✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शालेय अभ्यासातील आवडता विषय

क
कविता१९७८ यांनी
गुरुवार, 11/19/2015 - 20:17  ·  लेख
लेख
शाळा आणि काॅलेजमधे असताना प्रत्येकाचा कुठलातरी एक आवडता विषय असतोच. मला दहावी पर्यंत इंग्रजी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल हे विषय आवडायचे तर ज्युनिअर काॅलेजमधे ईंग्रजीबरोबर अर्थशास्त्र, इतिहास हे विषयही आवडु लागले. गणिताची फारशी आवड केव्हाच नव्हती. संस्कृत हो स्कोअरींग विषय होता. दहावीपर्यंत विज्ञानातही बर्‍यापैकी गुण मिळायचे. तुमचे आवडते विषय कोणते होते / आहेत???
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
20743 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

गणित...अज्याबात पाठांतर

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/19/2015 - 20:20 नवीन
गणित...अज्याबात पाठांतर नसायचे...१०-१५ मिनिटांत परिक्षेचा अभ्यास व्हायचा :)
  • Log in or register to post comments

शेम हिअर!

नया है वह
गुरुवार, 11/19/2015 - 20:24 नवीन
आणि लिखान सुद्धा कमी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तोंडी अभ्यास करायचो बिजगणिताचां

पगला गजोधर
गुरुवार, 11/19/2015 - 22:41 नवीन
आम्ही तर तोंडी अभ्यास करायचो बिजगणिताचां (सूत्रं मात्र पाठ पाहिजे बरका ) पुढे गणिता बरोबरच इंग्लिश व इतिहास आवडीचे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नया है वह

सगळ्यात आवडता म्हणजे

मांत्रिक
गुरुवार, 11/19/2015 - 20:30 नवीन
सगळ्यात आवडता म्हणजे कार्यानुभव. एकतर अगदीच टैम्पास काहीतरी असायचं आणि त्या शिक्षिका पण इतक्या गरीब होत्या की कुणाला म्हणून कधीच रागवायच्या नाहीत.
  • Log in or register to post comments

रसायनशास्ञ, जीवशास्ञ,

आदूबाळ
गुरुवार, 11/19/2015 - 20:30 नवीन
रसायनशास्ञ, जीवशास्ञ,
मराठी आवडायचं नाही हे ओघाने आलंच ;)
  • Log in or register to post comments

हाहाहाहा!! =))

मिहिर
Fri, 11/20/2015 - 06:14 नवीन
हाहाहाहा!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मला शाळाच आवडायची नाही !

मितान
गुरुवार, 11/19/2015 - 20:33 नवीन
मला शाळाच आवडायची नाही ! विषयांचा प्रश्नच नाही. गणिताच्या विज्ञानाच्या मराठीच्या सुद्धा तासांना वर्गाबाहेर उभं राहून बदामावरचे मुंगळे मोजलेलं आठवतं!
  • Log in or register to post comments

प्रतिसाद ऑफ द डे!!! +११११११

मांत्रिक
गुरुवार, 11/19/2015 - 20:36 नवीन
प्रतिसाद ऑफ द डे!!! +११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

+१००

Maharani
गुरुवार, 11/19/2015 - 21:29 नवीन
+१०० अगदी अगदी...पण नववी दहावीत अचानक इतिहास,भुगोल आवडते विषय बनले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

मला विज्ञान त्यातही

अजया
गुरुवार, 11/19/2015 - 21:25 नवीन
मला विज्ञान त्यातही जीवशास्त्र आणि फिजिक्स.समाजशास्त्र आणि मराठी पण फार आवडायचं.घरातल्या पुस्तक कृपेने अवांतर वाचन भरपूर असल्याने पुस्तकात असतो तो विषय अभ्यास असला तरी त्या पलीकडे हे सर्वच वाचन अभ्यास फार आनंददायी आहे हे उमगले कधीतरी शाळेच्याच दिवसात.
  • Log in or register to post comments

ते कोणता विषय कोण शिकवतं यावर

भाऊंचे भाऊ
गुरुवार, 11/19/2015 - 21:32 नवीन
ते कोणता विषय कोण शिकवतं यावर अवलंबुन असायच.
  • Log in or register to post comments

++१०००००

अन्नू
Sat, 11/21/2015 - 13:11 नवीन
ते कोणता विषय कोण शिकवतं यावर अवलंबुन असायच.
ज्युनिअरला असताना आमचा हिंदी हा सब्जेक्ट खुपच फेवरिट झाला होता; कारण तो विषय शिकवणार्‍या मिस लैच चिकण्या दिसत होत्या! ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

विषय भरकटवू नका...वेगळा धागा

टवाळ कार्टा
Sat, 11/21/2015 - 13:44 नवीन
विषय भरकटवू नका...वेगळा धागा काढा...जास्त प्रतिसाद येतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

शाळेमुळे किंवा कॉलेजमुळे

सुबोध खरे
गुरुवार, 11/19/2015 - 21:33 नवीन
शाळेमुळे किंवा कॉलेजमुळे माझ्या शिक्षणात कधीही व्यत्यय आला नाही
  • Log in or register to post comments

+१

राघवेंद्र
Fri, 11/20/2015 - 01:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खिक्क

टवाळ कार्टा
Fri, 11/20/2015 - 13:48 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गणित, अत्यंत आवडीचा विषय,

जव्हेरगंज
गुरुवार, 11/19/2015 - 21:36 नवीन
गणित, अत्यंत आवडीचा विषय, त्यातल्या त्यात बीजगणित तर भयंकर आवडीचा. त्याखालोखाल मराठी . इतिहास, भुगोल अजिबात आवडत नव्हते. इंग्रजी तर दुश्मन नबर वन. हिंदी भयानक किचकट वाटायचं. बस!
  • Log in or register to post comments

मराठी आणि इतिहास

समीर_happy go lucky
गुरुवार, 11/19/2015 - 21:38 नवीन
मराठी आणि इतिहास-नागरिकशास्त्र हे माझे प्रचंड आवडते आणि हमखास स्कोअरिंग विषय
  • Log in or register to post comments

व्याकरण व नागरिकशास्त्र सोडता

रेवती
गुरुवार, 11/19/2015 - 21:42 नवीन
व्याकरण व नागरिकशास्त्र सोडता सगळे विषय आवडायचे हे सत्य माझ्या शिक्षिका पचवू शकल्या नाहीत व त्यांनी मला दरवेळी कमी गुण दिले. ;)
  • Log in or register to post comments

लोकांची उत्तरे लै भारी आहेत!

पैसा
गुरुवार, 11/19/2015 - 21:52 नवीन
लोकांची उत्तरे लै भारी आहेत! आता विचार केला तर शाळेत असताना माझा नावडता विषय असा कोणताच नव्हता. कॉलेजात इकॉनॉमिक्स जरा जास्त आवडायचे आणि अकाउंटन्सी. कॉस्टिंग शिकवणारे कमालीचे रटाळ पद्धतीने बोलायचे. तासाला झोप यायची. त्यामुळे तो एक विषय नावडता झाला होता. खरे तर थंडीच्या दिवसात सकाळी ग्राउंडवर कोवळ्या उन्हात बसणे आणि मग ९ वाजता जवळचे पैसे मोजून मैत्रिणीसोबत रेखाचा एक किंवा २ वडे जे परवडेल ते आणि चहा दोघींत मिळून मारणे हा सगळ्यात आवडता विषय होता!
  • Log in or register to post comments

मला vidnyan आणि इतिहास हे

त्रिवेणी
गुरुवार, 11/19/2015 - 21:58 नवीन
मला vidnyan आणि इतिहास हे विषय आवडयाचे. गणिताचा कंटाळा होता.गृहपाठ केला नाही म्हणून एकदा sarani आम्हा काही मुलींना वर्गाबाहेर काढले. मग आम्ही संधीचा फायदा घेत मस्त खेळून घेतले आणि ठरवले उदयापण नको karyala गृहपाठ म्हणजे परत वर्गा बाहेर काढतील आणि आपण खेलू. पण नशीब जोरावर नव्हते सो आदल्या दिवशीचा अनुभव लक्षात घेता sarani वर्गातच उभे केले.
  • Log in or register to post comments

आवडता विषय कुठला म्हणता?

एस
गुरुवार, 11/19/2015 - 21:59 नवीन
'विषय सर्वथा नावडो...' हे आमच्याकडून इतक्या वेळा घोकून घेतले जाई की कुठलाच विषय आमच्या आवडीनिवडीत जागा मिळवू शकला नाही. ;-)
  • Log in or register to post comments

टवाळक्या

ट्रेड मार्क
गुरुवार, 11/19/2015 - 22:05 नवीन
वर्गात एवढे बदनाम होतो की दुसऱ्या कोणीही काही गडबड केली तरी मी वर्गाबाहेर असायचो. आमच्या Floor Supervisor तर माझ्यावर विशेष प्रेम करायच्या आणि त्यांची केबिन आमच्या वर्गाशेजारीच असायची नेमकी. येता जाता माझ्यावर बारीक लक्ष असायचं त्यांचं. त्यामुळे बहुतेक सर्व विषयांचे तास वर्गाबाहेर घालवलेले आहेत. टवाळक्या हा आवडता विषय!
  • Log in or register to post comments

हाहा सेम सेम ! माझ्या शेजारी

स्रुजा
Fri, 11/20/2015 - 03:26 नवीन
हाहा सेम सेम ! माझ्या शेजारी शांत मुलींना बसवुन पाहिलं तर त्याच एक दोनदा माझ्याबरोबर बडबड करताना पकडल्या गेल्या :D त्यात आई त्याच शाळेत नोकरी करत होती , अस्मादिक घरी पोह्चायच्या आधी दिवसभरातले कारनामे पोहोचले असायचे ! वैताग नाही तर. त्यामुळे गप्पांचा तास सगळ्यात आवडता . कमी नावडणारे विषय म्हणजे इतिहास, भाषा, आणि फिजिक्स. भयंकर म्हणजे काहीच्या काही आवडणारा विषय म्हणजे गणित !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

भारी चाललय ...

निवेदिता-ताई
गुरुवार, 11/19/2015 - 22:35 नवीन
भारी चाललय ... मला मराठी खूप आवडायचे, विशेषतः कविता....ते शिकवणार्या बाई तल्लीन होऊन शिकवायच्या.
  • Log in or register to post comments

भारी चाललय ...

निवेदिता-ताई
गुरुवार, 11/19/2015 - 22:35 नवीन
भारी चाललय ... मला मराठी खूप आवडायचे, विशेषतः कविता....ते शिकवणार्या बाई तल्लीन होऊन शिकवायच्या.
  • Log in or register to post comments

मला सगळेच विषय आवडायचे

पियुशा
गुरुवार, 11/19/2015 - 22:39 नवीन
मला सगळेच विषय आवडायचे गणीताच्या तासाला आम्ही वाहितल्या गाण्याच्या भेंडया खेळायचो हिस्ट्रीला पिक्चर कुठला भारी आलाय / हीरो हिरोईनच्या चर्चा असे प्रत्येक तासाचे खेळ शोधून ठेवेले होते म्हणुन मला सगळे विषय आवड़ायचे ==)))
  • Log in or register to post comments

भूगोलाच्या तासाला नकाशा नकाशा

रातराणी
Fri, 11/20/2015 - 00:33 नवीन
भूगोलाच्या तासाला नकाशा नकाशा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

आणि ते नाव गाव फूल फळ प्राणी

रातराणी
Fri, 11/20/2015 - 00:34 नवीन
आणि ते नाव गाव फूल फळ प्राणी ते पण खेळायचो आम्ही खूप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

हि हि हि....हे खूप म्हणजे

टवाळ कार्टा
Fri, 11/20/2015 - 13:50 नवीन
हि हि हि....हे खूप म्हणजे खूपच केलेय...आणि मराठीच्या तासाला बुक क्रिकेट...कारण मराठीचे पुस्तक सग्ळ्यात जाड असायचे ;) पेन फाईट्/कंपास-बो फाईट हे तर कधीही सुरु व्हायचे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

म्हणूनच भौतेक अज्जून दुश्ली ब

टवाळ कार्टा
Fri, 11/20/2015 - 13:48 नवीन
म्हणूनच भौतेक अज्जून दुश्ली ब मध्येच अडक्ली हैस =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

हां हां हां नाही रे टका

पियुशा
Fri, 11/20/2015 - 23:33 नवीन
हां हां हां नाही रे टका ,शिकुन् सवरुन इंजिनीअर झाले मी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

:)

टवाळ कार्टा
Sat, 11/21/2015 - 11:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

मराठी चित्रकला आणि कार्यानुभव

रातराणी
Fri, 11/20/2015 - 00:36 नवीन
मराठी चित्रकला आणि कार्यानुभव :)
  • Log in or register to post comments

मराठी चित्रकला म्हणजे

शब्दबम्बाळ
Fri, 11/20/2015 - 01:08 नवीन
मराठी चित्रकला म्हणजे बाराखडीपासून वगैरे चित्र तयार करायची का?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

:)

रातराणी
Fri, 11/20/2015 - 01:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

माझे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे विषय

इडली डोसा
Fri, 11/20/2015 - 01:18 नवीन
माझे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे विषय आवडते होते. पाचवी, सहावी सातवी फक्त शाशि. मग आठवित ईतिहास , भुगोल , संस्कृत आणि शास्त्र. नववित गणित, ईतिहास, ईंग्रजी मराठी, संस्कृत. आणि दहावित फक्त ईंग्रजी मराठी, संस्कृत याच विषयांच्या जोरावर दहावित चांगले टक्के मिळाले. सगळे श्रेय त्या - त्या वर्गात ते ते विषय शिकवणार्‍या सर बाईंना.
  • Log in or register to post comments

बीजगणित आणि भूमिती अतीप्रिय!

जॅक द रिपर
Fri, 11/20/2015 - 01:23 नवीन
बीजगणित आणि भूमिती अतीप्रिय! त्याखालोखाल पदार्थविज्ञानशास्त्रं, रसायनशास्त्रं, भूगोल आणि इतिहास! आणि सर्वात नावडता आणि संन्यास घेईन पण मेडीकलला जाणार नाही असं तीर्थरुपांना सांगून बारावीला अजिबात अभ्यास न केलेला आणि अतिशय तिटकारा असलेला विषय म्हणजे जीवशास्त्रं!
  • Log in or register to post comments

गणीत आणि फिजीक्स

संजय पाटिल
Fri, 11/20/2015 - 06:42 नवीन
अतीशय आवडायचे. सर्वात नावडता विषय ईतिहास.:(
  • Log in or register to post comments

संगीत. एक अंध शिक्षक होते.

शिव कन्या
Fri, 11/20/2015 - 10:15 नवीन
संगीत. एक अंध शिक्षक होते. आमचं ते नरडं.त्यांचा तो गळा! कान तयार झाला.पण सूर कधी घावलेच नै.
  • Log in or register to post comments

रटाळ तासांना नाव गाव /

अंतरा आनंद
Fri, 11/20/2015 - 10:33 नवीन
रटाळ तासांना नाव गाव / फुलीगोळा किंवा तत्सम खेळ खेळणं सर्वात आवडीचं. आठवीत भूगोलाच्या बाईंच्या समोर झोप काढायचे पण फार सज्जन बाई. कधी म्हणून त्रास दिला नाही मला उठवून. कधी कधी मीच लाज वाटल्याने, कंपास बॉक्स पाडून मला झोपेतून उठवायचे. अश्या वेळीही मी सगळं सामान गोळा करायला उठले की "नंतर तास संपल्यावर" असं म्हणून मी परत झोपेन याची काळजी घ्यायच्या. बाकी मला गप्प बसून कोणाचंही बोलणं ऐकून घ्यायचं म्हणजे झोपच येते. वाचन असल्याने इतिहास लक्षात रहायचा, भाषेतही तेच. त्यामुळे ते जरा जास्त आवडीचे. पण ज्या ज्या वर्षी जे विषय चांगले शिकवले जायचे ते त्या वर्षी आवडायचे.
  • Log in or register to post comments

ह.ह.पु.वा.

मांत्रिक
Fri, 11/20/2015 - 12:47 नवीन
ह.ह.पु.वा. या धाग्यावर अगदी मनोरन्जक प्रतिसाद येताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद

माझे आवडते/नावडते विषय

गॅरी ट्रुमन
Fri, 11/20/2015 - 10:36 नवीन
मला गणित फार आवडायचे-- त्यातही algebra पेक्षा geometry जास्त आवडायचे. इतिहास तर गणितापेक्षाही जास्त आवडायचा आणि नागरिकशास्त्र त्याहूनही जास्त आवडायचे.भूगोल या विषयाशी मी स्वतः कधीच रिलेट करू शकलो नव्हतो.मी शाळेत असताना अर्थशास्त्र नव्हते. पण ते नव्हते ते एका अर्थी बरेच झाले. नंतर मी त्या विषयाची पुस्तके बघितली आणि कुठल्याकुठल्या पंचवार्षिक योजनांमध्ये कशावर किती खर्च झाला, बेकारीचा दर किती टक्के आहे वगैरे विदा त्या पुस्तकांमध्ये होता. असला प्रकार मला कधीच आवडला नसता. विज्ञानात Biology शी माझे जन्माजन्मांचे वैर होते. कधीकधी वाटते की १२ वी मध्ये जर मला तो विषय असता तर मी अजूनही १२ वी मध्येच अडकलो असतो :) Chemistry शी कधीच जवळीक वाटली नाही. विशेषतः नववीत असताना Chemistry मधील एका धड्यात कधी न बघितलेल्या (आणि आयुष्यात कधीही बघायची शक्यता नसलेल्या) १२ की १५ केमिकलचे गुणधर्म आणि उपयोग, ते कसे तयार करतात वगैरे गोष्टी होत्या.ती गोष्ट मला अजिबात आवडली नव्हती आणि त्यामुळे या विषयाशी दुरावा निर्माण झाला तो कायमचाच. गणिताशी जवळचे म्हणून Physics आवडणारच अशी माझ्याविषयी अनेकांची अपेक्षा असे. पण तो विषय मला आवडला तो एकदाच--१२ वी मध्ये. भाषांमध्ये मराठी हा शाळेतील एक विषय म्हणून एकदाच आवडला तो १० वी मध्ये कारण पुस्तकातील धडे खूप छान होते. जुन्या आठवणी जागृत करणार्‍या या धाग्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मुन्ना भाई MBBS मधला subject

नितिन५८८
Fri, 11/20/2015 - 10:46 नवीन
मुन्ना भाई MBBS मधला subject लई भारी
  • Log in or register to post comments

शाळेतील आवडता विषय>>>

जेपी
Fri, 11/20/2015 - 11:22 नवीन
शाळेतील आवडता विषय>>> वर्गाबाहेर टांगलेली घंटा. माझ बारीक लक्ष असायच
  • Log in or register to post comments

जेप्या राॅक्स...

मांत्रिक
Fri, 11/20/2015 - 19:24 नवीन
जेप्या राॅक्स... शाळा शाॅक्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

खूप छान धागा आणि विषय !!

नीलमोहर
Fri, 11/20/2015 - 12:42 नवीन
आवडते विषय शिक्षक कोण त्यावर अवलंबून असायचे :) इंग्लिश पहिल्यापासून आवडता विषय, शिक्षिकाही खूप छान होत्या आणि शिकवणं व्यवस्थित त्यामुळे इंग्लिश बर्‍यापैकी पक्कं आहे. त्यांची लांबसडक रेशमी पोनीटेल (खर्‍याखुर्‍या घोड्याच्या शेपटीप्रमाणे) असायची ते खूप आवडायचं. मराठी सातवीपर्यंतच होतं त्यामुळे बर्‍यापैकी कच्चं राहिलं, ती कसर भरपूर वाचन करून भरून काढायचा प्रयत्न असतो. हिंदी आवडतं पण त्यात गुण जास्त पडायचे नाहीत. संस्कृत शिक्षिका अतिशय सुंदर शिकवायच्या त्यामुळेच दहावीत ८४% वगैरे गुण होते, अजूनही आवडतं. बाकी विज्ञान एवढं आवडत नव्हतं पण दहावीत सगळ्यात जास्त गुण त्यातच पडले होते, त्याखालोखाल गणितात तेही विशेष आवडायचं नाही. इतिहास भूगोल इतर सर्व ओके-ओके. चित्रकला पहिल्यापासून आवडते मात्र कला महाविद्यालयात जाण्यासाठी एलीमेंटरी, इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण असणे सक्तीचे असते हेही माहीत नव्हते अशी आमची अक्कल, त्या परीक्षा देणे राहूनच गेले ही खंत नेहमी राहिल. त्यामानाने आताची मुलं खूपंच स्मार्ट, आपल्याला पुढे काय शिकायचंय, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे सगळी इत्यंभूत माहिती त्यांना असते. मैथिली मिस म्हणून दक्षिण भारतीय शिक्षिका होत्या, एकदा गृहपाठ केलेला नसतांना ते सांगितलं नाही म्हणून त्यांनी ५वीच्या वर्गापासून स्टाफरूम पर्यंत माझी कान धरून वरात काढली होती ती शाळेतली पहिली आणि शेवटची शिक्षा.. मात्र नंतर त्यांना माझा मुंगेरीलाल स्वप्नाळू स्वभाव कळला, मग कधी शिकवण्यात लक्ष नाही असं दिसून आलं की त्याच विचारायच्या day dreaming haan? ;) अशा शाळेच्या रम्य आठवणी, आठवण काढली नाही की लगेच निबंध पण लिहून झाला.. :) कॉलेजमधील विषयांचा निबंध अजून मोठा होईल तेव्हा ते नंतर कधीतरी ;)
  • Log in or register to post comments

प्रत्येक टप्प्यात नवीन विषय आवडायचा.

बोका-ए-आझम
Fri, 11/20/2015 - 12:52 नवीन
शाळेत - इतिहास काॅलेजमध्ये - अर्थशास्त्र, राज्यशास्त्र मास कम्युनिकेशनमध्ये - पोलिटिकल कम्युनिकेशन कायदा शिकत असताना - दोन्ही प्रोसीजर कोड्स - सिव्हिल आणि क्रिमिनल. एमबीए मध्ये - स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट.
  • Log in or register to post comments

आवडते विषय सरनुसार बदलायचे

उगा काहितरीच
Fri, 11/20/2015 - 13:13 नवीन
आवडते विषय सरनुसार बदलायचे पाचवीला मराठी , सहावी सातवीला गणित , आठवीला विज्ञान , नववीला इतिहास , दहावीला शिंग फुटले अन् अभ्यासात असलेले विषय सोडून इतर विषयात लक्ष द्यायला सुरूवात झाली.
  • Log in or register to post comments

अल्जिब्रा आणि भाषा.

पिशी अबोली
Fri, 11/20/2015 - 13:17 नवीन
अल्जिब्रा आणि भाषा. अर्थात या दोन्ही गोष्टी कन्सिस्टन्टली आवडल्या नाहीत आणि जमल्या पण नाहीत. पण जमल्या तेव्हा अतिच आवडल्या, नाहीतर तशाही आवडल्याच. इकॉनॉमिक्स पण आवडायचं. दहावीला हा २० मार्कांचा अभ्यासक्रम भूगोलाच्या पेप्रात का घुसवला होता हे कधी कळलं नाही. इतिहास भयंकर नावडता. शिक्षकांमुळे अर्थात.. अकरावीला इतिहासाला ऑप्शन पाहिजे म्हणून १५ मिंटांवरील कॉलेज सोडून दोन बस बदलून १.५ तास जावं लागणारं कॉलेज निवडलं होतं. अर्थात ते चांगलंच झालं.. पुढे इंग्रजीमधे ड्रामा आवडायचा आणि पोएट्री अजिबात नाही. फिक्शन तर टीपीचा विषय होता. संस्कृतच्या वर्गात मीमांसा आणि तर्कशास्त्र(जमलं नाही कधीच, उगाच आवडायचं). बाकी सगळ्याचा वैताग यायचा. अष्टाध्यायीपण आवडली होती. पण ते सगळे वरवर केलेले विषय आहेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा