<विखुरलेला चखणा>
प्रेरणा www.misalpav.com/node/32919
हल्ली कमीच झालंय माझं बारमध्ये जाणं
गेलोच तर हरपुन जात हळुहळु दुनियेचं भान.
हल्ली कमीच झालंय तसं रात्र रात्र तळमळणं,
मला बघुन मालकानं कमी केलयं उधाऱ्या देणं.
हल्ली कमीच झालंय आता मला मोगराबाईनं खुणावणं,
तिलाही झालंय सवयीचं गुपचूप पाकीट मारणं.
हल्ली कमीच झालंय घरी ऊशिरा येणं.
मलाच कसं नाही जमलं असं अवेळी लवकर येणं.
हल्ली कमीच केलंय मी ऐकणं माझ्याच मनाच,
तुझ्याकडे तरी आलंय का गं पार्सल माझं चखण्याच?
(वोडका का रम काय सुचना)
ही ही ही जमलय :)
जव्हेरगंज आगे बढो
सिम्प्ली भन्नाट
कविता मस्त.
मस्तच बुवा! हा चखणा चविष्ट
=))
कराओ तेवढा बदल! खासमखासचं आहे
जव्हेरगंज आता खरंच म्ह्णत
केला बघा.
शीर्षक राहीलं बघा.
जव्हेरगंज भौ
हॅत्त!
ओ भौ! या इकडं! सोय करतो!
मांत्रिक भौ की जय हो.....
च्यायला, हापेक्षांच वझं
जव्हेरगंज भौ