✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

करार

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sun, 05/17/2015 - 10:24
तिला पहिल्यांदा पाहिल तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो तिचे टपोरे डोळे, लांबसडक केस आणि त्यात माळलेला तो मोगर्‍याचा गजरा पण मला ह्यातले काहिच दिसले नव्हते कारण ती माझ्या कडे बघुन जेव्हा हसली तेव्हा तिच्या गालावर पडलेल्या खळीने मी घायाळ झालो होतो. जळी स्थळी, काष्ठी पाषाणी मला तिच दिसत होती प्रेम ही माझी गरज होती लग्न ही तिची मी तिची अडचण समजाउन घेतली आणि मग मी तिच्याशी एक करार केला परत भेटण्याचा. जस प्रेम एकतर्फि होत तसाच हा करार पण होता पण शेवटी करार हा करारच असतो मग मी प्रेम करतच राहिलो आणि ती लग्न करुन निघून गेली पण माझा स्वतःवर विश्र्वास होता आणि तिच्यावरही मी तिची वाट बघत थांबलो मला खात्री होती एक ना एक दिवस ती परत येणार आणि तसेच झाले एक दिवस ती माझ्या कडे आली कोणाचा विश्र्वास बसणार नाही पण खरच एक दिवस ती माझ्या कडे आली स्वतःच्या पायांनी चालत ती माझ्या कडे आली माझ्या समोर येउन उभी राहिली माझ्या डोळ्यात डोळे घालून कितीतरीवेळ पहात राहिली माझ्या डोळ्यात ती काय शोधत होती कोण जाणे पण मी मात्र तिच्या डोळ्यांच्या दर्या मधे उडी मारुन मनसोक्त पोहून घेतले ती अजूनही तशीच होती जशी पहिल्यांदा दिसली होती तशीच गालावरची जी खळी बघुन मी पागल झालो होतो ती खळी देखील तशीच होती आगदी तशीच बराचवेळ एकमेकांकडे पाहिल्यावर ती दचकून भानावर आली आणि म्हणाली "काय करतोस कसा आहेस? बर्‍याच वर्षांनी दिसलास" आणि मग कडेवरच्या नातवा कडे बघत म्हणाली "या अजोबांना ओळखलस का?" मला पुढले काहीच ऐकू आले नाही. पुढच काही ऐकुन घेण्याची गरजच नव्हती. तिने करार पाळला होता आणि अता मला देखिल आता माझे उरलेले आयुष्य समाधानाने जगायचे एक सबळ कारण मिळाले होते कारण आता मी तिच्याशी दूसरा करार केला होता पुढच्या जन्मी सुध्दा तिच्यावरच प्रेम करत रहाण्याचा एकतर्फिच असला तरी करार हा करारच असतो. आणि प्रेम हे प्रेमच असते. पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
4663 वाचन

💬 प्रतिसाद (6)

का कुणास ठाऊक, कविता वाचून

चित्रगुप्त
Sun, 05/17/2015 - 10:34 नवीन
का कुणास ठाऊक, कविता वाचून गाणे आठवले: "जाने क्या ढूंढती रहती है ये आंखें मुझ मे .. राख के ढेर मे, शोला है न चिन्गारी है ...."
  • Log in or register to post comments

मस्त

मिसळलेला काव्यप्रेमी
Sun, 05/17/2015 - 11:51 नवीन
मस्त मस्त!
  • Log in or register to post comments

वाह!

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/18/2015 - 09:06 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

मस्त!!

सूड
Tue, 05/19/2015 - 19:15 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Tue, 05/19/2015 - 19:17 नवीन
प्रेम आवडलं अन करार पण!
  • Log in or register to post comments

पैजारबुवा

नाखु
Wed, 05/20/2015 - 08:59 नवीन
कराराची (द)मदार प्रेमांकीत प्रत स्वीकारली आहे. एकतर्फी कराराचा शिलेदार नाखु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा