काटा हालेना, काटा चालेना
मित्रांनो!! तुमच्या सगळ्या शिव्या-शाप मंजुर पण माझ्या ह्या पापात जरा सहकार्य करा.
लवकरच आमच्या माजी विद्यार्थ्यांचा योगा कॅम्प होऊ घातलाय. कॅम्प उत्तर काही मनोरंजन कार्यक्रम आहेत त्यात मला 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे विडंबन सादर करायचं आहे.… काही यमक चालीत बसत नाहीयेत… वेळ कमी आहे म्हणून मिपादारी गाऱ्हाणं घालायला आलोय. कृपया मदत करावी.
काटा हालेना, काटा चालेना,
आम्ही खंत करी, काही केल्या खाली सरकेना.
पाहिल्या शिल्पाच्या सिडी,
म्हंटली तिजसवें गाणी,
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे.
गेलो प्रत्येक जिमच्या दारी,
हर्ष दरवळला मनी,
घामासवें गळाले अवसान रे.
चल ये रे, ये रे गड्या,
धावू जरा मारू बैठक्या,
पाया गोळे येवूनि, झालो हैराण रे,
हे पोटाचे अंगण,
आम्हां दिले आहे आंदण,
उणे करू आपण सारेजण रे.
योग करण्याचे किडे,
ह्यांची धाव आरोग्याकडे,
आपण करू फक्त पेयपान रे.
काटा हालेना, काटा चालेना
आम्ही खंत करी, काही केल्या खाली सरकेना
काटा हालेना, काटा डुलेना
परफेक्ट
हे पोटाचे अंगण ऐवजी हा पोटाचा
=))
परफेक्ट
एससाहेब अप्रतिम विडंबन कराल..
जोर लगाके!
२ ऱ्या कडव्यात एक करेक्शन केलंय
कुंथलीऐवजी तिंबली करा.
मंजूर
आम्ही खंत करी, काही केल्या
हे कसे वाटते बघा....
ॠतुजाचे डाएटचे सल्ले,शिप्लाचे
एकदम मस्त…