✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

~*~*~*~ साप ~*~*~*~

न
नाव आडनाव यांनी
Sun, 03/06/2016 - 09:38  ·  लेख
लेख
मित्रांनो, मी ज्या सोसायटीत राहतो तिथली एक समस्या आहे. त्यावर काही उपाय माहित असतील तर सुचवा. तर समस्या अशी आहे की आमच्या सोसायटीत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात / ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साप दिसायला लागले. लोक घाबरले कारण लहान मुलं खेळत असतात. साप लहान मुलांना चावण्याची भिती होती. मी कमिटीत असल्यामुळे मी या समस्येवर उपाय शोधायला पाहिजे असं कार्यकर्त्यांचं मत होतं. एका जणाने सांगितलं की उपाय नाही पण रिपेलंट म्हणून कंपाउंड भिंतीच्या बाजूला थायमेट टाकून बघा. तसं केल्यानंतर साप गेले - म्हणजे नंतर दिसले नाहीत. पण "कावळा बसायला आणि फांदी तुटायला" असा उपाय झाला काय ही एक शंका आहे. जर पुढच्या वर्षी परत साप आले तर? तयारी असावी म्हणून हा धागा काढत आहे. येऊंद्या उपाय .....
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11348 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

ज्याक डनियल्सला तुमच्या

प्रचेतस
Sun, 03/06/2016 - 09:41 नवीन
ज्याक डनियल्सला तुमच्या सोसायटीत राहायला बोलवा.
  • Log in or register to post comments

तुम्ही रंगवली नाय राव कथा. ती

तर्राट जोकर
Sun, 03/06/2016 - 10:17 नवीन
तुम्ही रंगवली नाय राव कथा. ती बाई, तीचे तुम्हाला साप का कुच करो म्हणणे, इत्यादी. जरा डीट्टेल टाका. खफवर टाकला होता तसा.
  • Log in or register to post comments

:)

नाव आडनाव
Sun, 03/06/2016 - 11:42 नवीन
:) सोसायटीत सापांची चर्चा सुरू होऊन दोन-तीन दिवस झाले होते. एक दिवस हापिसातून घरी येतांना एक लै लै मोठ्या साहेबांच्या आईंनी (ललमोसाआ) मला थांबवलं. त्यांचं आणि माझं संभाषण - ललमोसाआ - "बहुत साप हो गये है. प्रसांतभैया कुछ करो". मी - (एकतर मी भैया नाही. मराठी माणूस आहे. आणि साप काय मी पाळून सोसायटीत सोडतो काय. कुछ करो म्हणजे?) आंटी बाजूवाले प्लॉट का काम चालू है. वो लोग खुदाई करते है तो अपने सोसायटीमे साप आते है. ललमोसाआ - बेटा (लक्षात घ्या - आधी भैया होतो) प्लॉट के मालिक को जाके कह दो बना ले अपना बिल्डिंग जल्दी से. मी - (बाजूचा प्लॉट ३/४ एकरचा आहे. किंमत कमीत कमी ४०-५० करोड असणार. माझ्यासारख्या दळभद्री माणसाने प्लॉट मालकाला असे सल्ले दिले तर तो नक्की मला घडी करून परत पाठवणार). आंटी ऐसा नही कर सकते. साप वो प्लॉटसे निकलके कंपाऊंड वॉल मे कुछ बिल है, उन बिलोमे छिप जाते है. ललमोसाआ - साप बिलोंसे ऐसेही बाहर नही निकलते. उसके लिए बीन बजानी पडती है. मी - (मी माझी अ‍ॅक्टिव्हा घेऊन गारूडी शोधत फिरतोय असं इमॅजिन केलं. आणि एखादा गारूडी नाही मिळाला / तो यायला तयार नसला तर मीच त्याची पुंगी दीड दोन तासाच्या भाड्याने आणून कंपाऊंड वॉलच्या बाजूला बिळं शोधून वाजवत बसलोय असं इमॅजिन केलं) :) सापांना काही उपाय नसतो हे माहित होतं. माझ्या गावाकडे साप दिसला तर लोक तो घरापासून लांब असला तर / घरा जवळ असेल आणि निघून जात असेल तर काहीच करत नाहीत. घरात घुसला तर मारावा लागतो. त्यात सप्टेंबर / ऑक्टोबर हा सापांचा मेटिंग पिरिएड असल्यामुळे पण ते बिळांतून बाहेर आले अशी एक शक्यता होती. पण लोकांना काय सांगणार. कोणीही भेटलं की तोच विषय असायचा. पार वैताग आणला होता पब्लिकने. इमेल मधे तोच विषय. मी कायप्पा वर नाही, पण कायप्पा वर पण तेच. शेवटी एकाने सांगितलं की रिपेलंट म्हणून थायमेट टाकून बघू. तसं केलं आणि नंतर सापाने काही दर्शन दिले नाही. सुटलो एकदाचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

:-D लोल.

उगा काहितरीच
Sun, 03/06/2016 - 12:02 नवीन
:-D लोल. एक उपाय: (खरे खोटे देव जाणे) तुळशीचे रोपं लावा सगळीकडे . तुळशीच्या झाडामुळे साप येत नाही असे म्हणतात . जसे बाड, मेहंदीचे कुंपण करतात तसे कुंपण करावे लागेल मात्र . (फायदा झाला तर ठीक नाहीतर फुकट अॉक्सिजन तरी मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

हांगाशी =)) हे धाग्यात अ

तर्राट जोकर
गुरुवार, 03/10/2016 - 18:43 नवीन
हांगाशी =)) हे धाग्यात अ‍ॅडवून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

मुंगुस पाळा.दुहेरी फायदा होईल

जेपी
Sun, 03/06/2016 - 10:21 नवीन
मुंगुस पाळा.दुहेरी फायदा होईल. १) सापांपासुन सुटका.. २) मुंगुसाचे तोंड सकाळी पाहणे लाभदायक असते, असे समजतात,त्यासाठी शुल्क आकारा,मुंगसाच्या खाण्यापिण्याचा खर्च निघेल.
  • Log in or register to post comments

मुंगुस ??

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 12:30 नवीन
मुंगुस ?? त्या पेक्षा बेयर ग्रिल ला पाळा . तो कच्चे खातो साप ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

पुराव्याने शाबित

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 12:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मग मुंगूस काय तंदूरी साप खातं

बाळ सप्रे
Fri, 03/11/2016 - 12:34 नवीन
मग मुंगूस काय तंदूरी साप खातं ?? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

एकूण असा प्रकार आहे तर!

एस
Sun, 03/06/2016 - 12:07 नवीन
आजकाल संस्थळांना डुआयडींनी जसे छळलेय तसे तुमच्या सोसायटीला सापांनी छळलेय असे दिसते. एक काम करा, 'ही आमची श्रीदेवी, हिच्यावर आमचा भारी जीव!' असे कॅप्शन असलेली 'नगीना', 'निगाहें' इ. चित्रपटातली पोष्टरे तुमच्या सोसायटीच्या कंपाउंड वॉलच्या बाहेरून चिकटवा. सगळे सर्पपुरूष तिथे डुलत बसतील आणि सगळ्या सर्पिणबाया त्यांच्या नावाने धूसफूस करतील. तुमची सोसायटी मोकळी!
  • Log in or register to post comments

फक्त श्रीदेवी?

अन्नू
Sun, 03/06/2016 - 12:38 नवीन
मल्लीकाला विसरलात का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आम्हांला रीना रॉय नाहीतर

एस
Sun, 03/06/2016 - 13:04 नवीन
आम्हांला रीना रॉय नाहीतर श्रीदेवी आठवतात हो. कोण ही मल्लिका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

कोण ही मल्लिका?.>>>

अन्नू
Sun, 03/06/2016 - 13:16 नवीन
कोण ही मल्लिका?.>>> तुंम्ही जलेबीबाईला ओळखत नाही? ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

छे! ही होय! ओंगळवाणी दिसलीये

एस
Mon, 03/07/2016 - 20:06 नवीन
छे! ही होय! ओंगळवाणी दिसलीये त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

खिक्क!

जव्हेरगंज
Sun, 03/06/2016 - 12:39 नवीन
हे एकदभ सुसाट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 03/06/2016 - 13:55 नवीन
सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड लावा "सापांना सोसायटी मध्ये येण्यास सक्त मनाई आहे. बेकायदेशीर घुसखोरी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल." तरी देखील साप आले तर सुशिक्षीत सापांना नोटीसा बजावा व अशिक्षीत सापां करता एका प्रौढ शिक्षण वर्ग सुरु करा. सापांची नसबंदी करुन घ्या त्यामुळे सापांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल व भविष्यातला त्रास कमी होण्यास मदत होईल. सापांच्या बिळात ए.सी, आणि झी च्या कनेक्क्ष्न सकट टीव्ही बसवुन द्या म्हणजे सर्पिणी बाहेर पडायच्या कमी होतील. सापांसाठि एखादा स्मोकिंग झोन तयार करुन द्या म्हणजे ते इकडे तिकडे फिरत बसणार नाहीत. सोसायटी मध्ये एक तक्षकयाग करुन घ्या. व त्याला सर्व सापांना बोलवा. साप दिसला कि त्याच्या मागे "सापड्या सापड्या" असे चिडवत फिरा. म्हणजे ते चिडुन येईनासे होतील. नाग असेल तर काय चिडवायचे ते तुम्ही ठरवा. नाग पंचमिला सर्पिणिंसाठि हळदी कुंकु व सापांसाठि कोकटेल पार्टीचे आयोजन करा. सापांच्या मुलांना जे एन यु मध्ये दाखला मिळवुन द्या. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

पैजारमाउली काहीतरी 'शेष' ठेवा

अभ्या..
Sun, 03/06/2016 - 14:16 नवीन
पैजारमाउली काहीतरी 'शेष' ठेवा इतरांसाठी. ;) . लास्टचा नागकिडस साठी जेएनयु म्हणजे जेनुइन नाग युनिवर्सिटी का? चांगलेय चांगलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

लै भारी

सुबोध खरे
Sun, 03/06/2016 - 17:01 नवीन
लै भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ख्या ख्या ख्या

बाबा योगिराज
Mon, 03/07/2016 - 08:51 नवीन
पैजारबुआ, साष्टांग दंडवत स्वीकारा. ____/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

बुवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/07/2016 - 08:56 नवीन
=)) सापड्या सापड्या अन नाग दिसला तर मेलो.. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

बिळाबाहेर पडताना हेल्मेट

सूड
Mon, 03/07/2016 - 18:48 नवीन
बिळाबाहेर पडताना हेल्मेट घालून बाहेर पडायची सक्ती करा. त्यातही सर्पिणींचा हेल्मेट सोन्याचाच असला पाहीजे असं म्हणा. म्हणजे एकमेकींचे हेल्मेट बघून जळफळाट होऊन बिळाबाहेर पडायच्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

नाग असेल तर काय चिडवायचे ते

सतीश कुडतरकर
Fri, 03/11/2016 - 11:50 नवीन
नाग असेल तर काय चिडवायचे ते तुम्ही ठरवा. :-)) :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

माउली, चरण कुठे आहेत?

बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 23:06 नवीन
का नागांसारखे सरपटता आजकाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

साप नि सोसायटी

नन्द्या
Sun, 03/06/2016 - 17:29 नवीन
तुळस नि मुंगूस आणण्यात अडचणी बर्‍याच! तुळशीला पाणी कोण घालणार? त्याचा खर्च कोण देणार? मुंगुसाचा तीच अडचण. समजा साप गेले, तर नंतर काय करायचे त्या मुंगुसाचे? त्याच्याकडे कोण बघणार, त्याचा खर्च कोण करणार? सोसायटीत मराठी बोलणारी माणसे रहातात म्हंटले! त्यातून मिपा वर लिहिणारे - वाद घालून शिव्या दिल्याशिवाय सोडणार नाही हां, सांगून ठेवतोय!
  • Log in or register to post comments

- अंघोळीच्या पाण्याच्या टाकीत

sagarpdy
Sun, 03/06/2016 - 21:20 नवीन
- अंघोळीच्या पाण्याच्या टाकीत नियमितपणे थायमेट टाकत चला, मुले या पाण्याने आंघोळ करतील व साप त्यांच्याजवळ येणार नाहीत. - मुलांसाठी सकाळ-संध्याकाळ नवनाग स्तोत्राचे पाठ आयोजित करा. सर्पविषाच्या धोक्यापासून मुक्ती मिळवा. - शिड्यांची तसेच फाशांची व्यवस्था करा. साप आले कि सापशिडी स्पर्धा आयोजित करा.
  • Log in or register to post comments

- सोसायटी स्वच्छ ठेवत चला.

sagarpdy
Sun, 03/06/2016 - 21:25 नवीन
- सोसायटी स्वच्छ ठेवत चला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

नागस्त्रोत्र

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/07/2016 - 09:05 नवीन
नागस्त्रोत्र नावाचं एक अष्टक आहे. सदरील अष्टक सकाळ संध्याकाळ पाठांतर करुन म्हटल्यास कोणत्याही सापाची आपल्या सोसायटीत यायची हिंमत होणार नाही. तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी सोसायटीच्या मैदानात लहान थोरांनी येऊन खालील स्त्रोत्र मोठ्या आवाजात म्हणावे, म्हणजे सोसायटीत साप येणार नाहीत. (स्त्रोत्र म्हणुनही साप आपल्या सोसायटीत आल्यास मला जवाबदार धरु नये) ''अनंतं वासुकि शेष पद्मनाभं च कम्बलम् । शड्खपाल धार्तराष्ट्र तक्षकं कालियं तथा ।। एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् । सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः ।। तस्मे विषभयं नास्ति सर्वत्र विजयीं भवेत् ।'' (माहिती सौजन्य : विकिपीडिया) -दिलीप बिरुटे (गारुडी)
  • Log in or register to post comments

प्रा डॉ. हा श्लोक संस्कृत मधे

विजुभाऊ
Mon, 03/07/2016 - 18:32 नवीन
प्रा डॉ. हा श्लोक संस्कृत मधे आहे. संस्कृत न समजणार्‍या सापांसाठी काय करायचे? सापांच्या नावाखाली तुम्ही संस्कृत ची छुपी सक्ती अशी चालवून घेणार नाही. अवांतरः मुंबईत सध्या टॅक्सी परमीट साठी मराठीचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी त्या उमेदवाराला मराठीत प्रश्न विचारतात उदा डावा हात म्हणजे कोणता. वडिलांचे नाव काय वगैरे. शिवसेनेतुन बाहेर पडलेले व काँग्रेसचे खंदे नेते संजय निरुपम यानी या मराठीच्या सक्ती विरुद्ध कडक्क आंदोलन छेडू असे सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संस्कृत न समजणार्‍या

खटपट्या
Tue, 03/08/2016 - 01:42 नवीन
संस्कृत न समजणार्‍या सापांसाठी काय करायचे?
बॅटमन गुर्जींचा क्लास लावायला सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

महाभारत काळापासून सापांना

बॅटमॅन
Tue, 03/08/2016 - 11:58 नवीन
महाभारत काळापासून सापांना संस्कृत समजत असल्याचे पुरावे आहेत त्यामुळे ही अडचण येऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ह्याने पूर्ण सोसायटीला फायदा

किचेन
Mon, 03/07/2016 - 19:53 नवीन
ह्याने पूर्ण सोसायटीला फायदा होइल कि फक्त स्वतच्या फ्लॅटला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

गवि
Mon, 03/07/2016 - 09:14 नवीन
www. sap. com इथे काही "सोल्युशन" मिळतंय का बघा.
  • Log in or register to post comments

थायमेट

तुषार काळभोर
Mon, 03/07/2016 - 10:02 नवीन
सापांना दूर ठेवण्यासाठी खरोखर उपयोगी असते. पण त्याचा वास लई बेक्कार असतो. मागच्या अनुभवावरून जर तो वास सहन होत असेल (कुंपण इमारतीपासून/खेळण्याच्या जागेपासून दूर असेल तर कमी त्रास होईल) तर वापरा. शेतकरी सापांना जनावरांपासून दूर ठेवण्यासाठी गोठ्याच्या आजूबाजूला वापरतात. फक्त थायमेट पाण्याच्या प्रवाहात मिसळणार नाही वा कोणाच्या पोटात जाणार नाही याची काळजी घ्या.
  • Log in or register to post comments

गारूडी बनायचे प्रशिक्षण घ्या.

अजया
Mon, 03/07/2016 - 10:05 नवीन
गारूडी बनायचे प्रशिक्षण घ्या.
  • Log in or register to post comments

इतके वेगवेगळे उपाय

नाव आडनाव
Mon, 03/07/2016 - 18:26 नवीन
इतके वेगवेगळे उपाय सुचवण्यासाठी धन्यवाद मित्रांनो :)
  • Log in or register to post comments

हाण्ण्ण्ण तेजायला. लेख अन

बॅटमॅन
Mon, 03/07/2016 - 19:35 नवीन
हाण्ण्ण्ण तेजायला. लेख अन प्रतिसाद दोन्ही कहर =)) =)) =))
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

श्रीरंग_जोशी
Tue, 03/08/2016 - 00:55 नवीन
लेख अन प्रतिसाद दोन्ही कहर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

थायमेट नको, वेखंड वापरा.

वाचक्नवी
गुरुवार, 03/10/2016 - 15:23 नवीन
सापांना दूर ठेवण्यासाठीचा परंपरागत उपाय म्हण्जॅ वेखंडाची पूड. वेखंडाचा वास बेक्कार नसतो, तर वेखंड सुगंधी असते. लहान मुलांच्या अंथरुणाभोवती वेखंडाच्या पावडरची रांगोळी काढण्याची पूर्वापार प्रथा आहे. .
  • Log in or register to post comments

हेच सांगायला आले होते.

नूतन सावंत
गुरुवार, 03/10/2016 - 23:06 नवीन
हेच सांगायला आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक्नवी

गाणं लावा - "तु मेरी दुश्मन ,

कविता१९७८
गुरुवार, 03/10/2016 - 15:40 नवीन
गाणं लावा - "तु मेरी दुश्मन , दुश्मन मै तेरा... तु नागिन मै सपैरा.... तु नागिन मै सपैरा..........." निदान नागिणी यायच्या बंद होतील. मग नागिणींच्या धाकाने नागही बाहेर पडणार नाहीत.
  • Log in or register to post comments

सोसायटीतल्या लोकांनी 'बिलानशी

सूड
गुरुवार, 03/10/2016 - 16:10 नवीन
सोसायटीतल्या लोकांनी 'बिलानशी नागीन निंगाली, नागोबा डुलाया लागला' गाण्यावर समुहनृत्य करा.
  • Log in or register to post comments

हे गाणं लावलं तर नागिणी

सतीश कुडतरकर
Fri, 03/11/2016 - 11:54 नवीन
हे गाणं लावलं तर नागिणी पाहायला अख्ख्या गावातले नाग सोसायटीत येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

http://www.misalpav.com/node

होबासराव
गुरुवार, 03/10/2016 - 16:15 नवीन
http://www.misalpav.com/node/17219
  • Log in or register to post comments

हसुन हसुन वाट लागली.

हेमंत लाटकर
गुरुवार, 03/10/2016 - 22:48 नवीन
हसुन हसुन वाट लागली.
  • Log in or register to post comments

अर्रे काय हे --/\--

पियुशा
Fri, 03/11/2016 - 10:40 नवीन
अर्रे काय हे --/\--
  • Log in or register to post comments

http://www.snake-removal.com

सुबोध खरे
Fri, 03/11/2016 - 11:46 नवीन
http://www.snake-removal.com/repellent.html
  • Log in or register to post comments

वाढलेले तण काढून टाका

मराठी कथालेखक
Fri, 03/11/2016 - 11:55 नवीन
वाढलेले तण काढून टाका काही काळ हिरवळ पण साफ केलीत तर बरे अंधार्‍या जागा राहू देवू नका, सगळीकडे प्रकाशाची व्यवस्था करा
  • Log in or register to post comments

जॅक डॅनिएलशी मैत्री करा. तो

बाळ सप्रे
Fri, 03/11/2016 - 12:05 नवीन
जॅक डॅनिएलशी मैत्री करा. तो सर्पमित्र आहे. मग मित्राचा मित्र अशी ओळख सापाला सांगा. मग एकदा साप ओळखीचा झाला की मग काय घाबरायचं.. एखादं बीळ खणून घ्या आवारात मग सोसायटीला सिक्युरीटीचीपण गरज नाही :-)
  • Log in or register to post comments

सापाची जनरल चालः ~~~~~~

गवि
Fri, 03/11/2016 - 12:20 नवीन
सापाची जनरल चालः ~~~~~~ माणसाची जनरल चालः ------ पुरेश्या जॅक डॅनियलनंतर माणसाची चाल: ~~~~~~ पुरेश्या जॅक डॅनियलनंतर सापाची चाल: ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

जॅक डॅनिएल फक्त माणसाला

बाळ सप्रे
Fri, 03/11/2016 - 12:37 नवीन
जॅक डॅनिएल फक्त माणसाला द्यायची.. सापाला नाही.. मग दोघांची चाल सारखी होइल.. मग मैत्री होइलच की चालताचालता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा