...

चांदणे संदीप
Tue, 07/19/2016 - 17:07 नवीन
हे बघा....
पुढारी-पगारी । लाडके जावई । माफियांची ताई । लोकशाही ॥
लोकशाहीला, पगारी लोकांची म्हणजेच आमच्यासारख्याची "ताई" करून टाकलेत, वर पुढारी आणि माफियांच्या शेजारी बसवलेत!! मी पगारी आहे म्हणून पगारदारांच्याबद्दलच बोलणार! सांगा, यात सरसकटीकरण नाही का? तुमची काव्याची जण उत्तम आहे, तुमचे काव्य उत्तम आहे. काव्याला समाजाच्या भल्याकरिता वापरणे हे जे तुम्ही करता ते दुर्मिळ आहे यात शंका नाहीच! मला तुमचे काव्य आवडतेही. एकमार्गी, एकाला चालो रे प्रकारचं आहे त्याचंही विशेष कौतुक पण इथे तुम्ही बर्याचदा(बघा; मी सर्वच वगैरे म्हणत नाही आहे) शेतकरेतर जणांना बोल लावता! का बरे? हे मी वैयक्तिक त्राग्यातूनही लिहीत नाही असा समजा कारण इथे मिपावर वारंवार आल्यावर तुमचे काव्य एका बाजूला आणि काही नेहमीचे प्रतिसादकर्ते दुसर्या बाजूला असेच चित्र दिसत राहते. बरं तटस्थही राहून पाहिले. आता तुम्हाला सांगूनही पाहिले तर तुम्ही मला, माझे गाव "चंद्रावर" वगैरे आहे का? असा टोमणासदृश प्रश्न विचारता! किंवा तुमची एक कविता मला दाखवा ज्यात तुम्ही शेतकरी सोडून आमच्यासारख्या सर्वसामान्यांची बाजू मांडलीत! इथे मिपावरच इतरांनी लिहिलेल्या कविता सापडू शकतात. असो, आता थांबतो. तुम्ही खूप सिनियर आहात, उणेअधिक बोलून गेलो असें तर माफ करा! __/\__ Sandy
  • Log in or register to post comments

कवितेचा अर्थ

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 17:50 नवीन
एकदा कविता लिहून लोकार्पण केली की कविता लोकांची होते. तिचा काव्यात्मक आनंद कसा घ्यायचा याचाही सर्वस्वी अधिकार रसिकांचा असतो. कवितेचा अर्थ कसा लावायचा, तीची काव्यात्मकता कशी तपासायची हाही अधिकार वाचकांचा असतो. वाचक आणि रसिक आपापल्या पात्रतेप्रमाणे, योग्यतेप्रमाने, कुवतीप्रमाणे अर्थ काढतात. तोही वाचकांचा अधिकार आहे. कवीला जे म्हणायचे तो ते व्यकत करतो. प्रत्येक कवीची अभिव्यक्ती प्रत्येक वाचकाच्या पचनी पडेल किंवा झेपेल असे कधीही नसते. कवीतेचा अर्थ सांगत बसायचे असेल तर कवीने कविता कशाला लिहावी? लेखच का लिहू नये? शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा असा की, ज्याला पद्यातून कळत नसेल त्याला गद्यातून कळेल याचीही शास्वती नाही. कारण विषय गद्य किंवा पद्याचा नसून विचारसरणीचा असतो. कविला त्याचे विचार व्यक्त करायचे असते, वाचकांना हवे ते लिहिणारा बाजारू कवी असू शकतो, अभिजात नव्हे. जगद्गुरू तुकोबारायांनी प्राण गमावला पण विचारांशी तडजोड केली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कवीतेचा अर्थ सांगत बसायचे

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 20:55 नवीन
कवीतेचा अर्थ सांगत बसायचे असेल तर कवीने कविता कशाला लिहावी रोमलीन सोमलीन इकडची क्वाक क्वाक रोमलिन सोमलीन तिकड्ची क्वाक क्वाक बदकाच्या सांगण्याची इतकीच ही चोच कविता संपली कवितेचं नाव --चल सोडा प्यायला जाऊया
  • Log in or register to post comments

ज्यांना कवितेतला क सुद्धा

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 21:10 नवीन
ज्यांना कवितेतला क सुद्धा समजत नाही त्यांनी या क्षेत्रात लुडबूड का करावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बदकाच्या चोचीवरुन मला मी

टवाळ कार्टा
Tue, 07/19/2016 - 21:18 नवीन
बदकाच्या चोचीवरुन मला मी नुकतीच केलेली कवीता आठवली बदका बदका नाच रे घरात पिल्ले पाच रे चपट तुझी चोच रे राराला जाउन टोच रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कविता खरंच चांगली आहे. थोडी

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 21:22 नवीन
कविता खरंच चांगली आहे. थोडी सुधारणा केल्यास छान बालगीत अथवा बडबडगीत होऊ शक्ते. तुम्ही या धाग्यावरच्या वातावरणातला प्रतिसाद आहे म्हणून गंभीरतेने घेणार नाहीत पण हा विषय तुम्ही चांगल्या तर्‍हेने हाताळून न्याय देऊ शकता असे वाटते. (मी गंमत किंवा चेष्टा करत नाहीये.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अप्रिशिएट केल्याबद्दल धन्यवाद

टवाळ कार्टा
Tue, 07/19/2016 - 21:24 नवीन
अप्रिशिएट केल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मी(पण) गंमत किंवा चेष्टा करत

टवाळ कार्टा
Tue, 07/19/2016 - 21:24 नवीन
मी(पण) गंमत किंवा चेष्टा करत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

एकदा ज्ञान कोशकार श्री व्यं

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 21:28 नवीन
एकदा ज्ञान कोशकार श्री व्यं केतकर सकाळी सकाळीनाश्ता करत असताना त्यांच्या कडे एक कवी आला आणि म्हणाला मी तुम्हाला माझ्या कविता वाचून दाखवतो ते हसत हो म्हणाले. काही कविता वाचल्यावर कवीने विचारले कशा वाटल्या केतकर म्हणाले 'अत्यंत भिकार " यावर कवी रागाने म्हणाला तुम्ही फक्त ज्ञानकोश लिहावेत तुम्हाला कवितेतील काय कळणार डॉ केतकर हसत म्हणाले, "असे म्हणू नका" आणि तेथे असलेले एक उकडलेले अंडे हातात घेऊन ते म्हणाले "असं पहा हे अंडं काही मी घातलेलं नाही पण हे किती रुचकर लागतं हे मी कोंबडीपेक्षा जास्त चांगलं सांगू शकतं नाही का ?" कवी महाशय आपलं कवितेचं बाड उचलून तेथून गायब झाले.
  • Log in or register to post comments

श्री व्यं केतकर 'अत्यंत

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 21:36 नवीन
श्री व्यं केतकर 'अत्यंत भिकार " म्हणाले ते योग्य होते. त्यांनी कवितेबद्दल स्वतःचे मत मांडले. त्याला आत्मबल पाहीजे. तुमच्याकडे आत्मबलाची वानवा असल्याने कवितेबद्दल तुम्ही काहीच लिहू शकला नाहीत. कवितेशी असंबद्ध लिहिण्यापुढे तुम्हाला काय येते? उगीच तुलना! कुठे ते केळकर आणि कुठे हे खरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ते केतकर आहेत ज्ञान

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 21:54 नवीन
ते केतकर आहेत ज्ञान कोशकारान्चे नावही माहीत आसू नये? हा हन्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

तथास्तु

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 21:59 नवीन
क्षमस्व. कुठे ते केतकर आणि कुठे हे सुबोध खरे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तेच म्हणतो मी

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 22:01 नवीन
तेच म्हणतो मी आम्ही एकारान्त कोकणस्थ आहोत. जाज्वल्य का काय म्हणतात तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मग तुमच्या नात्यात कविता लागत

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:08 नवीन
मग तुमच्या नात्यात कविता लागत असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हो ना माझ्या चुलत बहिणीची

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 22:10 नवीन
हो ना माझ्या चुलत बहिणीची आतेनणंदच आहे कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

अरेरे. मग तुमचा तर कवितेशी

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:25 नवीन
अरेरे. मग तुमचा तर कवितेशी दुरान्वयानेही संबंध दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अजीब बात है! हमारे इतने

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 22:34 नवीन
अजीब बात है! हमारे इतने समझाने के बाद भी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

तुमच्या समजावण्याने ६

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 23:39 नवीन
तुमच्या समजावण्याने ६ महिण्याचं तान्हूलही रडणं थांबवण्याची शक्यता नाही. समजवणे म्हणजे पोरखेळ नव्हे. महाकठीण काम आहे ते. त्यासाठी पात्रता आणि कर्तुत्वाचा अधिकारही पाहिजे. बोलघेवड्यांची जगाच्या कोणत्याच कोपर्‍यात काहीच किमंत नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असे एका असहाय्य माणसावर तुटून पडणे हे चूक आहे....

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 21:45 नवीन
एका ज्येष्ठ मिपाकराची अशी टोचाटोची? सध्याच्या गुरु राहू चांडाळ योगाचे परिणाम आहेत हे ! कलियुग हो....घोर पाप...हन्त हन्त !
  • Log in or register to post comments

माझी चिंता नको. तुम्ही

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:01 नवीन
माझी चिंता नको. तुम्ही त्यांचंच बघा. मी असहाय्य वगैरे काही नाही. सक्षम आणि निरोगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

असं बघा.....

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 22:19 नवीन
चांडाळ योगाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करा. शुक्र बुध शनीचा प्रभाव वाढेल इकडे लक्ष देणे गरजेचे. सध्या हेच करावे. पुढचा मार्ग मोकळा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

बद्धकोष्ठ आहे काय?

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 22:22 नवीन
बद्धकोष्ठ आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

पत्ता कधी देणार?

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:24 नवीन
पत्ता कधी देणार? तेवढं सोडून अवांतर लिहिण्यात फारच उत्साह आहे तुम्हाला. पत्ता ध्या. तुमचा दुवा घ्यायला येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

મોટાભાઈ.....તારી હાલત સારું નથી...

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 22:30 नवीन
અમદાવાદ માથી આવી જા....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

एवढे पळपुटेच होते तर दुवा

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:33 नवीन
एवढे पळपुटेच होते तर दुवा देण्याच्या वगैरे वल्गना कशाला केल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

मी दुवा देणार हे अगाध ज्ञान कसं झालं आपणास सर....

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 22:38 नवीन
मी इतर लोकांना हा सल्ला दिला होता..... पण तुमची इच्छा असेल तर मीही देईन हो दुवा.... तुम्ही माझ्यासारख्या य:कश्चित माणसाकडून दुवा मागणे हेही नसे थोडके !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

पळू नका. देईन आणि देणे यातली

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 23:00 नवीन
पळू नका. देईन आणि देणे यातली तफावत कळतेय ना तुम्हाला? चला द्या पत्ता आणि दुआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

तुम्हाप्रत कल्याण असो !

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 23:28 नवीन
दुआ कुबूल करो मालिक़ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

लांबून दुवा द्यायची किंवा

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 23:35 नवीन
लांबून दुवा द्यायची किंवा दुवा पोस्टाने पाठवण्याची भारतीय/मराठी/हिंदवी संस्कृती नाही. पत्ता द्या. घरी येतो. नतमस्तक होतो. मग दुवा द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

नाही... तेवढी आमची योग्यता नाही...

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 23:38 नवीन
नतमस्तक मीच झालोय आज...तुसी तो छा गए सर.... आज जहाँ देखो मिपापर एक ही नाम है...गंगाधरशेठ मुटे.... जय हो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मी चमचे पाळत नाही.

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 23:40 नवीन
मी चमचे पाळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

हा विविक्षित शब्द चुकून आला का तुमच्याकडून...।

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/19/2016 - 23:43 नवीन
चमचे कुठे आले मध्येच..आज भातुकली नका खेळू....कबड्डी खेळा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

संकेतस्थळ मालक आणि संपादक

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 22:07 नवीन
संकेतस्थळ मालक आणि संपादक मंडळ केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून पाहतोय मिपावरच १५-२० आयड्यांचं टोळकं माझ्या धाग्यावर तुटून पडत असते. हे १५-२० आयड्यांचं टोळकं म्हणजे अख्खी मिसळपाव आहे किंवा हे मिसळपावचे अधिकृत प्रतिनिधी आहे असे मी मानत नाही. तुम्ही काय मानताय हे मला माहीत नाही. स्वत:ची ओळख लपवणार्‍यांना काहीच धरबंद नसतो. ते काहीही बोलू शकतात, लिहू शकतात. पण त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. मात्र यावेळेस मी सर्वांना जशास तसे उत्तर देणार आहे, यांची दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की, यापूर्वी सारखी एकतर्फ़ी कारवाई करून केवळ माझे उपप्रतिसाद उडवू नयेत. वाचकांना सर्व वाचू द्या. ते त्यांच्या सदसदविवेकबुद्धीने काय ठरवायचे ते ठरवतील. आपला एक सदस्य गंगाधर मुटे
  • Log in or register to post comments

नोटेड

खटपट्या
Tue, 07/19/2016 - 23:05 नवीन
नोटेड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

संपादकांच्या उत्तराच्या

टवाळ कार्टा
Tue, 07/19/2016 - 23:32 नवीन
संपादकांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

आयड्यांना स्वतःचे अस्तित्व

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 23:36 नवीन
आयड्यांना स्वतःचे अस्तित्व झाकून ठेऊन व्यक्त व्हायची मिपाने सदस्यांना मुभा दिली आहे. त्याचा गैरफायदा सदस्याची एक झुंड घेत आहे. या झुंडीतील सर्वांचे खरे रूप उघड केले तर असे मोकाट सुटून काहीही बोलण्याची, लिहिण्याची यांची तयारी आहे का? एवढे मला आता तपासायचेच आहे.
  • Log in or register to post comments

मुटे साहेब

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 23:54 नवीन
मुटे साहेब असंख्य लोक मिपा वर टोपण नावाने वावरत असतात. त्या मागे त्यांची एक विशिष्ट अशी विचारसरणी असते. आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न ही आहे. उदा इस्पीकचा एक्का, पैसा ताई, मुवि, गवि इ. म्हणून ते पळपुटे आहेत किंवा पदराआड दडून काही करतात असे म्हणणे चूक ठरेल. बाकी आज प्रतिसाद दिला ते लोक -- उगाच झुंड बनवून तुमच्या धाग्यावर धुरळा उडवण्याइतके यातील कोणी रिकामे नाही. काही लोकांना मी कट्ट्यावर भेटलो आहे आणि हे लोक आपापल्या क्षेत्रात मान्यवर आहेत. इतर कित्येक लोकांना काळा की गोरा हेही पाहिलेले नाही.त्यांनी आपले खरे नाव आणि पत्ता तुम्हाला दिला तर तुम्ही काय क्रांती करणार आहात? त्यांनी एक विशिष्ट कारणासाठी नाव घेतलेले असते केवळ तुम्ही आरडा ओरडा केलात म्हणून त्यांनी आपले का=हरे बाव उघड करावे ही तुमची अपेक्षा चूक आहे. उगाच झुंड करून म्हणून तुम्ही आरडा ओरडा चालवला आहे त्यात काही तथ्य नाही. आपलीच एक ( ही नव्हे) कविता आपणच ३ वर्षांनी वर काढून ती आर पी मिळवायचा तुमचा प्रयत्न कशासाठी हे कळले नाही. मीच काय तो बरोबर आणि इतरांना अक्कल नाही असे नसते. बाकी आक्रस्ताळेपणा करण्याने तुम्हीच बरोबर हेही सिद्ध होत नाही खरं तर निष्पन्न काहीही होत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

अच्छा! आधी निरर्थक, अर्थहीन,

गंगाधर मुटे
Wed, 07/20/2016 - 00:08 नवीन
अच्छा! आधी निरर्थक, अर्थहीन, असंबद्ध व कवितेशी निगडीत नसलेले ५० प्रतिसाद दिल्यानंतर आता असा सौम्य प्रतिसाद लिहिता होय? एवढी प्रगल्भता तुमच्यात आता आली आहे, मग काही मिनिटापूर्वी कुठे गेली होती तुमची प्रगल्भता? एखाद्या कवितेवर अधाशासारखे तुटून पडताना तुम्हाला व तुमच्या झुंडीला बरेच दिवसापासून पाहात आहे. तेव्हा कुठे गेली होती तुमची ही सौम्य भाषा? एखाद्याची कुचेष्टा करणार, त्याला हीन लेखण्याचा प्रयत्न करणार, त्याची झुंडीने मिळून मुस्कटदाबी करणार, करता येईल तेवढी त्या कवितेवर हुल्लडबाजी करून तो धागा घाणेरडा करून ठेवणारे तुम्ही आणि तुमची झुंडच आहे ना? त्या झुंडीत आपापल्या क्षेत्रात मान्यवर असलेले असतीलही. पण त्यांची लक्षणे गुंड आणि मवाल्यांसारखी नसावीत ना? हे काय मी सांगू तुम्हाला? वेद, पुराण, गीता यांनी आपल्याला हीच शिकवण दिली आहे का? माझ्या धाग्यावर येऊन कुणी हुल्लड करत असेल तर त्याचा मला नैतिक अधिकार आहेच पण कायदेशीर अधिकारही मिळून जाईल. मी संपूर्ण मिपाकरांना त्यांचे पत्ते मागीतले नाही. फक्त झुंडखोरांचे स्वरूप उघड व्हावे, असे म्हटले आहे. तूर्त एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

केंद्रातील सत्ताबदलाचा प्रभाव

गंगाधर मुटे
Wed, 07/20/2016 - 00:29 नवीन
आक्रस्ताळेपणा करण्याने तुम्हीच बरोबर हेही सिद्ध होत नाही मला तुमच्या झुंडीसमोर काहीही सिद्ध करायचे नाही आहे. तशी आवश्यकताही नाही. तुम्हप्रमाणपत्र दिले तरी साहित्यजगात त्याला कवडीची किंमत नाही. मला फक्त इतकेच शोधायचे आहे की, आकाशातील ग्रहतार्‍यांचा मनुष्याच्या स्वभावावर प्रभाव पडतो असे म्हणतात. केंद्रातील सत्ताबदलाचाही तसाच काही प्रभाव मिपा आयड्यांवर पडला आहे का? उत्तर शोधत आहे. उत्तर मिळाले की जाहीर करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुमच्या उत्तराला केराची टोपली

सुबोध खरे
Wed, 07/20/2016 - 00:35 नवीन
तुमच्या उत्तराला केराची टोपली दाखवली जाण्याची शक्यता दाट आहे. कारण तुम्ही पुरावा न देता फक्त विधाने करता.आपल्या दुसऱ्या कवितेमध्ये कमीत कमी दोन डझन लोकांनी आपले विधान का करत आहेत हे विचारले त्यावर तुमची फक्त उद्धट उत्तरे आली यात बापूसाहेब इ लोक आहेत जे महाराष्ट्रातही नाहीत त्याना पण तुम्ही कंपू आणि झुंड मध्ये सामील करून मोकळे झालात. साहित्य जगात मला जायचे कारणच नाही मग कुणाला प्रमाणपत्र का आणि कशासाठी देऊ. लोकांनी मला चांगले म्हणावे म्हणून मला स्वतः प्रतिसाद देऊन धागे वर काढायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा