आमची घोडचूक झाली हे आम्हास मान्य आहे, धन्यवाद !!!
धन्यवाद बिरुटेशेठ!
प्रथम तुमची क्षमा मागतो, परंतु तुमच्यासारखा जिंदादिल माणूस या शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या सोकॉल्ड डुढ्ढाचार्यांना आणि त्यांच्या शाणपट्टीला बळी पडून फुकट जाऊ नये, स्वत:ची रसिकता हरवून जाऊ नये म्हणूनच आम्हाला अंमळ कडक शब्द वापरावे लागले आणि मिपावर व्याकरंण-शुद्धलेखनावरील लेखनाला बंदी आणावी लागली..
बिरुटेशेठ, तसा माझा तुमच्यावर डायरेक्ट राग नाही, तुम्ही फक्त निमित्त ठरलात!
परंतु या व्याकरण-शुद्धलेखनवाल्यांना वेळीच जागच्या जागी ठेचले नाहीत तर पुढे पुढे ही मंडळी फारच शेफारतात असा अनुभव आहे. शुद्धलेखन-व्याकरणाकरता मनोगतावर, उपक्रमावर, किंवा आणखी कुठल्या संस्थळावर अगदी भरपूर जागा आहे तिकडे जा म्हणावं फोकलिच्यांनो आणि शुद्धलेखनाच्या नावाने काय घालायचा तो नंगानाच, धिंगाणा घाला म्हणावं आणि हव्वी तितकी शाणपट्टी करा! :)
मिसळपावचा त्याकरता गैरवापर होऊ नये असं वाटतं!! :))
पुन्हा एकदा क्षमस्व!
आपला,
(बिरुटेसरांचा विद्यार्थी!) तात्या.
र्हस्व-दीर्घासंबंधीचे नियम (नियम ५ ते ८). यांत एक बदल सुचवावासा वाटतो. - यास्मिन शेख :
तत्सम इ-कारान्त व उ-कारान्त शब्द दीर्घ लिहावेत, विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यास ते दीर्घच राहतात; फक्त सामासिक शब्दांत हे शब्द पूर्वपदी आल्यास, ते संस्कृताप्रमाणे र्हस्व लिहावेत, असा नियम आहे. ते शब्द सामासिक शब्दांत पूर्वपदीही दीर्घ लिहिल्यास या नियमाचे सुलभीकरण होऊ शकेल. संस्कृतची पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला, हा बदल केल्यामुळे, सामासिक शब्दलेखन करणे अधिक सोयीस्कर होईल. हाच नियम तत्सम इन्-प्रत्ययान्त (विद्यार्थिन्, पक्षिन्) शब्दाच्या बाबतीतही स्वीकारता येईल. जसे : विद्यार्थी - विद्यार्थीगृह, पक्षी - पक्षीमित्र. संदर्भ
प्रतिक्रिया
धन्यवाद,
पहिलं ते र्हस्व दिर्घ, ण आणि
हो, खरंच लय ठोकलयं! :)
:(
र्हस्व-दीर्घासंबंधीचे नियम (यांत एक बदल सुचवावास - यास्मिन शेख