ग्रेस . . (श्रद्धांजली - दि.२८ मार्च २०१२)
"प्रिय ग्रेस . . . . ."
दुःखाचा महाकवी होतास 'तू'
दुःख साजरे करायला
शिकवलस तू मला..
व्यथा अन वेदनांनाच जगण्याची भाषा केलीस तू
देवालाही ठावूक नसेल कुठल्या मातीचा बनला होतास तू,
काळजातल्या दुःखाला सहसा कुणीही हात लावत नाही
अन तुला मात्र काळजातल्या दुःखाशिवाय कधी काहीच रुचलं नाही..
दुःखाला तरल करायला सहजच जमायचं तुला
दुःखातही 'सुख' असते हे तुझ्यामुळेच कळले मला,
सुखालाही दुखावेल इतक्या सुंदरपणे तू दुःख साजरं करायचास
अन तितक्याच अभिमानाने ते जगासमोर मिरवायचासही…..
पण तू एक प्रमाद केलास.................
अनंताच्या प्रवासाला निघालास .....
खरं तर कुणालाच हा प्रवास चुकलेला नाही
पण ...
तू जरा अतीच घाई केलीस ....................
तुझही बरोबर आहे म्हणा
नाही तरी इथे तुझ्याशिवाय कोणामध्ये एवढी ताकद होती
'वैश्विक नश्वर सत्याला' हसत कवटाळण्याची?
तू गेल्याचं दुःख आहेच रे आम्हाला .........
पण तू येणारच नाहीस परत कधीही
याहून मोठे दुःख काय असणार?
तुझ्या नसण्याच दुःख
तुलाही मांडता येणार नव्हतं
म्हणून कदाचित ..............
श्रद्धांजली...
+ १. आवडले.
एस.योगी.......
आभार
आवडली.... _/\_
आवडले
त्यांच्या कविता गूढ असतात यात वाद नाही
योगी जी सुंदर शब्दात ग्रेस विषयीच्या भावना मांडल्यात
मला फार थोड्या कविता पुर्णपणे समजल्या अस म्हणायच होत
एस.योगी
मोहन गोखले ग्रेस च्या कवितांच सुंदर सादरीकरण करायचे
मोहन गोखले ग्रेस च्या कवितांच सुंदर सादरीकरण करायचे
समद्या भावना पोचल्या पण
काव्य काल सुचित होणेसाठी
अतिशय आवडली.
ग्रेस ...