Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खव्वयांसाठी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी आणि हैदराबाद मधिल हॉटेलांची यादी [त्यातल्या त्यात सामिश भोजन]

स
संताजी धनाजी यांनी
Sat, 11/22/2008 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
71651 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

उ
उम्मि Sat, 11/22/2008 - 11:09 नवीन

छान!

पण एखाद्या होटेलचा सविस्तर पत्ता मिळेल काय?? मानलं बुवा!!! समस्त खवय्यांचे तुम्हांस आशिर्वाद............................. एक खवय्या, उम्मि.
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Mon, 11/24/2008 - 14:02 नवीन

अहो हे

अहो हे आपल्या सर्वांसाठीच तर केले :) लोभ असावा. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उम्मि
न
निखिलराव Sat, 11/22/2008 - 12:40 नवीन

वा..

जबद्स्त डाटा मिळाला. पुस्तकच काड्तो.... धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
स
सुनील मोहन Sat, 11/22/2008 - 15:26 नवीन

हॉटेल नागपूर

हॉटेल नागपूर. टिळक स्मारक मन्दिराकडून पेरुगेट पोलिस चौकीकडे जावे. साधारण शन्भर कदम चालल्यावर (पन्चनामा) डावीकडे हे हॉटेल आहे. हॉटेल ओळखायची खूण म्हणजे इथे भिन्तीकडे तोन्ड करुन जेवणारे लोक दिसतील. आणि बाहेर किमान १०-१५ जण आशाळभूत नजरेने त्यान्च्याकडे पहात असलेले असतील!!!!! पण इथले मटण रस्सा, पुलाव, अ प्र ति म. बिर्याणी अनेक ठिकाणी मिळते पण मटण पुलाव मात्र इथे सुरेख मिळतो. अजून एक खासियत म्हणजे इथला भेजा फ्राय. हे लिहून झाल्यावर तडक हॉटेल नागपूर गाठणार आहे कारण लिहितानाच तोन्डाला पाणी सुटले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 11/22/2008 - 16:18 नवीन

बघा, पुण्या

बघा, पुण्यातच ५० ठिकाणे सापडली.:) मुंबई व ठाणे मिळून साधारण २५ हॉटेल्स. पुणेकर लोक किती रसिक व चोखंदळ असतात ह्याचा हा पुरावाच.;) अरे महाराष्ट्रातली इतर ठिकाणे हि येउद्यात रे. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 11/22/2008 - 18:02 नवीन

सर्वांना एक कळकळीची विनंती

कृपया यातून पुणे वि. मुंबई असा वाद सुरु करू नये ही नम्र विनंती. (अभिज्ञराव, कृपय वैयक्तिक घेउ नये.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
स
संताजी धनाजी Sat, 11/22/2008 - 19:14 नवीन

मीही तेच

मीही तेच म्हणणार होतो. :D महाराष्ट्रातली इतर ठिकाणे जरुर येवुदेत की! - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
क
कलंत्री Sat, 11/22/2008 - 18:28 नवीन

मिपावर वेगळे सदरच हवे.

भारतातील लोक खवय्ये समजले जातात. मिपावर यासाठी वेगळे सदरच हवे, उदा. पाककृती, चर्चा, काव्य इत्यादी सारखे. म्हणजे देशातील अथवा जगातील उत्तम खाद्यतिर्थक्षेत्राची यादी कोणालाही विनासायास मिळु शकेल. सरपंचानी विचार करावा.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Sat, 11/22/2008 - 18:30 नवीन

कॅफे बहार, हैदराबाद

कॅफे बहार हे आर.टी. सी. क्रॉसला नसून हिमायतनगरजवळ आहे. बिर्यानी वोक्के असते. पत्थर का गोश्त खायचे असेल तर बडे मिया - टँक बंड (हुसन सागर) ट्राय करावे. पाया - इरानी रोटी वगैरे खायचे असेल तर नायगारा - कवाडीगुडा किंवा मदीना... हैदराबादी बिरयानी आणि दख्खन चवींसाठी 'हैदराबाद हाऊस' च्या आता ठिकठिकाणी शाखा सुरू झाल्यात. सर्वच उत्तम! आंध्रा चवीचे मटनबिटन, मासेबिसे (मटन फ्राय मसाला, चापल पुलुसु/ अपोलो फिश) अभिरुची - आरटीसी क्रॉस रोड. तित्तर-बटेर 'फिश लँड'-लकडी - का- पूल कधीकधी मिळतात. मरोळ (गोड्या पाण्यातला मासा) फस्क्लास! ईरानी चाय शौकिन बहार - वाय एम सी ए , सिकंदराबाद येथे जाऊ शकतात. तिथली बिर्यानीसुद्धा लै भारी. पिव्वर शाकाहारी ("तिकडचे चमचेसुद्धा चालत नाहीत आम्हाला!") लोकांनी मिनर्व्हा- हिमायतनगर, पंचरत्न- काचीगुडा आणि अन्नपूर्णा- शंकरमठ इ. ठिकाणे ट्राय करावीत. बाकी आजकाल अप्टाऊन ईटरीज सगळ्या बंजारा हिल्स, ज्युबिली हिल्स परिसरात आहेत. अंगिठी, तबला ही काही प्रसिद्ध नावे. तिकडे खान-पान इ. सोयी आहेत. मेक्सिकन, थाय वगैरे तेथे मिळेल.
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Sat, 11/22/2008 - 19:22 नवीन

वरील

वरील माहीती घेवुन लेख अद्ययावत केला आहे. आभारी आहे :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
न
नंदन Mon, 11/24/2008 - 12:57 नवीन

बार्बेक्यू नेशन, हैदराबाद

कबाब, बिर्याणी बर्‍यापैकी असतात, पण बुफे प्रकारातले उत्तम जेवण.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
द
दत्ता काळे Sat, 11/22/2008 - 19:23 नवीन

ईतर दुसरी हॉटेल्स

१. वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटाच्या पहिल्या वळणाच्या आधी डाव्या हाताला " हॉटेल सिध्दगिरी " - स्पेश्यालिटी : मटण भाकरी, लिमिटेड डिश असतात म्हणून लवकर जावे. फक्त संध्याकाळी , ( आपली बाटली घेऊन बसायची सोय आहे ), जेवण १नंबर, म्हणून मापात टाकावी. २. हॉटेल तोरणा विहार - वेल्हा - तोरण्याच्या पायथ्याशी, पोलीस स्टेशन शेजारी - कमीत कमी दोन दिवस उ पा शी राहुन नंतर जे वणासाठी जाणे लईईईच्च भारी.
  • Log in or register to post comments
स
सागर Sat, 11/22/2008 - 22:59 नवीन

पुण्याच्या जोशीबाईंचे फ्रेंड्स हॉटेल राहिले हो यादीत

पुण्याच्या जोशीबाईंचे फ्रेंड्स हॉटेल राहिले हो यादीत, तेवढे वाढवून घ्या... जोशीबाईं बनवतात तसा मासा पुण्यात मिळत नाही अशी त्या ठिकाणची ख्याती बर्‍याच वर्षांपासून आहे. बहुतेक फ्रेंड्स नाव आहे हॉटेलचे...फर्ग्युसन कॉलेजजवळ ज्ञानेश्वर पादुका चौकातून पुणे युनिव्हर्सिटीकडे जाताना एका चौकाच्या कॉर्नरलाच आहे ते. त्याच्या पलिकडच्या बाजूलाच भाजीवाल्यांचे गाळे आहेत, ही ओळखायची खूण (मासाप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments
व
व्यंकु Sun, 11/23/2008 - 11:42 नवीन

दुरुस्ती

वरती उल्लेख केल्याप्रमाणे रत्नागिरीतील आमंत्रण हॉटेल एसटी स्टॅँडजवळ नसुन एसटी डेपो(वर्कशॉप) जवळ आहे चोकशी करतेवेळी 'माळनाका' असा उल्लेख करावा आपला रत्नागिरीचा व्यंकु
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Mon, 11/24/2008 - 12:38 नवीन

वोक्के...

बॉस! थांकू बरं का! :) मला एड्रेस नीट माहीत नव्हता...म्हणून जरा घोटाळा झाला... पुढ्ल्या रत्नागिरी ट्रिप ला जाताना पुन्हा नक्की जाईन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकु
स
संताजी धनाजी Mon, 11/24/2008 - 14:11 नवीन

अद्ययावत

अद्ययावत केले. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकु
श
शैलेन्द्र Sun, 11/23/2008 - 13:16 नवीन

डोंबिवलीच

डोंबिवलीचे "सत्कार" टीळक टॉकीज मागे.. उत्तम मासे आणि भाकरी, शिवाय परवडणारे दर..
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Mon, 11/24/2008 - 14:13 नवीन

अद्ययावत

अद्ययावत केले. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
ब
बन्ड्या Sun, 11/23/2008 - 15:39 नवीन

कोल्हापुरात हॉटेलं कसली शोधताय राव....

जुन्या कोल्हापुरात म्हन्जे पेठांत असाल तर सरळ कुठल्याही घरगुती खानावळीत घुसायचं ..(फक्त बघुन काही खानावळी फक्त शाकाहारी आहेत) चांगलं जेवण मिळनार.. पुण्यात कोल्हापुरी च्या नावखाली जो फक्त लाल तिखट जाळ असनारं फुळुक पाणी देत्यात च्यामारी... चक्कीत जाळ होतो ! (जाळ हा त्यातल्या तिखटा मुळे नाही ). अवो शहरातल्या नवीन भागात ही कीती तरी चांगली हॉटेलं आहेत... ओपेल >>जुना पुणे बेंगलोर रोड तंदुर >> जुना पुणे बेंगलोर रोड अयोध्या >> कावळा नाका राजधानी >> रुईकर कोलनी सायबा >> राजारामपुरी जनता बझार मागे शेतकरी धाबा >> फुलेवाडी पद्मा गेस्ट हाऊस >> धैर्यप्रसाद हॉल शेजारी पर्ल >> सी.बी.एस. जवळ आपला कोल्हापुरी ...बन्ड्या
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Mon, 11/24/2008 - 14:15 नवीन

अद्ययावत

अद्ययावत केले. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्ड्या
उ
उमराणी सरकार Sun, 11/08/2009 - 20:58 नवीन

परख

मार्केट यार्ड समोरील 'परख' चा उल्लेख आवश्यक आहे. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्ड्या
म
मैत्र Mon, 11/24/2008 - 14:39 नवीन

हैदराबाद

१. पॅराडाइज - हे पॅराडाइज सर्कल सिकंदराबाद इथे आहे. आर टी सी क्रॉस रोडला नाही. २. चटणीज -- नागार्जुना हिल्स - ज्युबिलीकडून पंजागुट्टाला जाताना डाव्या बाजूला - याहून उत्तम दक्षिण भारतीय हैदराबाद मध्ये नाही. इडली, "स्टीम डोसा", एम एल ए पेसरट्टू ही विशेष खासियत. दक्षिण भारतीय अनलिमिटेड थाळी ही मिळते. ३. चटणीज - शेजारी एक बफे पण आहे जिथे उत्तर व दक्षिण भारतीय असा अनलिमिटेड बफे आहे. असंख्य पदार्थ आणि डेझर्टस. उत्तम आहे. चटणीज पूर्ण शाकाहारी आहे. ४. अंगिठी - केअर हॉस्पिटल समोर -- मासाब टँक कडुन पंजागुट्टा कडे जाताना. जबरदस्त उत्तर भारतीय बफे. वेगवेगळे पण मागवता येतात पण बरंच महाग आहे. शोरबा सही असतो. सामिष निरामिष दोन्ही उत्तम आहे. ५. ओहरीज - बशीर बाग आणि बंजारा हिल्स रोड नं १२ - बेष्ट चायनीज - अतिशय ऑथेन्टिक चायनीज, सुंदर चायनीज सजावट. बांबू राइस ही पोकळ बांबू मध्ये बांबू शूट्स सह केलेली रेसिपी छान आहे. बिर्याणी बफे असतो. हॅवमोर नावाचे त्यांचे आइस्क्रीम आहे. तिथले आइस्क्रीम आणि संडेज ला तोड नाही. ६. व्हेन्यू - नामपल्ली - हैदराबाद स्टेशन समोर क्वालिटी इन रेसिडेन्सी हे प्रसिद्ध ३/४ तारांकित हॉटेल आहे. त्याला जोडलेले रेस्टॉरंट. निजामी पद्धतीचे शाही सामिष पदार्थ. निजामी सजावट आणि रचना मस्त आहे. महाग आहे पण एका डिश मध्ये पदार्थाची क्वांटिटी बरिच येते.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/02/2008 - 22:11 नवीन

चटनीज्

केवळ चविष्ट. चटनीज् चे बांधकाम चालू असल्यापासून बधत होते. नंतर बरेच शकाहारी पदार्थ चाखले, अगदी उपमा सुद्धा चविष्ट आहे. छान आठवणी आहेत चटनीज् च्या. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मनस्वी Mon, 11/24/2008 - 15:48 नवीन

हैदराबाद

हैदराबाद बिर्याणीसाठी उत्तम पर्याय : १. पॅराडाइज २. बावर्ची शाकाहारी / मांसाहारीसाठी उत्तम पर्याय : १. अंगीठी (बंजारा हिल्स) - दुपारचा बफेही मस्त, महाग पण उत्तम २. बार्बेक्यू नेशन (बंजारा हिल्स) ३. पंजाबी ढाबा (गच्चीबोली-कोंडापूर सिग्नलच्या चौकात) - स्वस्त आणि मस्त ४. मालगुडी (निरनिराळी आऊटलेट्स) ५. बी.जे.एन. (बंजारा हिल्स) ६. ईरानी चाय (ज्युबिली हिल्स, रोड नं १०) ७. हवेली (कोंडापूर) - कै च्या कै महाग ८. अवर पॅलेस (बंजारा हिल्स, रोड नं १०) शाकाहारीसाठी उत्तम पर्याय : १. चटनीज् (शेजारील बफे टुकार आहे) २. ओहरीज् (मल्टीकसीन) - कै च्या कै महाग
  • Log in or register to post comments
उ
उमराणी सरकार Sun, 11/08/2009 - 21:00 नवीन

पिस्ता हाउस

४ मिनार जवळचे पिस्ता हाउस देखील बिर्याणीसाठी उत्तम. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
स
संताजी धनाजी Mon, 11/24/2008 - 16:41 नवीन

वा! काय

वा! काय यादी झाली आहे. तोंडाला भयंकर पाणी सुटले आहे. =P~ आता आठवड्यातुन एकदा तरी एकेका हॉटेलात जायचा बेत आहे. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Mon, 11/24/2008 - 17:04 नवीन

संताजी धनाजी साहेब...

एक आणखी अपडेट करणार का... प्रभात पो. चौ. समोरील, करी ऑन द रूफ (कॉन्टिनेंटल साठी) पुणे. कमला नेहरू पार्क कडून कर्वे रस्त्याला जाताना, घोडके बंधू मिठाई चौकात उजवीकडे वळालं की डाव्या हाताला. वीटकरी रंगाची इमारत आहे. किंवा एस्.एन्.डी.टी कॉलेज कडून 'कल्याण' भेळवाल्याकडून पुढे आलं की 'टी' जंक्शन ला उजवीकडे वळाल्यावर डाव्या बाजूस प्रभात पो. चौ. आहे आणि बरोब्बर त्याच्या समोर उजव्या हाताला 'करी ऑन द रूफ' आहे.
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Mon, 11/24/2008 - 19:12 नवीन

अद्ययावत

अद्ययावत केले. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केवळ_विशेष
व
विजुभाऊ Mon, 11/24/2008 - 19:09 नवीन

सदाशिव

सदाशिव पेठेतल्या " नागपूर " हाटेलची खासीयत म्हणजे इथे समोरासमोर बसुन खाता येत नाही. सगळी माणसे भिन्तीकडे तोंड करुन बैलानी गव्हाणीत आम्बोण खावे तशी भिन्तीकडे तोन्ड करुन खात असतात मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Tue, 11/25/2008 - 16:31 नवीन

मालवण समुद्र

आजच पिंपरी चिचवड मधील मालवण समुद्र मध्ये जावुन आलो. मांदेली फ्राय, बोंबील फ्राय, भरलेला पापलेट, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय आणि कोळंबी भात मागवला होता. अतिशय उत्तम जेवण होते. सोबतीला सोलकढी होतीच :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Tue, 11/25/2008 - 18:21 नवीन

रत्नागिरीत प्रशांत लंच होम

रत्नागिरीत विहार वैभव लॉज व जिल्हा माहिती कार्यालयाजवळ, बंदर रोडला प्रशांत लंच होम आहे. टिपीकल मालवणी जेवणाचा स्वाद घ्यायला उत्तम ठिकाण! उत्तम मासे खायला मिळतात. अस्सल मालवणी सोलकढी कशी असते याचा स्वाद येथे जाऊन घ्यावा, म्हणजे अनेकदा सोलकढीच्या नावाखाली आपण जे काही पितो ते किती फिके आहे याचा अंदाज येतो. आताही मी कल्पनेत प्रशांत मध्ये मासे हादडतो आहे!
  • Log in or register to post comments
व
व्यंकु Tue, 11/25/2008 - 21:32 नवीन

व्वा

वा राव प्रशांत मधले मासे म्हंजी लय बेश्ट बघा
  • Log in or register to post comments
म
मैत्र Wed, 11/26/2008 - 09:43 नवीन

एक नंबर

प्रशांत लंच होम झकास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकु
अ
अनंत छंदी Wed, 11/26/2008 - 21:32 नवीन

हे काय? हॉटेलं संपली?......

प्रतिसाद थंडावलेला दिसतोय! हॉटेलं संपली की सगळे उपोषण करतायत? हॉटेलं संपली असली तर मला वाटतं खाद्यपदार्थांच्या गाड्या, स्टॉल्स, ठेले , धाबे अजून शिल्लक आहेत. माझ्याकडून काही भर... कराड बसस्थानकासमोर रात्रीच्यावेळी एक आटीव दुधाची हातगाडी लागते. साखर, वेलची घालून आटवून रवाळ झालेले गरमागरम दूध मोठ्या ग्लासात ओतून तो गाडीवाला चमचाभर खवा घालून आपल्या हातात देतो. अशी मस्त चव लागते, की काही विचारू नका. एका वेळी चार ग्लासचा आपला रेकॉर्ड आहे. तो गाडीवालाही कुठून हा दुष्काळग्रस्त आला? अशा नजरेने पहात राहिला होता.
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Tue, 12/02/2008 - 15:13 नवीन

हो ना! आता

हो ना! आता नेमके मुंबईला पाहुणे आले होते आणि येवुन वरती पण गेले, त्यामुळे सगळे जण त्यांचा समाचार घ्यायला गेले आहेत. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी
भ
भिडू Tue, 12/02/2008 - 21:09 नवीन

बँगलोर - कलमी कबाब

इथे बँगलोर ला कलमी कबाब नावाची चिकन तन्दुरी सारखी मस्त डिश मिळते....हे कबाब खूप सॉफ्ट असतात्..आणि स्पाईसी ही......चव अर्थातच उत्तम....त्यातुन जोडिला बाटली असेल तर चव अजुनच वाढते.हि डीश इथे कुठल्याहि नॉन्-व्हेज होटेल मधे मिळते. पण इथे मी २/३ ठिकाणी चिकन लॉलिपॉप ट्राय केले...चव एकदम बेकार्...आणि आकार पण लहान्.कोनाला बॅगलोर मधली फूड जॉईन्ट्स माहीत आहेत का?
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 12/02/2008 - 23:33 नवीन

बांद्रा इथलं सायबा !

संताजी धनाजी... मुंबईच्या यादीत बांद्रा इथलं सायबा टाका की राव ... मालवणी जेवण, विशेषतः तिसर्‍या मसला अप्रतिअम. नक्की पत्ता तात्या किंवा कुणी अस्सल मत्स्यप्रेमी मुंबईकर देऊ शकेल
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 09/02/2009 - 19:18 नवीन

सायबा

एस. व्ही. रोडवर जामा मशिदीच्या समोर आहे. (मला वाटते त्या बिल्डींगचे नाव 'झरीन' असावे--- तेथे सुप्रसिद्ध सरोद वादक श्रीमति झरीन दारुवाला राहतात).-- माहिमकडून बांद्र्याकडे जातांना पश्चिम महामार्गाचा फाटा गेला की जरा पुढे गेल्यावर डाव्या हातास हे लागेल-बरोबर समोर, आपल्या उजव्या बाजूस जामा मस्जिद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
प
पर्नल नेने मराठे Wed, 09/02/2009 - 15:46 नवीन

'पेनिन्सुल

'पेनिन्सुला' सायन सर्कलला. चुचु
  • Log in or register to post comments
अ
अमित बेधुन्द म… Wed, 09/02/2009 - 16:48 नवीन

पुरेपुर

पुरेपुर कोल्हापुर लै भरि
  • Log in or register to post comments
त
तर्री Wed, 09/02/2009 - 17:52 नवीन

मुलुंड / ठाणे

१.गोमांतक : पोस्टाच्या गल्लीत. ( थाळी झकास) २. विश्व सम्राट व अथीती : मुलुंड (प) ३. निसर्ग : ला.ब. शास्त्री मार्गावर ठाण्यात गेल्यावर्षी लेरीदा / विहंग / सत्कार रेसिसन्सी ही ३ त्रीतारांकीत हॉटेले झालीत. जरूर जावे आशी. बुफे : अनलिमिटेड , नोन वेज रु.२७५ /-
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 09/02/2009 - 21:08 नवीन

..शिवाय

ठाण्यात गेल्यावर्षी लेरीदा / विहंग / सत्कार रेसिसन्सी ही ३ त्रीतारांकीत हॉटेले झालीत. जरूर जावे आशी. बुफे : अनलिमिटेड , नोन वेज रु.२७५ /- आणि विहंगमध्ये अनलिमिटेट बुफेसोबत एक ग्लास वाइन अथवा बियर कॉम्प्लिमेंटरी!! लेरिडा/सत्कारबद्दल कल्पना नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
स
सुर Tue, 10/09/2012 - 11:03 नवीन

क्रूपया विहंग चा पत्ता मिळु

क्रूपया विहंग चा पत्ता मिळु शकेल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
अ
अत्रन्गि पाउस Mon, 12/24/2012 - 21:57 नवीन

ते महेश लंच होमे मधले

ओतप्रोत बटर चिकन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
संजय अभ्यंकर Wed, 09/02/2009 - 19:22 नवीन

महाराष्ट्रा बाहेर...

भोपाळ: मांसाहारा साठी: हकिम रेस्टॉरंट (ह्याच्या शाखाही आहेत). शुद्ध शाकाहारी: बापु की कुटिया (दोन्ही रेस्टीरंट्स महाराणा प्रताप चौकात आमोरे सामोरे) दिल्लीत: पॉट पौरी, का के दा होटलः दोन्ही कॅनॉट प्लेस मध्ये सुपर बझार जवळ) दोन्ही मांसाहारी हॉटेल पेशावरी (शाकाहारी), निरुलाज (सामिष) अजमलखाँ रोडवर पो. चौकी जवळ कलकत्ता: कॅमॅक स्ट्रीटवर (रोबिंद्रो शॉदन स्टेशन कडचे टोक) ३-४ फास्ट फूड वाले आहेत. त्यांच्या कडे फक्त रोल्स मिळतात. पोळी किंवा पराठ्यात शाकाहारी व मंसाहारी पदार्थ भरून रोल बनवतात. चवीष्ट मॉछे झोल (फिश करी) खायचा असेल तर कुठल्याही भागातले अतीशय कळकट होटेल शोधावे, तशी चव हाय फाय हॉटेलांत नाही. डमडम विमानतळाजवळ स्टाफ कँटीन बेष्ट. चेन्नई मध्ये: सरवणा भवन: शुद्ध व अप्रतीम शाकाहारी. ह्याची कैमा इडली नावाची डीश बेष्ट (संपूर्ण चेन्नई भर शाखा तसेच परदेशातही काही ठिकाणी शाखा. वसंत भवनः शुद्ध शाकाहारी: संपुर्ण चेन्नईभर शाखा अंज्जापार: खास मध्य तामीळनाडू मधल्या (चेट्टीनाड स्टाईल)मांसाहारी डीशेस मिळतात. सशाची सागुती मिळते. चेन्नईत सर्वत्र शाखा कराईकुडी: खास तामीळ सीफूड (राधाकॄष्ण सालै वर (सवेराहॉटेल जवळ, निलगिरिज हॉटेलच्या समोर) संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 09/03/2009 - 02:07 नवीन

अंजप्पार

आहाहा.... आता पुन्हा एकदा जायला पाहिजे...सुदैवाने अंजप्पारची शाखा न्यू जर्सीलाही आहे आणि मस्त झणझणीत जेवण असतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 09/03/2009 - 11:07 नवीन

सरवणा भवन:

सरवणा भवन: शुद्ध व अप्रतीम शाकाहारी. ह्याची कैमा इडली नावाची डीश बेष्ट (संपूर्ण चेन्नई भर शाखा तसेच परदेशातही काही ठिकाणी शाखा. मलाही आवड्ते सर्वणा भवन..... चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 09/03/2009 - 11:18 नवीन

हम्म्म!

सर्वणा भवन खरोख्रर चांगले! सात्विक अन् शुद्ध शाकाहारी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 09/03/2009 - 12:01 नवीन

माझा मित्र

माझा मित्र म्हण्तो कि तिक्दे सग्ले अण्णा असतात म्हणुन ते सर्वणा भवन ;) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
विंजिनेर गुरुवार, 09/03/2009 - 11:10 नवीन

चेन्नई

चेन्नई मध्ये:
अजून काही: जी आर टी ग्रँड डेज् : पंचतारांकित (असून सुद्धा!) अतिशय चविष्ट जेवणासाठी प्रसिद्ध. विषेशतः चेट्टीनाड आणि मल्लू पदार्थांसाठी महशूर. ह्यांचा बफे साधाराणतः ३००/- पर्यंत असतो चेनैच्या विमानतळावर वडाकरी डोसा मिळतो. तो सुद्धा खासच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा