✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सेहेवागी पोवाडा

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 05/30/2014 - 23:42
जय हो..
जय हो..

जय हो..

(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...! (गद्य) मृत्युच्या छायेत असतांना..मृत्युच्या छायेत असतांना.. मरणाची धुंदी चढावी..आणि बेधुंssssद मस्ती करावी..हा या शिलेदाराचा जन्मजात स्वभाव..खास बाणा!

पेटली पुन्हा ती आग...

हो sssssssss ओ..ओ..ओ...ओ..ओsssssssss

पेटली पुन्हा ती आग,मृत्युची बाग तिथे बॉलरचा होई खात्मा...तिथे बॉलरचा होई खात्मा सांगे सेहेवाग कथा आत्मा... हो जी..जी..जी..! ॥धृ॥ धन्य धन्य उपरी कट,मारी तो खट.. तसा कोणाही नाही जमला...तसा कोणाही नाही जमला ऐसा खतरा हा वीर मामला...हो..जी..जी..जी..॥१॥ तडतडा फोडे तो चेंडू, झोडे जसा झेंडू चिरफळ्या उडल्या तिथे हो रणात..चिरफळ्या उडल्या तिथे हो रणात बॉलरं लावी कपाळा हात...जी..जी..जी..॥२॥ बाऊंड्य्रा आणि सिक्सरं,मारी अक्सरं जणू फिक्सरं त्याचे हो...बॉल,जणू फिक्सरं त्याचे हो...बॉल किती पाजी-बॉलरा..हा...ल हलाहल जी..जी..जी॥३॥ किती मारले??? नाही गणंतीत..धाडले पणंतीत.. तयांचे फोटो लटकले खास!..तयांचे फोटो लटकले खास! जरी वाटली तुम्हा बकवाsssस..जी..जी..जी..॥४॥ ऐश्या या धडाकेबाजा,म्हणीन मी राजा रनांचा गडी पॉssवर..बाज,रनांचा गडी पॉssवर..बाज राssखिली कैकदा लाज..हो..जी..जी..जी॥५॥ तेंडल्या ढाणा होता वाघ,तरी ही बाग आपुल्या परि तिथे फुलली..आपुल्या परि तिथे फुलली.. आता तारीफ मनी उरली..हो जी..जी..जी॥६॥ चला घेतो अता आंम्ही रजा,पाहुनी मजा आत्मा हा खूssषं लै झाला..आत्मा हा खूssषं लै झाला.. पssवाडा लिवन्या योग-पहिला __/\__ हो जी..जी..जी॥७॥ ================================ सदर पोवाड्यावर आजच्या मॅचची(किंग्ज पंजाब वि. चैन्नई सु.किंग्ज) गडद छाया असली..तरी सेहेवागचा असा हा खेळ नेहेमीचाच आहे.. याचा प्रत्यय वाचकांना आला,तर माझा हा प्रथम प्रयत्न सार्थकी लागल्यासारखा वाटेल! :) या अगोदरचे शीर्षकः आग...आग...सेहेवाग!!! :D - एक आत्मि'क ;) पोवाडा!

प्रतिक्रिया द्या
18922 वाचन

💬 प्रतिसाद (63)

बुवांची पन्नाशी आली?

प्यारे१
Fri, 10/23/2015 - 12:02 नवीन
बुवांची पन्नाशी आली? बुवा तरुण वाटतात ओ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

भौ

नाखु
Fri, 10/23/2015 - 12:24 नवीन
टायटलच्या हेडिंग्मध्ये जरा वाचा की ! धागा पन्नाशी सपष्ट लिवलय !!!!!! खुलाश्या नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काय नाखुनमालक. आमाला का कळत

प्यारे१
Fri, 10/23/2015 - 12:53 नवीन
काय नाखुनमालक. आमाला का कळत न्हाय व्हय त्ये. आमी ज़रा खेचायचा प्रेत्न केला तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बुवांना

नाखु
Fri, 10/23/2015 - 13:07 नवीन
पन्नाशीचे म्हटल्यावर ती दंबूक आम्च्याव चालवतील त्याच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आमचे बुवा पन्नाशीचे झाले तरी

खटपट्या
Fri, 10/23/2015 - 13:27 नवीन
आमचे बुवा पन्नाशीचे झाले तरी असेच राहतील. म्हणजे आनंदी, अवखळ, मिष्कील,बेधडक. संस्थापक सदस्य - बुवा फॅन क्लब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

तरी सेहेवागचा असा हा खेळ

प्रचेतस
गुरुवार, 10/22/2015 - 22:04 नवीन
तरी सेहेवागचा असा हा खेळ नेहेमीचाच आहे.. याचा प्रत्यय वाचकांना आला,तर माझा हा प्रथम प्रयत्न सार्थकी लागल्यासारखा वाटेल
आम्हाला आला हो प्रत्यय. पोवाडा खरंच जब्राट झालाय.
  • Log in or register to post comments

जबरदस्त पोवाडा शाहीर!

पाषाणभेद
गुरुवार, 10/22/2015 - 22:42 नवीन
जबरदस्त पोवाडा शाहीर!
  • Log in or register to post comments

अरेह! क्या बात है ! वाह

वेल्लाभट
गुरुवार, 10/22/2015 - 23:35 नवीन
अरेह! क्या बात है ! वाह शाहीरदादा वाह!
  • Log in or register to post comments

संपादक,

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/23/2015 - 06:43 नवीन
संपादक, याच नाव "सेहेवागी पोवाडा" अस करा हो
  • Log in or register to post comments

वा वा!

बोका-ए-आझम
Fri, 10/23/2015 - 09:57 नवीन
आत्मूस, तुसी एकदम मतवाले शायर हो!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

सर्वसाक्षी
Fri, 10/23/2015 - 17:10 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

मस्त, मस्त पोवाडा.खूपच आवडला.

पद्मावति
Fri, 10/23/2015 - 19:38 नवीन
मस्त, मस्त पोवाडा.खूपच आवडला.
  • Log in or register to post comments

आवडेश.

शिव कन्या
Fri, 10/23/2015 - 20:01 नवीन
आवडेश.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा