✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

झाडीबोली गझल - " बदल "

स — स्वामी संकेतानंद, Mon, 04/25/2016 - 07:30
किती कोसावर कोनाची कहानी बदलते नदी वाह्यत जाते सयरात पानी बदलते कई बदलन का रस्ता आपला वैनगंगा? बदलते चुलबन, चन्दन अन् कठानी बदलते तुयी ताकत काउन त्याच्या गुलामीत जाते? इस्यारा कर तू बाप्पू, राजधानी बदलते उधारीची जिनगी जगला तई थो समजला उधारीच्या जिनगीवर का जवानी बदलते? इस्यारा समजन का थो पारधी, जंगलाचा? निस्याना हुकला होता, थो मचानी बदलते * कई = कधी * थो = तो * चंदन, कठानी आणि चुलबन(चुलबंद) ह्या वैनगंगेच्या उपनद्या आहेत. बाकी सगळे सोपे आहेच.

प्रतिक्रिया द्या
2107 वाचन

💬 प्रतिसाद (12)

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/25/2016 - 07:57 नवीन
भाषेसहित गझल आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Mon, 04/25/2016 - 11:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खल्लास बे स्वाम्या! खासच जमले

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/25/2016 - 11:12 नवीन
खल्लास बे स्वाम्या! खासच जमले हे काम! :)
  • Log in or register to post comments

आवडली.

पिलीयन रायडर
Mon, 04/25/2016 - 11:13 नवीन
आवडली. ही बोली मला आवडलीच आहे फार. ती बोलीच छान आहे म्हणुन की तुम्ही छान लिहीता म्हणुन ते नक्की माहिती नाही. :)
  • Log in or register to post comments

बोलीच छान आहे. सगळ्याच बोली

स्वामी संकेतानंद
Tue, 04/26/2016 - 06:44 नवीन
बोलीच छान आहे. सगळ्याच बोली छान असतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मस्त! आवडली!

रातराणी
Mon, 04/25/2016 - 12:05 नवीन
मस्त! आवडली!
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Mon, 04/25/2016 - 12:33 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

छानच..

नीलमोहर
Mon, 04/25/2016 - 13:09 नवीन
बोली भाषेतील लिखाण मनाला नेहमीच स्पर्शून जाते.
  • Log in or register to post comments

मस्तच!

चांदणे संदीप
Mon, 04/25/2016 - 13:19 नवीन
झाडीबोलीने अगदी झाडून टाकले! कस छान दिसतंय मिपांगण! :) Sandy
  • Log in or register to post comments

मला पूर्ण समजली नाही पण आवडली

एस
Mon, 04/25/2016 - 13:23 नवीन
मला पूर्ण समजली नाही पण आवडली.
  • Log in or register to post comments

लय भारी भौ ! भलकशी आवडली !!

पथिक
Tue, 04/26/2016 - 14:12 नवीन
लय भारी भौ ! भलकशी आवडली !! इदर्भातले दिस्ता ?!
  • Log in or register to post comments

इस्यारा समजन का थो पारधी,

बोका-ए-आझम
Tue, 04/26/2016 - 16:18 नवीन
इस्यारा समजन का थो पारधी, जंगलाचा? निस्याना हुकला होता, थो मचानी बदलते
हे मस्तच! बोलीभाषेतली गझल हा प्रकार भारी आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा