Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाचे जावई व सुना, एक ओळख....! :)

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 12/15/2008 - 18:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33066 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

ध
धमाल मुलगा Tue, 12/16/2008 - 12:01 नवीन

तिला?

तिला मी वर्कहॉलिक वाटतो... तिला? फक्त तिला?? :? तुला ओळखणारा कोणीही हेच्च म्हणतो. (हे अवांतर होऊ शकतं की नाही हे खरोखरच ठाऊक नाही हो! न पटल्यास निर्णय-ए-संपादक कबूल है कबूल है कबूल है!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीमंत दामोदर पंत
य
योगी९०० Tue, 12/16/2008 - 12:16 नवीन

मजा आली

खुप मजा आली.. असाच एक धागा आपल्या मुलांच्या बाल लिला वर्णन करण्यासाठी सुरू करा.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 12/16/2008 - 12:31 नवीन

मी आणि हिलरी

१) विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? माझी आणि हिलरीची गाठ पडली इंटरनेटवरून. आणि ती शादी.कॉम किंवा तत्सम संकेतस्थळावरून नाही तर चॅटवरून. म्हणजे आमचा हिलरीबरोबरचा विवाह प्रेमातूनच झाला. मी अमेरिकेत होतो तेव्हाची गोष्ट. लग्नाचा विचार सुध्दा केला नव्हता आणि सिंगल राहण्यात धन्यता मानायच्या काळात हिलरीची आणि माझी गाठ चॅटवर पडली. सुमारे ४ वर्षात अनंतवेळा चॅट करून (अनेकदा वबकॅम चॅट सुध्दा) आणि फोनवर बोलून जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा नवीन काही विचारायचे बाकीच नव्हते कारण आम्हाला एकमेकांविषयी सर्वकाही माहित होते.अनेक मंडळी या प्रकाराला मूर्खपणा म्हणतात पण माझा तरी अनुभव आहे की मी आणि हिलरी म्हणजे अगदी 'मेड फॉर इच अदर' आहोत. २) जोडीदाराच्या आवडीनिवडी माझी आवड म्हणजे मिसळपाव, इतिहास,अर्थशास्त्र, राजकारण, किशोरदा किंवा येसुदास यांची अर्थपूर्ण गाणी ऐकणे आणि हो गुलाम अलींच्या गझला सुध्दा. हिलरीची आवड मानसशास्त्र,चित्रपट आणि संगीत ३) एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या नाही बुवा. वादविवाद आणि भांडणं मारामार्‍या या गोष्टी म्हणजे काय आणि त्या कशाशी खातात? ४) एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? नाही कधीच नाही. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 12/16/2008 - 13:50 नवीन

३)

३) एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या नाही बुवा. वादविवाद आणि भांडणं मारामार्‍या या गोष्टी म्हणजे काय आणि त्या कशाशी खातात? ४) एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? नाही कधीच नाही. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
तद्दन खोट्टं!!!! च्यायला, लगिन केलं ना? मग भांडण नाही म्हणता? साधे वादही नाहीत? हॅ: बिनफोडणीचं मिळमिळीत वरणच म्हणायचं की हो बिन वादाचा संसार म्हणजे! (ह. घ्या. तद्दन इनोद केला आहे!) मिष्टर एक्स प्रेसिडेंट, यु हॅव नो आयडिया व्हॉट यु आर मिसिंग इन लाइफ :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
विनायक प्रभू Tue, 12/16/2008 - 17:15 नवीन

ड्रीम

ह्या धाग्यावर काही ड्रीम शिक्वेन्स आहेत रे धमु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रभाकर पेठकर Tue, 12/16/2008 - 12:39 नवीन

????

'राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो' अशी सुरुवात केल्यामुळे आपल्याला लिहायला परवानगी आहे की नाही ह्या संभ्रमात इतके दिवस होतो. पण आता जाणवले की 'भल्याभल्यां'नी लिहीलय आपण त्या मानाने बरेच 'सभ्य' आहोत, असो. मिपालाच सहचारिणी मानल्यामुळे मी मिपाचा जावई होऊ शकत नाही. मिपाबद्दल काय लिहू? तुम्ही सर्वजण ओळखताच. माझ्या आवडी निवडी (चारचौघात तरी) सात्विक.मिपाच्या (खूपवेळा) भडक. मला माझ्या मित्र मैत्रीणींबद्दल आपुलकी वाटते. मिपाला माझ्या शत्रूपक्षाबद्दलही आपुलकी वाटते (हे माझे दु:ख) मला माझ्या खर्‍या नांवानीशी वावरायला आवडते, मिपा (आपल्या सदस्यांच्या) खोट्या आयडींतून वार करते. मी मिपाशिवाय राहू शकत नाही, मिपा माझ्याशिवाय नुसती राहातच नाही तर प्रगतीही करते आहे. मला कोणाचा दुस्वास करायला आवडत नाही, मिपा मनोगताचा विनाकारण दुस्वास करते. मी 'मनोगता'वर प्रेम केले तर मिपाला राग येतो पण मिपावर सर्व (सदस्य) प्रेम करतात ते मात्र मी खपवून घेतो. मी मिपाशी कधीच 'कट्टी' करत नाही, मिपा मात्र मला न कळवता अनेक 'कट्टे' भरवते. असो. लिहायला गेलो तर खूप लिहिता येईल पण मिपाचे आणि माझे संबंध कधीच तुटू नयेत असे वाटते म्हणून सध्या इथेच थांबतो. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/18/2008 - 04:43 नवीन

खासच

आदरणीय पंत, आपण आपल्याला साजेशा शैलीत मिपाची ओळख करून दिलीत. भल्ली भारी! लिहायला गेलो तर खूप लिहिता येईल पण मिपाचे आणि माझे संबंध कधीच तुटू नयेत असे वाटते म्हणून सध्या इथेच थांबतो हे एकदम खल्लास! आपला, (चाहता) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सायली पानसे Tue, 12/16/2008 - 12:43 नवीन

ओळख

नमस्कार मंडळी मी तशी नविन आहे मिपा वर.... पण ज सकाळी मिपा उघडल्याशिवाय दिवस सुरु होत नाहि. तर माझी ओळख मी सायली .... आमची मुंबई हे - विजयन ... केरळ आमचे हे मल्लु आहेत आणि मी मराठी..... आम्ही एकत्र होतो पुन्यात शिकयला..... अर्थत तेव्हा फकस्त बेश्ट फ्रेन्ड्स होतो....... नंतर जमल... माझ्या आधि घरचे हो म्हणाले.... मग मी.... जोडीदाराच्या आवडीनिवडी तश्या वेगवेग्ळ्याच्....एक गाणे ऐकणे आणि वाचन ... आणि मुलांबरोबर वेळ घालवणे या शेम टु शेम. मला भटकायला .. जेवण बनवायला... चित्र काढायला.... आणि गप्पा मारायला खुप आवडते...त्याला गप्प बसायला... दोघांना ड्राएव्ह करायला खुप आवडते.... मला बाईक जास्त चांगली येत अस्ल्याने तिथे भांडण होत नाही पण गाडी कोणी चालवायची हा वाद कायम असतो नी मी कायम हारते कारण पोरांना पोरगी चांगली गाडी चालवु शकते आणी ति चालवत असताना शेजारी बसणे मान्य नसते.... बाकी जेवणखाणाच म्हणाल तर मी जितक्या आवडीने डोसा पुट्टु खाते तितक्याच आवडीने तो थालिपीठ , भगर आमटी , कांदे पोहे खातो.... तो गोडघाशा नी मी पाणीपुरी भक्त...कुठे ही केव्हांहि कितिहि खायला तयार.... त्याला त्या भैयाने पाण्यात हात घातलेला पाहुन मळमळते. पण मला खायला बंदी नाही. घरात जेवण मस्त असत मिक्स... मल्लु मराठि पंजाबी गुज्जु ... एकदा श्रि . राज ठाकरेंना बोलवायचा विचार आहे जेवायला.. एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या तो सगळ्या कामात परफेक्ट आणि मी थोडि निवांत .थोडीशी आळशी.... जेव्हांच्या तेंव्हा काम करणे ह्यावर भरपुर लेक्चर मिळतात आधि आई कडुन आता....इकडुन त्यामुळे कामावरुन होतात थोडे फार ... बाकि काही वाद हास्यास्पद आहेत उदा. मी गणपति भक्त तो गोपाळ भक्त.... मग... एखादी मनासारखी गोष्ट झालि कि तुझ्या गणपति मुळे कि माझ्या गोपाळा मुळे... असा मुद्दा असतो.... अर्थात दोघांचा वरद हस्त असल्यामुळे मी खुश. बाकी मिपा वरुन वाद होत नाहित कारण आमचा असा नियम आहे कि आम्ही घरात असताना नेट जास्त वापरत नाहि... टी व्ही सुध्दा जास्त नाहि... अर्थात लावायचा तर बातम्या......मरठि आणी मल्लु वाहिन्या एक एकटे असताना पाहतो.... एखादा विशेष कार्यक्रम असेल तर एकत्र पाहतो..... त्यात आजकाल मिपा वरील लेखांचि भर आहे.... चांगले लेख त्यांना भाषांतर करुन वाचुन दाखवते... तो हि आल्यावर आज काय खबर तुमच्या मिपा वर?अस विचरतोच. आंघोळ हा वादाचा विषय असतो विकांताला... पण इथे उलट आहे मी ४ नंतर आणी हा सकाळी ६ ..... सुट्टीला माणुस ६ वाजत भल्या पहाटे कसा काय उठु शकतो हा माझ्यासाठी आणि माणसांना सकाळी ६ नंतर झोप कशी काय येते हा त्याच्यासाठी अनुत्तरित प्रश्न आहे आणी त्यावर उत्तर सापडले नसल्याने आम्ही त्यावर वाद घालणे बंन्द केले आहे.... आठवड्याचे पाच दिवस मी माझ्या मध्यरात्रि म्हणजे सकाळी साडे चार ला उठुन डबा करुन देते ह्या बद्दल दर शुक्रवार शनिवार ( दुबई मधे हाच विकांत) सकाळचा चहा तो करतो.... बाकि भांडण करायला चान्स नाहि कारण मला कायम मदत करतो अगदि मुलांना जेवण भरवणे ते डायपर बदलणे पर्यंत सर्व मदत करतो....... सगळी कामे आम्ही वाटुन करतो ...फक्त माझ्या वाटणीची कामे जरा उशीराने होतात ... म्हणुन डोस मिळ्तो मधे मधे..... मग परत माझि गाडी रुळावर. घरात मुले हिंदी मराठी मल्लु आणि इन्ग्लिश या ४ भाषा उत्तम बोलतात...त्यामुळे सगळे आजि आजोबा खुश असतात आणी सासु सासरे यांना खुश ठेवण्या ईतक मल्लु आणि मराठी दोघांना येत असल्याने हसत खेळत भांडत संसार चालु आहे.... नो रिग्रेटस दोंघांना ही.... तर ...एकदा पाहावे करुन ... लग्न. टीप माझे शुध्द्लेखन अप्रतिम आहे त्याबद्दल माफी असावी.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/18/2008 - 04:46 नवीन

अवांतर चौकशा

वेगळा अभुभव वाचायला मिळाला. आपले सुखात चालले आहे हे पाहून आनंद वाटला. अभिनंदन! घरात मुले हिंदी मराठी मल्लु आणि इन्ग्लिश या ४ भाषा उत्तम बोलतात...त्यामुळे सगळे आजि आजोबा खुश असतात आणी सासु सासरे यांना खुश ठेवण्या ईतक मल्लु आणि मराठी दोघांना येत असल्याने हसत खेळत भांडत संसार चालु आहे.... उत्सुकतेपोटी एक अवांतर चौकशी - तुम्हा दोघांच्या संभाषणाची भाषा कोणती? आपला, (चौकस) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे
स
सायली पानसे गुरुवार, 12/18/2008 - 11:23 नवीन

धन्यवाद.

धन्यवाद. आम्हि घरात ४ हि भाषा बोलतो... पण प्रामुख्याने हिंदी. फक्त भांडण चालु असताना मी शुध्द मराठी वापरते हो.... त्यामुळे मी मराठी सुरु केला कि लगेच समजते कि राग आलेला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/18/2008 - 22:30 नवीन

अवांतर प्रतिक्रिया

फक्त भांडण चालु असताना मी शुध्द मराठी वापरते हो.... त्यामुळे मी मराठी सुरु केला कि लगेच समजते कि राग आलेला आहे... -- हे लयीच भारी. आमची ही पण राग आला की इंग्रजीतला एक असभ्य सौम्य(?) शब्द वापरते (एरव्ही मात्र शुद्ध मराठी). मग आम्ही काय ते ओळखून तलवार म्यातच नाही तर थेट अटलांटिक मध्ये टाकून शरणागती पत्करतो. ;) आमचा एक मित्र चढल्यावरच भांडतो. एरव्ही शांत असतो व मराठीतच बोलतो. मात्र चढल्यावर भांडताना अशी अस्खलीत इंग्रजी बोलतो की विचारु नका. त्याची आठवण आली. :) आपला, (त्रिभाष्या) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे
र
राघव Tue, 12/16/2008 - 13:11 नवीन

ओळख -

ओळख - उत्तरे :) विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? आमच्या ओळखीने अन् घरच्यांनी पाहून!! :D जोडीदाराच्या आवडीनिवडी, ती वर्कोहोलिक आहे. अन् म्या येक नंबरचा आळशी!! मन मानेल तेव्हा झोप घेण्यात काय सुख आहे ते सांगुन नाही समजायचे! जेवणात आपल्याला काहीही चालते (शाकाहारी अर्थातच!).. तिचे नखरे असतात.. कधी कधी जास्त होतात.. मग झापावे लागते!! (अर्थात् मी झापण्याच्या संधी मुळात फार कमी वेळ येतात!!) दोघांनाही वाचण्याची आवड, (मला आळस सोडून उठल्यानंतरच अन् तिला कधीही)फिरायची आवड, फोटोग्राफीची आवड! त्यामुळे तिथे आमचे जरा जुळते! एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या, दणकून होतात वाद... मारामार्‍याही होतात ना.. मी मार खातो!!! बाकी मार आपण खायचा अन् वरून मारतांना तिला स्वतःला लागले त्यासाठीही बोलण्या खायच्या हा प्रकार मला जरा जड जातो पचवायला.. माझा उलट मार चुकवण्यासाठी असलेला तो एक जबर अभिनय आहे अशी मला धूर्त शंका आहे!! एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? नाही.. अजून तरी असे झालेले नाही. मी हाफिसात असतांना मिपावर पडिक असल्यामुळे तेवढा फरक पडत नसावा. ती मात्र अजून मिपावर सदस्य झालेली नाही! पण होईल लवकरच!! तिच्यासाठी एक कडवे लिहिलेले इथे देतोय- ऋण कोणाचे कोण स्तवे अन् प्रेम कुणाचे श्रेष्ठ ठरे? सतजन्माचे नाते अपुले तुझ्या(च) व्रताचे बंध खरे! या जन्मातील साथ तुझी मज मिळती कैसी सांग बरे? तूच मनातील अमृतधारा तव प्रेमाने विश्व तरे!! :) मुमुक्षू
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 12/16/2008 - 20:28 नवीन

पारंपारीक पद्धतीने विवाह झाला.

माझे सासरे आणि माझे काका कानपूरच्या एअरफोर्स बेसवर एकत्र काम करत होते. त्या ओळखीतून प्रस्ताव आला. मी पाह्यलेली ही तिसरी मुलगी होती. आधीच्या दोघींनी मला नकार दिला होता. मैत्रीणींनी (ओळखत असल्याने) आधीच नम्र नकार देऊन सुटका करून घेतली होती. आवडी निवडी कळायला तिला वाव मिळाला नाही.आता पश्चात्ताप झाला आहे. नक्षत्रासारखी दोन मुलं आहेत म्हणून नाहीतर....असं रोज म्हणते अर्थातच भांडणं हा आमचा संवाद आहे.त्याचा मुलांवर काडीइतका परीणाम झालेला नाही.भांडणाचे विषय मुलांचा अभ्यास ,माझं बेजबाबदार वागणं,वगैरे वगैरे. मारामारी नाहीच . ती स्टेट-लेवलची ऍथलेट आणि गोळाफेक चँपीअन असल्यामूळे मी जोखीम घेत नाही. मिपा वाचत नाही.एकूण काहीच वाचत नाही.वाचनाचा प्रचंड कंटाळा आहे. सुग्रण आहे.माझी आणि मुलांची खाण्याची हौस भागवणं हा जीवनाचा एकमेव हेतू आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 12/17/2008 - 01:55 नवीन

आमची ष्टोरी

मी व ती कॉलेज स्वीटहार्टस. लायब्ररीत पुस्तकांबरोबर प्रेम एक्स्चेंज केले. बायको आमच्यापेक्षा हुषार. ती आय आय टी ला गेली. मी पुण्याला. (साले कुठल्या आय आय टी पेक्षा कमी आहे काय पुणे ! ) =)) आय आय टी चे वीमेन्स होस्टेल (एच १०) बर्‍यापैकी माहिती झाले. दारात येऊन उभा राह्यचो तिला घ्यायला तर बाकीच्या साळकायामाळकाया हजर आम्हाला पहायला ;-) पुढील काव्यशास्त्रविनोद पवई लेकवर. =)) बायकोस गाण्याची आवड. अस्मादिकांच्या शिंगे फुटण्याच्या वयातल्या फुटकळ गाण्यांची पहिली श्रोती. पुस्तकांचे वाचन एकेकाळी चांगले होते. दोघांनी मिळून "भावसरगम" हा गाण्यांचा कार्यक्रम सुमारे १० वेळा ऐकला होता. मुले व्हायच्या आधीची बायको आणि नंतरची बायको या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. मिसळपावचा शोध मुले व्हायच्या आधी लागला असता तर तिने गाजविले असते. आता मुले हेच सर्वस्व. पदवी , करत असलेली नोकरी , नवरा वगैरे गोष्टी दुय्यम.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 12/17/2008 - 09:53 नवीन

जियो

जियो सुनितराव :) मी व ती कॉलेज स्वीटहार्टस. सह्ही.... लायब्ररीत पुस्तकांबरोबर प्रेम एक्स्चेंज केले. एकदम हिंदी पिच्चर? :) >>पुढील काव्यशास्त्रविनोद पवई लेकवर. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
श
शितल Wed, 12/17/2008 - 04:09 नवीन

काय बोलावे..

मी आणी अमर अरेन्ज मॆरेज, लग्न झाल्यावर कळले बागेच्या अलीकडे मी आणि पलीकडे तो रहात होता (अर्थात तो पुण्यात होता शिकायला त्यामुळे कोल्हापुरला येणे कमी होते तसे ) आम्हाला पाहुन बरेच जण विचारत - लव्ह मॆरेज आहे का, तर मी सांगायचे जो/जी हा प्रश्न विचारेल त्याला/तीला १०० उठाबशा काढायला सांग. ;) डोक्यावर अक्षता पडल्यापासुन जे वाद चालु आहेत ते ही प्रतीक्रीया देण्याच्या क्षणा पर्यत. ;) मी बडबड करत असते तर तो मितभाषी, पण मी न बोलता बसले तरी ते ही चालत नाही. :) पण त्याच्या विसराळु पणामुळे मी अगदी हैराण होते, आणी त्याच्या बरोबर पिक्चर पहायला गेल्यावर, थिएटर मध्ये ह्याला एकट्यालाच तो जोक कळाला आहे असे हसायला लागला की खुप राग येतो. स्वत: दागिणे घ्यायचा आग्रह करणार्‍या दुर्मिळ नवरावर्गा पैकी एक आहे. :) गावी जाऊन शेती करायची त्याची इच्छा मात्र मला अजिबात आवडत नाही. सर्वात आवडता गुण म्हणजे पदार्थ केला की तो अजिबात तोंड वेडे वाकडे न करता सरळ पोटात घालतो :)
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 12/17/2008 - 04:14 नवीन

मिपा बद्दल राहिलेच

मिपावर सकाळी ८ ते स्ंध्याकाळी ६ प. मी, ६ नंतर तो. :) त्याच्याकडुनच मला मिपा बद्दल कळले .:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
म
मृण्मयी Wed, 12/17/2008 - 05:09 नवीन

पदरी पडलं... :)

मि.पा.वाश्यांना लग्नाबद्दल इतकं सगळं आठवतं म्हणजे अलीकडेच लग्न झाली असावीत किंवा अजून दोनाचे तीन झाले नसावेत. :) मला फक्त 'बर्‍याच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं खरं 'येव्हडंच आठवतं. का कसं वगैरे आता गौण! :D गेल्या १५-१६ (किंवा जास्तही झाली असतील) वर्षात अनिरुध्दला रागवलेलं चिडलेलं बघीतलं नाही. ती कसर मी भरून काढतेच म्हणा. एव्हाना त्यानं माझ्याकडे बघून 'पदरी पडलं पवित्र झालं' हे मनोमन पटवून घेतलं असावं. :D मि.पा. चं व्यसन लागण्याची चिन्ह आहेत. आजकाल माझा नवरा 'बरं काय म्हणते पाणीपुरी' असं आवर्जून विचारतो. :D
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 12/17/2008 - 05:58 नवीन

एकदम ओळखीचे!!!!

ओळखीचे स्वरूप - एकमेकांना पुरेपूर ओळखून आहोंत... विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? पिरेमातून! आणि बिबिशीआयला जीआयपीचा डबा जोडलाय.... (ओळख कशी झाली आणि विवाह या विषयावर एक स्वतंत्र लेख होईल!!! सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन!:)) जोडीदाराच्या आवडीनिवडी, मी/ ती नाव : डांबिसकाका/ डांबिसकाकू गाव : मुंबई/ मुंबई फुल : गुलाब/ मोगरा फळ : आंबा/ आंबा (दुसरं कोणतं असणार तिच्यायला!!! आमच्या पैशावर क्रॉफर्ड मारकिटमधल्या अडत्यांनी मोटारी घेतल्या!!) व्यवसाय : नवनवीन औषधांचे रेणू बनवणे/ त्या रेणूंवर शक्तिशाली रेडिएशन सोडून ते मोडून टाकणे!!:) पदार्थ : तिखट (अपवादः जिलेबी!!)/ तिखट (अपवादः कॅडबरी!!!!) सिनेमा/ टि व्ही आवड: विनोदी, राजकीय, साहसपट/ चिकफ्लिक नेहमी पाहिले जाणारे सिनेमा/ टीव्ही: अर्थातच चिकफ्लिक!!!:( वाचनाची आवड : खूप/ खूप हिंडण्याची आवड : खुपच कमी / अत्यंत, अतिशय, भरपूर!!! आवडती खरेदी : खाण्याच्या गोष्टी/ बाकी सर्व संगणक खेळ : अप्रिय/ अप्रिय कला : बागकाम/ पाककला (जय हो!!!) एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या, वादविवाद - दैनंदिन गोष्टींवरून अजिबात नाहीत. तात्विक गोष्टींवरून भरपूर!! उदा. मी रिपब्लिकन ती डेमोक्रॅट!! ती शिवसेना मी मनसे!!! होऊन जाऊ द्या!!!:) मारामार्‍या - कधीच केल्या नाहीत, करत नाही आणि करणार नाही!!! एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? माझ्या मिपावर असण्यामुळे भरपूर शिव्याशाप उच्चारले जातात (शिवसेना - एकदम बाळासाहेब स्टाईल!!), पण ते बहुतेक वेळा तात्याला उद्देशून (मिपा काढल्याबद्दल!!!:)) असल्याने मी मुळीच मनाला लावून घेत नाही!!!! इत्यादी इत्यादी इत्यादी... जबाबदार्‍यांची आणि कामांची व्यवस्थित वाटणी करून घेतल्याने बराच फायदा होतो.... उदा. १. ती उत्तम खादाडी बनवते, मी त्या पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेतो... २. मी माझ्या बागेत मेहनत करून फुलं फुलवतो, ती बिनदिक्कत तोडून केसांत माळते.... ३. मी माझ्यासोबत तिच्या गाडीचाही मेन्टेनन्स व्यवस्थित ठेवतो. ती मनसोक्त ड्रायव्हिंग करते... (वीसापेक्षा जास्त वर्षे स्वतःची गाडी चालवत असूनसुद्धा गाडीत पेट्रोल भरण्याव्यतिरिक्त ऑईल बदलणे, टायर रोटेट किंवा चेंज करणे अशा काही गोष्टी असतात याची बाईसाहेबांना फारशी कल्पना नाही!!) ४. संसाराचे स्ट्रॅटेजिक प्लानिंग करण्यात मी रमतो, तिचा मोठेपणा हा की ती बाकीच्या फुटकळ, चिल्लर गोष्टींचा त्रास माझ्या डोक्याला होऊ देत नाही... (अवांतरः "मिपाची सून" म्हटल्याबद्दल काकूकडून तात्याचा जाहीर निषेध!!! शब्दशः प्रतिक्रिया - "मला सून म्हणतोय? माझ्या बारशाला आला होता का? आता भेटू दे तो तात्या!!! नाय त्याचे डेंगे मोडून चिंबोरीबरोबर उकळायला टाकला तर कायस्थाचं नांव नाय सांगणार!!!") :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/17/2008 - 08:44 नवीन

पण ते

पण ते बहुतेक वेळा तात्याला उद्देशून (मिपा काढल्याबद्दल!!!) असल्याने मी मुळीच मनाला लावून घेत नाही!!!! आयला, हे बरं आहे! :) मी माझ्या बागेत मेहनत करून फुलं फुलवतो, ती बिनदिक्कत तोडून केसांत माळते.... ओहो! क्या केहेने.. :) "मला सून म्हणतोय? माझ्या बारशाला आला होता का? आता भेटू दे तो तात्या!!! नाय त्याचे डेंगे मोडून चिंबोरीबरोबर उकळायला टाकला तर कायस्थाचं नांव नाय सांगणार!!!") मस्त! :) आपला, तात्या गुप्ते! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ध
धमाल मुलगा Wed, 12/17/2008 - 09:51 नवीन

माझ्या

माझ्या मिपावर असण्यामुळे भरपूर शिव्याशाप उच्चारले जातात (शिवसेना - एकदम बाळासाहेब स्टाईल!!), पण ते बहुतेक वेळा तात्याला उद्देशून (मिपा काढल्याबद्दल!!! "मला सून म्हणतोय? माझ्या बारशाला आला होता का? आता भेटू दे तो तात्या!!! नाय त्याचे डेंगे मोडून चिंबोरीबरोबर उकळायला टाकला तर कायस्थाचं नांव नाय सांगणार!!!"
अग्गायायायाया..... ओ तात्या...सांभाळून हो...क्यालिफोर्नियाला जायचं म्हणताय शिंडीला भेटायला, डांबिसकाकांनापण भेटणार असाल तर बाहेरच भेटा...घरी नका जाऊ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 12/17/2008 - 11:39 नवीन

नाय हां!!!

ओ तात्या...सांभाळून हो...क्यालिफोर्नियाला जायचं म्हणताय शिंडीला भेटायला, डांबिसकाकांनापण भेटणार असाल तर बाहेरच भेटा...घरी नका जाऊ असं नाय हां!!! ही बाई कितीही तडकली तरी आतिथ्याला मागे पडणार नाय हां!!!! आता जवळीक शिवसेनेची, त्याला कोण काय करणार?:) तेंव्हा तू निश्चिंत मनाने ये रे तात्या, आम्ही वाट पहात आहोत!!!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 12/18/2008 - 13:35 नवीन

>>तेंव्हा

>>तेंव्हा तू निश्चिंत मनाने ये रे तात्या, आम्ही वाट पहात आहोत!!! बरेच दिवस कोणी सापडला पण नाही. ह. घे णे ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
न
नीधप Wed, 12/17/2008 - 10:01 नवीन

आता काय करावे?

तात्या, अवांतर, समांतर भरपूर चाल्लाव की. ओळख १६ जोड्यांची आणि प्रतिसाद १७६०... कसं करताव आता? बघा बुवा.. मजा येतेय खरंतर.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 12/17/2008 - 11:06 नवीन

तात्या, तुमचं डोकं बाकी सुपीक हो! कसले कसले धागे काढता!!

ओळखीचे स्वरूप - कसलं स्वरुप अन काय? ही मला चांगलीच ओळखून आहे. मी तिला ओळखून आहे असं मला दर काही दिवसानी नव्याने वाटत असतं! ;) विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? विवाह रीतसर एकमेकांना पाहून ठरला. तिने पाहिलेला पहिलाच मुलगा मी पण मी पाहिलेली ही सातवी मुलगी (आधीच्या सहा पैकी कोणी कोणास नाकारले ही माहिती गुप्त ठेवली आहे! [( ) नंतर बोलताना दोघांनीही एकमेकांना सांगितलं की पाहता क्षणीच दोघांच्याही डोक्यात घंटा वाजली की हाच माझा जोडीदार! जोडीदाराच्या आवडीनिवडी, मी/ती सिनेमा - बहुतेक सिनेमा बघताना मी झोपतो (फार कमी अपवाद)/ती कोणताही सिनेमा बघू शकते (असा तिला सार्थ अभिमान होता) (पण अलिकडेच काही सिनेमे असे निघाले की तिचे गर्वहरण झाले आहे! :B ) खाद्यपदार्थ - मोदक, गुलाबजाम, पावभाजी, शिरा आणि इतर असंख्य/पोहे, भेळ, पाणी-पुरी, रगडा-पॅटीस चटकमटक कडे जास्त ओढा. पुस्तके - दोघांनाही वाचायला आवडते. टीवी - घरी टीवी घेतलेला नाही त्यामुळे प्रश्न नाही! खेळ - बुद्धीबळ, क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल (हाताने खेळायचा अमेरिकन फुटबॉल नव्हे यूरोपियन!) / खेळ ह्या प्रकाराशी फारशी सलगी नाही. त्यातल्यात्यात पत्ते (भिकार-सावकारमधे ती कायम सावकार!) फळे - आंबा, पिकलेली गोड पपई, रसदार कलिंगड, मधुर केळी, रसरशीत स्ट्रॉबेरीज, जांभळं, पेरु जवळजवळ सगळीच मधुर फळं / आंबा (तोही शक्यतो हापूस) सोडला तर बाकीच्यांच्या वाटेला फारशी जात नाही. फिरणे - मला एकेकाळी फिरायची अवड होती हे मी आता विसरुन गेलोय! / तिला फारसे भटकायला आवडत नाही. शक्यतो घरीच मैफिल जमवावी, खावे प्यावे, भरपूर गप्पा कराव्यात ही आवड. माणसे - दोघांची समान आवड माणसे. घरी बोलवा. खा-प्या मजा करा, गप्पा करा, रात्ररात्र गप्पा करायचा उत्साह आहे (माझा तिच्यामुळे वाढला हे नक्की!) माणसांच्या पोटात शिरण्याची कला मात्र तिला अवगत आहे ह्यात काही वाद नाही! गोष्टी लक्षात ठेवणे - मी यथातथाच लक्षात ठेवतो. "कोण कोणास काय म्हणाले?" वगैरे प्रकारात माझे डोके चालत नाही! टेलीफोन नं, पासवर्डस, सांख्यिकी माहिती पक्की लक्षात ठेवतो! / ती म्हणजे काय लक्षात ठेवेल हे सांगता येत नाही. म्हणजे आमच्या चिरंजिवांच्या बारशाला (साधारण सात वर्षापूर्वी) माझ्या मामीने कोणती साडी नेसली होती (आणि कसा शिष्ठपणा केला - हे जास्त महत्त्वाचे ;) ) इथपासून ते मागल्या भारतवारीत निघता निघता मी कोणते छानछान ड्रेसेस तिला घ्यायला हवे होते इथपर्यंत सगळे लक्षात रहाते! ;) शिस्त - साधारणपणे नीट असल्या गोष्टी की चालते मला / प्रत्येक गोष्ट ही शिस्तीतच झाली पाहिजे ह्या तिच्या आग्रहामुळे माझ्या अनेक 'चांगल्या सवयी' मातीमोल ठरल्या आहेत (सूज्ञास अधिक सांगणे न लगे! ;) ) (उद्या चिरंजिवांनी दिवे लावले ना की माझ्याच नावाने फोडणार खडे - हे आवडतं पालुपद शिस्तीवरुन झालेल्या युद्धप्रसंगातलं) एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या, भांडणं भरपूर! खच्चून!! अहो तेरा वर्ष नियमाने करत आलोय ती. पण भांडणांनंतर ती जवळजवळ नेहेमीच उत्तम पदार्थ करुन खाऊ घालते! ;) त्यामुळे मी तिला चिडवतो की तुझं माथं गरम असतानाच तू पदार्थ बनवत जा, कसा झणझणीत होतो! तात्विक भांडणं भरपूर व्हायची हल्ली कमी होतात (कोण कोणास काय म्हणाले ह्याबाबतीतला माझा विसराळूपणा इथे नडतो - दुसरे काय?) मारामार्‍या नाही. फक्त शाब्दिक. (ती स्वयंपाकघरात असताना शक्यतो तेही नाही कारण लाटणे जवळच असते :O ) एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? मी एकटाच सभासद होतो तेव्हा सुरुवातीला व्हायची. ती आधीपासून फक्त वाचनमात्र होती पण नंतर मी धीराने आणि नेटाने तिला बराचकाळ मनवत हळूहळू सभासदत्त्वापर्यंत आणल्याने माझा डाव यशस्वी झाला आणि ती भांडणे संपली! :) आमचा फोटू - मिपावर झालेल्या बर्‍याच कट्ट्यातून तुम्हाला आस्मादिकांचे आणि आमच्या सौं चेदर्शन घडलेच आहे. खरं सांगू, घर, मुलगा, नवरा, स्वयंपाक, माणसं हे तिचं खरं प्रेम आहे! घरासाठी खपते ती. आज आमचा संसार ज्या काही भल्या स्थितीत आहे त्यात हिचा वाटा नि:संशय माझ्यापेक्षा जास्त आहे!! चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/18/2008 - 22:32 नवीन

हृदयस्पर्षि

खरं सांगू, घर, मुलगा, नवरा, स्वयंपाक, माणसं हे तिचं खरं प्रेम आहे! घरासाठी खपते ती. आज आमचा संसार ज्या काही भल्या स्थितीत आहे त्यात हिचा वाटा नि:संशय माझ्यापेक्षा जास्त आहे!! वाह! क्या बात है! खर्‍या अर्थी भावना पोचल्या! संसारात एकमेकांप्रती असेच प्रेम व आदर असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
द
दीपुर्झा Wed, 12/17/2008 - 14:51 नवीन

खूप मजा

खूप मजा आली सगळं वाचून :) तुम्ही लोकांनी छान शेअर केले अनुभव :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 12/17/2008 - 22:50 नवीन

ऑपोझिट्स ऍट्रॅक्ट !!

मी / ती -- नवरा / बायको ---- नावः तिचं बदललं नाही / ती मला नावं ठेवत नाही (राम मिलाई जोडी असल्या सारखी आमची नावं अनुरूप आहेत !) वयः मी वयापेक्षा मोठा दिसतो असं तरूण मुलींना वाटतं / तिच्या पंचविशीनंतर तिचं वय वाढणं थांबलंय (असं मला बजावण्यात आलंय !) लग्न कसं जमलं?: पत्रिका बित्रिका बघून (तिला प्रेमविवाह करायचा नव्हता आणि माझे प्रेमविवाहाचे प्रयोग यशस्वी होत नव्हते !!!) लग्नाची अटः मला वकील किंवा डॉक्टर मुलगी नको होती / तिला फार काळ परदेशी वास्तव्य नको होतं (लग्न ठरलं तेव्हा ती पुण्यात वकिली करायची / लग्नानंतर एका वर्षात आम्ही अमेरिकेला आलो) पुस्तकं : दिसामाजी काही वाचावे / दिसामाजी काही वाचावे (माझं लेखन बाकी कुणी वाचो वा ना वाचो, घरी एक हक्काची वाचक आहे. महत्वाचे म्हणजे लेखनाबद्दल सडेतोड मत मिळतं... नवरा - बिवरा स्टेटस आड येत नाही... असं काही स्टेटस असतं का रे भाऊ ? !!!) जेवायच्या आवडी-निवडी: भरपूर (नखरे म्हणण्यापेक्षा जास्त) .. मी भेळ मात्र आदल्या दिवशी डिनर आणि दुसर्‍या दिवशी ब्रेकफास्टलाही खाऊ शकतो / ती सगळ्या भाज्या- बिज्या आवडीने खाते... (कसं काय जमतं माहिती नाही.... ज्या गावी जायचं नाही त्याची वाट का विचारावी? :) ) पसारा: असल्याशिवाय काम सुचत नाही / तिला पसारा दिसला की तो आवरायला लागते (ह्या बाबतीत मी चंद्रशेखर गोखलेंची ' घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं... एकाने पसरलं तर दुसर्‍याने आवरायचं' ही कविता पक्की लक्षात ठेवली आहे. :) ) पदार्थः ' आज जेवायला काय आहे? ' हा माझा आवडता प्रश्न / मला काय खावंसं वाटतंय ते माझ्याआधी तिला कळतं खाणं आवडतं?: मला बारा महिने, चोवीस तास / ती सुगरण (ह्याची खात्री पटल्यावरच लग्नाला हो म्हणालोय ना राव!!! माझ्या सासूबाई पुण्यात कुकिंग क्लासेस घेतात त्याचा पोटाला होणारा फायदा वेगळाच !!) (मिपाकर मित्र / मैत्रिणी घरी आल्याशिवाय कसं समजेल ? त्यामुळे हे आमंत्रण समजावे :) ) प्रकृती : बैठी / चळवळी भांडणं: त्याला काय कारण लागतं का? त्याशिवाय कुठला संसार सुखी असतो? नाटक / सिनेमा: कुठलाही सिनेमा पाहू शकतो / तिला चांगले तरी आवडतात किंवा 'चिक फ्लिक' :) छंद : भरपूर पण 'लष्कराच्या भाकर्‍या..' टाईपचे / खूप पण काळ्-वेळेचं भान राखून स्मरणशक्ती : मोजक्या तारखांशिवाय आकडे माझ्या लक्षात रहात नाहीत / ती माझी चालती-बोलती डिरेक्टरी आहे तूर्तास इथेच थांबतो ! --------- जोक्स अपार्ट, आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारांमुळे एकमेकांवरचा विश्वास वाढतच गेलाय हे एक सत्य !! ---------
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/18/2008 - 04:34 नवीन

लाखात एक

आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारांमुळे एकमेकांवरचा विश्वास वाढतच गेलाय हे एक सत्य !! चित्रे साहेब, लाखात एक बोललात. मोजक्या तारखांशिवाय आकडे माझ्या लक्षात रहात नाहीत / ती माझी चालती-बोलती डिरेक्टरी आहे आमचेही हे असेच आहे. आपला, (सहमत) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
स
संदीप चित्रे गुरुवार, 12/18/2008 - 19:53 नवीन

धन्यवाद !

केन्डेसाहेब ... दाद देण्यासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
व
वाटाड्या... गुरुवार, 12/18/2008 - 00:59 नवीन

आहाहा...सगळंच उलट..

तात्या...काय जबरा काढलाय धागा...केवढं मोठं संकट..बोलायचं असतं खुप पण काय आहे की नीट बोलाव लागतं नाहीतर इथे लिहीताना मागुन मार पडायचा...तर आमचं असं... ओळखीचे स्वरूप - विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? : पिरेमातुन...हसु नका..लहानपणापासुन आम्ही पोरींच्या बाबतीत औरंगजेब होतो. रस्त्यावरुन मुलगी येताना दिसली की आम्ही आडबाजुची गल्ली धरुन जाणारे. त्यामुळे पिरेमातुन म्हणजे आम्हाला एक धक्काच होता आणि पालकांना तर आमच्यापेक्षा... जोडीदाराच्या आवडीनिवडी, मी/ती १. शाकाहारी/शाकाहारी...फक्त आम्हाला शाकाहारात आम्हाला पोळी/भाजी/वरण/भात इतकच माहीत..तर तीला कसल्या कसल्या फळांचे रस, कसले कसले सॅलड(कच्ची भाजी हो).... २. वडा-पाव/भेळ ३. भाजलेले शेंगदाणे/अजिबात नाय...(कॉलेस्ट्रोल वाढतं म्हणे...) ४. मिसळ(गोटा साफ करणारी :D ) /पाव-भाजी(अजुबाची) ५. गाणं गायचं/तबला वाजवते मित्रांनो (१-२ परीक्षा पण झाल्यात)...गुरुजींची आवडती विद्यार्थीनी.. ६. स्वयंपाक हे फक्त खावा/स्वयंपाक हा चांगला करावा व खावा..बघा मंडळी(लग्नानंतर ५७ किलो वरुन आपलं वजन ८० किलो झालं..२ वर्षात..काय समजलात मिश्टर).. ७. पिच्चर हे फक्त बघावेत/पिच्चर हे झोपण्यासाठीच असतात... ८. मला फुलं आवडुन घ्यावी लागतात/तिला दिलेलीही चालतात... एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या, १. हे काय चार चौघांच्यात चघळायचा विषय आहे का?? इति "ती" २. वैचारिक वाद कायम...पण आपण एक जोक नेहेमीच लक्षात ठेवलाय.. "नवरा बायकोच्या भांडणात एक नेहेमीच बरोबर असतो, दुसरा नवरा असतो".. ३. नो मारामारी...आम्ही(म्हणजे मी) कौटूंबिक हिंसाचाराच्या विरोधात आहोत...त्यावर माझा विश्वास आहे.....तसा तिचा नसावा बहुतेक... एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? नाही...कारण "ती" कविता वगैरे करते...त्यामूळे ती काय चाल्लं आहे आज मिपावर विचारत असते मधुन मधुन... एकूण छान चाल्ल आहे...कधी कधी ती माझ्या कपड्यांवरुन माझा पोपट करते. कधी कधी वेळ पाळण्यावरुन (?) घायकूतीला आणते. तरी पण पक्की पुणेकरीण आहे. शिस्त म्हणजे शिस्त. पण स्वयंपाक म्हणजे बघा लैच भारी करते...नशिब आपलं आपलं...सगळ्यांना निमंत्रण..कधी येताय सांगा..मस्त अण्णांचा 'रामकली' लावू आणि मिसळ/वाफाळलेला चहा/कॉफी करु... स्वगत : "आलो आलो....भांडी राहीली वाटतं आज माझ्या कडुन घासायची.. ;) "
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/18/2008 - 04:38 नवीन

खल्लास

"आलो आलो....भांडी राहीली वाटतं आज माझ्या कडुन घासायची.. आगदी खल्लास. =)) =)) नो मारामारी...आम्ही(म्हणजे मी) कौटूंबिक हिंसाचाराच्या विरोधात आहोत...त्यावर माझा विश्वास आहे.....तसा तिचा नसावा बहुतेक... =)) =)) मस्त अण्णांचा 'रामकली' लावू आणि मिसळ/वाफाळलेला चहा/कॉफी करु... काय आठवण काढली राव... चला आता स्वयपांक घरात काय चाललं आहे याचा कानोसा घेतो... आपला, (खादाड) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
व
वाटाड्या... गुरुवार, 12/18/2008 - 23:26 नवीन

धन्यवाद केन्डे साहेब...

धन्यवाद केन्डे साहेब...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/18/2008 - 13:56 नवीन

लहानपणापा

लहानपणापासुन आम्ही पोरींच्या बाबतीत औरंगजेब होतो. रस्त्यावरुन मुलगी येताना दिसली की आम्ही आडबाजुची गल्ली धरुन जाणारे. त्यामुळे पिरेमातुन म्हणजे आम्हाला एक धक्काच होता आणि पालकांना तर आमच्यापेक्षा... हाहाहा .... आमची (माझी आणि अभिरची अशीच काहीशी श्टूरी आहे) आमच्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी आमचा एक कॉमन मित्र (वयाने बराच मोठा आहे तो, ५०-५५!) घरी आला होता. त्याचं म्हणणं, "अदितीचं लव्ह मॅरेज झालं यात काहीही आश्चर्य नाही. पण अभिरचंपण! आणि ते पण अदितीशी!!". अर्थात आमच्याबद्दल जेव्हा "कुजबूज" सुरु झाली तेव्हा आम्ही दोघे मुंबईत नव्हतो पण कानावर आलेलं गॉसिप याच अर्थाचं होतं, "अदिती आणि अभिर? काहीतरी चूक होत आहे का?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
व
वाटाड्या... गुरुवार, 12/18/2008 - 23:38 नवीन

अक्षरशः

असेच...माझ्या बायकोला तिच्या मैत्रीणीने हेच म्हटलेलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अनिल हटेला गुरुवार, 12/18/2008 - 11:26 नवीन

वाह वाह !!

छान चालू आहे जावई -सुना परीचय..... मजा आली वाचुन..... उरलेली मंडळी कधी येताये...... (शिंगल & खुष ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/18/2008 - 21:36 नवीन

मी परत

काही लिहिण्याची गरज नाही. पढवल्याप्रमाणे रंगरावांनी सगळं लिहिलय (नाहीतर धडगत नव्हती ना...).;) रेवती
  • Log in or register to post comments
भ
भिडू गुरुवार, 12/18/2008 - 23:38 नवीन

पुस्तक काढा

तात्या, हे सर्व अनुभव एकत्र करुन पुस्तक काढा. मजबूत खपेल. -भिडु
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Mon, 12/22/2008 - 16:14 नवीन

ही घ्या माझी उत्तरे...

ओळखीचे स्वरूप - किस्सा आहे... माझं इंजिनिअरिंग संपलं तेव्हा माझी एका मुलीशी ओळख झाली आणि तिच्याकडून माझ्या बायकोशी... ती मैत्रिण सायडिंगला पडली आणि आमची गाडी ट्रॅकवरून धावू लागली...:) विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? विवाहः- आंतरजातीय... बायको सी. के. पी अर्थातच प्रेम विवाह. भयंकर विरोध, माझ्याघरातून! नुकताच इंजिनिअर झालो होतो...ते ही गचके खात खात बोली भाषेतः- लै वेळा नापास होऊन (४ अक्षरी चार वर्षे) गाडी माझी धक्क्याला लागली होती...आणि बायको व्यवथित सेटल होती...तिचं त्यावेळी बुटीक होतं आणि मी नोकरीच्या शोधात...तिच्याघरातून तिच्या लग्नाचं बघत होते आणि हिचा जीव माझ्यावर!... एक ठरवलं होतं की, पळून जाऊन लग्न करायचं नाही...कधी कधी परीस्थिती बिकट वाटत असे... शेवटी २-२.५ वर्ष घासल्यानंतर २५ डिसेंबर २००५ ला लग्न लागलं...औंदा ३ वर्ष होतील...:) जोडीदाराच्या आवडीनिवडी, माझ्या- झोपा काढणे...दुपारीपण! त्यावरून तिची चिडचिड... दोघांनाही मासे प्र चं ड आवडतात...आणि पक्की सी के पी असल्यामुळे तिला मी आणलेले अजिबात पटत नाहीत, स्वत: जाऊन आणते. उत्तम सुगरण आहे...आणि खवय्यापण...लग्नाआधी मी अन्नभक्षण करणे एवढचं करायचो... लग्नानंतर चवीने खायला लागलो... छान चित्र/रांगोळी काढते... आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत एस एन डी टी पुणे कडून असणारी फेमस विद्यार्थिनी. फॅशन डिझायनिंग केलंय तिनं... दोन्ही घरातल्यांना सांभाळण्याची तारेवरची कसरत यशस्वीपणे चालू आहे तिची! नाटक, सिनेमा, मैफिली,फिरायची दोघांनाही आवड आहे...माणसं जोडायला मी तिच्याकडून शिकलो. तिला बाईक पण चालते फिरायला आणि मला कार शिवाय जायचा कंटाळा येतो...आणि गाडी स्पॉट पर्यंत जायला हवी हा माझा आग्रह असतो...त्यामुळे तिची इच्छा असूनही माथेरानला गेलेलो नाही अद्याप. पण आता जावसं वाटतंय...:) एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या- डायरेक्ट अशा नाहीत्...पण मी कामानिमित्त मुंबईत आणि ती घरी पुण्यात असल्यामुळे (मी ही अस्सल पुणेरी आहे पण गेले ६ महिने जॉब मुंबईत असल्यामुळे शुक्र. पुणे आणि सोम. मुंबईत येतो) आमच्या पावणे दोन वर्षाच्या मुलीचं सगळं तीच करते...मी आल्यावर फक्त २-३ दिवस मुलीला तयार करणे शी धुणे वगैरे कामं मी करावीत अशी रास्त अपेक्षा. त्यावरून. मी हरतो. एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? नाही. कारण मी सोम्-शुक्र मिपा हापिसातून एक्सेस करतो...आणि पुण्याला गेल्यावर पूर्ण वेळ त्या दोघींना देतो...संगणकाला हातही लावत नाही. मला तिचा खूप अभिमान वाटतो! टचवूड:) मी त्या दोघींना खूप खूप 'मिस' करतोय आणि त्या पण मला! :(
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 01/13/2017 - 05:49 नवीन

चांगला धागा आहे. सौ. ची

चांगला धागा आहे. सौ. ची परवानगी घेऊन आमच्याबद्दल लिहीन सावकाश. ;-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/13/2017 - 10:24 नवीन

:)

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा