Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुमारांच्या तावडीत...

श
श्रावण मोडक यांनी
Fri, 12/05/2008 - 18:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4854 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Fri, 12/05/2008 - 18:27 नवीन

आम्हाला

आम्हाला वाटले आमच्या प्रातःस्मरणीय परमपुजनीय सदगुरु केशवसुमारांबद्दल काही आहे की काय .. हुश्श .. बरे झाले काही नाही .. एक लढाई वाचली.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 12/05/2008 - 18:48 नवीन

अहो

अहो पेट्रोल स्वस्त झाले आहे.. आता विकेंडला थोडे बाहेर फिरुन येतो.... आणि सगळे राजकारणी सारखेच हो ! एकाला झाका दुसर्‍याला काढा... चालायचंच.. --(प्रातिनिधिक सुमार) लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 12/05/2008 - 19:04 नवीन

यापुढे जाऊन -

अनायसे परकीय प्रवाशांचा लोंढा थांबल्यामुळे भारतात पर्यटन स्वस्त झालेच आहे. आता तर काय? पेट्रोल,डिझेलही उतरले! वा! चला, निवडणूकीच्या आसपास रजा टाकून केरळ किंवा थंडी नसेल तर कुलू,मनालीला जाऊन येऊ. नाहीतरी मी मतदान करून काय उजेड पडणार ते दिसतेच आहे! ----(बेसुमार सुमार) विसुनाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
सुवर्णमयी Fri, 12/05/2008 - 19:33 नवीन

ह्म्म

मोडक, वेगळे काय घडले? काय करायचे कसे करायचे ते सर्व ठरलेले असते. त्यांना सुमार म्हणायला आधी आपण सुमार आहोत का असे प्रश्न मनात येतात आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्हीच दिले आहे. - स्वतःच्या हिताभोवतीच्या परीघात माणसे फिरत असतात. चार सुशि़क्षित माणसे काय फरक पडतो मतदान करून म्हणून करत नाही, किंवा अगदी जाऊन मतदान करतात पण सगळी चक्रे फिरवणारी मते वेगळीच आहेत आणि ती कशी मिळवायची ते उमेदवारांना माहिती आहे! त्यामुळे हे थांबणार कसे? एकापाठोपाठ एक घटना तशाच घडत गेल्या की हळूहळू काही जण हे असेच असते आणि असेच होईल असे मान्य करतात.. तसे झाले माझे असे म्हणू. दूर्घटना घडल्याचे वाईट नक्कीच वाटते पण त्यावर काही उपाययोजना करतील अशी आशा सुद्धा वाटत नाही..करावी अशी सदिच्छा. पण करू शकतील का? तेवढी पात्रता आहे का? इत्यादी प्रश्न फार गुंतागुंतीचे वाटतात. सोनाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
व
विकास Fri, 12/05/2008 - 19:25 नवीन

मला वाटले

मला वाटले लोकसत्तेत काहीतरी नेहमी प्रमाणे अग्रलेख आला की काय... ;) म्हणून वाचायला घेतले तर एक चांगला लेख वाचायला मिळाला. अधिक प्रतिसाद नंतर देतो.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/06/2008 - 00:48 नवीन

हेच म्हणते..

एक चांगला लेख वाचायला मिळाला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विजय राणे Sat, 12/06/2008 - 01:13 नवीन

धन्यवाद!

आपल्या लायकीप्रमाणेच आपल्याला सरकार मिळते, असे म्हणतात. आता राजकारणी सुमार आहेत हा त्यांचा दोष नाही. कारण आपणच सुमार आहोत. खरे की नाही? नसेल तर नाही म्हणा. आपल्या स्वार्थी वृत्तीमुळेच ते आपल्यावर राज्य करीत आहेत. वरील लेख लिहून तुम्ही स्वत: सुमार आहात, हे प्रांजळपणे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 12/06/2008 - 08:06 नवीन

खरये..... >>>एक

खरये..... >>>एक चांगला लेख वाचायला मिळाला. असेच म्हणतो..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 12/06/2008 - 09:29 नवीन

श्रावण,

श्रावण, छान लेख होता.... ... लेखाचा हताश शेवट सुद्धा अगदी अगदी प्रातिनिधिक आहे....मलाही असंच वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मैत्र Sat, 12/06/2008 - 10:27 नवीन

सहमत

+१.... उत्तम लेख..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 12/06/2008 - 11:33 नवीन

लेख चांगला

लेख चांगला वाटला!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 12/06/2008 - 12:35 नवीन

खुजेपणा/सुमारपणा

मला वाटते, खुजेपणा आणि सुमारपणा या गोष्टींकरता आपल्या पुढार्‍यांनाच केवळ दोष देऊन चालणार नाही. वर श्री. राणे यांनी "आपण सुद्धा सुमारच आहोत" अशा अर्थाचे विधान केले आहे , ते मला पटते. आपल्या कक्षेच्या , वर्तुळाच्या पलिकडे जाण्याची क्षमता फार थोड्या लोकांमध्ये असते. कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे. थोडे विषयांतर होईल , पण विषय राजकारणी लोकांचा चालला आहे, त्यामुळे मी जिथे आहे तिथल्या राजकारणाबद्दलच्या अत्यल्प अशा माहितीवरून मला असे दिसते की, ओबामा यांच्या निवडून येण्यामागे, त्यांच्या "ऑल्सो रॅन"पेक्षा वेगळे असण्याच्या प्रतिमेचाही भाग नि:संशय आहे. अर्थात हे म्हणजे अजून मैदानातच न उतरलेल्या खेळाडूबद्दल आधीच कौतुक वाटण्याजोगे आहे हे खरे , पण, सांगायची गोष्ट म्हणजे लोकांना सुमारपणापेक्षा काहीतरी वेगळे , असामान्यत्वाच्या निदान काही खाणाखुणा दाखवणारे काही हवे असते , त्याचे आकर्षण असते. तर , या सुमारपणाचा निकष लावून पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारंणात आशा वाटेल असा कुणी माईचा लाल राजकारणी सध्याच्या स्थितीत अस्तित्त्वात नाही असे दिसते. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही ,(आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे ) काही एक समज असणारे , करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. राजकारणातून हे दोघेही निवृत्त झालेलेनसले तरी एकूण परतीचे वारे सुरू झाल्यागत स्थिती दिसते. पण त्यांची पोकळी भरून काढणारे नेतृत्त्व अजून तयार झालेले दिसत नाही. यशवंतराव चव्हाण , वसंतरराव नाईक , वसांतदादा पाटील यांनंतर त्यांच्या इतके मोठेपण ज्याप्रमाणे (काँग्रेस च्या संदर्भात ) पवारानी मिळवले तितपत कुणी इतर आजतरी दिसत नाही.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 12/06/2008 - 13:36 नवीन

लेख आवडला आणि ...

कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे. सहमत. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही, (आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे) काही एक समज असणारे, करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. या दोघांमधे एक सूक्ष्म फरक करावा असं वाटतं. शरद पवार निवडणूका लढवून, कायदेशीर जबाबदारी घेऊनच राजकारण करत होते आणि करतात. बाळ ठाकरेंनी निवडणूक लढवल्याचे (भले ती राज्यसभेची असेल) माझ्यातरी माहितीत नाही. श्रावणकाकांचा लेख आवडला. आणि शेवट तर जास्तच आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
स्वाती दिनेश Sun, 12/07/2008 - 16:14 नवीन

असेच.

लेख आवडला. आणि शेवट तर जास्तच आवडला. अदितीसारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मृदुला Mon, 12/08/2008 - 04:53 नवीन

बहुमत

कारण आपण सारेच सुमार आहोत का?
नेते सार्‍यांचे नाही तर बहुसंख्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे सुमारांची बहुसंख्या आहे असे म्हणावे लागेल. पण माझ्यामते, प्रश्न कुवतीचा नसून क्षमतेच्या वापराचा आहे. बहुसंख्यांना आवश्यक तेव्हढे शिक्षण, ज्ञान नसण्याचा आहे. नेत्याचा मुलगा नेता ही सरंजामी मनोवृत्ती घासून काढता आली तरी प्रतिनिधित्वाचा दर्जा उंचावेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा