गेले मोदी कुणीकडे
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा
महागाईलाही पूर चढे
विमान उडवीत चहूकडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे
शिक्षण खोटे पदवी खोटी
मंत्रीणबाई तुळशी झाली
केजरीवालची पडता बिजली
दचकून तीचा ऊर उडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे
पैसा काळा आणू म्हणुनी
ठोकूनी भाषण दाही दिशांनी
चाय - गाय पे चर्चा करूनी
मनकी बाता देश बुडे ,
गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे
चीनमध्ये झोपाळ्यावरुनी
दाढीवाले बिंब बघूनी
हसता संघ भगव्या रानी
धर्म अफूचे ऊन पडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे..
= = = = = = = = =
रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे, गं बाई
गेला मोहन कुणीकडे
तरुवर भिजले भिजल्या वेली
ओली चिंब राधा झाली
चमकुन लवता वरती बिजली
दचकुन माझा ऊर उडे, ग बाई
हांक धावली कृष्णा म्हणुनी
रोखुनी धरली दाही दिशांनी
खुणाविता तुज कर उंचावुनी
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे, ग बाई
जलाशयाच्या लक्ष दर्पणी
तुझेच हसरे बिंब बघुनी
हसता राधा हिरव्या रानीं
पावसातही ऊन पडे, ग बाई
राजकीय साठमारी
वाह
यावे....
ते
दादा (द)रेकर
वा वा!मस्तच!
कविता खासच लिहिली आहे. इथे
...दचकुन माझा ऊर उडे
ह्ये र्हायलं ना पावणं
प्रसिद्धीमाध्यमांच्या फार आहारी आहात..
विडंबन छाने
आमचंबी गायबगान
जिल्ब्यांचा पाऊस पडे सारखा
आरारा
गोडबोले विसरलात की
पार बाजार च उठवलात की...
फुटलो...
हॅ!
कायम चूर्णच्या बरोबर...
'गेला' ऐवजी 'गेले' वापरण्याचं
अरेच्चा!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आयडी उडवण्याचा तीव्र निषेध.