भुकेल वासरू
माळरानी चालुन पुरतं थकुन गेलं होतं..
चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं,
लहानपणीच नशिबानं ज्याला औताला जुंपल होतं
घाम फुटण्याआधीच मात्र त्याच काळीज तुटलं होतं..
मुक्या बिचार्या जिवाला कधी रडताही आलं नाही
दमलोय,थकलोय असं काही बोलताही आलं नाही..
नांगराचा फाळ त्याला कधी ओढताच आला नाही,
गळ्यावरचा फास देखिल कधी सोडताच आला नाही..
थकलं होतं, दमलं होतं, जन्माला ञासुनं गेलं होतं,
पायातलं ञान हरपुन भुकेनं व्याकुळ झालं होतं..
डोळ्यामधलं पाणी सारं सारं सुकुन गेलं होतं
चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं,
.. माळरानी चालुन चालुन पुरतं थकुन गेलं होतं..
चुकलेलं वासरू खरचं जिवनाला मुकुन गेलं होतं..
आई..ग्ग..
वासराला कधी औताला जुंपलेलं
मग बुवा तुम्हाला ही कविताच
वा!
धन्यवाद
लिहित रहा! प्रतिकात्मक आहे!
:(
साध्या व सच्च्या शब्दांत
एक दोन ओळी सोडल्यास, क्लास!
ही कविता लिहीताना डोळ्यासमोर
त्यातल्याच एका शेतकरर्याच्या
माहिराज, अत्यंत छान कविता.
उत्तम प्रतिसाद!!!
त्र - t+r+a
ओह... मन दुखलं...
कामगार पण असाच चेपला गेला.