✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

श
श्रीरंग_जोशी यांनी
Sat, 06/16/2012 - 10:07  ·  लेख
लेख
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात. जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते. पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात. आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार? यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये. मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
66103 वाचन

💬 प्रतिसाद (155)

प्रतिक्रिया

या संपुर्ण प्रतिसाद नेमकं

शिल्पा ब
Mon, 06/18/2012 - 05:10 नवीन
या संपुर्ण प्रतिसाद नेमकं विनोदी असं काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+१, मी तर प्रतिसाद वरुन

५० फक्त
Mon, 06/18/2012 - 08:22 नवीन
+१, मी तर प्रतिसाद वरुन खाली, खालुन वर, डाविकडुन उजवीकडे, त्याच्या उलट, मग एक ओळ सोडुन एक ओळ( अशा प्रकारे वाचायचं साहित्य हल्ली फार कमी झालं आहे) सगळ्या प्रकारे वाचुन पाहिलं, विनोद तर सोडा, विनोद तावडेंचं नाव देखील नाही सापडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

प्रतिसाद आवडेश..

डावखुरा
Mon, 06/18/2012 - 11:28 नवीन
प्रतिसाद आवडेश..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कारण ते गाजलेलं आहे!!

श्रीरंग_जोशी
Mon, 06/18/2012 - 08:42 नवीन
गाजलेली विधाने हि प्राथमिक पात्रता आहे धाग्याच्या शीर्षकाप्रमाणे. विनोदी असेल तर दुधात साखर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

जागेचे आश्वासन...

श्रीरंग_जोशी
Mon, 06/18/2012 - 16:45 नवीन
आणखी एक गाजलेले विधान. ६ डिसेंबर १९९२ च्या अयोध्येतील घटनेनंतर देशभरात दंगली पेटल्या व बरेच आठवडे सुरू राहिल्या. मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव या घटनेवर धोरणात्मक असं काही बोलले नाही. काही महिन्यांनंतर सर्व काही शांत झाल्यानंतर त्यांनी चक्क अयोध्येत जाहीर सभा घेतली. या सभेत स्वतःच्या कार्यपद्धतीला शोभून न दिसणारे (अयोध्येत मंदिर मशीद पुन्हा बांधण्याचे) आश्वासन त्यांनी दिले. हा (उजवे व डावे) विरोधकच काय तर स्वपक्षीयांसाठीही एक धक्काच होता. अर्थातच विरोधी पक्षांनी यावर रणकंदन सुरू केले व स्पष्टीकरणाची मागणी केली. त्यावेळी सरकारच्या वतीने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण (यांना अख्खा महाराष्ट्र हेडमास्तर म्हणून संबोधायचा) याबद्दलचे स्पष्टीकरण दिले. "पंतप्रधानांनी अयोध्येत मंदिर मशिद बांधायचे आश्वासन जरूर दिले, पण कुठे बांधले जाणार त्या जागेचे नाही". अर्थातच या एका उत्तराने विरोधकांच्या विरोधामधली हवाच काढून घेतली.
  • Log in or register to post comments

अर्थातच विरोधी पक्षांनी यावर

विजुभाऊ
Mon, 06/18/2012 - 15:12 नवीन
अर्थातच विरोधी पक्षांनी यावर रानाकडनं सुरू केले तुम्हाला हवा असलेला शब्द "रणकंदन"
  • Log in or register to post comments

अरेच्या...

श्रीरंग_जोशी
Mon, 06/18/2012 - 16:43 नवीन
धन्यवाद विजुभाऊ! मूळ लेखन टंकले तेव्हा 'रणकंदन' असेच टंकले होते अथवा टंकण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित अनुस्वार वगैरे राहिला असेल. म्हणून शुद्धिचिकित्सकाने सरळ रानाकडे न्यावे? अर्थात शु. चि. वापरताना माझीच घाई व अतिआत्मविश्वास नडला असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ममता ब्यानर्जी रेल्वे बजेट

बॅटमॅन
Mon, 06/18/2012 - 16:25 नवीन
ममता ब्यानर्जी रेल्वे बजेट संसदेत सादर करताना म्हणाल्या "आय कांट सॅटिस्फाय ऑल ऑफ यू", प्रचंड हशा उसळला. त्यांचेच एक दुसरे उदा. बंगालमध्ये गुंतवणूक करावी वैग्रे सांगणारी एक समिट् बोलावली होती. त्यात त्या म्हणाल्या, "यू हॅभ टु इन्भेस्ट इन बेंगॉल, बिकॉज बेंगॉल इज द गेटवे टु नॉर्थइस्टर्न कंट्रीज(राज्ये म्हणावयाचे असावे). ऑल्सो, इट इज द गेटवे टु बांगलादेश अँड बांगलादेश इज द गेटवे टु पाकिस्तान". ऐकता ऐकता कळावयाचे बंद झाले. तूनळीवर ममता ब्यानर्जींच्या मजेशिर भाषणांची क्लिप आहे, सर्चल्यास मिळंल लग्गेच.
  • Log in or register to post comments

:-D

मोदक
Mon, 06/18/2012 - 23:57 नवीन
:-D जबरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काही वाक्य आवडली ... धागा

गणेशा
Mon, 06/18/2012 - 18:32 नवीन
काही वाक्य आवडली ... धागा मस्त.
  • Log in or register to post comments

दादा कोंडकेंचे फेमस भाषण

गणेशा
Mon, 06/18/2012 - 18:34 नवीन
दादा कोंडकेंचे फेमस भाषण सगळ्यांना माहितीच असेल .. काय ती वाक्यावाक्यावर हुकुमत आणि टोले.
  • Log in or register to post comments

कुठ वाचाय मिळल

कपिलमुनी
Mon, 06/18/2012 - 18:55 नवीन
??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अत्यंत थर्ड क्लास भाषण आहे

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 06/18/2012 - 20:42 नवीन
अत्यंत थर्ड क्लास भाषण आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

दादा कोंडके उवाच... :)

चेतनकुलकर्णी_85
Mon, 06/18/2012 - 20:22 नवीन
स्व. दादा कोंडके यांचे कोल्हापुरातील फार जुनी सभा आहे शिवसेनेच्या समर्थनात ..त्यात त्यांनी शरद पवार ला ,राजीव गांधीला आणि कॉंग्रेस ला खूपच हाणले आहे... :) http://www.youtube.com/watch?v=CK3Ve4nE_A8 कॉंग्रेस(आय) चा अर्थ पण सांगितला आहे.. :) जाता जाता "लागले हे आपापली "cyclindare" उचलून कामाला..." इति शिवसेना प्रमुख....
  • Log in or register to post comments

साहेब : कमी बाईट - जास्त मायलेज.

तर्री
Tue, 06/19/2012 - 01:26 नवीन
आपले कृषी मंत्री मोजकेच बोलतात. शेती तज्ञ असल्याने कुठे काय पेरावे व त्या पासून किती पिक मिळेल याचा त्यांना नेमका अंदाज असतो. मोर जसा पावसाळा सुरु झाल्यावर केका करतो तसेच प्रत्येक निवडणुकीच्या आधी साहेब बोलतात. १.देशाच्या राजकारणामध्ये प्रमोद महाजनांचा दबदबा होता , बाळासाहेबांशी मैत्री होती आणि त्याचा परिपाक म्हणजे मनोहर जोशी (मर्यादित कर्तुत्वावर अलगद) लोकसभेचे अध्यक्ष झाले. वास्तविक पवारही तेंव्हा आपत्ती निवारण संन्स्थेचे मोठे पद (महाजन पवार दोस्तीमुळे परस्पर हितवादी ) राखून होते. निवडणुका आल्यावर साहेब बोलले होते - हल्ली राजकारण जोशी -महाजनांच्या हातात आहे. भारताचा कर्णधार रवी शास्त्री असताना , चंद्रकांत पंडित ही भारतीय संघात होता. ( आणि मुंबईचा कर्णधार). त्यावेळचे त्यांचे उद्गार "भार्तीईय क्रिकेट मध्येही शास्त्री-पंडितांचेच राज्य आहे " असो. पुढे त्यांनी क्रिकेटचा कारभार हाती घेतला आणि आता मराठी मुलगा भारतीय संघात नाहीच तर मुंबईत ही हाताच्या बोटावरमोजण्याईतकेच. हया वाक्यामध्ये फार मोठा विनोद ( अतिशयोक्ती हो ) तर आहेच पण , एखादे बीज कसे पेरावे व त्यापासून भरघोस पिक कसे घ्यावे हे सांगणारे आहे. - साहेब सगळ्यांचे बारसे जेवले आहेत हेच खरे.
  • Log in or register to post comments

दुष्काळ

हुप्प्या
Tue, 06/19/2012 - 20:45 नवीन
जाणता राजा म्हणून प्रसिद्ध असणारे शरच्चंद्रजीरावदादासाहेब पवार लोकसभेत दुष्काळ या विषयावर अस्खलित हिंदीत भाषण करत होते, "महाराष्ट्र में इतना बडा सूखा पडा है के लोगोंको चार घास भी ठीक से खाने को नही मिलते!" तमाम हिंदीभाषिक बुचकळ्यात. महाराष्ट्र मे लोग घास खाते है?
  • Log in or register to post comments

साहेबांनी हिंदीची शिकवणी लावली होती म्हणे....

श्रीरंग_जोशी
Tue, 06/19/2012 - 21:03 नवीन
खासदार झाल्यावर सुरुवातीच्या काळात हिंदीवर प्रभुत्व नसल्याने झालेले घोळ बघून साहेबांनी हिंदीची शिकवणी लावली होती अशी वंदता होती. तसेच नंतरच्या काळात इंग्रजीची पण शिकवणी लावल्याची कुजबूज होती. खरे खोटे साहेबच जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

पुन्हा एकदा - १००वा.

शिल्पा ब
Wed, 06/20/2012 - 01:03 नवीन
पुन्हा एकदा - १००वा.
  • Log in or register to post comments

अरे वा...

श्रीरंग_जोशी
Wed, 06/20/2012 - 01:12 नवीन
शिल्पातै - आपले टायमिंग (म. श. सुचवा) जोरदार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अर्थसंकल्प...

श्रीरंग_जोशी
Wed, 06/20/2012 - 10:16 नवीन
इंग्लंडच्या उच्च संसदीय परंपरांचे उदाहरण म्हणून सांगितला जाणारा एक किस्सा... एकदा इंग्लंडचे अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडण्यासाठी तेथील संसदेत पोचत होते. प्रवेशद्वारापाशीच एक विरोधी सदस्याला सिगारेट ओढताना पाहून ते कुत्सितपणे म्हणाले, 'महोदय, उद्यापासून ही चैन आपल्याला परवडणार नाही'. अर्थसंकल्प मांडून झाल्या झाल्या तो विरोधी सदस्य उभा राहून म्हणाला की अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा भंग केलेला आहे म्हणून मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. संपूर्ण सभागृह अवाक होवून पाहत असताना त्या सदस्याने सकाळचा किस्सा समजावून सांगितला. अर्थसंकल्पात तंबाखुजन्य पदार्थांवरील कर वाढवल्यामुळे सकाळी बोललेले वाक्य म्हणजे अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा शपथेचा भंग केलेला आहे. अन आपल्याला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे अर्थमंत्र्यांनी हा आरोप मान्य करून तडक राजीनामा दिला व तो लगेच मंजूरही करण्यात आला.
  • Log in or register to post comments

इंदिराजी व फील्डमार्शल

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/21/2012 - 09:55 नवीन
बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तान चा न भूतो न भविष्यती असा पराभव केल्यावर फील्डमार्शल सॅम माणेकशॉ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. पंतप्रधान म्हणून इंदिराजींनि खेळलेल्या राजकीय डावपेचांबद्दल त्यांनाही यथोचित श्रेय मिळतच होते. पंतप्रधान व सैन्यप्रमुख म्हणून दोघांचेही संबंध सलोख्याचे होते. परंतु या दिग्विजयी कामगिरीनंतर इंदिराजींच्या भोवती असलेल्या काही विघ्नसंतोषी मंडळींनी इंदिराजींचे कान भरणे सुरू केले की माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर उठाव करणार आहे. आपल्या देशाच्या सुदैवाने इंदिराजींनी कुठलेही अविचारी पाऊल न उचलता सरळ माणेकशॉ यांना पाचारण केले व स्पष्ट शब्दांत याबाबत विचारणा केली. सॅम यांनी अगदी सहजणे उत्तर दिले. देवाने आपल्या दोघांनाही चांगले धारदार नाक दिले आहे जे आपण दोघेही एकमेकांच्या कामात कधी खुपसत नाही व यापुढेही खुपसणार नाही.
  • Log in or register to post comments

चर्चिलचा किस्सा

साधामाणूस
गुरुवार, 06/21/2012 - 20:54 नवीन
(बहुतेकांना माहीत असावा.) चर्चिल हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिध्द होते. एकदा विरोधी पक्षाच्या सदस्या चिडून त्यांना म्हणाल्या," मी जर तुमची पत्नी असते तर तुमच्या चहात विष मिसळले असते." क्षणाचाही विलंब न लावता चर्चिल उत्तरले,"मी जर तुमचा नवरा असतो तर तो चहा आनंदाने प्यायलो असतो!"
  • Log in or register to post comments

क्या बात हैं!!

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/21/2012 - 21:30 नवीन
सहीच...! मला तर नव्हते ठावूक. अजून येउद्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधामाणूस

हा किस्सा जॉर्ज बर्नार्ड शॉ

श्रीरंग
गुरुवार, 06/21/2012 - 22:31 नवीन
हा किस्सा जॉर्ज बर्नार्ड शॉ चा म्हणून ऐकला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधामाणूस

दोन्हीही इरसाल व्यक्तिमत्वे...

श्रीरंग_जोशी
Fri, 06/22/2012 - 10:59 नवीन
विन्स्टन चर्चिल काय अन जॉर्ज बर्नाड शॉ काय, दोन्हीही इरसाल माणसे. असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत त्यांच्याबद्दल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

चर्चील आणि नॅन्सी अ‍ॅस्टर

जॅक द रिपर
गुरुवार, 11/19/2015 - 23:49 नवीन
चर्चील आणि नॅन्सी अ‍ॅस्टर (ब्रिटनच्या पहिल्या महिला खासदार) यांच्यातला किस्सा आहे तो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

चर्चीलचा अजून एक गाजलेला

जॅक द रिपर
गुरुवार, 11/19/2015 - 23:44 नवीन
चर्चीलचा अजून एक गाजलेला किस्सा - चर्चील पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या टॉयलेटमध्ये असताना दाराची कडी वाजली. चर्चीलचा सेक्रेटरी बाहेरुन म्हणाला, "Excuse me Prime Minister, but the Lord Privy Seal wishes to speak to you." "Tell His Lordship: I'm sealed on The Privy and can only deal with one shit at a time!" चर्चीलने आतून उत्तर दिलं!
  • Log in or register to post comments

चर्चील आणि जॉर्ज बर्नाड शॉ

जॅक द रिपर
गुरुवार, 11/19/2015 - 23:47 नवीन
जॉर्ज बर्नाड शॉने एकदा आपल्या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाची दोन तिकीटं चर्चीलला पाठवली. सोबत एक खवचट चिठी होती. "तुला एखादा मित्रं असलाच तर त्याच्याबरोबर नाटकाला ये!" "तुझ्या नाटकाचा दुसरा प्रयोग झालाच, तर नक्की येईन!" चर्चीलने त्याच कागदावर खाली लिहून पाठवलं!
  • Log in or register to post comments

चिट्ठी जरा अशा भाषेत होती असे

अभ्या..
Fri, 11/20/2015 - 00:32 नवीन
चिट्ठी जरा अशा भाषेत होती असे वाचल्याचे स्मरते. मित्राला घेऊन नाटकाला ये......... कुणी असला तर. अवश्य दुसर्‍या प्रयोगाला येईन.......जर झाला तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक द रिपर

माय मोशन ...................

सौन्दर्य
Fri, 11/20/2015 - 00:26 नवीन
सर विन्स्टंट चर्चिल हे पंतप्रधान असताना, एकदा आजारी असून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. त्यांना भेटायला विरोधी पक्षाचे काही सद्स्य हॉस्पिटलमध्ये आले होते. नेमके त्याचवेळी, एक नर्स, त्यांचा नैसर्गिक विधी उरकून, ते भांडे घेऊन चालली होती. रुममध्ये त्यावेळी उपस्थित विरोधी पक्ष सदस्याना बघून सर विन्स्टंट चर्चिल म्हणाले, "First time I am seeing my 'motion' being carried unopposed.”
  • Log in or register to post comments

अब्राहम लिंकन

जॅक द रिपर
Fri, 11/20/2015 - 00:51 नवीन
अमेरीकेतील नागरी युद्धाच्या काळातला हा एक किस्सा - दक्षिणी राज्यांविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत उत्तरी राज्यांचा मॅक्लेलान नावाचा एक सेनापती होता. हा मॅक्लेलान आपले रिपोर्ट पाठवण्याबाबत कमालीचा आळशी होता. त्याच्या एखाद्या चकमकीचा अहवाल बर्‍याचदा महिन्याभराने लिंकनच्या हाती येत असे! वैतागून लिंकनने एकदा त्याला रोजच्यारोज डिटेल रिपोर्ट पाठवण्याचा सक्तं हुकूम सोडला. "आज आम्ही शत्रूच्या चार गाई पकडल्या आहेत!" मोजून दोन दिवसांनी मॅक्लेलानचा संदेश आला! "ताबडतोब दूध काढून सैनिकांना पिण्यास द्या!" लिंकानने उत्तर पाठवलं!
  • Log in or register to post comments

Pepper पेप्पर की paper पेपर ?

रमेश आठवले
Fri, 11/20/2015 - 01:12 नवीन
मी हा किस्सा लोकसभेच्या प्रेक्षक ग्यालरीत बसून ऐकलेला आहे - सभागृहात मिरे (Pepper) निर्यातीबद्दल चर्चा चालली होती. त्या वर बिहार मधील एका खासदारांनी उठून हा प्रश्न विचारला होता - देशात paper (कागदा) चा इतका तुटवडा असताना त्याच्या निर्यातीची चर्चा का चालली आहे ?
  • Log in or register to post comments

लालू बेचारा

रमेश आठवले
Fri, 11/20/2015 - 01:16 नवीन
लालू बेचारा आदत का मारा घरमे थी रबडी लेकिन खा रहा था चारा
  • Log in or register to post comments

लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच

जयन्त बा शिम्पि
Fri, 11/20/2015 - 01:29 नवीन
लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. ( कोणत्या साली ते आठवत नाही, जाणकारानी शोधुन लिहावे ) केरळमधुन काँग्रेसचे खासदार जाफर शरीफ निवडून आले होते. पहिलाच दिवस असल्याने , खासदारांचा शपथविधी सुरु होता. जाफर शरीफ यांचे नाव पुकारले गेले आणि नेमक्या त्याच वेळेला ते बाहेर निघून गेले होते. त्यावेळी नाथ पै की मधू दंडवते कोणीतरी पटकन म्हणाले , " हमारे में एक ही तो ' शरीफ ' था , वो भी बाहर गया है '! ! १९६२ सालच्या चिनी आक्रमणा नंतर पं. जवाहरलाल नेहरू , आपण गमावलेल्या १२,००० चो. मैलाच्या भुभागाचे , न पटणारे समर्थन करीत असतांना म्हणाले , " नाहीतरी त्या जमीनीवर गवताचे एक पाते उगवत नव्हते, जमीन काही कामाची नव्हतीच. " त्यावर श्री पिलू मोदी हे गुजराथ मधील खासदार , नेहरुन्च्या , तुळतुळीत टकलाकडे पाहून म्हणाले, " आपल्याही डोक्यावर असेही काही उगत नाही, तेही आपल्या काय कामाचे ? " लोकसभेत हंशा पिकला हे सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments

चर्चिल ची लोकप्रियता

चौकटराजा
Fri, 11/20/2015 - 07:44 नवीन
चरिचिलना नभोवाणी वरून भाषण करायचे होते. काही कारणाने त्याना ट्याक्सी तून जावे लागले.रस्त्यावर आल्यावर त्यानी एक ट्याक्सी थांबविली " नभोवाणी केद्रावर नेतोस का अर्जट ? चर्चिल " नाही जमायचे नाही ! मला चर्चिल साहेबांचे भाषण ऐकायला थांबायचेय " ड्रायव्हर अरे, मी चौपट पैसे देतो तुला जायचे " चर्चिल असे का मग चला साहेब तो चर्चिल गेला खड्ड्यात " ड्रायव्हर .
  • Log in or register to post comments

बरेच आधी एक किस्सा वाचला होता

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 11/20/2015 - 07:55 नवीन
बरेच आधी एक किस्सा वाचला होता तो लिबरल ब्रिटिश प्राइम मिनिस्टर लॉयड जॉर्ज ह्यांचा होता की अब्राहम लिंकन चा नीट आठवत नाहीये जाणकार कदाचित सांगु शकतील, किस्सा असा की लॉयड जॉर्ज/ लिंकन एकदा निवडणूक प्रचारासंबंधात एक "नुक्कड़ सभा" सारखी सभा घेत होते तेव्हा प्रेक्षकात बसलेला एक टारगट बाप्या ओरडला "ह्याचा बाप एक जुना खटारा चालवत असे ज्याला घोड्या ऐवजी गाढ़वे जुंपलेली असत!" ह्यावर अजिबात तोल न ढळू देता लॉयड जॉर्ज / लिंकन मिश्किलपणे म्हणाला की "आज आमचे पिताजी जिवंत नाहीत किंवा त्यांचा तो खटारा ही अस्तित्वात नाहीत पण त्याला जुंपलेली गाढ़वे मात्र अजुन जिवंत आहेत"
  • Log in or register to post comments

बापू,

स्पार्टाकस
Fri, 11/20/2015 - 08:09 नवीन
बापू, ही कॉमेंट अब्राहम लिंकनची होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

टाइम मिलने दो ,आता हु।

भंकस बाबा
Fri, 11/20/2015 - 09:10 नवीन
☺☺☺
  • Log in or register to post comments

भारतीय लोकशाही

पामर
Fri, 11/20/2015 - 13:01 नवीन
१९९६ साली अट्लबिहारी वाजपेयीं पंतप्रधान असताना विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आणला व NDA सरकार १३ दिवसात पडलं.त्यानंतर तिस-या आघाडीला बाहेरुन पाठींबा देऊन काँग्रेसनी देवेगौडांना पंतप्रधान केलं. त्या वेळी संसदेच्या पहिल्याच सत्रात प्रमोद महाजन बोलत होते. सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात त्यांनी तुफानी आतिषबाजी केली होती. त्या वेळच्या तडजोडीच्या राजकारणावर सडकुन टिका करताना त्यांनी एक किस्सा सांगायला सुरुवात केली.एकदा भारतीय सर्व-पक्षीय संसदीय मंडळ चीनच्या दौर्यावर गेले होते,त्यावेळी एका चिनी राजकारणी माणसाने महाजनांना भारतीय लोकशाही बद्दल काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले," हम जब चीन मे गये तो बहुत सारे लोग हमारे साथ थे| तब मुझे किसीने पुछा आपकी democracy कैसे चलती है? मैने कहा की democracy समझाने से अच्छा मैं सिर्फ आपको अपने सहचारिंओंका परीचय करवां देता हूं आप खुद ही भारतीय democracy समझ जायेंगे. मैंने कहा..'I am Pramod mahajan, I am member of Loksabha, I belong to single largest party in the house.. and I am in opposition!' फिर मैंने श्रीवल्लभ पाणिग्रहींकी ओर हाथ करे बोला,'He belongs to second largest party (Congress). He is outside the Government..supporting the Government', फिर मैंने अहमद बेदी साहाब को उठाया और कहा,'He is in third largest party(Janata Dal).. he is inside the front but out side of government' और फिर मैंने कहा,'he is Mr. Ramakant Khalap,( Maharashtrawadi Gomantak Party) he is the only member of his party and he is in the government!!(Law Minister)'...
  • Log in or register to post comments

एक सुधारणा

गॅरी ट्रुमन
Fri, 11/20/2015 - 13:06 नवीन
प्रमोद महाजनांचे हे भाषण म्हणजे खरोखरच खूपच छान होते. एक सुधारणा-- हे भाषण प्रमोद महाजनांनी देवेगौडा सरकार आल्यानंतर पहिल्या संसद अधिवेशनात केले नव्हते तर सीताराम केसरींनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा अचानक काढून घेतल्यानंतर ११ एप्रिल १९९७ रोजी देवेगौडा सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत केले होते. (११ एप्रिल १९९७ च्या विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेतील प्रत्येक भाषण अगदी भक्तीभावाने ऐकलेला) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पामर

law will take its own course

जिन्क्स
Fri, 11/20/2015 - 15:52 नवीन
law will take its own course - या वरुन "आप रेस कोर्स मे बैठे हो ऑर उनको ओन कोर्स बोल रहे हो ये कैसे चलेगा" - हे पण याच भाषणा वेळी. :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

त्यांची भाषणे आणि घोडे

निनाद मुक्काम …
Sat, 11/21/2015 - 18:01 नवीन
त्यांची भाषणे आणि घोडे बाजारातील खरेदी विक्रीचे कसब चांगले होते. आता संघात भाजपात फर्डे व्यक्ते अनेक होते पण भाजपात पंचताराकित वलयांकीत व कलंकित संस्कृती आणण्याचा बहुमान ह्यांचाच भाजपला महाराष्ट्रात दुबळे व सेनेचे बांडगुळ ह्यांनीच बनवले. नुसत्या भाषणांनी आर्थिक सुधारणा व प्रशासकीय कारभारात सुधारणा शक्य असत्या तर अजून काय हवे होते आपल्या मतदार संघात त्यांना गुरुदास कामत ह्यांचे अप्रतिम कामाचे व प्रभावी कार्यकर्त्यांच्या जाळ्याचे आव्हान लाभले होते , राम मंदिर नानात्र ची निवडणूक वगळता इतरवेळी त्यांचा नेहमीच सुपडा साफ झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

चुकी साठी माफी असावी..मला हा

पामर
Fri, 11/20/2015 - 13:15 नवीन
चुकी साठी माफी असावी..मला हा प्रसंग कोणता तरी विश्वासदर्शक ठरावादरम्यान होता हे आठवत होते..
  • Log in or register to post comments

माफी कशाला?

गॅरी ट्रुमन
Fri, 11/20/2015 - 13:30 नवीन
चुकी साठी माफी असावी
माफी वगैरे कशाला? समजा प्रमोद महाजनांनी ते भाषण एप्रिल १९९७ मध्ये केले असे म्हणण्याऐवजी जून १९९६ मध्ये केले असे म्हटले तरी त्यामुळे आभाळ थोडीच कोसळणार आहे? रेकॉर्ड स्ट्रेट असावा म्हणून सुधारणा सुचवली इतकेच. माफी वगैरे मागून टेन्शन घेऊ आणि देऊ नका राव. मिपा आपलाच असा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पामर

इंदिरा इ़ज इंडीया..

बबन ताम्बे
Fri, 11/20/2015 - 14:44 नवीन
"इंदिरा इ़ज इंडीया " आणीबाणीच्या काळातले हे काँग्रेस पुढा-याचे वाक्य खूप गाजले होते. बहुतेक बॅ. रजनी पटेल. नक्की आठवत नाही. अजून एक, "काँग्रेसला राजीव गांधींशिवाय पर्याय नाही आणि देशाला काँग्रेससिवाय पर्याय नाही " - बॅ. विठ्ठलराव गाडगीळ
  • Log in or register to post comments

देवकांत बरूआ

गॅरी ट्रुमन
Fri, 11/20/2015 - 15:14 नवीन
"इंदिरा इ़ज इंडीया "
हे नरपुंगव होते काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरूआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

बरोबर !!

बबन ताम्बे
Fri, 11/20/2015 - 16:36 नवीन
देवकांत बरूआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

कामराज

गॅरी ट्रुमन
Fri, 11/20/2015 - 16:23 नवीन
लालबहादूर शास्त्रींनंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान बनविण्यात कामराज, निजलिंगप्पा, अतुल्य घोष इत्यादी सिंडिकेटचा महत्वाचा वाटा होता. १९६७ च्या निवडणुकांपर्यंत इंदिरांना पंतप्रधानपदी ठेवायचे तोपर्यंत त्यांना कठपुतलीप्रमाणे कसेही फिरवता येईल असा त्यांचा कयास होता.पण तो कयास जोरदार फसला. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदी आल्यावर स्वतःचा इंगा दाखवून द्यायला सुरवात केली. १९६६ मध्ये रूपयाचे अवमूल्यन करायचा निर्णय इंदिरा गांधींच्या सरकारने घेतला.हा निर्णय सिंडिकेटला फारसा रूचला नव्हता.त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी "Great man's daughter--small man's mistake" असे म्हटले. म्हणजे Great man's (नेहरूंच्या) daughter (इंदिरांना) पंतप्रधान बनविणे ही small man's mistake होती. इथे small man हे कामराजांनी स्वतःला उद्देशून म्हटले. अर्थातच यात विनोदी काहीच नाही पण हे कामराजांचे गाजलेले विधान होते म्हणून इथे लिहित आहे.
  • Log in or register to post comments

लोकसभा निवड णूक १९८४- शरद पवारसाहेबांचे भाषण...

बबन ताम्बे
Fri, 11/20/2015 - 16:49 नवीन
लोकसभा निवडणूक १९८४. बारामती मधून शरद पवारसाहेब (स. काँग्रेस) आणि शंकरराव पाटील (काँग्रेस) असा प्रमुख सामना होता. पवारसाहेबांची आकुर्डीच्या सभेमधील भाषणातील काही वाक्ये - ".... आजच टाईम्समधे गेल्या पाच वर्षांत ज्यांनी लोकसभेत एकही प्रश्न विचारला नाही अशा खासदारांची लिस्ट आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या २८ खासदारांची नावे आहेत. त्यात पहीले नाव आहे शंकरराव बाजीराव पाटील. या माणसानी लोकसभेत फक्त दोन वेळा तोंड उघडले. पहील्यांदा खासदारकीची शपथ घ्यायला. कारण त्याशिवाय खासदारकीचे बेनीफिट मिळत नाहीत. आणि दुस-यांदा जांभई दयायला..." प्रचंड हशा ....
  • Log in or register to post comments

बाबासाहेब भोसले

शुंभ (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 11/21/2015 - 05:00 नवीन
(चु. भु . द्या . घ्य.) बाबासाहेब भोसले यांच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षातील लोकांनी एका बैठकीत बंड केले, प्रकरण हातघाईवर आले, तेव्हा कसेबसे बाहेर आलेल्या बाबासाहेबांची प्रतिकिया :- यांची उक्ती बंडाची वृत्ती गुंडांची कृती षंढांची
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा