Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रौशनी.. ५

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 01/21/2008 - 20:13  ·  लेख
लेख

Book traversal links for रौशनी.. ५

  • ‹ रौशनी.. ४
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
94923 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 01/21/2008 - 21:02 नवीन

तात्या,

छानच आहे हा भाग. उत्कंठा वाढते आहे... बिपिन.
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Mon, 01/21/2008 - 21:13 नवीन

छान......

छान...... , बरेच दिवसानी रोशनी वाचून आनन्द वाटला. पुढचा भाग लवकर येउ द्या....
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/21/2008 - 21:23 नवीन

बर्‍याच दिवसांनी

बर्‍याच दिवसांनी रोशनीला पाहून संतोष जाहला!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/21/2008 - 21:27 नवीन

रोशनी.....!!

तात्या,
रौशनीचा ह्या भागात तुमच्या गप्पा चालू असतांना  आम्ही शेजारी उभे राहून हे सर्व ऐकतोय असे चित्र उभे राहिले. हा भागही अगदी ओघवता आणि अतिशय सुंदर झाला आहे. या भागात तिला असलेली गाण्याची आवड, तीची मुलगी आणि जाफरभाइच्या  बिर्यानीची याद राहील. हा भाग आवडला हे सांगने न लगे, पुढील भागात काय असेल याची उत्सुकता आहेच !!!!

अवांतर :- लेखकाला गाण्याची आवड आहे, म्हणुन प्रसंगाच्या निमित्ताने गाण्याविषयी लेखक भरुभरुन लिहितो असे नाही ना ? 


तात्याच्या लेखनाचा फॅन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 07:43 नवीन

अस्सच!

तात्या, रौशनीचा ह्या भागात तुमच्या गप्पा चालू असतांना आम्ही शेजारी उभे राहून हे सर्व ऐकतोय असे चित्र उभे राहिले. हा भागही अगदी ओघवता आणि अतिशय सुंदर झाला आहे. हा भाग आवडला हे सांगने न लगे, पुढील भागात काय असेल याची उत्सुकता आहेच !!!! अगदी अस्सच!!! आता मात्र पुढला भाग लवकरात लवकर टाका बॉ :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नंदन Tue, 01/22/2008 - 10:32 नवीन

हेच

म्हणतो, तात्या. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे. [शिवाय, तुला सवड मिळेल तेव्हा 'शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई'चे पुढचे भागही लिही. त्याची सुरुवात फार छान झाली आहे.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ब
बेसनलाडू Tue, 01/22/2008 - 18:50 नवीन

सहमत आहे

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ध
धोंडोपंत Mon, 01/21/2008 - 21:32 नवीन

वा तात्या

वा तात्या, पहिल्या चार भागांसारखा हा भागही उत्तम आहे. उत्कंठा शिगेला पोहोचलेय. ही रौशनी अजून काय काय गुपिते उघड करेल हा विचार करतांनाच हा भाग संपला. उत्कंठा अजून ताणली गेली. पुढील भाग आता लवकरात लवकर येऊदे. झकास लेखन झालाय. शुभेच्छा. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 01/21/2008 - 21:37 नवीन

तात्या,

इतकी थोडी-थोडी बिर्याणी वाढताय की अंमळ "अडजीभ खाऊन पडजीभ बोंबलली" असं वाटतयं हो! जरा जोरकस ताटभरुन येऊ द्या की राव! लिखाण बाकी फक्कड हों तुमचें:)!! चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 01/22/2008 - 14:16 नवीन

च्या मारी

अगदी हेच म्हणातो.. पुढचे भाग जरा भरभर लिहा नाहीतर कथा तरी भरभर पुठे पळवा..असे आशेला लावून ठेऊ नका.. हा ही भाग उत्तम हे सांगणे न लगे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्राजु Mon, 01/21/2008 - 22:57 नवीन

हे नेहमीचेच..

अशा उत्कंठावर्धक ठिकाणी भाग संपवायचा आणि पुढचा भाग १ महिन्यानी लिहायचा.. तात्या शोभतं तुम्हाला हे. हा भाग ही इतर भागांप्रमाणे तरल झाला आहे. आता पुढच्या भागासाठी किती प्रतिक्षा करावी लागणार आहे हे देव आणि तात्याच जाणोत.. लवकरच यावा ही देवाला आणि तात्याना प्रार्थना.. (ह्.घ्या.) :))) - प्राजु
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 01/21/2008 - 23:03 नवीन

रोशनी

तात्या, फारच सुंदर लेखन! मी लहानाचा मोठा मोरलँड रोड, नागपाडा भागात झालो. फोरास रोड, कामाठीपुरा, फॉकलंड रोड, चोर बाजार इ. भाग हा आमचा परिसर. आमची शाळेची वाटही ह्या भागातुन जात असे. आम्ही रात्री बेरात्री याभागात मिळणारे विविध खाद्य पदार्थ खाण्यासाठि फिरत असु. परंतु आम्हाला याचा (इथल्या घटना, नित्यक्रम यांचा)ताप नसे. फोरास रोड वरच्या बच्चुभाईच्या वाडीत शिग कबाब व पराठे खाण्यासाठी आम्ही तेथे फेरफटका मारायचो. मोहंमद अली रोड ते भायखळा हा भाग अपना एरिया, इतके त्याभागावर प्रेम. नागपाडा सोडताना अतिव दु:ख झाले. आमचे शाळामित्र ह्याच भागातले. गुन्हेगारी, स्मगलिंग, टोळियुद्धे हे आमच्या नित्य पहाण्यातले. परंतु आम्ही स्वतःला या प्रकारांपासुन अलिप्त ठेवले. हे सर्व प्रकार करणारे, स्थानीक लोकांना याचा उपद्रव होउ देत नसत. नागपाडा सोडल्याला आता आठ वषे झाली. आपली रोशनी वाचताना मी परत माझ्या भागात फिरतोय असे वाटते. संजय अभ्यंकर
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 01/21/2008 - 23:06 नवीन

बडा ख्याल!

सुरुवातीची नोमतोम संपून आता बड्या ख्यालाला सुरुवात झालेय. तात्या तब्येतीत होऊन जाऊ द्या. आम्ही मैफिलीत आहोतच... तुम्हाला दाद द्यायला. चांगला रंग भरा.
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 01/22/2008 - 07:38 नवीन

खूप छान

पुन्हा एकदा उत्कंठा ताणलेय्...तुमची लिहिण्याची स्टाईल एकदम मस्तंच्....
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Tue, 01/22/2008 - 10:33 नवीन

सुरेख

तात्या तुम्ही जिक्लाय..........
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 01/22/2008 - 10:53 नवीन

तात्या शेठ

आता तात्या कपुर न बनता पटपट भाग येवु देत. उत्सुकता वाढली आहे :)
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 01/22/2008 - 12:20 नवीन

निवडुंगमधली लालन सारंग

तात्या, रौशनी मस्त होते आहे. जरा लवकर लिहा बुवा. अवांतर - आता रामनाथबरोबर पळून गेलेली रौशनी त्याच्या व्यसनाधीनतेमुळे घरवाली कशी बनते ते वाचण्याची उत्सुकता आहे. 'निवडुंग' चित्रपटातली लालन सारंगची व्यक्तीरेखा (नाव आठवत नाही) काहीशी अशीच होती नाही का? परवाच दिलखुलास या 'मी मराठी' वाहिनीवरच्या कार्यक्रमात वेश्याव्यवसायावर उघड चर्चा झाली. त्यातल्या बर्‍याच वेश्यांची हीच कहाणी होती. त्या चर्चेत भाग घेणार्‍या एका समाजसेवकाचे (पुन्हा नाव आठवत नाही) म्हणणे मनात घुसून बसले आहे - "वेश्याव्यवसाय हा समाजाचा सेफ्टी व्हॉल्व आहे असे म्हणणारी माणसे करंटी आहेत. वेश्यांमुळे आपल्या आया-बहिणी सुरक्षित राहू शकतात म्हणून तो व्यवसाय चालू द्यावा असे मत असणार्‍यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या आया-बहीणी तिथे पाठवाव्यात आणि सामाजिक सुरक्षिततेला मोलाचा हातभार लावावा."- इति.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 01/22/2008 - 12:20 नवीन

प्रतिक्षा..

बर्‍याच प्रतिक्षेनंतर रौशनी आली परत, आता मात्र लवकर लिही पुढे,उत्सुकता जास्त ताणू नको बाबा,:)..असे इतरांसारखेच म्हणते. नेहमीप्रमाणेच हा भाग सुध्दा छान जमून आला आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/22/2008 - 12:21 नवीन

वा.. वाचनीय

वा.. वाचनीय भाग, पुढील भाग लव्कर लिहा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 01/22/2008 - 21:09 नवीन

????

उत्सुकता! ही प्रश्नचिन्ह उत्कंठा निर्माण करतात. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/26/2008 - 09:43 नवीन

आभार/उत्तरे...

प्रतिसाद देणार्‍या आणि न देणार्‍या (केसु ष्टाईल) सर्व वाचकांचे आभार... काही उत्तरे - बिरुटेशेठ, अवांतर :- लेखकाला गाण्याची आवड आहे, म्हणुन प्रसंगाच्या निमित्ताने गाण्याविषयी लेखक भरुभरुन लिहितो असे नाही ना ? हो, असे काहीसे आहे खरे! :) नंदनशेठ, [शिवाय, तुला सवड मिळेल तेव्हा 'शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई'चे पुढचे भागही लिही. त्याची सुरुवात फार छान झाली आहे.] हो, नक्की लिहीन... संजय अभ्यंकर नागपाडा सोडल्याला आता आठ वषे झाली. आपली रोशनी वाचताना मी परत माझ्या भागात फिरतोय असे वाटते. धन्यवाद संजयराव! विसूनाना, अवांतर - आता रामनाथबरोबर पळून गेलेली रौशनी त्याच्या व्यसनाधीनतेमुळे घरवाली कशी बनते ते वाचण्याची उत्सुकता आहे. हा शोध तुम्हाला केव्हा लागला? रौशनी रामनाथसोबत पळून गेलेली नव्हती, तसेच रामनाथ व्यसनाधीन होता असेही कधी मला रौशनीने सांगितले नाही! असो, विसूनाना तुम्ही एक काम करा. नाहीतरी तुम्ही वेगवेगळे शोध लावताच आहात तर आत्तापर्यंतच्या कथेनुसार रौशनीची पुढील कथा तुम्हीच लिहा तिच्यायला! ती वाचायला मी उत्सुक आहे. रौशनीची आत्तापर्यंतची कथा ही सत्यकथा आहे. त्यावर आधारीत काल्पनिक अंदाजच जर तुम्हाला बांधायचे असतील तर या पुढील कथा तुम्हीच पूर्ण करा. माझं काहीच म्हणणं नाही! च्यामारी मी तरी पुढे लिहिण्याचा त्रास कशाला घेऊ? ऑर्कुटवर देखील कुण्या महाभागाने रौशनीची कथा लिहिलेली आहे असे कुठेतरी वाचनात आले, त्याचेही कुणी दुवे दिल्यास मी आभारी राहीन. म्हणजे तो सद्गृहस्थ पुढे काय लिहितो हे वाचनास मी उत्सुक राहीन! असो, लोक रौशनीबद्दल पुढचे अंदाज बांधू लागले आहेत, विसूनानांसारखे छातीठोकपणे पुढचे दावे करू लागली आहेत, कुण्या महाभागाला ती ढापून ऑर्कुटवर आणाविशी वाटली हेच मी रौशनीचे यश समजतो..! असो, पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार... आपला, (खुद्द रौशनीला पाहिलेला मूळ लेखक!) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sun, 03/14/2010 - 17:49 नवीन

तात्या,

रोशनी ची कथा इथेच थांबवलीत का?????? ----- सौरभ :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मी-सौरभ Mon, 02/27/2012 - 20:32 नवीन

तातूस

काय झालं? रोशनीची कहाणि पुढे कधी सरकवताय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
स
स्वाती राजेश Sat, 01/26/2008 - 14:53 नवीन

मस्त लेखनशैली

रोशनी चे पुढील भाग लवकरच टाका खूप उत्सुकता लागली आहे.. रोशनी चे पहिले सर्व भाग अप्रतिम लिहिले आहेत.. ते वाचत होते त्यामुळे प्रतिक्रियेस उशीर झाला. एवढ्या छान लेखकाला उशीरा प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल क्षमस्व. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 01/28/2008 - 20:14 नवीन

बाजार, चांदनी ......

बार, इ. चित्रपट डोळ्यांसमोर उभे राहिले. खरे म्हणजे १ ते ५ भाग आतांच वाचले. अमिताची कहाणी हृदयद्रावक आहे. सत्याची दाहकता वर्णन करून सांगता येत नाही. आपण बरेच कणखर आहात. अमिताची कहाणी ऐकून मी तर कृष्णाचे काम त्वरित केले असते. निदान जीवतोड प्रयत्न केले असते. हल्लीच एक भाषांतरित कादंबरी वाचली. मूळ काश्मिरी कादंबरी. कश्मीर्मधील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवरील. त्यात एका वेश्येसाठी एक मनस्वी तरूण आयुष्य कसे उधळतो ते आठवले. सुन्न झालो. पुढील भाग लवकर येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/29/2008 - 02:27 नवीन

तात्या,

अहो, रागावू नका. पण तुम्हीच लवकर लिहायला घ्या रोशनी. कारण, जितका तुम्ही वेळ कराल तितके अंदाज किंवा काल्पनिक कथा बांधल्या जातील. तुमची रोशनी.. तुमच्याच शब्दांत वाचायची आहे. कारण तुम्ही तिला पाहिली आहे. तिच्याशी गोष्टी केल्या आहेत तुम्ही. तिला तुमच्याइतके स्पष्ट आणि तरल कोण वर्णु शकेल? तेव्हा आता... लग जाईये काम पे! - प्राजु
  • Log in or register to post comments
झ
झंप्या Tue, 01/29/2008 - 05:56 नवीन

जम्या नही!

तात्या ये भाग कुछ जम्या नही! एखाद्या सिरियल प्रमाणे चिंगम सारखे हे भाग आता तू ताणत आहेस असे वाटत आहे. वर कुणीतरी म्हंटल्या प्रमाणे पुढच्या 'एपिसोड' मध्ये जरा जास्त बिर्याणी वाढ आता!!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/01/2008 - 22:08 नवीन

तडपाना

तात्या.. आपल्या 'रौशनी' चा प्रत्येक अपूर्ण भाग कायम आम्हाला 'तडपाना ' म्हणजे काय याचा प्रत्यय देत आहे....कृपया पुढचे भाग लवकर लिहुन ही हूरहूर थांबवा... (तात्यांच्या लेखनाला दाद देणारा) डॅनी..... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Fri, 02/22/2008 - 10:32 नवीन

पुन्हःप्रत्ययाच आनन्द दिलात

तात्या मजा आणलीत राव..... एकदम बाबा कदमान्ची आठवण झाली. पण किती दिवस नुसति बिर्याणीच खात बसलाय ...पुढचे भाग लवकर लिहा. (बिर्यणी चाहता) आम्बोळी
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sun, 03/16/2008 - 20:11 नवीन

बाबा कदम

एकदम बाबा कदमान्ची आठवण झाली हेच म्हणतो. बाबा कदम, सरकारी रेस्ट हाऊस, सोनेरी रंगाचे पेग, करुणेची झालर असणारी (लेकिन दिल की अच्छी!) अशी नायिका, वाफाळत्या बिर्याण्या, फिश फ्राय, शास्त्रीय संगीतातल्या उस्तादांचे उल्लेख.... मराठीत एकता कपूरसारखी निर्माती नाही याचे शल्य वाटते. The meek shall inherit the earth. Are you sufficiently meek? Ask yourself! सन्जोप राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
व
विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 12:41 नवीन

आभार..

स्वाती राजेश, सुधीरराव, प्राजू, झंप्या, मिराशीसाहेब, आंबोळी, आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.... पुढचा भाग लिहितो लवकरच. सध्या कामाच्या गडबडीत असल्यामुळे हवा तसा निवांतपणा मिळत नाही. थोडी सवड मिळाली की पुन्हा एकदा रौशनीच्या विश्वात जाईन.. तात्या.
  • Log in or register to post comments
प
पराग Fri, 03/07/2008 - 20:40 नवीन

पुढचा भाग

पुढचा भाग कधी लिहीनार ?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/08/2008 - 08:34 नवीन

लवकरच..

लिहितो लवकरच.. धन्यवाद, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पराग
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 03/08/2008 - 22:26 नवीन

वा !!!

हा भाग वाचण्यात आलाच नव्हता. आज वाचला.. इतर काही वाचकांनी लेखमाला "हळू हळू पुढे सरकते आहे" असे अभिप्राय दिले आहेत. पण आम्ही त्यांच्याशी अजीबात सहमत नाही. - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी Sun, 03/16/2008 - 15:01 नवीन

िव्कास०१५

िव्कास०१५४ तात्या तो महाभाग सापडला......त्यानेच रौशनी ऑर्कुटवर copy-paste केली आहे http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=21132317&tid=2576143168354681902&na=4 त्याने तुम्ह्च्याच नावाने रौशनी ऑर्कुटवर copy-paste केली आहे ...... "रौशनी" या कथेचे मूळ लेखक - तात्या अभ्यंकर. हे आहेत मी फक्त misalpav.com वरुण coppy पेस्ट केली आहे. मी या कथेचा लेखक नाही. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=21132317&tid=2576143168354681902&na=2&nst=47 .......................................................................... आप्ला लेख्नाचा एक िनिस्सम चाह्ता.... िवकास िशदे....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 15:15 नवीन

धन्यवाद,

धन्यवाद साहेब! आपण मुद्दामून ऑर्कुटवर जाऊन रौशनीचा शोध घेतलात याचे खरंच कौतुक वाटते! "रौशनी" या कथेचे मूळ लेखक - तात्या अभ्यंकर. हे आहेत मी फक्त misalpav.com वरुण coppy पेस्ट केली आहे. मी या कथेचा लेखक नाही. याचे आम्हाला लेखक म्हणून समाधान आहे. तो महाभाग साहित्यचोर नाही हे कळले आणि खूप खूप बरे वाटले. आता उलटपक्षी आम्ही त्याला रौशनीला त्याने स्वत:हून ऑर्कुटवर प्रसिद्धी दिल्याबद्दल त्याचे आभार मानतो! ऑर्कुटवरदेखील काही लोक रौशनी वाचत आहेत, तिच्या दुव्यांचा ट्रॅक ठेवीत आहेत, प्रतिसादही देत आहेत हे पाहून खरंच खूप बरे वाटले. प्रत्यक्षात आंतरजालीय जगताशी पूर्णत: अनभिज्ञ असलेल्या आमच्या रौशनीला, आज आंतरजालीय जगतात ओळख मिळते आहे याचे समाधान वाटते! आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद िव्कासराव! आपला, (रौशनीच्या आठवणीने किंचित ह़ळवा झालेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास्_मी मराठी
अ
अभिज्ञ Sun, 03/16/2008 - 15:40 नवीन

रोशनि....

नमस्कार. तात्या, विकास राव ह्यानि दिलेलि लिंक पाहिलि.आपला त्यावर आलेला प्रतिसाद हि वाचला. परन्तु ,हि कथा मराठी विनोद --हसण्यातच मजा आहे अशा कम्युनिटिवर प्रसिद्द झालि आहे. आता या कथेत हसण्यासारखे काहिहि नाहि.उलट हि एक चान्गलि साहित्यकृति आहे. मिसळपाव वरिल लेख नुसते लिन्क देउनहि पाठवता आले असते. ते पेस्ट करण्याचे काय कारण?आणी ते पण कुठल्या ठिकाणि? हे प्रश्न राहतातच. (रोशनि प्रेमि)अबब
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 16:06 नवीन

अबबराव,

अबबराव, तुमचं म्हणणं खरं आहे. पण जाऊ द्या! काय करणार? अहो जिथे सार्‍या जगानेच आमच्या रौशनीचं हसं केलं त्याला ऑर्कुट तरी कसं अपवाद असणार?! तेव्हा चालायचंच! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
न
नन्दु Sun, 03/16/2008 - 20:29 नवीन

वा!!!!!!!!!!!!!

तात्या लवकर पुडचा भाग येऊ द्या मी रोशनि ओर्कुत वेर प्रथम वाचलि अनि त्या खना पासुन तुम्चा फ्यान झालो "रौशनी" या कथेचे मूळ लेखक - तात्या अभ्यंकर. हे आहेत मी फक्त misalpav.com वरुण coppy पेस्ट केली आहे. मी या कथेचा लेखक नाही. हेय वाचुन मग मिसल् पाव ल भेट दिलि अनि हेय क्य इथे अलो व इथ् लाच झालो मिसल पव चि पहिलि ओल्ख रोशनी मुले झालि माझि तर तात्या लवकर पुड्चा भाग लिहा
  • Log in or register to post comments
ह
हर्शल Sun, 03/16/2008 - 20:36 नवीन

तात्या ये

तात्या ये भाग कुछ जम्या नही! एखाद्या सिरियल प्रमाणे चिंगम सारखे हे भाग आता तू ताणत आहेस असे वाटत आहे. वर कुणीतरी म्हंटल्या प्रमाणे पुढच्या 'एपिसोड' मध्ये जरा जास्त बिर्याणी वाढ आता!!
  • Log in or register to post comments
इ
इसम Sun, 03/16/2008 - 21:09 नवीन

बाबा कदम

तात्या मजा आणलीत राव..... एकदम बाबा कदमान्ची आठवण झाली. काय चुकतंय तात्या? उत्साहाच्या भरात अतिरन्जित लिखाण होतेय का? शब्द्संपत्ति तोकडी पडतेय की नको त्या ठिकाणी नको ती वर्णने येतायत? क्रमश: च्या नादात मूळ गाभ्या कडे दुर्लक्ष झालेय का? मग पिटातून शिट्ट्या का ऐकू येतायत? -एक इसम
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 22:57 नवीन

इसमराव,

काय चुकतंय तात्या? माझ्या मते काहीच चुकत नाहीये! उत्साहाच्या भरात अतिरन्जित लिखाण होतेय का? नाही. जे काही लेखन आहे ते केवळ अन् केवळ सत्य घटनेवर आधारीत आहे. सत्य घटनेवर आधारीत, जे घडलं तसं लिहिलं आहे, ते जर कुणाला अतिरंजित वाटलं तर वास्तव किती भयानक असेल याची कल्पना करा! असो, स्वत:च्या ए सी दिवाणखान्यात बसून अतिरंजित लेखन किंवा बाबा कदमांची कांदंबरी वाटते आहे असे शेरे मारणे हे मी समजू शकतो! अहो ज्यांनी कधी रंडीबाजारात नौकरी तर सोडाच, परंतु साधी चक्करही मारली नाही, दारूच्या गुत्त्यावर काम केले नाही, त्या सुशिक्षित, उच्चशिक्षित पांढरपेशी वर्गाला या लेखनाबद्दल काय वाटेल, कसं वाटेल हे मी कसं सांगू? शब्द्संपत्ति तोकडी पडतेय की नको त्या ठिकाणी नको ती वर्णने येतायत? शब्दसंपत्तीची काहीच गरज नाही. कारण जे आहे जसं आहे, जसं घडलं, ते घडताना मला जे वाटलं तेच मी माझ्या शब्दात मांडलं आहे. शब्दसंपत्तीची गरज कल्पित साहित्य लिहिणार्‍याला लागते! नको त्या ठिकाणी नको ती वर्णने येतायत? मुळीच नाही. कारण सगळी वर्णनं ही सत्य घटनेनुसारच लिहिली आहेत आणि ती सत्यकथा जशी समोर आली तशीच लिहिली आहेत! प्रश्न आहे तो मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे असंही काही घडू शकतं हे समजण्याच्या कुवतीचा! क्रमश: च्या नादात मूळ गाभ्या कडे दुर्लक्ष झालेय का? असं मला वाटत नाही. मूळ गाभ्याकडे कुठे दुर्लक्ष झाले आहे असं आपल्याला वाटतंय? मुळात आपल्याला मूळ गाभा काय आहे तो माहित्ये का? मग पिटातून शिट्ट्या का ऐकू येतायत? ते कृपया पिटातल्या माणसांना विचारा! मी ते कसं काय सांगू शकणार? असो, आपण आपुलकीने काही प्रश्न विचारल्याबद्दल मी आपला आभारी आहे! आपला, (मुंबईच्या रंडीबाजारात नौकरी केलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इसम
अ
अवधुत पुरोहित Mon, 03/17/2008 - 05:39 नवीन

अब ईन्तजार नही होता...

(तात्या भक्त फिल्मी) अवधुत
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Mon, 03/17/2008 - 10:34 नवीन

खुलासा

मला तात्यान्ची आणि बाबा कदमान्ची अजिबात तुलना करावयाचि नव्हती .. दोघेही स्वतन्त्र प्रतिभा आसलेले लेखकु आहेत असा आमचा दावा आहे... फक्त ही कथा वाचुन बाबान्ची आठवण होण्यापलिकडे आम्हाला काहीही सुचवायचे नव्हते. असो. क्रमश: च्या नादात मूळ गाभ्या कडे दुर्लक्ष झालेय का? एक वाचक म्हणुन आम्हाला तसे वाटत नाही.... पण दुसर्या कुठल्यातरी कामात गुन्तून पडून कथा पुर्ण करण्याकडे दुर्लक्श होत आहे असा आमचा आरोप आहे. (दावेदार) आम्बोळी
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न Mon, 03/17/2008 - 11:26 नवीन

पुढला भाग कधी येणार आहे?????

फार उत्सुकता लागली आहे, तरी लवकरात लवकर पुढील भाग प्रकाशित करावा हि विनती
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 03/20/2008 - 08:11 नवीन

पुढे काय?

भाग ५ न॑तरचे भाग कुठे आहेत्?का, अजुन तात्या॑नी लिहिलेच नाहीत्..लवकर अपलोड करा..
  • Log in or register to post comments
स
सन्दीप Tue, 04/01/2008 - 11:50 नवीन

रोशनि

तात्या उत्कन्था शिगेला पोहचवुन अर्ध्यवर का बरे सोदलेत आम्हला. पुधचा भाग लवकर येउन्दे. (आसुसलेला) सन्दीप
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 06/18/2008 - 13:46 नवीन

तात्या,

तात्या, तुम्ही आमचा मामा केलात हो...., पुढ्च्या महीन्याची वर्गणी नाहि भरणार मी...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 06/18/2008 - 14:33 नवीन

आला, आला ५

आला, आला ५ वा भाग आला!! वाचते मग शांतपणे.. :) अजुनही क्रमशः आहेच का? लवकर लवकर टाका.
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 06/18/2008 - 22:04 नवीन

क्या यार

सौ गज दिखाते हो दो गज फाडते हो. तहान भागत नाही हो चारच घोटात. जे जसे आहे तसेच सादर करण्याच्या शैलीमुळे रंगतदार झाले आहे. ( प्रतीक्षेत) रामदास
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा