✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तू इथे असतीस तर....!

च — चांदणे संदीप, Sun, 09/13/2015 - 00:44
विविधभारतीच्या 'आपकी फर्माईश' मधली 'काही' गाणी इच्छा नसताना ऐकणे; त्यात मध्यरात्री हे कुत्र्यांचे भुंकणे; सर्व बाजूंनी गुणगुणना-या डासांची 'अ'मानवी ठरावी अशीच कत्तल करीत बसणे; मध्येच, बाहेरच्या रस्त्यावर, एखाद्या गाडीच्या चाकाला खड्ड्यात डोकावून पाहताना 'ब्रेक' नावाच्या सद्गृहस्थाने हासडलेली शिवी; अचानक लक्ष वेधून घेत पायाकडील भिंतीवरून सरसरत, जणू 'बोल्ट'चा १०० मीं चा विक्रम मोडीत आडोशाला गडप होणारी पाल; विनाकारण! फक्त त्रास द्यायच्या हेतूनेच, विचारलेलं नसतानाही, प्रत्येक सेकंदाला ओरडून वेळ सांगणारं घड्याळ; काय हिंमत होती या सा-यांची, मला त्रास द्यायची..... ....तू इथे असतीस तर....!

प्रतिक्रिया द्या
7010 वाचन

💬 प्रतिसाद (21)

छान आहे. बाकी विडंबनासाठी

एस
Sun, 09/13/2015 - 00:49 नवीन
छान आहे. बाकी विडंबनासाठी अत्यंत योग्य असा कच्चा माल आहे! :-)
  • Log in or register to post comments

सहमत! पण चांदणेसाहेब, दणकट

मांत्रिक
Sun, 09/13/2015 - 07:44 नवीन
सहमत! पण चांदणेसाहेब, दणकट लिहिता अगदी. मला तर आवडली कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मांत्रिकास आमचा टोटल प्लस वण!

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/22/2015 - 20:27 नवीन
मांत्रिकास आमचा टोटल प्लस वण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

क्या बात है...

चांदणे संदीप
Tue, 09/22/2015 - 21:19 नवीन
आत्मुबुवा धन्यवाद! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हा हा...

चांदणे संदीप
Sun, 09/13/2015 - 09:37 नवीन
अगदी...अगदी! विडंबन वाचायला खूप आवडेल! धमाल विषय आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हम्म्म

चाणक्य
Sun, 09/13/2015 - 00:59 नवीन
कल्पना चांगली होती खरं तर.
  • Log in or register to post comments

जबरदस्त...! दणकट लिहीलयं...!!

जव्हेरगंज
Sun, 09/13/2015 - 01:14 नवीन
जबरदस्त...! दणकट लिहीलयं...!! अफाट कल्पना...!!!
  • Log in or register to post comments

छान... आता विडंबनाची वाट

मदनबाण
Sun, 09/13/2015 - 10:11 नवीन
छान... आता विडंबनाची वाट पाहावी म्हणतो ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens
  • Log in or register to post comments

हां हां हां मस्तच

एक एकटा एकटाच
Sun, 09/13/2015 - 12:29 नवीन
हां हां हां मस्तच
  • Log in or register to post comments

अरे हसता काय राव?

प्यारे१
Sun, 09/13/2015 - 12:41 नवीन
अरे हसता काय राव? अतिशय टोचणारी कविता आहे. भयाण एकटेपणाची जाणीव यात. रात्रभर झोप न येऊ शकणार्‍या एखाद्या व्यक्तीची मनोव्यथा वगैरे.
  • Log in or register to post comments

फारच बुवा विनोदी तुम्ही!

रातराणी
Sun, 09/13/2015 - 12:48 नवीन
फारच बुवा विनोदी तुम्ही! असं कांही नाहीये. घाब्ल्लाय नुसता तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>>> ....तू इथे असतीस तर....!

प्यारे१
Sun, 09/13/2015 - 12:54 नवीन
>>>> ....तू इथे असतीस तर....! ती नाहीये त्याच्याजवळ याचं दु:ख जाणवतंय त्याला. कधी न जाणवणारे कुत्र्याचे नि गाड्याच्या ब्रेकचे आवाज, न जाणारा वेळ नि त्या घड्याळाची टिकटीक, भिंतीवरुन जाणारी पाल.... एकटेपणा खातोय ओ त्याला. कवी सांगेल म्हणा काय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

माणूस घाबरलेला असतो तेव्हाच

रातराणी
Sun, 09/13/2015 - 13:31 नवीन
माणूस घाबरलेला असतो तेव्हाच हे सगळ नोटीस करतो ओ. ऐका माझं. खरोखर आतून एकटेपण येतं तेव्हा बाहेर काय आहे याच्याशी काही घेणं देनं नसत. म्हणजे बघा, आज मनातला चंद्रही उदास हसत होता, तू दिसावीस म्हणून उघडली खिडकी, पण आता इतका काळोख झालाय की तुला मी अन मला तू दिसणारच नाही; शब्दाचेच खेळ मांडले होते, त्यांनीच मोडून टाकले, पैजाच लावल्या होत्या ग, तू गेलीस तेव्हापासून बघ कसे हसतायेत; कधी बहरला होता प्राजक्त इथे, फुल न फुल वेचून घेऊन गेलीस ना, तक्रार नाहीच ग तशी तुझीच होती ती पण उगीच माझ्या मनाला वाटत, मीही माझा उरलो असतो जरासा, तू इथे असतीस तर! हॆ कसं आपणही आपले न राहाण म्हणजे खोल खोल जाणवणार एकटेपण वाटत की नाही. ( वाटतच म्हणा बर का )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वा वा! बेश्ट. ऐकलो. वाटतं. ;)

प्यारे१
Sun, 09/13/2015 - 13:37 नवीन
वा वा! बेश्ट. ऐकलो. वाटतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

वाह सुरेख

एक एकटा एकटाच
Sun, 09/13/2015 - 13:50 नवीन
वाह सुरेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

अहो,

एक एकटा एकटाच
Sun, 09/13/2015 - 12:58 नवीन
अहो, पण ही कविता वाचुन एक कल्पना चाटून गेली की कवी इतर कुठल्याही गोष्टीला इतका घाबरत नाही जितका " ती " असताना घाबरतो की काय? म्हणुन हसू आवरल नाही. बाक़ी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काय एकेक प्रतिक्रिया...

चांदणे संदीप
Sun, 09/13/2015 - 13:58 नवीन
काय एकेक प्रतिक्रिया आहेत. हहपुवा झाली! प्यारे, रातराणी _____/\____ घ्या!
  • Log in or register to post comments

लई भारी..... पण अपुर्ण वाटली

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 09/13/2015 - 14:32 नवीन
शेवटच वाक्य राहिला आहे बहुतेक.......... मी पूर्ण करतो ....तू इथे असतीस तर....! आपण दोघेही एकदम जोरात ओरडलो असतो .......जागाते रहोऒऒऒ आता म्हणता येईल वाचमन चे मनोगत आवडले, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मस्त

ज्योति अळवणी
Sun, 09/13/2015 - 17:52 नवीन
मजा आली वाचताना... शेवटाकडे जमून गेली आहे कविता
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

चांदणे संदीप
Sun, 09/13/2015 - 20:11 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

लई भारी!

विश्वजित रामदास जाधव
Tue, 09/22/2015 - 20:22 नवीन
सॉल्लिड है बॉस!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा