✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'शिववडा पाव' विरुध्द 'कांदे-पोहे'?

अ
अमोल केळकर यांनी
Wed, 11/26/2008 - 10:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3596 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

क
कपिल काळे Wed, 11/26/2008 - 10:50 नवीन

कोणते राहिले आहेत?

झुणका भाकर पण झाली आता पदार्थ कोणते राहिले आहेत? १थालीपीठ २फोडणीचा भात ३फोडणीची ( कालची)पोळी ४उपमा ( हा मराठी आहे का?) ५शिरा ( नको बुवा साजुक तुपामुळे एखाद्या जातीसमूहापुरता मर्यादित अपील ) ६. मिसळ पाव ( आपली रॊयल्टी आहे) ७. अजून काय? कांदा भजी वगैरे? एकेका पक्षाने त्याला साजेसा पदार्थ घ्यावा आपण सगळ्यांनी एका पक्षाला एक पदार्थ सुचवला तर?? सुचवा पाहू..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/26/2008 - 12:30 नवीन

आणि सांजा,

आणि सांजा, उकड, घावन, धिरडी यांनी काय हो घोडी मारली आहेत, कपिल काका? ते झानटामाटीक भाताचं पण कायतरी बघा ब्वॉ! (खादाड) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
श
शक्तिमान Wed, 11/26/2008 - 10:50 नवीन

तुलना होऊ शकत नाही

वडा पाव हा घाईगडबडीत खायचा पदार्थ आहे. तर कांदे पोहे हा आरामात बसून मजा लुटत खायचा पदार्थ आहे. त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही. आणि snack म्हणून वडापावचे स्थान अबाधितच राहणार आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/26/2008 - 11:58 नवीन

मर्द

मर्द मावळ्या... एकदा आमच्या इंदौरला फिरून ये... पोहे 'कसेही - कुठेही - कधीही' कसे खाता येतात ते समजेल मग तुला. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शक्तिमान
अ
अमोल केळकर Wed, 11/26/2008 - 12:37 नवीन

इंदौर चे

इंदौर चे पोहे आणि शेव मस्तच असते- -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
भ
भिंगरि Wed, 11/26/2008 - 13:16 नवीन

साबुदाणा

साबुदाणा खिचडि/साबुदाणा वडा ह्यापैकि एक मस्ट आहे :).
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 11/26/2008 - 13:26 नवीन

बिस्किट आंबाडे

बिस्किट आंबाडे तर मस्त चालतील. आधी दोघांनाही घरी बोलवुन खायला घालीन. ते दोघेही एकाचवेळी येतील असे बघीन. कोणीतरी एकाने हो म्हटले तर चालेल.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 11/26/2008 - 13:44 नवीन

नवीन आयडीया!!!

व्हेज / चिकन फ्रँकी प्रमाणे भाजी-पोळी-रोल उपक्रम पण राबविता येईल. आहाराच्या दृष्टीने चांगला, कॅरी करण्यास सोपा (वडापावसारखा), स्वस्त (वडापावइतकाच), रुचकर - आत एकदम टेष्टी भाज्या टाकायच्या (वडापावसारखाच) आणि पोट भरेल असा.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/26/2008 - 13:51 नवीन

खिचडी

सर्व पक्ष मिळुन खिचडी का विकत नाहित ? :? ++++ प्रसाद ++++ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।। http://papillonprasad.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
किट्टु Wed, 11/26/2008 - 14:26 नवीन

भाजी-पोळी-रोल

मनस्वी, तुझी आयडीया आवड्ली. इथे "नेदरलेंड" मधे पण 'रोटी रोल ' खुप प्रसिद्द आहे. आहाराच्या दृष्टीने चांगला आणि स्वस्त. :) -किट्टु.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Wed, 11/26/2008 - 20:43 नवीन

लापशी करायला हवी.

लापशी ही नाश्त्यामध्ये ठेवायला हरकत नाही. सध्या पक्षापक्षामध्ये असे वाटप होत असेल तर बसपाने लापशीचा प्रचार / प्रसार करावा असे नकळतच मनात आले. चला यानिमित्त्याने मराठी खाद्यपदार्थांना आणि खवैयांना चांगले दिवस येत असतील तर बरेच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गुंड्या Wed, 11/26/2008 - 21:03 नवीन

हे कसं वाट्तंय?

अळु वड्या आणि कोथिंबिरीच्या वड्या !!!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 11/26/2008 - 21:54 नवीन

हे

हे कुठल्या प्रदेशातून आणले जातात त्यावरुन ही राजकारण जोर धरु लागले आहे>>>>>>>>>> हा कॉन्ग्रेसचा रडीचा डाव आहे हे न कळणारा मुर्ख म्हणावा लागेल. शिवसेना शिववडा प्रसिद्ध करण्याच्या मागे बरेच दिवस आधीपासुन होतीच. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या नावाचा मक्ता काय फक्त शिवसेनेकडेच आहे का अशा प्रकारचा विरोध झालेला माझ्या लक्षात आहे. कदाचित शिवसेनेला मिळालेली प्रसिद्धी बघुन "इनो" पिउन कॉन्ग्रेस ने कांदापोहेचा कार्यक्रम ठेवला असेल. :) डिसक्लेमर : मी कोणत्याच पक्षाचा पुरस्कर्ता नाहि. इथे कॉन्ग्रेसचा सरळ सरळ रडीचा डाव दिसला म्हणुन लिहिल. (खरतर अस करुन आपण आपली लायकी काय आहे हे दाखवत आहे हे कळत नसेल का विद्वान लोकाना?? ) अवांतर : आता कांदापोहेचे कार्यक्रम बाहेरच्या बाहेर उरकता येतील नै :? अति अवांतर : स्टार प्रवाह नावाच एक नवीन चॅनेल सुरु झाल आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर एक सिरियल सुरु होणार आहे. निर्माता आहे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाइ. :) सध्या टेस्ट सिग्नल वर जे जे प्रोमोज पाहिले त्यावरुन तरी आश्वासक वाटत आहे सिरियल. जे आषुतोष गोवारीकरने कराव अशी माझी वैयक्तीक इच्छा होती ती नितीन देसाई यानी पुर्ण केली बॉ. बघाच. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा