✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बसते बिचारी एकटी आजी -

व — विदेश, Tue, 03/01/2016 - 11:20
बसते बिचारी एकटी आजी देवापुढती वाती वळत असते मुखात नामस्मरण कधी तिचे ना कंटाळत.. गत आयुष्याचा पाढा असते स्वत:शीच उगाळत गालावर एखादा अश्रू नकळत येई ओघळत.. सोसले जे आयुष्यभरात जाईे डोळ्यासमोर तरळत वेग वाती वळण्याचाही जाई वाढत तसाच नकळत.. सखा जीवनातुन का गेला सोडून अर्ध्यावरुनी पळत आसवात का भिजती वाती जिणे रोजचे राहीे छळत.. .

प्रतिक्रिया द्या
5714 वाचन

💬 प्रतिसाद (24)

कविता भावली....

मुक्त विहारि
Tue, 03/01/2016 - 11:23 नवीन
आमच्या वडिलांची आई अशीच वाती वळत बसत असे. असो, आजचा दिवस तिच्याच आठवणीत जाणार...
  • Log in or register to post comments

हळवे केलेत..

नीलमोहर
Tue, 03/01/2016 - 11:40 नवीन
डोळ्यांसमोर आज्जी आली, अशीच वाती वळत बसलेली, त्या वातींसारखेच तिचेही आयुष्य..
  • Log in or register to post comments

फार मस्त

एक एकटा एकटाच
Tue, 03/01/2016 - 12:57 नवीन
फार मस्त
  • Log in or register to post comments

हे असं मागं राह्य्लेल्यांच लय

भरत्_पलुसकर
Tue, 03/01/2016 - 13:14 नवीन
हे असं मागं राह्य्लेल्यांच लय अवघड आसतय जिण.
  • Log in or register to post comments

धन्यवाद----

विदेश
Tue, 03/01/2016 - 14:29 नवीन
मुक्त विहारि, नील मोहर, एक एकटा एकटाच, भरत_पलुसकर ... प्रतिसादासाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments

सुरेख कविता.

पद्मावति
Tue, 03/01/2016 - 14:39 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments

आजीची आठवण आली :(

स्पा
Tue, 03/01/2016 - 14:42 नवीन
आजीची आठवण आली :(
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

एस
Tue, 03/01/2016 - 14:49 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

छान कविता आहे.

बोका-ए-आझम
Tue, 03/01/2016 - 14:57 नवीन
सुदैवाने माझ्या आज्यांवर ही वेळ आली नाही पण एखादा एकाकी वृद्ध माणूस पाहिला की उदास वाटतं.
  • Log in or register to post comments

:(

सुमीत भातखंडे
Tue, 03/01/2016 - 20:46 नवीन
.
  • Log in or register to post comments

पद्मावति, स्पा, एस, बोका-ए

विदेश
Tue, 03/01/2016 - 22:08 नवीन
पद्मावति, स्पा, एस, बोका-ए-आझम, सुमीत भातखंडे ..... मन:पूर्वक धन्यवाद .
  • Log in or register to post comments

कविता भुतकाळात घेवुन जाते ..

गणेशा
Sat, 03/05/2016 - 16:04 नवीन
कविता भुतकाळात घेवुन जाते .. आवडली
  • Log in or register to post comments

आमच्या समोरचे आजोबा परवाच

तर्राट जोकर
Sat, 03/05/2016 - 16:12 नवीन
आमच्या समोरचे आजोबा परवाच गेले. खूप मनमिळावू, चांगले होते स्वभावाने. आजीही तशाच. दोघे कधीही कुठे जायचे असेल तर सोबतच जायचे. नेमके परवा कधी नव्हे ते आजोबा एकटेच कुठल्या तरी गावाला वर्षश्राद्धानिमित्त गेले, तिकडेच हार्टअ‍टॅक येउन गेले. घरच्यांना कुणालाही भेटायला चान्स मिळाला नाही. त्या आजींची अवस्था शब्दांपलिकडली आहे. :(
  • Log in or register to post comments

अस काही वाचल.. पाहिल की खुप

गणेशा
Sat, 03/05/2016 - 16:17 नवीन
अस काही वाचल.. पाहिल की खुप वाईट वाटते .. ---- कविता पुन्हा वाचली आणि ह्या ओळी आता हेलावून गेल्या सखा जीवनातुन का गेला सोडून अर्ध्यावरुनी पळत आसवात का भिजती वाती जिणे रोजचे राहीे छळत.. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आवडली

निशांत_खाडे
Sat, 03/05/2016 - 16:12 नवीन
सोसले जे आयुष्यभरात जाईे डोळ्यासमोर तरळत वेग वाती वळण्याचाही जाई वाढत तसाच नकळत..
एक नंबर..
  • Log in or register to post comments

सगळी अवस्था जशीच्या तशी

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/05/2016 - 21:03 नवीन
सगळी अवस्था जशीच्या तशी पकडलित की हो! :(
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

जव्हेरगंज
Sun, 03/06/2016 - 10:20 नवीन
अप्रतिम !
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

नूतन सावंत
Sun, 03/06/2016 - 19:02 नवीन
अप्रतिम.
  • Log in or register to post comments

धन्यवाद -

विदेश
Tue, 03/22/2016 - 06:08 नवीन
गणेशा, तर्राट जोकर , निशांत_खाडे , आत्मबंध , जव्हेरगंज , सुरन्गी - सर्वांचे मनापासून आभार !
  • Log in or register to post comments

सुदैवाने आज्ज्यांवर ही वेळ

रेवती
Tue, 03/22/2016 - 07:15 नवीन
सुदैवाने आज्ज्यांवर ही वेळ आली नाही पण दोन्ही आजोबा नंतर एकटेपणात हरवून गेले. ही कविता वाचून चौघेही डोळ्यासमोर आले. कविता आवडली. एकदम मनात सय दाटून आली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद -

विदेश
Wed, 03/23/2016 - 16:13 नवीन
रेवती - प्रतिसादासाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

पैसा
Wed, 03/23/2016 - 17:09 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

धन्यवाद -

विदेश
Sat, 03/26/2016 - 15:30 नवीन
पैसा - आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments

भावलेली कविता

पाषाणभेद
Sun, 03/27/2016 - 08:40 नवीन
भावलेली कविता
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा