✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कुंकवाचा भार ना होतो कपाळी ...

व — विशाल कुलकर्णी, Mon, 01/04/2016 - 16:21
तू तरी कोठे तशी हसतेस आता बोलक्या मौनासही जपतेस आता पालखी माथ्यावरी रुतलीच आहे जोखडांना सौख्य तू म्हणतेस आता कुंकवाचा भार ना होतो कपाळी 'भाग्य' म्हणुनी त्यास का फसतेस आता कोडगा तो उंबरा हसतो मुक्याने का स्वतःची वंचना करतेस आता दांभिकांचे दंभ तू नाकार वेडे तूच दुर्गा, कालिका असतेस आता विशाल

प्रतिक्रिया द्या
3261 वाचन

💬 प्रतिसाद (19)

वाह.... मस्तच आहे!! आवडले!!

शार्दुल_हातोळकर
Mon, 01/04/2016 - 17:24 नवीन
वाह.... मस्तच आहे!! आवडले!!
  • Log in or register to post comments

वाह.... मस्तच

पालीचा खंडोबा १
Mon, 01/04/2016 - 17:26 नवीन
वाह.... मस्तच
  • Log in or register to post comments

लोडेड आहे बे!!

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 01/04/2016 - 18:30 नवीन
लोडेड आहे बे!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद __/!\__

विशाल कुलकर्णी
Mon, 01/04/2016 - 19:09 नवीन
धन्यवाद __/!\__
  • Log in or register to post comments

संपादक मंडळी, शेवटच्या

विशाल कुलकर्णी
Mon, 01/04/2016 - 21:30 नवीन
संपादक मंडळी, शेवटच्या द्वीपदीत अर्ध्वयूंचे दंभ तू नाकार वेडे अर्ध्वयूंचे हा शब्द चुकला आहे, तो 'अध्व र्यू' असा हवा, पण त्यामुळे वृत्तभंग होतोय, त्याऐवजी 'दांभिकांचे'हा शब्द टाकाल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments

संपादक नाही पण साहित्य

सस्नेह
Tue, 01/05/2016 - 11:20 नवीन
संपादक नाही पण साहित्य संपादकांनी केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

धन्यवाद :)

विशाल कुलकर्णी
Tue, 01/05/2016 - 12:27 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सुंदर.

प्रचेतस
Mon, 01/04/2016 - 21:45 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

क्या बात!!

सटक
Mon, 01/04/2016 - 21:54 नवीन
क्या बात!!
  • Log in or register to post comments

झकास हो विकुभौ!

बोका-ए-आझम
Mon, 01/04/2016 - 22:53 नवीन
का कुणास ठाऊक पण खालील ओळी आठवल्या - पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी । आपुल्या घरीच हाल सोसते मराठी । हे असे कित्येक खेळ पाहते मराठी । शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।
  • Log in or register to post comments

धन्यवाद देवा, मेहनत सार्थकी

विशाल कुलकर्णी
Tue, 01/05/2016 - 07:56 नवीन
धन्यवाद देवा, मेहनत सार्थकी लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मस्त, खल्लास कविता

शैलेन्द्र
Tue, 01/05/2016 - 08:46 नवीन
मस्त, खल्लास कविता
  • Log in or register to post comments

झकास

मित्रहो
Tue, 01/05/2016 - 10:30 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments

काही ओळींनंतर प्रश्नचिन्ह

माहितगार
Tue, 01/05/2016 - 10:53 नवीन
काही ओळींनंतर प्रश्नचिन्ह गृहीत असावे असे वाटते तसे 'कुंकवाचा भार ना होतो कपाळी' या ओळीनंतरही प्रश्नचिन्ह अभिप्रेत आहे का ?
  • Log in or register to post comments

ते वाचकांवर सोडलेले आहे ...

विशाल कुलकर्णी
Tue, 01/05/2016 - 12:29 नवीन
ते वाचकांवर सोडलेले आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

सुंदर कविता.

सस्नेह
Tue, 01/05/2016 - 11:20 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता!

प्राची अश्विनी
Wed, 01/06/2016 - 18:07 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Wed, 01/06/2016 - 19:11 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

छान कविता!

एस
Wed, 01/06/2016 - 20:29 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा