✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बंगालच्या वाघिणी

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 12/14/2008 - 01:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28668 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sun, 12/14/2008 - 03:43 नवीन

सुनिती आणि

सुनिती आणि शांती या वाघिणींना मानाचा मुजरा..! साक्षिदेवा, 'नाही चिरा नाही पणती..' ही उक्ति लागू व्हावी अश्या अनेक क्रांतिकारकांची आम्हाला केवळ तुझ्यामुळेच ओळख होत आहे..! अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. खरं आहे! एवढंच नव्हे, तर 'भारताला आजादी विना खड्ग, विना ढाल मिळाली हो..!' अशी गीते गाण्यातच आम्ही धन्यता मानतो..! तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बगाराम Sun, 12/14/2008 - 04:30 नवीन

तात्या,

तात्या, तुमच्या परिचयातील कुणा १४ वर्षाच्या चुणचुणीत मुलीकडुन हे काम करुन घ्याल का? कायदा देखिल १८ वयाच्या खालील मुलींना सज्ञान समजत नाही. त्यांना लग्न करण्याची देखिल परवानगी देत नाही. इथे तर चक्क बंदुक चालवुन जीव धोक्यात घालण्याचे प्रशिक्षण दिले जातेय.काहीतरी चुकतय अस वाटत नाही का? सिस्टमॅटीक ब्रेन वॉशींगच नव्हे का हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विनायक प्रभू Sun, 12/14/2008 - 12:56 नवीन

एन्.सी.सी.

एन्.सी.सी. मधे १४ व्या वर्षी हळदीकुंकू समारंभाचे शिक्षण दिले जाते हो तात्या. सर्वसाक्षी धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
ब
बगाराम Sun, 12/14/2008 - 21:08 नवीन

चूकीची तुलना

एनसीसी मध्ये विद्यार्थ्यांना मिलिटरीची ओळख करुन दिली जाते. भविष्यात त्यांनी सैन्यात भरती व्हावे ह्या अपेक्षेने. एनसीसीत दिलेले प्रशिक्षण घेउन कुणी युद्धावर जीव धोक्यात घालायला जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sun, 12/14/2008 - 22:04 नवीन

जीव

शोधाबद्द्ल अभिनंदन. युद्धावर जीव रमवायला जात नाहीत. सैन्यात भरती झालेल्याना ते माहित असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
आ
आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 22:32 नवीन

चुकीचा अर्थ

एनसीसीचे प्रशिक्षण घेऊन युद्धावर जात नाहीत. सैन्याचे प्रशिक्षण घेऊन युद्धावर जातात हा बगाराम यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. आपला, (सार्जंट) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sun, 12/14/2008 - 22:36 नवीन

लॉग आउट

लॉग आउट करताना बॅटन तुम्हाला दिले काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 22:40 नवीन

संबंध काय

या प्रतिसादाचा चर्चेशी काय संबंध आहे कळला नाही. तसाही मी शांततावादी असल्याने माझ्यासारख्या अल्पवयीन मुलाच्या हातात बॅटन देण्याचा लोकांनी प्रयत्न केला तरी मी ते हातात घेणार नाही. तेवढा मी सुजाण आहे. आपला (हाताची घडी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
बगाराम Sun, 12/14/2008 - 23:41 नवीन

जाऊ द्या

जाऊ द्या हो! एकंदरीत मुद्दे संपलेले दिसतात. असली विधाने यायला लागली की समजुन जायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
र
रामपुरी Wed, 12/17/2008 - 22:00 नवीन

म्हणजे त्यांनी काय करायला पाहीजे होते?

म्हणजे त्यांनी काय करायला पाहीजे होते असे तुमचे म्हणणे आहे हे तरी कळू दे. १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट बघायला हवी होती की सैन्यात जाऊन प्रशिक्षण घेउन यायला हवे होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Wed, 12/17/2008 - 06:47 नवीन

ब्रेनवॉशिंगचे जाऊ द्या, पण...

काहीतरी चुकतय अस वाटत नाही का? सिस्टमॅटीक ब्रेन वॉशींगच नव्हे का हे?
ब्रेनवॉशिंगचे एक वेळ जाऊ द्या, पण...
५ मार्च १९३१ रोजी बिरेन भटाचार्यच्या नेतृत्वाखाली ब्राहमण बारिया येथील ट्पाल कचेरीतून सरकारी खजिन्यत भरण्यासाठी जाणारी पंचविस हजार रुपयांची थैली लुटली. हे पैसे अखिल नंदीकडे सोपविण्यात आले व याच पैशातुन क्रांतिसाठी पिस्तुले व काडतुसे विकत घेतली गेली.
यह बात कुछ हज़्म नहीं हुई| अर्थात, डेस्परेट (मराठी?) परिस्थितीत, जेव्हा एखादी गोष्ट करायचीच आहे म्हटल्यावर मनुष्य काहीही करू शकतो, पण म्हणून अशा कृत्यांचे समर्थन होऊ शकते काय? प्रस्तुत जिल्हाधिकारी मग्रूर होता, अत्याचारी होता, अमानुष होता आणि म्हणून त्याचा वध करणे गरजेचे / योग्य होते असे जरी (व्यक्तिशः मला जरी पटत नसले तरी) वादाच्या सोयीकरिता मानले, तरी त्याच्या वधाकरिता शस्त्रास्त्रसामग्री आणण्याकरिता पैसे नाहीत म्हणून टपालकचेरी लुटणे हे समर्थनीय होते काय? एकदा "क्रांतीसाठी"म्हटले की काय वाटेल त्याची भलावण होऊ शकते काय? (ही बातमी "टपालकचेरीवर दरोडा" या मथळ्याखाली फिट्ट बसावी. "क्रांतीसाठी" हे लेबल लावल्याने हा दरोडा क्षम्य होतो काय?) मग "शोले"मधला गब्बरसिंग गाववाल्यांना म्हणतो की मी तुमचे संरक्षण करतो आणि त्याच्या बदल्यात जर का मी तुमच्याकडून काही पोती धान्य (जबरदस्तीने) घेतले, तर कोणताही जुलूम करत नाही म्हणून, तर त्याचे लॉजिक नेमके कोठे चुकले? (टपालकचेरीत तरी पैसे येतात ते कोठून? जनतेकडून गोळा केलेल्या महसुलातूनच ना?) आणि हे क्रांतिकारक जर देशासाठी, जनतेसाठी हे सर्व करत होते (म्हणजेच जनतेचे प्रतिनिधित्व करत होते आणि जनतेची त्यांना मान्यता होती), तर जनतेकडून वर्गणी गोळा करून शस्त्रास्त्रांसाठी पैसे गोळा करता आले नसते काय? जनतेने ते दिले नसते काय? (स्वखुशीने की कसे तो नंतरचा प्रश्न.) त्यासाठी दरोडा घालण्याची काय गरज होती आणि दरोडा घालणे हे योग्य होते काय?
क्रूरकर्मा जिल्हाधिकारी स्टिव्हन्स याच्या वधाच्या योजन्या आखल्या जाउ लागल्या. हा शूरवीर आपल्या बंगल्यात जागत्या पहाऱ्यात लपून बसल्याने याला गाठायचा कसा हा प्रश्न भेडसावित होता.
आपल्या हत्येची कारस्थाने रचली जाताहेत, आपला जीव धोक्यात आहे याबद्दल खात्रीलायक कुणकुण लागल्यावर सदर सद्गृहस्थ स्वतःच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणार नाही काय? आणि सदर सद्गृहस्थ हा सरकारी अधिकारी आहे म्हटल्यावर खुद्द सरकार तशी व्यवस्था करणार नाही काय? स्वातंत्र्योत्तर कालात आजसुद्धा महत्त्वाच्या पदांवरील विविध अधिकारी व्यक्तींना, मंत्र्यांना वगैरे ती काय म्हणतात ती झेड सिक्युरिटी वगैरे देत नाहीत काय? आपल्या सुरक्षिततेला असलेल्या धोक्याबद्दल माहिती असूनही सदर महोदयांनी क्रांतीच्या / क्रांतिकारकांच्या सोयीसाठी आपल्या सुरक्षेची किमान खबरदारीसुद्धा घेऊ नये अशी अपेक्षा होती काय? ("शूरवीर" या शब्दावरून तरी तसे वाटले.) तशी अपेक्षा असेल तर या मुलींना कोणत्याही प्रकारची झडती न घेता लपवलेल्या पिस्तुलांसह जिल्हाधिकार्‍यापर्यंत जाऊ देण्यात आले यातून ती अपेक्षा पूर्णच केली गेली, असे म्हणावे लागेल. (किंवा सुरक्षेच्या खबरदारीमध्ये हलगर्जीपणा झाला असे म्हणावे लागेल - टेक युअर पिक.) एखादी कृती (विशेषतः 'वध' वगैरे) ही क्रांतिकारी कृती कधी होते आणि दहशतवादी/अतिरेकी/गुन्हेगारी कृती कधी होते ही मला कधीही न समजलेली गोष्ट आहे. वरील घटनेची इतर दोन घटनांशी तुलना करू या. १. सदर जिल्हाधिकारी हा मग्रूर असून त्याने सत्याग्रहींवर लाठीमार करून असंख्य सत्याग्रहींना बेदम मारहाण केली म्हणून युगांतरसारख्या क्रांतिकारी संघटनांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला / ऑपरेशन ब्लू स्टार नंतर काही शिखांनी इंदिरा गांधींची हत्या करण्याचा विडा उचलला / फाळणीनंतर गांधीजी मुसलमानांचा अनुनय करतात असे वाटल्याने आणि विशेषतः गांधीजींच्या पाकिस्तानला पाकिस्तानचेच पंचावन्न कोटी देण्याच्या आग्रहावर नाराज होऊन नथुराम गोडसे प्रभृतींनी गांधीजींचा वध करण्याचा विडा उचलला. २. जिल्हाधिकार्‍याच्या जिवाला धोका आहे याची कुणकुण असूनही या मुलींना कोणतीही झडती न घेता जिल्हाधिकार्‍यापर्यंत शालीत लपवलेल्या पिस्तुलांसह जाऊ देण्यात आले / आपल्या जिवाला धोका आहे याची पूर्ण माहिती असूनही इंदिरा गांधींनी आपल्या (सशस्त्र) अंगरक्षकांमधून शिखांना वगळण्यास नकार दिला / महात्मा गांधींच्या सुरक्षाव्यवस्थेबद्दल कल्पना नाही, बहुधा तेवढी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवणे शक्यही नसावे आणि गांधीजींचे आपल्या सुरक्षाव्यवस्थेबद्दलचे नेमके विचार काय होते याची कल्पना नाही, परंतु नथुराम गोडसे पिस्तुलासह गांधीजींपर्यंत पोहोचू शकला. ३. पिस्तुलासह जिल्हाधिकार्‍यापर्यंत पोहोचलेल्या मुलींनी जिल्हाधिकार्‍यावर गोळ्या झाडून त्याचा वध केला / इंदिरा गांधींच्या शिख सशस्त्र अंगरक्षकांनी इंदिरा गांधींचा वध केला / पिस्तुलासह गांधीजींपर्यंत पोहोचलेल्या नथुरामने गांधीजींचा वध केला. या तीन घटनांमध्ये नेमका फरक काय? कोणाला तरी आपल्यावर, आपल्या "राष्ट्रा"वर अन्याय आणि जुलूम होतोय असे वाटले, त्याने/तिने त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार वाटली तिच्या वधाचा पण केला, जिचा वध करायचा त्या व्यक्तीने पुरेशी काळजी न घेतल्यामुळे या व्यक्ती आपापल्या लक्ष्यांपरंत शस्त्रांसह पोहोचू शकल्या आणि त्यांनी आपापल्या लक्ष्यांचा पॉइंट ब्लँक रेंजवर (मराठी?) गोळ्या झाडून वध केला. यातले कोठले कृत्य समर्थनीय आणि कोठले नाही आणि का? यातले "क्रांतिकारक" कोण आणि "दहशतवादी/अतिरेकी/खुनी" कोण आणि कोणत्या निकषांवर? "क्रांतिकारक" म्हणून जेव्हा आपण कोणाचा गौरव करतो, तो पूर्णपणे विचार करून, समजूनउमजून करतो, की केवळ आपल्याला तसे करायला शिकवले गेले आहे म्हणून करतो, हीही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण विचार न करता काहीही केले, तर मग आम्हाला कोणीही (पर्यायाने आमच्या नेत्यांनी) काहीही सांगावे आणि आम्ही ते मागचापुढचा विचार न करता आचरावे, अशी परिस्थिती होते. आणि मग "मुकी बिचारी कुणी हाका रे" ही आमची परिस्थिती होती, हीच आहे, फक्त हाकणारे बदललेत, यापेक्षा तेव्हात आणि आतात काहीही फरक राहत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
क
कोलबेर Wed, 12/17/2008 - 07:21 नवीन

वा

वा टग्याजी! १००% विचार पटले.
कुठल्याही एकाच दृष्टीकोनाशी आपण स्वतःला बांधून घेतले ("मॅरींग टू अ सर्टन स्कूल ऑफ थॉट") तर एकूण व्यापक अशा सत्याकडे दुर्लक्ष होते याचे , ही चर्चा म्हणजे एक चांगले उदाहरण आहे.
मुक्तसुनित ह्यंच्या ह्या विधानाचे विस्तृत विवेचन वरील प्रतिसादात वाचायला मिळाले. एकदा का 'क्रांतीकारक' 'जाज्वल्य भक्ति' 'देशासाठी बलिदान' वगैरे उल्लेख केले की बहुतेक लोक भावनेच्या भरात वाहुन जातात. आणि भावनिक झाले की तर्कबुद्धी वापरणे अशक्य होउन बसते, त्यामुळे वरील (कडू) व्यापक सत्ये दुर्लक्षली जाऊन त्यावर फक्त विखारी टीका करण्याचे प्रयत्न होतात. 'किव येते', 'हलकट विचार' इ.इ. शेरेबाजी त्यातुनच होते असे वाटते. गांधीवादी असो वा क्रांतीकारक सगळ्यांचे अंतिम ध्येय स्वातंत्र्यच होते, पण म्हणून आंधळेपणाने त्यांच्या कुठल्याही कृतीचे समर्थन वा अभिवादन करण्यापेक्षा चिकित्सक वृत्तीने त्यातले अनुकरणीय तेवढेच वेचुन काढणे अधिक योग्य. (टग्याजींचा पंखा) कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
आ
आजानुकर्ण Wed, 12/17/2008 - 09:17 नवीन

उत्तम प्रतिसाद

टगोबांचा प्रतिसाद नेहमीप्रमाणेच पटला आपला (सहमत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 12/17/2008 - 07:21 नवीन

मूळ मुद्दा

मूळ मुद्दा इथे हा आहे की बंगालच्या वाघिणी म्हणा किंवा इतरही क्रांतिकारक म्हणा ज्यानी ज्यानी हत्या केल्या त्या ब्रिटीश अधिकार्‍यांच्या किंवा त्या गोष्टीला कारणीभूत ठरलेल्या लोकांच्या केल्या. त्यांच्यातिक कोणीही रेल्वेस्थानकात, बसमधे बॉम्बस्फोट किंवा बेछूट गोळीबार नाही केला. सामान्य जनतेला त्यात वेठीला धरले नाही कोणी. " हनुमंत महाबळी रावणाची लंका जाळी, होते बळ म्हणूनि न जाळि झोपड्या गोरगरीबांच्या" हा फरक लक्षात घ्यावा. आणि क्रांतिकारकानी फक्त खजिन्याचीच लूट केली असं नव्हे. मध्यंतरी तर असे वाचनात आले की क्रांतिकारकानी खंडोबाचे देवस्थान लूटूनही क्रांतिकार्यासाठी पैसा जमा केला होता. आणि त्याबद्दल जनतेने त्याना कदाचित माफ अशासाठी केले असेल कारण त्यांचा त्यामागचा हेतू स्वतःच्या घरचे गल्ले न भरता देश स्वतंत्र व्हावा यासाठी काहीतरी करणे. गांधींनी संरक्षण अथवा शस्त्र जवळ बाळगणे नाकारले असेल तर ते ठीक आहे कारण ते त्यांच्या तत्वानुसार वागत होते. पण इंदिराजी आणि तो ब्रिटीश अधिकारी याना असा अतिरेकी आत्मविश्वास होता की आपल्याला कोण मारू शकत नाही. आणि त्यानेच त्यांचा घात केला. कारण विचार न करता काहीही केले, तर मग आम्हाला कोणीही (पर्यायाने आमच्या नेत्यांनी) काहीही सांगावे आणि आम्ही ते मागचापुढचा विचार न करता आचरावे, अशी परिस्थिती होते. आणि मग "मुकी बिचारी कुणी हाका रे" ही आमची परिस्थिती होती, हीच आहे, फक्त हाकणारे बदललेत, यापेक्षा तेव्हात आणि आतात काहीही फरक राहत नाही. हे बाकी खरे बोललात. ते वारंवार दिसलेच आहे. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Wed, 12/17/2008 - 21:26 नवीन

मूळ मुद्द्याला धरून आणखी मुद्दे

मूळ मुद्दा इथे हा आहे की बंगालच्या वाघिणी म्हणा किंवा इतरही क्रांतिकारक म्हणा ज्यानी ज्यानी हत्या केल्या त्या ब्रिटीश अधिकार्‍यांच्या किंवा त्या गोष्टीला कारणीभूत ठरलेल्या लोकांच्या केल्या. त्यांच्यातिक कोणीही रेल्वेस्थानकात, बसमधे बॉम्बस्फोट किंवा बेछूट गोळीबार नाही केला. सामान्य जनतेला त्यात वेठीला धरले नाही कोणी.
इंदिरा गांधींच्या शिख अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची हत्या केली, सामान्य जनतेवर गोळीबार नाही केला. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली, जमलेल्या इतर उपस्थितांवर गोळ्या झाडल्या नाहीत.
आणि क्रांतिकारकानी फक्त खजिन्याचीच लूट केली असं नव्हे. मध्यंतरी तर असे वाचनात आले की क्रांतिकारकानी खंडोबाचे देवस्थान लूटूनही क्रांतिकार्यासाठी पैसा जमा केला होता. आणि त्याबद्दल जनतेने त्याना कदाचित माफ अशासाठी केले असेल कारण त्यांचा त्यामागचा हेतू स्वतःच्या घरचे गल्ले न भरता देश स्वतंत्र व्हावा यासाठी काहीतरी करणे.
जनतेने माफ केले म्हणजे नेमके कोणी माफ केले? खंडोबाचे देवस्थान त्या काळी ज्यांच्या मालकीचे होते (किंवा ट्रस्टखाली असेल तर ज्या ट्रस्टच्या अधिपत्याखाली होते) त्यांच्या किंवा खंडोबाच्या देवस्थानात त्या काळात दर्शनासाठी किंवा श्रद्धेपोटी नित्याने जा-ये करणार्‍या भक्तांच्या मतांची किंवा भावनांची चाचपणी (सर्व्हे वगैरे) कोणी केली होती काय? आणि माफ केले म्हणजे नेमके काय केले? दुसरा काही पर्याय होता काय? की 'पब्लिक मेमरी इज़ शॉर्ट' याचे हे उदाहरण आहे? क्रांतिकारकांचा हेतू स्वतःचे गल्ले भरण्याचा नव्हता हे शतशः मान्य. पण तरीही देवस्थानाची संपत्ती देवस्थानाच्या परवानगीशिवाय वापरणे - ज्या कार्यासाठी वापरायचे ते कितीही उदात्त असले तरी - समर्थनीय होते काय? देवस्थानाच्या मालकांना / विश्वस्तांना ते कार्य रास्त आणि उदात्त वाटून त्यांनी स्वखुशीने ती संपत्ती क्रांतिकारकांना दान दिली असती तर गोष्ट वेगळी. गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन "आपण आपल्या गल्लीसाठी करतो आहोत", "ही आपल्या गल्लीसाठी अभिमानाची गोष्ट आहे", "त्याने आपल्या गल्लीची एकी वाढते" वगैरे कितीही उदात्त हेतूंनी करायचे म्हटले, तरी त्यासाठी वर्गणीची जबरदस्ती करणे किंवा एखाद्याने स्वेच्छेने वर्गणी द्यायचे नाकारले तर "नाही देत काय वर्गणी? गल्लीत ये, मग घेतोच बघून!" असे म्हणणे हे समर्थनीय होते काय? त्याने मूळ कार्याची उदात्तता टिकून राहते काय? हे उदाहरण आणि क्रांतीसाठी देवस्थान लुटणे यात नेमका फरक काय?
पण इंदिराजी आणि तो ब्रिटीश अधिकारी याना असा अतिरेकी आत्मविश्वास होता की आपल्याला कोण मारू शकत नाही. आणि त्यानेच त्यांचा घात केला.
संबंधित ब्रिटिश अधिकार्‍याबाबत कल्पना नाही, परंतु इंदिरा गांधींच्या बाबतीत माझ्या अर्धवट ऐकीव माहितीप्रमाणे (चूभूद्याघ्या!) इंदिरा गांधींना त्यांच्या जिवावरील संभाव्य धोक्याची पूर्वसूचना आणि अंगरक्षकांमध्ये शिखांची नेमणूक न करण्याचा सल्ला गुप्तचरांकडून मिळाला होता, परंतु "हे खरे असले तरीही मी माझ्या अंगरक्षकांच्या नेमणुकीत भेदभाव करू शकत नाही" म्हणून त्यांनी तो नाकारला होता. आधी म्हटल्याप्रमाणे ही ऐकीव माहिती आहे, त्यात कितपत तथ्य आहे याची मला कल्पना नाही, स्वतंत्र वाचनातून याची मी अद्याप खात्री करून घेतलेली नाही, परंतु यात तथ्य असल्यास त्याला अतिरेकी आत्मविश्वास म्हणावा की तत्त्वनिष्ठा की आणखी काही, याचा निर्णय मी करू शकलेलो नाही. अवांतर:
" हनुमंत महाबळी रावणाची लंका जाळी, होते बळ म्हणूनि न जाळि झोपड्या गोरगरीबांच्या"हा फरक लक्षात घ्यावा.
लंकेत गरीब नव्हते का? लंकेतल्या झोपड्यांत राहणार्‍या गरिबांनी सीतेचे हरण केले होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
आ
आजानुकर्ण Wed, 12/17/2008 - 21:31 नवीन

लंकेत

लंकेत गरीब नसावेत. कारण लंका सोन्याची होती. (सोन्या हे रावणाचे लहानपणीचे नाव). त्यामुळे कोणालाही वाटले तर काढ एक सुवर्णवीट आणि वीक असे करु शकत असावेत. आपला, (रावण) आजानुकर्ण Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ए
एकलव्य Wed, 12/17/2008 - 08:20 नवीन

भलतेच ब्रेनवॉशिंग

टगेदादा - आपले भलतेच ब्रेनवॉशिंग झालेले दिसते आहे. चला आम्हीही सामील होतो आणि लिस्ट वाढवितो... सांगा बरे - फरक तो काय?
  1. शिवाजी महाराजांनी लाल महालावर रात्री घातलेली धाड आणि अफजलने केलेला पार्लमेन्टवरील हल्लाबोल
  2. मराठ्यांनी फोडलेले दिल्लीचे तख्त आणि अफगाणिस्तानात तालिबान्यांनी महाबुद्धाचा केलेला ध्वंस
  3. भगतसिंगाने झाडलेल्या गोळ्या आणि जनरल डायरने दिलेला गोळीबाराचा आदेश
  4. सुभाषबाबूंनी इशान्य भारतावर केलेले आक्रमण आणि हिटलरने इंग्रजांवर म्हणून भारताशी पत्करलेले वैर
  5. बांगला मुक्तिसंघर्ष आणि डायरेक्ट ऍक्शन फॉर पाकिस्तान
  6. ...
म्हटले तर फरक आहे आणि नाहीच म्हटले तर काहीही फरक नाही. तर्क चालू देत... त्याने नुकसान काहीही नाही. (मॅझिनी) एकलव्य Intelligence KILLS Judgment... Slowly but Surely!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
आ
आजानुकर्ण Wed, 12/17/2008 - 09:16 नवीन

मराठ्यांनी फोडलेले तख्त?

मराठ्यांनी दिल्लीचे तख्त वगैरे काही फोडलेले नाही. दिल्लीपर्यंत गेलेले मराठे हे बिकट परिस्थितीची लागल्याची जाणीव होईपर्यंत बादशहाशीच एकनिष्ठ होते आणि सैनिकांचे पगार द्यायला पैसे नव्हते म्हणून मग पेशव्यांनी सिंहासनाचा चांदीचा पत्रा विकून पैसे गोळा केले. त्यालाच आपण तख्त वगैरे फोडले असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो. आपला, (वस्तुनिष्ठ) सुमेरसिंग आजानुकर्ण गारदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
क
कोलबेर Wed, 12/17/2008 - 09:47 नवीन

+१

अजानुकर्ण शेठ, तुमच्यामुळे ही माहिती नविनच कळली. भगतसिंगाने घातलेल्या गोळ्यांमध्ये किती निरपराध मेले आणि डायरबाबाने घातलेल्या गोळ्यांमध्ये किती मेले ह्यांचा ताळमेळ लावला तर ती तुलना देखिल लिष्ट मधुन वगळावी लागेल. सुभाषबाबुंनी केलेले इशान्य भारतावरील (?) आक्रमण ह्या विषयी मात्र फारशी माहिती नाही. -- “The sign of an intelligent people is their ability to control their emotions by the application of reason”
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ए
एकलव्य Wed, 12/17/2008 - 17:55 नवीन

वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात

भगतसिंगाने निरपराधांवर गोळ्या झाडल्या नाहीत असे आपण म्हणता आहात पण इंग्रज न्यायाधीश तसे म्हणत नाही. डायरचेही तसेच... आपण पाहाल त्याप्रमाणे आहे. शिवाजीला वाट चुकलेला देशभक्त म्हणणारेही कमी नाहीत. ही तुलना वगळायला हवी हे मान्य आहे पण वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात. तसे यादी वाढवणारे बक्कळ आहेतच म्हणा. चीअर्स - एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
क
कोलबेर Wed, 12/17/2008 - 21:39 नवीन

तुलना

ही तुलना वगळायला हवी हे मान्य आहे पण वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात.
टगोबांची उदाहरणे खोडून काढायला (त्यातील फोलपणा दाखवायला) तुम्ही मुद्दामच ही उदाहरणे दिलीत ह्याची कल्पना आहे, पण तरिही सगळ्याच तुलना वगळायच्या म्हंटलं तर हे चिकित्सा करुनच ठरवावे (भगतसिंगांच्या उदाहरणा सारखी) असे वाटते. चीअर्स - कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
ए
एकलव्य Wed, 12/17/2008 - 17:48 नवीन

माहिती आहे...

धन्यवाद! पण तुलना करायचीच म्हटल्यावर काय? (अजून एक) लव्य गारदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
छ
छोटा डॉन Wed, 12/17/2008 - 22:42 नवीन

सहमत आहे ...

दिल्लीपर्यंत गेलेले मराठे हे बिकट परिस्थितीची लागल्याची जाणीव होईपर्यंत बादशहाशीच एकनिष्ठ होते आणि सैनिकांचे पगार द्यायला पैसे नव्हते म्हणून मग पेशव्यांनी सिंहासनाचा चांदीचा पत्रा विकून पैसे गोळा केले. त्यालाच आपण तख्त वगैरे फोडले असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो.
अगदी असेच म्हणतो ... मी जो काही अभ्यास केला आहे त्यातुन हीच परिस्थीती स्पष्ट होतो. मराठ्यांना तख्त फोडले खरे पण ते बहादूरी वगैरे नाही तर "गरज" म्हणुन फोडले हे सत्य आहे. आजानुकर्णाशी सहमत ...! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Wed, 12/17/2008 - 20:46 नवीन

तेच तर विचारतोय!

टगेदादा - आपले भलतेच ब्रेनवॉशिंग झालेले दिसते आहे.
स्वतःच्या हातांनी धुवून जितके स्वच्छ करायला जमले तितके केलेय बुवा. आता लाँड्रीत धुतल्यासारखे एकसारखे पांढरेशुभ्र झाले नसेल, एखाददुसरा डाग राहिलाही असेल - चालायचेच. शेवटी स्वावलंबनाचा मार्ग खरा.
सांगा बरे - फरक तो काय?
तेच तर विचारतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय - समजून घ्यायला आवडेल. मला कळलेला नाही. तुम्हाला कळला असेल तर जरा तुम्हीच समजावून सांगा की!
म्हटले तर फरक आहे आणि नाहीच म्हटले तर काहीही फरक नाही.
फरक आहे असे सतत सांगण्यात, ठसवण्यात आले आहे. फक्त नेमका काय फरक आहे ते कोणी स्पष्ट केलेले नाही. आता इतके जण सांगतात म्हणजे कदाचित त्यात तथ्य असूही शकेल. पण नेमके काय ते स्वतःला नीट समजल्याशिवाय केवळ सगळे सांगतात, सांगत आले आहेत म्हणून मानायचे काय? म्हणून तर म्हणतोय की फरक नीट समजावून सांगा; समजला तर मानायला काहीच हरकत नाही. पण न समजता केवळ 'बाबा वाक्यं प्रमाणम्' (किंवा 'संघं शरणं गच्छामि') म्हणून विश्वास ठेवणे माझ्यापुरते मला तरी योग्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
क
कलंत्री Sun, 12/14/2008 - 12:31 नवीन

अवांतर प्रतिक्रिया.

खरं आहे! एवढंच नव्हे, तर 'भारताला आजादी विना खड्ग, विना ढाल मिळाली हो..!' अशी गीते गाण्यातच आम्ही धन्यता मानतो..! ही अवांतर आणि विषयाला भरकटवणारी प्रतिक्रिया आहे. संपादक मंडळानी यावर टिपण्णी करावी. तात्या : गांधी हलके आहे म्हणून कोणाचे कार्य उत्कट होत नाही असा विचार ठेवावा. शेवटी आपण सर्व एक आहोत आणि आपल्यासारख्या दिग्ग्जाच्या प्रतिक्रिया मूळ विषय अकारणच भरकटवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अवलिया Sun, 12/14/2008 - 12:37 नवीन

ही अवांतर

ही अवांतर आणि विषयाला भरकटवणारी प्रतिक्रिया आहे. संपादक मंडळानी यावर टिपण्णी करावी. मला अजिबात असे वाटत नाही. उलट भारताला स्वातंत्र्य अहिंसेतुन मिळाले नाही, किंवा क्रांतिकारकांमुळे मिळाले नाही. दुस-या महायुद्धामुळे बेजार झालेल्या आंग्लांना ह्या प्रचंड देशाचा कारभार करणे अशक्य झाले म्हणुन ते निघुन गेले हे जितक्या लवकर आपण समजु तितके आपल्याला चांगले असेल. यात अहिंसावाद्यांचा किंवा क्रांतीकारकांचा अपमान करण्याचा हेतु नाही, पण भावनाविवश होवुन इतिहासाकडे आपण पाहु नये. अर्थात इंग्रजांना अहिंसावाद्यांपेक्षा क्रांतीकारकांचे भय जास्त वाटत होते हे मात्र १०० टक्के नक्कीच. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
स
सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 13:13 नवीन

अवांतर नाही

द्वारकानाथजी, जर स्वातंत्रय्प्राप्तीसाठी सर्व मार्ग अनुसरणीय होते व जर स्वातंत्र्यप्राप्ती ही केवळ घोषणा, आंदोलने व मोर्चे यातुन न होता त्यात असंख्य क्रांतिकारकांचा सिंहाचा वाटा आहे तर सरकारी प्रचार यंत्रणेने दे दी हमे आजादी बीना खड्ग बीना ढाल असा खोटा व स्वतःला सोयीचा व हिताचा प्रचार करणे हे चीड आणणारे आहे, सदर लेख क्रांतिकारकांवर असल्याने या प्रचाराचा निषेध अवांतर ठरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
श
शंकरराव Sun, 12/14/2008 - 04:14 नवीन

अवघ्या

अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यात त्यांचा वाघिणीचा वाटा आहे. आज त्यांच्या शौर्यकृत्याच्या ७७ व्या स्मरणदिनी त्या दोघींना सादर अभिवादन. आसेच म्हणतो.... स्वातंत्र चळवळीतील सर्व क्रांतिकरकांना व त्यांच्यातील निस्सिम देशभक्तिला शतशः वंदन प्रस्तुत ऍतिहासिक लेखाबद्द्ल सर्वसाक्षी याचे अनेक आभार
  • Log in or register to post comments
ब
बगाराम Sun, 12/14/2008 - 04:18 नवीन

या लहान

या लहान मुलींनी पिस्तुल प्रथमच हाताळले होते. पैकी सुनिती ही कृश अंगकाठीची, तिची बोटे हडकुळी होती. तिला मागचा चाप अंगठ्याने ओढायला जमत नव्हता, तिने आपल्या प्रशिक्षकाला शक्कल सुचविली की मला अंगठ्या ऐवजी मधल्या बोटाने चाप मागे ओढयला शिकव! ही शक्कल लागु पडली. या दोघींनी दोन दिवस सराव केल. तेवढा पुरेसा होता कारण एक तर वेळ नव्हता व दुसरे म्हणजे गोळ्या अगदी जवळुन झाडायच्या होत्या. अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलिंना हातात बंदुकी देउन खून करायला लावणारे आणि तालिबानी अल-कायदा ट्रेनिंग कँपमधले अतिरेकी ह्यांच्यात काय फरक? १४ वर्षाच्या मुलींना काय समज असते की त्यांना आपले जीवित धोक्यात घालुन असले कृत्य करायला भाग पाडावे? वरील वर्णन वाचुन तर अंगावर काटा आला. कोवळ्या मुलिंना शस्त्रास्त्रे चालवायला शिकवुन जीवावर उदार करणारे हे देशभक्त मला तरी आदरस्थनी वाटले नाहीत. आपल्याला ’क’ ऐवजी राजबंद्यांच ’ब’ वर्ग देण्यात यावा यासाठी अन्नस्त्याग्रह केला. आवाज उठवुनही दाद मिळत नाही हे समजल्यावर उपोषणास प्रारंभ केला व अखेर त्याची बदली केली गेली. हे वाचुन गांधीजींची टवाळी करणारे काय म्हणतील ते वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
क
केदार Sun, 12/14/2008 - 04:47 नवीन

ध्येय जेव्हा स्वातंत्र्य

बगाराम, ध्येय जेव्हा स्वातंत्र्य असते तेव्हा वयाला मर्यादा नसते. तूमचा तालिबान विषयीचा अभ्यास कच्चा असल्याचे लगेच दिसतेय कारण जेव्हा अफगाण, तालिबान्यांनी स्वतंत्र्य केले तेव्हां अफगाणात दिवाळी साजरी झाली होती हे आपल्याला माहीती नसावे. आजची तालिबान आणि तेव्हांची तालिबान खचितच वेगळी होती, थोडे खोलात शिरा. मग बोलू. तूम्ही फ्क्त आजच्याच तालिबानला खरे समजताय. कूठल्याही चळवळीला सामान्यांची मान्यता लाभली की फ्क्त चळवळ राहत नाही. त्यामूळे उद्य १० वर्षाच्या बालकाची कथा कोणी लिहीली ( भारतीय / अभारतीय) व ते स्वातंत्र्य प्राप्ती साठी बलिदान झाले असेल तर आम्हांस त्या व्यक्तीचा आदरच वाटेल. उपोषन हे गांधीजीनीच अस्तित्वात आणले, आणी उपोशन केले म्हणजेच अहिंसावादी असा सुर जो तूमच्या पोस्ट मध्ये लागतोय तो निश्चीतच चूक आहे. आणि जे अहिसांवादी नसतात (उदा सावरकर, नेताजी, ह्या भगिनी, मी स्वत :) इ इ) त्या सर्वांना 'कूठलाही' मार्ग चालतो. हिंसेंचा वा अहिसेंचा. की फरक पैंदा यारो. ताक. - गाधींजीची टवाळी करानारे हे कोण हे मला अजुन माहीत नाही पण तरीही उत्तर दिले कारण मि ही त्यांचा डोळस विरोधक आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
ब
बगाराम Sun, 12/14/2008 - 04:50 नवीन

माझ्या

माझ्या प्रतिक्रिया उडवल्या जात आहेत. मी कसे काय उत्त्तर देऊ? तालिबानचे समर्थन करणार असाल तर तशीही माझी शरणागतीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार
व
विसोबा खेचर Sun, 12/14/2008 - 05:02 नवीन

सदर

सदर लेखावरील आपले मत समजले. आपला अभिप्राय व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिली गेली आहे. मलाही आपण क्वेश्चन केले आहे. परंतु पक्या किंवा इतर कुणी या लेखाबद्दल त्यांचे मत लिहिल्यास, अथवा अभिवादन केल्यास प्रत्येकालाच आपण जाहीरपणे क्वेश्चन करू शकत नाही. आपण खरड पाठवून त्या विषयासंदर्भात एखाद्याशी चर्चा करू शकता. साक्षींचा सदर लेख हा काय चूक, काय बरोबर यावर भाष्य न करता इतिहासात जे घडलं आणि त्या मुलींनी जे केलं त्यावर भाष्य करणारा आहे.. असो, इथे अधिक विषयांतर न करता या संदर्भात आपण माझ्याशी खरडीतून संपर्क साधू शकता. शक्य झाल्यास व इच्छा असल्यास उत्तर देईन.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
आ
आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 05:27 नवीन

बगाराम

बगाराम यांचा मुद्दा विचार करण्याजोगा आहे. आपला (तटस्थ) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
स
सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 13:06 नवीन

आपली कीव येते

<अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलिंना हातात बंदुकी देउन खून करायला लावणारे आणि तालिबानी अल-कायदा ट्रेनिंग कँपमधले अतिरेकी ह्यांच्यात काय फरक> इतिहास जरा नीट वाचा. वयाच्या १४ व्या वर्षी ज्या मुलींनी असिम शौर्य दाखवले त्यात आपल्याला क्रांतिकारकांचे तालिबानी वर्तन दिसले यात आपली मनोवृत्ती दिसुन आली क्रांतिकारक वा त्या वाघिणी यांना यत्किंचितही कमीपणा आला नाही. या वीरांगना ध्येयाने प्रेरित होऊन स्वतःच्या जीवावर उदार झाल्या होत्या, त्याना पढवुन वा बुद्धिभेद करुन तयार केलेल्या नव्हत्या. १४ व्या वर्षी समज नसते हे विधान आपले व्यक्तिगत मत वा आपला अनुभव असू शकतो पण ते जागतिक सत्य नव्हे. जरा भारतिय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास एकदा वाचा, अनेक शाळकरी हुतात्मे दिसतील. बाकी आपली आदरस्थाने हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे त्यावर माझे काही भाष्य नाही. उपोषणाविषयीचे आपले घोर अज्ञान आपण जाहिर केले आहेत. क्रांतिकारकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कोणताही मार्ग वर्ज्य नव्हता. तुरुंगात हातापायात बेड्यांनी बद्ध असतानाही आपल्या अधिकारांसाठी आणि स्वाभिमानासाठी क्रांतिकारकांनी तेजस्वी उपोषणे केलेली आहेत. अहो जे फासावर जाणारच होते ते उपोषणाने देहत्याग करायला का भितील? गांधींचा विषय विनाकारण घुसडला आहातच तर ऐका: माझ्या अल्पशा माहितीनुसार सशस्त्र क्रांतिच्या पुरस्कर्त्यांपैकी तीन क्रांतिवीरांनी आपल्या ध्येयाखातर व राष्ट्राभिमानाखातर आमरण उपोषण केले व देहत्यागाने ते अजरामर झाले. ते तीन हुतात्मे आहेतः १) हुतात्मा मणींद्र बॅनर्जी - २० जून १९३४ फतेगढ तुरुंग २) हुतात्मा जतिन दास - १३ सप्टेंबर १९२९ लाहोर तुरुंग ३) हुतात्मा महाविरसिंह - १७ मे १९३३ अंदमान तुरुंग आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
व
विनायक प्रभू Sun, 12/14/2008 - 17:37 नवीन

सर्वसाक्षी

सर्वसाक्षी साहेब, जाउ दे. वार झोन म्हणजे काय? आणि वार झोन मधे वय नसते. हे कळणे खूप जणाना कठीण जाते. तालीबान्याबरोबर थोडीशी सुद्दा तुलना हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 18:04 नवीन

हास्यास्पद विचार

प्रभुशेट, अहो १४ वर्षी समज नसते हे ऐकुन मला तर जाम हसायला आलं. नापास झालेली काही पोरे ९५ टक्के मिळविणार्‍यांबद्दल असेच बोलतात 'मास्तरांचे चमचे आहेत/ कॉपी केली असेल/ मास्तरने पैसे खाऊन पेपर आधीच दिला असेल ..नाहितर इतके गुण मिळुच शकत नाहीत'. चालायचेच, कारण त्यांची कुवत तितपतच असते त्यामुळे त्यांना कुणाला बुद्धी असेल व कुणी कष्ट केले असतील असा विचारच करता येत नाही. किंवा असे कष्ट करायची तयारी नसते. मग अशी मुक्ताफळे उधळण्यापलिकडे ते दुसरे काय करणार? पुढे नोकरीत असेच होते. एखाद्या कर्तबगार मुलीने अल्पावधीत पदोन्नती मिळवली तर अनेक वर्षे खुर्चीत बसून दात कोरणारे छातीवर हात ठोकुन सांगतात की आहो आम्हाला ५ वर्षात मिळत नाही इथे हिला एका वर्षात मिळाले यात हिचे कर्तृत्व नाही तर बॉसचे आहे, तिने त्याला 'खूष' केला असेल. ज्या वयात आपल्याला काही समजत नसते वा काही करायची धमक नसते आणि त्या वयात इतरांनी काही असामान्य कृत्य केले तर ते मान्य न करायची रोगट मानसिकता असलेले नेमेकी हिच प्रतिक्रिया देतात. याना उदाहरणे शोधायचीच म्हटली तर खूप मिळतील, पण शोधणार कोण? आणि कशाला? लहानशी रांगोळी काढायची तरी कष्ट पडतात, मात्र जाता जाता पायाने ती फराटुन टाकायला कष्ट वा बुद्धी लागत नाही. कोणी रांगोळ्या रेखतात, कोणी पाहतात व कौतुक करतात, कुणी नाक मुरडतात तर कुणी त्या फराटुन टाकतात. ज्याची त्याची मानसिकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
आ
आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 18:30 नवीन

हास्यास्पद का?

दोन प्रश्नः १. हमास, हिजबुल्ला पासून ते तालिबान पर्यंत सगळे आधुनिक क्रांतीकारक लहान मुलांचे ब्रेनवॉशिंग करत राहतात हे वारंवार दिसले आहे. पॅलेस्टिनींवर होणाऱ्या अत्त्याचारांच्या फिती वारंवार दाखवून ज्यू हे डुकरापासून जन्मलेले आहेत, हिंदू माकडाचे वंशज आहेत, हे धर्म घाण आहेत हे लहान मुलांच्या मनांवर बिंबवले जाते. या ब्रेनवॉशिंगमध्ये आणि वरील ब्रेनवॉशिंगमध्ये काय फरक आहे हे मला समजत नाही. २. आजकाल सामनामध्ये हिंदुस्तानचे इस्लामिस्तान होणार वगैरे पेटवापेटवीचे प्रयत्न चालले आहेत. समजा हे इस्लामिस्तान दुर्दैवाने यशस्वी झालेच तर कसाब आणि इतर ९ दहशतवादी हे नव्या इस्लामी राष्ट्रात क्रांतीकारक ठरतील का? हे प्रश्न प्रामाणिकपणे विचारत आहे. माझी कीव वगैरे न करता याची उत्तरे द्यावीत जेणे करून माझ्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sun, 12/14/2008 - 18:40 नवीन

फरक

अतिरेकी तयार करुन दुस-या देशात पाठविणे आणि देशभक्तीने प्रेरीत होणे हा एक फरक आहे. आजकाल अतिरेकी तयार करणे हा एक कारखाना आहे. ब्रेन वॉशींग ची प्रोसेस सहा महिने ते एक वर्ष चालते. वरील लेखात स्पाँटेनियस रिऍक्शन दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ब
बगाराम Sun, 12/14/2008 - 21:10 नवीन

स्वतंत्र

स्वतंत्र कश्मिर साठी लढणार्‍या अतिरेक्यांना क्रांतीवीर म्हणणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अभिजीत Sun, 12/14/2008 - 21:19 नवीन

स्वतंत्र

स्वतंत्र कश्मिर साठी लढणार्‍या अतिरेक्यांना क्रांतीवीर म्हणणार का? नाही. त्यांना अतिरेकीच म्हणणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
स
सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 21:40 नवीन

कश्मिर

हा हिंदुस्थानचा भाग आहे. त्या भागाचा लचका तोडण्यासाठी परक्या देशातून शत्रू आक्रमण करीत आहे, दहशतवाद पसरवीत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता त्या घूसखोरांना क्रांतिवीर म्हणायचे की अतिरेकी ते आपणच ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
ब
बगाराम Sun, 12/14/2008 - 21:45 नवीन

हिंदुस्था

हिंदुस्थानही त्याकाळी ब्रिटीश साम्राज्याचाच भाग होता. हे सगळे आपण नदीच्या कुठल्या तीरावर आहोत ह्यावर ठरते. मी अतिरेक्यांना अतिरेकीच म्हणणार. १४व्या वर्षी अल्लड वयात बंदुका हाती देणे हा अतिरेकच. आणि खुद्द कश्मिर मधील अतिरेकी? त्यांना काय म्हणाल मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 22:11 नवीन

उत्तर आपणच दिले आहेत

आपण ब्रिटिशधर्जिणे असाल तर तमाम क्रंतिकारक आपल्या नजरते अतिरेकी असणे स्वाभाविक आहे. आम्ही हिंदुस्थानच्या वतीने विचार करीत असल्याने आम्हाले ते क्रांतिकारक वंदनिय हुतात्मे वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
भ
भास्कर केन्डे Tue, 12/16/2008 - 02:03 नवीन

विषयांतर

बगाभाऊ, क्रांतिकारक असो वा अहिंसावादी, दोन्ही प्रकारांतल्या स्वातंत्र्यवीरांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपल्या मातृभूमीस स्वतंत्र करण्यासाठी प्राण्याच्या अहुत्या दिल्या. त्यांच्या बलिदानांमुळे आपण येथे अशा मिमांसा करण्याच्या परिस्थितीत आहोत. याचे भान ठेऊन त्या क्रांतिवीरांना मानचा मुजरा करावा... पुढील पिढीसमोर आदर्श सांगत अशा देशभक्तांच्या कथा प्रत्येकाच्या मुखी वदल्या जाऊन पुन्हा देशभक्तीच्या चैतन्याने वातावरण मुग्ध करावे असे मला वाटते. वयाच्या बाबतीत योग्य-अयोग्यचा खल करण्यासाठी एक स्वतंत्र धागा सुरु केलात तर तेथे येऊन आम्ही आपली मते मांडू. पण येथे स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उद्घृत करताना असले विचार करण्याऐवजी विधायक लेखन करावे अशी नम्र विनंती. त्या खलासाठी आपण अगदी श्रावण बाळ (कोवळ्या वयात आई वडिलांचे ओझे वाहने), अभिमन्यू (बालवयात वडिलांच्या सांगण्यामुळे युद्धात उतरणे) ते बाबू गेणू (कुणाच्या तरी ब्रेनवाशिंग मुळे नीच व कृर इंग्रज अधिकार्‍यांकडून उघड्या छातीवर गोळ्या घेण्यासाठी निशस्त्र सामोरे जाणे) पर्यंत सगळ्या उदाहरणांवर कीस पाडा... आम्ही आपले अनुमोदन करु पण इथे असले काही आमच्याच्याने होणार नाही. वंदे मातरम्! आपला, (देशप्रेमी) भास्कर संपादित आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
ब
बगाराम Tue, 12/16/2008 - 06:39 नवीन

माननीय

माननीय केंडेमहोदय, आपल्याला न पटलेल्या विचारांना 'हलकट' असे संबोधायला हे काही संघाचे कार्यालय नव्हे. इथल्या संपादक मंडळाने कृपया ह्या जहाल विचारसरणीच्या लोकांच्या भाषेला लगाम घालावा. अश्या शेरेबाजीमुळे चर्चा होणे अशक्य होउन बसते आणि हुल्लडबाजी करणार्‍यांना आपला मुद्दाच पुढे रेटल्याचे समाधान मिळते. -बगाराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
व
विनायक प्रभू Sun, 12/14/2008 - 22:06 नवीन

सत्कार

तुम्ही हवे असल्यास त्यांचा क्रांतिवीर म्हणुन सत्कार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
क
कलंत्री Sun, 12/14/2008 - 20:53 नवीन

गांधीवाद्यांना आवाहन.

आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते. कोणास ठाऊक आज अनेक़जण गांधीवादाचे / विचाराचे समर्थन करण्यास पुढे येत आहेत ही मला सुखावणारी गोष्ट आहे. संकेतस्थळाचे निर्माण झाले तेंव्हा आम्ही गांधीवादावर काही लिहावे आणि सावरकरवादी, क्रांतिकारकवादी आणि संघाच्या विचारसरणीच्या लोकांनी तेच ते प्रश्न विचारावे आणि राष्ट्रीय लढ्याच्या संदर्भात आम्ही यथायोग्य उत्तर द्यावे आणि या लोकांचे परत परत तेच ती प्रश्न यावीत असे ठरलेले असे. आता वरील प्रश्नाचे उत्तर देणे सोपे आहे कारण स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा आणि त्याचे नायकत्व निर्विवादपणे कॉग्रेस आणि गांधीकडेच ( त्याच्या यश-अपयशाबरोबर) जाते. स्वातंत्र्य लढ्याचे अनेक पदर आणि पैलु आहेत, परंतु माझी अपेक्षा अथवा विनंती आहे की, गांधीवादी लोकांनी याविषयावरचा सांगोपांग अभ्यास करावा. सुदैवाने आज अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्षी गांधीवादाचा परामर्ष घेणारी अनेक पुस्तके प्रकाशित होत असतात. आजही गांधीवादाचा अभ्यास असणारी अनेक थोर आणि तज्ज्ञ लोक आहेतच. वरील प्रश्नाचा उपयोग करुन आपण याविचारसरणीचा सांगोपांग अभ्यास करावा. सर्वसामान्य लोकांना गांधीवादाबद्दल परत आस्था आणि विश्वास वाटेल अशी मांडणी करावी. शक्य असल्यास काही प्रश्नेही हाताळावावीत,तरच आपण गांधीवादाला समजावुन घेत आहे असे निष्पन्न होईल. अन्यथा भाषाविलास आणि वाणीविलासा बाहेर आपलेही पाऊल पडणार नाही. बर्‍याच वेळेस अनेक लोकांचा विचार करण्याची पद्धत एका टप्प्यावर येऊन थांबते ते आपल्याबाबतीत घडू नये अशीच माझी प्रार्थना आहे. याबाबतीत माझा जो काही अभ्यास आणि ग्रंथसंग्रह आहे तो आपल्यासाठी खुला आहे. द्वारकानाथ कलंत्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 21:43 नवीन

विषयांतर नको

द्वारकानाथजी, हा लेख दोन क्रांतिकारक कन्यांना समर्पित आहे. त्यावर जे काही लिहायचे ते अवश्य लिहा. पण या लेखात गांधीवाद घुसवु नका. आपण त्या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
ट
टारझन Sun, 12/14/2008 - 22:12 नवीन

आपण त्या

आपण त्या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहा.
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ब
बगाराम Sun, 12/14/2008 - 21:16 नवीन

माझी कीव

माझी कीव केल्याबद्दल धन्यवाद. जहालमतवादी बर्‍याचदा वैयक्तिक शेरेबाजीवर उतरतात हा अनुभव घेतला आहे. असो मी तुम्हाला काहिही विचारणार नाही. कारण तात्यांना माझे साधे क्वेश्चन खटकतात पण तुम्ही विनाकारण माझी केलेली कीव खटकत नाही ह्यावरुन त्यांचा तुमच्या विचारांशी बायस आहे हे स्पष्ट दिसते. आणि ते इथले आणिबाणी काळातील मालक असल्याने मी तुमच्याशी हा वाद वाढवणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा